तुळस म्हटलं की झुपकेदार तुळस व टोकाला मंजीरी असं दृश्य डोळ्यांसमोर येत. बाल्कनी आणि ग्रील मध्ये दाटीवाटीने झाडं असल्याने बहुतांशी कुंड्यांमध्ये हवेने कींवा इतरत्र कारणाने मंजीरी पडुन तुळशीची रोपटी येत रहायची. अशी रोपटी एकत्र एका कुंडीत जमा करू लागले म्हणून, ह्या लेखाच नाव "One Pot तुळस" ठेवलं आहे. सध्या एकुण ४ प्रकारच्या तुळशी ह्यात लावल्या आहेत. राम तुळस, कृष्ण तुळस, कापुर तुळस आणि सब्जा.
तुळस ही नेहमी मोठ्या आकाराच्या चौकोनी कुंडीत लावावी. त्यामुळे मुळांचे वेटोळे होऊन (Root Bounding) तुळस मरत नाहीत. तुळशीला जर सुर्यप्रकाश कमी मिळत असेल तर पाण्याचे प्रमाण सुध्दा कमी ठेवावे. एका कुंडीत नेहमी तुळशीची एका पेक्षा अधिक रोपटी लावावी.
साधारणतः तुळशीच्या मंजीरी खुडल्या तर तुळस मरत नाही. परंतु, मंजीरी तश्याच ठेवल्याने चिमण्या आणि pollinators जास्त प्रमाणात येतात. आणि ह्या मंजीरींची अजून रोप तयार होऊन cycle चालू राहते.
तुळस सारखी मरत असल्यास कोणत्याही फुलझाड असलेल्या कुंडीत (झेंडू वगळता) कींवा कढीपत्ता, लींबाच्या कुंडीत तुळस लावावी. तुळस ही नेहमी दुसऱ्या झाडाबरोबर छान वाढते.
तुळशीला प्रखर सुर्यप्रकाश गरजेचा आहे आणि त्याला कोणताही दुसरा पर्याय नाही. एखाद्या वेळेस तुळशीला कमी पाणी दिलं तर चालेल परंतु, जास्त पाणी देऊ नये.
कापुर तुळस ही सर्वात सोप्पी, भराभर वाढणारी आणि देखणी तुळस आहे. त्यामुळे, तुळस वाढवण्यात अडचणी येत असल्यास कापुर तुळस लावावी. तुळशीला सुध्दा कीड लागते. त्यामुळे, अधुन मधुन तुळशीच्या पानांकडे लक्ष द्यावे.
एकदा तुळस नर्सरी मधुन विकत आणली ( कींवा कोणी भेट दिली असेल ) तर सहसा तुळस परत आणायची गरज लागत नाही.
छान, उपयुक्त माहिती.
छान, उपयुक्त माहिती.
छान माहिती.
छान माहिती.
माझी काळी तुळस होती.छान बहरायला लागली होती खरं पण मधेच काय झालं माहीत नाही, पूर्ण सुकली.सुर्यप्रकाश भरपूर आहे.
तुळशीच्या मंजिरी उडून ईथे
तुळशीच्या मंजिरी उडून ईथे तिथे एवढी रोपं उगवली होती, मी सुद्धा ती एका कुंडीत एकत्र लावली.
छान माहिती आणि फोटोही छान
सुंदर, तजेलदार फोटो आहे
सुंदर, तजेलदार फोटो आहे तुळशीचा! माहितीही छान. धन्यवाद!
छान माहिती
छान माहिती
वरील छायाचित्र कापूर तुळशीचे
वरील छायाचित्र कापूर तुळशीचे आहे का? पानांवरून कसे ओळखायचे तुळशीचे प्रकार?
@किशोर मुंढे
@किशोर मुंढे
@mrunali.samad
@mrunali.samad
कदाचित पाणी जास्त झालं असेल किंवा कुंडी लहान आकाराची असेल
@वावे @जाई. @मीरा.. @ललिता-प्रीति
धन्यवाद
दोन्ही शक्यता आहेत. धन्यवाद
दोन्ही शक्यता आहेत.
धन्यवाद
काय ग मस्त तजेलदार तुळस आहे!
काय ग मस्त तजेलदार तुळस आहे! मस्त वाटलं बघून.
काय ग मस्त तजेलदार तुळस आहे!
काय ग मस्त तजेलदार तुळस आहे! मस्त वाटलं बघून.
काय ग मस्त तजेलदार तुळस आहे!
काय ग मस्त तजेलदार तुळस आहे! मस्त वाटलं बघून....... +१.
छान माहिती आणि फोटोतली तुळशी
छान माहिती आणि फोटोतली तुळशी ही.