माबोवरील नवीन /दुर्लक्षित लेखक आणि त्यांचे लिखाण

Submitted by सहजराव on 28 June, 2021 - 14:05

मायबोलीवर येऊन नव्याने लेखक झालेले किंवा आधीपासूनच अन्यत्र लिखाण करत असलेले आणि आता मायबोलीकरांच्या सेवेत रुजू झालेल्या लेखकांसाठी हा धागा. अनेकदा प्रस्थापित आयडींच्या किंवा एखाद्या लोकप्रिय धाग्याच्या प्रभावामुळे नव्या लोकांचे लिखाण दुर्लक्षित राहण्याची शक्यता असते.

अशा नवीन /दुर्लक्षित गरजू लेखकांचे नाव आणि त्यांच्या कथा / कादंबरी / ललित लेखाचे नाव त्यांच्या चाहत्यांपैकी कुणीही इथे देऊ शकता. कायमस्वरूपी नोंद असावी ही कल्पना आहे. (एखादा नवीन लेखक चांगले लिहीत असूनही दुर्लक्षित राहिलेला असल्यास सध्या तो जुना असेल तरी आपण त्याची नोंद घेऊ शकता.

लिखाण आवडले / नावडले ही सक्ती नाही. तरी पण कुणाला आवड निवड कळवायची असल्यास स्वागतच आहे. तसेच नव्या लेखकांना सूचना करायच्या असल्यास त्या करू शकता. काही चुका टाळण्याचा प्रेमाचा सल्ला द्यायचा असेल तर या धाग्याचा वापर करू शकता.

उदा.
आयडीचे नाव देवभू बाबा - कथेचे नाव गल्लीनायक
(ही नोंद झाल्याने धागा मागे गेला तरी ज्यांच्या दृष्टीस पडला नाही ते शोधू शकतात).

ब-यापैकी प्रस्थापित झालेल्या , भरपूर प्रतिसाद मिळालेल्या आयडींची माहिती देण्याचे टाळावे ही नम्र विनंती (नवीन असले तरीही).

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users