Submitted by चाफा on 22 May, 2009 - 12:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
सॅलड :
रेड स्विस चार्ड १ जुडी (५-६ मोठी पाने)
येलो स्वीट कॉर्न (Whole kernel) (ताजे, फ्रोझन किंवा कॅन्ड चालतील. मी कॅन वापरला.)
१-२ शॅलट्स (लहान गुलाबी रंगाचे गोडसर कांदे)
१ मोठी काकडी
१०-१२ चेरी टोमेटो
ड्रेसिंग :
मीठ चवीप्रमाणे
काळ्या मिर्यांची भरड पूड
१ मोठे रसदार लिंबू (२ टेबलस्पून रस)
२-३ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल (EVOO)
Garnishing :
किसलेले पार्मेजान चीज (ऐच्छिक)
टोस्टेड गार्लिक ब्रेड (ऐच्छिक)
क्रमवार पाककृती:
- चार्डची पाने व देठे स्वच्छ धुवून घ्यावीत. प्रत्येक पानाची घट्ट घडी घालून सुरीने उभी-आडवी मध्यम बारिक कापावीत. देठेही घ्यावीत. त्यांच्यात भरपूर fiber असतं व खाताना अजिबात त्रास होत नाही.
- शॅलट्सच्या बारिक गोल चकत्या कराव्यात.
- काकडीचे मधे कापून दोन भाग करावेत. व मग आडव्या चकत्या (अर्धवर्तुळाकार) कापाव्यात.
- चेरी टोमेटोजना मधोमध कापून दोन भाग करावेत.
- लिंबाचा रस काढून घ्यावा. त्यात मीठ व मिरेपूड मिसळून घ्यावी. आता EVOO ची धार एका हाताने त्यात सोडत दुसर्या हाताने मिश्रण चमच्याने जोरात ढवळत रहावे (emulsion).
- सॅलड बोल मधे ड्रेसिंग वगळता इतर सर्व जिन्नस एकत्र करावेत.
- वाढण्यापूर्वी आयत्या वेळी सॅलडवर ड्रेसिंग ओतून नीट ढवळावे. व देताना वर पार्मेजान चीज भुरभुरावे व गार्लिक ब्रेडचे छोटे छोटे कापलेले चौकोनी तुकडे घालून द्यावे.
वाढणी/प्रमाण:
२-३ माणसे
अधिक टिपा:
ड्रेसिंग आयत्यावेळीच घालावे. नाहीतर सॅलड विल्ट होते (मरगळते).
टोस्टेड गार्लिक ब्रेड, बटरनट स्क्वाश सूप व हे सॅलड असा उत्तम पोटभरीचा बेत होतो.
माहितीचा स्रोत:
अवांतर माहिती व स्वतःचे प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे मस्त
हे मस्त वाटतेय. करणेत येईल.
चाफा,
चाफा, आभारी आहे तत्परतेने कृती टाकल्याबद्दल. करुन बघेन नी सांगेन कसं वाटलं ते.