वाड्यातल्या गप्पा

Submitted by अस्मिता. on 24 June, 2021 - 11:18

वाड्यातल्या गप्पा
IMG-20240909-WA0003_1.jpgहा धागा एक माणसांनी भरलेला वाडा आहे , कोणीही या, कधीही या, अंगणात कोणीतरी बाज टाकून बसलेले असेलच. तुमचे हसूनच स्वागत होईल.  मायबोलीवरचे इतर लेखन इथे कॉपी करून आणू नका. त्या विषयीचे गॉसिपही नकोच. राजकारण नकोच. कसलेही चित्र द्या , कसल्याही शुभेच्छा द्या. रोज द्या / कधीतरी द्या. लिंक्स द्या.

धाग्याचे नियम-
कुणालाही हेटाळणीजनक प्रतिसाद देऊ नका. प्रत्येकजण (अमेरिकेतले/ भारतातले/ किंवा अजून कुठलेही) आपापल्या अनुभवविश्वातील गप्पा मारायला येथे येणं साहजिकच आहे. हा धागा फनहितार्थ आहे, जनहितार्थ नव्हे. त्यामुळे अपेक्षा नकोत आणि दबाव आणण्याचे प्रयत्नही नकोत. त्यांना आपापल्या समविचारी लोकांसोबत आनंदाने गप्पा मारायचा अधिकार आहे. सर्वांशीच सौजन्याने वागा आणि गोड बोला. Happy
धन्यवाद.


Happy करा सुरू.. !

***दवंडी***
वाडा निवडक हा धागा वाडा, मग, अग वरील निवडक पोस्ट्ससाठी काढला आहे. तो पहाण्यास पश्चिम महाराष्ट्र ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
वाड्याची तिजोरी गप्पांचाच ठेवा.
ही तिची किल्ली-उघड दार वाडेकरा
प्रताधिकारमुक्त चित्र सौजन्य - अनिरुद्ध

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG20260124201207~2.jpg
फोटो काही भारी नाही. पदार्थ मात्र सुंदर आहे Proud
हो मधुरा मस्त आणि खुसखुशीत, आणि पदार्थ करताना तिला स्वतःलाच बादलीभर लाळ सुटते Proud

Lol मस्त आहे की हे. वर पाणीपुरी फ्री !
मधुरा आणि तिच्या कृती मला दोन्ही आवडत नाहीत. सध्या युअर फूड लॅब आवडतं. अजून एक लाळ गाळणारा आणि वखवखलेल्या नजरेने बघणारा शेफ होता, तो आणि कुणाल विजयकर. त्यांना पाहून तूच खा एकदाचं होतं. शक्ती कपूर ज्या नजरेने स्त्रियांकडे बघायचा तंतोतंत तीच नजर.

ममो, रूमाल अतिशय आवडला. सुंदर आहे.

Proud
मधुराचे व्हिडिओ पाहिलेत काही, एक कुठला पदार्थ करून बघितला होता.
निशा-मधुलिक यांचे सरसो का साग आणि बऱ्याच भाज्या केल्यात.
पण सगळ्यात जास्त कबिताज किचन. बाई अजिबात जास्तीची बडबड करत नाही (एवढ्यात बघितले माहीत व्हिडिओ, बदल झाला असेल तर माहीत नाही) एक एक शब्द मोजून मापून टु द पॉईंट.
बाकी मग गावरान, गावाकडची रेसिपी वगैरे चॅनेल्स मधल्या काही आजींच्या व्हिडिओ प्रमाणे केल्या आहेत भाज्या, अंडाकरी, तव्यावरचं घट्ट पीठलं, एकदा मिसळ.

माझेमन तू दिलेले गाणे ऐकले. मस्त आहे धन्यवाद Happy
-----------
ममो सुंदर रंगाचे क्रोशे विणकाम.
अनया मस्त रांगोळी.

निशा मधुलिका अतिशय गोड बोलते. तिचं ऐकून मी सुद्धा घरी बहोतही स्वादिष्ट लगता है असं करून लोकांना तंग केले. रोजच्या स्वैपाकालाही मी लाईक किजिये, सबस्क्राईब किजिये, बेल आयकॉन को दबाना ना भुलीये म्हणून मुलीला अनॉय करते. Proud माझ्या मनावर परिणाम झाला आहे एकंदरीत. अजून एक राजस्थानी काकू माझ्या फीड मधे येते, तिच्या मागे धबधबा, नदी वगैरे दिसते. तिचं केले नाही काही पण बरं वाटलं. ती संपूर्ण राजस्थानी वेशभूषेत असते. नवरा म्हणाला अगं किती दिवसांत हे खाल्ले नाही की बायको लगेच करणार हा एक ट्रेंड आला आहे, तो कंटाळवाणा झाला आहे. नाटकंच असतात तरीही.

तात्याचा मळा, आणि गावरान एक चव - वरच्या काही रेसिपी करून पाहिल्या आहेत. तव्यावरची डाळ - तूर डाळ भिजवून न शिजवता केलेली आवडली. मी हल्ली एका डब्यात सगळ्या डाळी मिक्स करून भरून ठेवल्या आहेत, त्याच वापरते. नाही तर खाल्ल्या जात नाहीत. अंडाकरी मी पण केली होती बहुतेक.

माझेमन, अरे व्वा ! Happy बेस्ट आहे तो.

>>>>>मी हल्ली एका डब्यात सगळ्या डाळी मिक्स करून भरून ठेवल्या आहेत, त्याच वापरते. नाही तर खाल्ल्या जात नाहीत.
मी ३/४ तूर आणि १/४ कोणती तरी वेगळी डाळ घेते. नाहीतर खरच संपणार नाहीत. एक एकदम गडद ऑरेन्ज , संत्र्याच्या रंगाची डाळ असते तिचे नाव काय?

अनया, रांगोळी as usual सुंदर. तुमच्या रांगोळीत खूप सात्विकता जाणवते.

हेमाताई, किती सुंदर विणला आहे रुमाल! मलाही एक सुईवरचं विणकाम खूप आवडतं.

आज मी शेवपुरी खाल्ली. रगडा पॅटिस बरेच दिवसांत खाल्ले नाही.

एक एकदम गडद ऑरेन्ज , संत्र्याच्या रंगाची डाळ असते तिचे नाव काय? >> मसूर डाळ का?

लंपन, मस्तच दिसतोय रगडा पॅटीस.
मलाही YFL आवडते. संज्योत खूप नीट समजावून सांगतो, टिप्स अगदी व्यवस्थित देतो. मुख्य रेसिपी बरोबर, मसाला, चटणी साईड डिश सुद्धा व्यवस्थित सांगतो.

मला आवडते निशा मधुलिका. एकदम शांतपणे सांगते. धर्मिज पण आवडते. संजोत पण नीट सांगतो. कविता नाही पाहिले जास्त. तात्या, गावरान खरी चव मधल्या काकू आवडतात कारण अशाच पद्धतीने साधारण घरी स्वयंपाक असतो (सांगली कोल्हापूर साइड). मुख्य म्हणजे नेहेमीच्या रोजच्या भाज्यात कांदा लसूण मसाला / तिखट आणि शेंगदाणे ह्याचा सगळ्यात वापर. आणि ओले वाटण पण त्यात दाखवतात तसेच. म्हणजे सुके खोबरे, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि खसखस. फक्त आम्ही एकदम कमी तिखट करतो. ओला नारळ चव फार क्वचित, नाहीच म्हटला तरी चालेल.
अस्मिता ती पापा मम्मी राजस्थानी का? तिच्या चांगल्या असतात आणि चुकत नाहीत. गट्टे मस्त होतात तिच्या रेसिपीने.

पाणीपुरीचा फोटो आवडला.
मसूर का? मी फोटो टाकते. ही मसूर डाळ आहे का? फक्त रंगाला भुलून घेतलेली.
.

तुम्ही सगळे किती उत्साहाने रेसिपी शो बघता! हॅट्स ऑफ!

मी हेबार्स किचन चे नो वर्ड व्हिडिओज् बघते.तेही अगदी केक करतानाच कारण मी तो कधीतरी सटीसामाशी करते म्हणून प्रमाण बघण्यासाठी आणि मग हळूहळू लागेल तशी कृती. बाकी सगळा सासूविद्यापीठ सिलॅबस आहे. टिपिकल पुणेरी.
अबरचबर खायची धाव ही बिकानेरी मंडळींकडून सामोसा, किंवा ग्रीन/ पूना बेकरी वगैरे लोकांचे पॅटिस इतपतच. इडली-आप्पे-डोसे बरेचदा घरीच.
नैवेद्य घरीच. बाकी मग आपल्या रोजच्या मराठी पद्धतीच्याच भाज्या.
मंडळींची पथ्यं, आवडीनिवडी आणि माझा उत्साह याचा लसावि काढला की मग फार काही उरतच नाही जे मी आवर्जून रेसिपी शो मधे बघून करेन Proud
हो ही मसूर डाळ. हाय प्रोटीन.

<<ओले वाटण पण त्यात दाखवतात तसेच. म्हणजे सुके खोबरे, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि खसखस.>>. हो, छान लागते असे घातले की. तीळ सुद्धा असतात काही रेसिपीत. मी पण तिखट कमी घालतो फार.

सामो ही डाळ उत्तम आहे. आम्ही तूर फार कमी वापरतो रोज पण मूग आणि मसूर आणि नावाला तूर असेच वरण / आमटी असते. खिचडी पण खूप टेस्टी होते. बंगाली रेसिपी बघा त्यात हीच वापरतात.

ओह ओके लंपन. माहीतीकरता, धन्यवाद. मी सहसा, तूरमध्ये मिसळून , आमटी करते. आता खिचडी करेन.
------------------------------------
४ फेब्रुवारीला माझ्या जॉबचे एक्स्टेन्शन व्हायला हवे. आतापर्यंत अ‍ॅप्रुव्ह व्हायला हवे होते. मला वाटते नाही होणार. कारण आतापर्यंत कळायला हवे होते. एजन्सीच्या व क्लायंटच्या रिलेशनवर तसेच माझ्या परफॉर्मनवरती अवलंबुन असणार. माझ्या गंभीर चूका झालेल्या नाहीत. अर्थात एखाद दुसरी झालेली आहे.
------------------
स्वामी ओम यांचे श्रीसूक्तावरचे पुस्तक किंडलवर घेउन वाचते आहे ज्यात भृगु ऋषींनी नारायणाच्या छातीवरती लाथ मारल्याची कथा येते. लक्ष्मी चिडुन शाप देते की तुमच्या वंशजांपासून मी दूर राहीन. वाईट वाटले वाचून कारण आम्ही भार्गव गोत्राचे आहोत. लक्ष्मीची मनधरणी केली पाहीजे Happy

सन्ज्योत किर मलाही आवडतो..निट मुद्देसुद, व्यवस्थित मान्डणि असते..
मधुरा मला कधिही आवडली नाही, अजिबात निटनेटकापणा नाही, प्रमाण निट दाखवता येत नाहि..त्यापेक्षा सरिताज किचनच्या आवडतात..खुप व्यवस्थितपणा आहे..प्रमाण अगदी निट दिलेल असत.
निशा मधुलिका पण चान्गल आहे..
रणविर ब्रार आधी आवडायचा पण तो सान्गितलेले प्रमाण कधिच वापरत नाहि..रेसिपित लिहतात २ चमचे तेल आणी रणविरने दोन पळ्या तरी ओतलेल्या दिसतात..शिवाय तो इतर फाफटपसाराच बोलत राहतो..तेही अ‍ॅनॉयिन्ग होत..
आताही मास्टरशेफ मधे प्रत्येक पदार्थाचा वास घेत बसतो..ते बघताना फार ऑड वाटत.
मास्टरशेफ मधे सगळ्याना मिळुन एकच प्लेट त्यातच सगळे चमचे घालुन खातायत तेही ऑड वाटत मला...ऑस्ट्रेलिया वैगरेचे मास्टर शेफ किवा इतर शोजला जेवढे जजेस तेवढ्या प्लेट बघितल्या होत्या ..जाउ दे ! उष्टे चमचे घालणारे,खरकटे हात घेवुन फिरणारे, मचमच आवाज करत जेवणारे हे सगळे माझ्या नावडत्या गटातले लोक आहेत.

पॅटिस, पाणीपुरी मस्त दिसतायत..नवरा बेडेकरच फ्रोजन रगडा पॅटिस घेवुन आलाय्, कल्याण भेळ पण आलिये आमच्यापर्यत आता!
प्र९ माझ कुठल विद्यापिठच नाही, घरी आइ-दोन्ही वहिनी याच्यातुन सुटुन करायला भरिव काहि यायच नाहि...कोशिबिर करा, पाटपाणी घ्या, पुरण वाटुन द्या, श्रिखण्ड वाटुन द्या, ताक घुसळुन द्या, पाटाभोवती रान्गोळि काढा..पन्गतित छोट काहितरी वाढा इतपतच...
माझ विद्यापिठ अन्नपुर्णा, रुचिरा आणी मुख्य म्हणजे मायबोलीच!!...

रांगोळी आणि रुमाल दोन्ही सुंदर!
ममो, मला आवडला रुमालाचा रंग! तुमचे काम तर नेहमीच सुबक असते.
रगड पॅटिस मस्त! आज आमच्याकडे मिसळ!

रांगोळी आणि रुमाल दोन्ही सुंदर!
ममो, मला आवडला रुमालाचा रंग! तुमचे काम तर नेहमीच सुबक असते.>> +१

रुमाल आवडला थँक्यु सर्वांना..
आज शेफ च्या गप्पा.. रगडा पॅटीस भारीच दिसत होतं. तिकडे माम ची मटार कचोरी ही एकच नंबर , लिहिते तिकडे ही.
आमच्या सौम्य चवी बघता, एकाच रेसिपी मध्ये लवंगा, काळी मिरी, हिरवी मिरची, आलं ह्यांच वाटण, लाल तिखट रंगा करता, गरम मसाला आणि वरून अख्या लाल मिरच्यांची फोडणी हे एवढं मसालेदार मी स्वप्नात ही खाऊ शकणार नाही त्यामुळे ते फक्त बघण्यापुरतच राहत. असो.

ममो सेम! माझ्या वडिलाना जराही तिखट सोसायच नाही, त्यामुळे आमच्याकडे सगळ मध्यम तिखट, गुळचट चविच असायच..आइला तिखट आवडायच मग ती तिच्यासाठी अधेमधे मिरचीचा ठेचा करुन घ्यायची..

ममो, मलाही उग्र सहन नाही होत. अगदी एकच मिरा, लवंग, दालचिनी, लसूण टाकते. जितके कमी तितका दरवळ छान.

प्राजक्ता, रणवीर ब्रार थापाड्या आहे. पाल्हाळ लावतो. हेब्बर चांगले आहे. सध्या मीही काहीच पहात नाहीये. नवीन काही करत नाहीये.
लंपन - हो, पापा मम्मी. Happy वाचून लक्षात आले की मी खसखस फारशी वापरत नाही. तीळ, सुकं खोबरं, शेंगदाणे मात्र भरपूर.


भोपळी मिरची+बीट रुट + कांदा + बटाटा + काकडी + टोमॅटो + हॅम
मी हॅम नाही घालत माझ्यात.
ब्रेडला चटणी + चीझ आणि बटाट्यावर, टोमॅटोवर, थोडा चाट मसाला भुरभुरवुन

मला मधुरा एकदम आवडते. बडबड इग्नोर केली तर प्रमाण व्यवस्थित असतं, कृती नीट सांगते, योग्य तेवढ्या टिप्स देते, आणि शेवटी परत प्रमाणाची स्लाइड हल्ली येते. तसा तंतोतंत पदार्थ केला की माझा तरी मला हवा तसा बनतो. तुम्ही तुमचं डोकं चालवता का? मी एकही गोष्ट न बदलता पदार्थ करतो.

रणवीर ब्रार साहित्य, प्रमाण काहीच धड सांगत नाही. पण त्याची कृती आणि चव चांगली होते. पण आपली अक्कल वापरायला लागते त्यामुळे जरा त्रास होतो. संज्योत कीर चांगला आहे. पापा मम्मी किचन काकू पण आवडतात.
गावरान चव, खेडवळ चूल वगैरे बघायला ठीक वाटतं त्याच्या कृती काही करत नाही. त्यापेक्षा परब काकू, आणि अनुराधा तांबोळकर आणि अशा रँडम सुगरणी बऱ्या वाटतात. उगा वरवंटा आणि चूल आणि शेत रिलेट होत नाही.

गावरान चवीत दाखवतात तसे मी शेतात चुल पेटवुन बसले तर वार्‍यामुळे माझी चुल पेटायची नाही पण चुकुन् ठिणगी पडली तर आग रानोमाळ पसरेल Happy कायम भणाणता वारा असतो.

रणवीर पदार्थ करताना प्रमाण बोलत नाही पण विडिओत खाली स्क्रीनवर प्रत्येक प्रमाण डिस्प्ले होते. शेवटी डिटेल प्रमाणासकट रेसिपी येते. तो जी माहिती सांगतो ती चांगली असते, अमुक असे का व तमुक तसे का याचे शास्त्रिय विवेचन करतो. सैपाकघरातले विज्ञान समजायला मला मदत होते.
तेल मात्र कित्येक जण दोन चमचे घाला म्हणुन दोन पळ्या ओततात हे खरे आहे.

जमल्यास जिओ हॉट्स्टार वरचा किश्किंधा कांडम बघा. विस्मरणाचा विकार जडलेल्या माणसाला आपल्या हातुन गुन्हा घडलाय आणि आपण बहुतेक तो विसरलोय असे वाटायला लागले तर त्याची काय अवस्था होईल ते खुप उत्तमरित्या दाखवलेय.

बाकी भारतात घरात लोडेड रिवॉल्वर का ठेवायचे हा प्रश्न याच्या मुळाशी आहेच. रिवॉल्वर विकत घेतलेय तर ते रिकामे करुन ठेवा ना…

अमेरिकेत असे घडते तर समजु शकले असते.