मातीची फुले

Submitted by limbutimbu on 21 May, 2009 - 04:54

सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर Sad

गुलमोहर: 

सही... रे लिंबूभाऊ... जमल्यास वेगवेगळ्या रंगात रंगवून पण फोटो काढा की... मस्त रंगबेरंगी फुलं... छान दिसतील एकदम..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

मस्तच!
लिंबुदा! तुमच्या हालाखिच्या परिस्थितीत तुम्हाला हात दिला त्यानी. आता त्यांच्यावर एखादा रंगाचा हात द्यायची वेळ आली आहे. एकदा बसून रंगवून टाका की!

मस्तच. पण स्कॅन कशी केली ही फुलं? येकिखू म्हणतो तसं एखाद दुसरं रंगवा. या फुलांचं तुमच्या प्रवासाच मोठं स्थान आहे Happy

************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

मस्त आहेत. Happy इतकी लहान हाताने बनवायचास की साचे बनवले होतेस?

--------------------------
धन्य भाग सेवा का अवसर पाया

अरे येतात करता हाताने Happy
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

छान आहेत!!!

**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************

लिम्बु,
लै भारी रे! Happy
आज वर पारच इसरला व्हतास की हयांना!
आता पुन्यांदा बनव की नव्याने!
-------------------------------------------------------------
मी मोठा शाहणा, धनाढ्यही , गर्वभार हा वाहुं नको
एकाहुनि चढ एक जगामंधी, थोरपणाला मिरवु नको

जपून ठेवा ही फुलं. आज "लागू बन्धू" मधून हिरेजडीत फुले विकत घ्यायची शक्ती आहे तुम्हाला.
पण एके काळी या फुलांनी तुम्हाला आधार दिला होता. आणी रंगवून एखादा फोटो टाका.

लिंबूशेठ, फुले मस्त आहेत. मी पण एकेकाळी केली होती असली फुले. ती करुन आरश्याच्या कडेने लावायचा प्लान होता. पण कधी पूर्ण नाही झाला. माझ्याहातुन अर्धवट राहिलेले एकमेव प्रॉजेक्ट असेल ते.

मस्त आहेत. एक सेमी पेक्षा लहान फुलामधे असे डिझाईन हाताने केले काय? नाजुक काम दिसते.

सुंदरच आहेत
फारेंडशी सहमत
एवढी लहान कशी केली

सुधीर

मस्त दिसतायेत फुलं... पण रंग लावाच त्यांना.. अजुन खुलतिल.. मी पण एकदा केली होती असलीच फुलं सिरॅमिक मातीची (?).. मातीच्या भांड्यांवर लावली होती. पण नीट चिकटली नाहीत, अन एकेक करुन गळुन पडली नंतर.. आईकडे ठेवलियेत (बरिचशी तुटली होती नंतर)

मी मातीत पण मळताना फेव्हीकॉल घातला होता त्यामुळे सुकुन मस्त कडक झाली. भाजायची गरज पडली नाही. पॉटला चिकटवलेली अजूनही तश्शीच आहेत (पुण्याला आत्याकडे Proud ) ७ वर्षं झाली.
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

वा!! फार आर्टिस्टिक दिसत आहेत फुलं. मला पण रंगवलेली इतकीशी आवडली नाहीत. न रंगवलेल्या फुलांना एक अँटिक लुक आहे. नोकरी,व्यवसायाच्या गुंत्यातून, अशी हॉबी असेल तर निश्चीतच एक मोकळा श्वास घ्यायला मिळतो, जरा हट के काही केले कि कित्ती बरं वाटतं नै??

बिच्चारा स्कॅनर... फुले हाताने बनवलीत म्हणजे कमालच आहे तुमची.

एकदा तर मी स्कॅनर वर माझा चेहरा धरुन स्कॅन केलेला >>>>>>

काय तो स्कॅनरवर अत्याचार!! Proud

-------------------------------------------------------------
मी मोठा शाहणा, धनाढ्यही , गर्वभार हा वाहुं नको
एकाहुनि चढ एक जगामंधी, थोरपणाला मिरवु नको

लिंब्या मस्तच. तुझ्या घरी एकदा भेट देऊन असा काय काय खजिना दडलाय बघायला लागेल. Happy नाहीतर पुढच्या पिढीला केळकर संग्रहालयात जावे लागेल.

लिम्ब्या मस्तच रे. बर्‍याच गोष्टी करत असतोस Happy

@केपी,
लिम्ब्याचे आडनाव केळकर आहे का? Proud
----------------------------------------
मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...

लिंब्या मस्तच. तुझ्या घरी एकदा भेट देऊन असा काय काय खजिना दडलाय बघायला लागेल. नाहीतर पुढच्या पिढीला केळकर संग्रहालयात जावे लागेल.
>>>
त्यासाठी लिम्ब्याने बोलवायला हवे ना Proud Light 1

फुले छानच रे! मला पण न रंगवलेलीच फुलं आवडली. कला आहे तुझ्या हातात!! (तो हातावरचा ताबा वगैरे वाचून हातावरचा ताबा निसटवणार्‍या काही सवयी व तुझे जुने किस्से ह्याची आठवण झाली. ताबा कसा राहायचा तेव्हा? :फिदी:)
बाकी पेठीगिरी गेली नाही तुझी अजून. पेठेत वार्डातल्या निवडणुकीपासून युनोच्या निवडणुकीपर्य्म्त कशावरही बडबडतात, त्याऐवजी तू केव्हडाली पोस्टं टाकतोस. Light 1

लहान मुलीच्या मानाने तिने चांगली रंगवली आहेत. तुम्ही अगदी ० किंवा १ नंबरच्या ब्रशने अ‍ॅक्रिलिकने रंगवा आता एखादे. मुलाना शिकवण्यासंदर्भात थोडे लिहितेच इथे Happy

माझ्या मम्मीने तिला जे येते ते सगळे शिकवायचा प्रयत्न केला भरतकाम, शिवणकाम. मला जरा आवड आहे हे कळल्यावर चित्रकला. थोडे वर्शानी विणकम आणि क्रोशे. त्यावेळी मी शिकायला त्रास दिलाच असेल. पण आज हेच आणि इतर बरेचसे छंद आहेत त्यामुळे मला वेळ कसा घालवावा याची चिंता पडत नाही. तेव्हा मुलांना हे शिकवाच अगदी थोडे दिवस मानगुटीवर बसावे लागले तरी. काही वर्षानी त्याचे महत्व कळेलच त्यांना.

लिंबू

तुझं वरील सगळच लिखाण अगदी खरं आहे.
या भयानक वेगाने बदलत्या जगात आपण कुठेच फिट नाही की काय वाटू लागते

त्यातूनच ही कविता तयार झाली
http://www.maayboli.com/node/7882

सुधीर

Pages