साधारणतः पहिल्या पावसाच्या आगमनानंतर जुईची इवलीशी फूलं फुलायला सुरुवात होते. ६-७ इवल्याशा पांढऱ्या नाजूक पाकळ्यांच सुगंधीत फूल. जुईचा वेल असल्याने जास्त जागा व्यापत नाही. एका कुंडीत जुई व्यतिरीक्तही दुसर फुलझाड लावू शकतो. परंतु, कुंडी मध्यम किंवा मोठ्या आकाराची हवी. जुईच्या बहरण्याचा काळ सुरू होण्यापूर्वी म्हणजेच २-३ महिने अगोदर hard pruning कराव. त्यामुळे फुल येण्याचं प्रमाण वाढत. जुईच्या पानांना कीड कींवा बुरशी / mealybugs चा प्रादुर्भाव पटकन होतो. त्यामुळे जुईच्या पानांकडे सतत लक्ष ठेवावे. १५ दिवसांतुन एकदा कडुनिंबाच्या तेलाचा फवारा करावा. जुईच्या फुलाला प्रखर सुर्यप्रकाशाची गरज असते. जर ह्याला कमी ऊन्ह मिळाल तर फूलं जास्त येत नाहीत. दररोज पाणी आणि १५-२० दिवसांनी खत द्यावे. बहराच्या काळात दर ७-१० दिवसांनी खत द्यावे. कधी कधी जुईला फूलं येत नाहीत त्याच एक कारण root bounding सुध्दा आहे.
जुईचा वेल जर व्यवस्थित वाढला असेल आणि नीट काळजी घेतली असेल तर जुईच्या बहराच्या काळात दररोज भरघोस फूलं येतात. संध्याकाळीच फूलं ऊमलायला सुरुवात होते. अतिशय नाजूक अश्या फुलांना हात लावतानाही विचार करावा लागतो. ह्या फुलाच सौंदर्य ह्याच्या नाजूक पाकळ्या मध्ये आहे बहुधा.
मन प्रसन्न करणारा सुगंध आणि शुभ्र कांती असलेल इवलस नाजूक फूल "जुई"
वा ! किती नाजूक आणि सुंदर !
वा ! किती नाजूक आणि सुंदर !
छान माहिती.
छान माहिती.
छान माहिती.
छान माहिती.
4 महिन्यापूर्वी लावलेला वेल मोठा होत आहे पण फुले अजून येत नाहीयेत. 15 दिवसातून एकदा जीवामृत देते.
मस्त, आवडते फूल. रात्रीच्या
मस्त, आवडते फूल. रात्रीच्या वेळी फुललेला वेल खूप छान दिसतो आणि सुगंध तर अहाहा!
@जाई. @mrunali.samad
@जाई. @mrunali.samad
धन्यवाद
@चैत्रगंधा
कधी कधी उशीरा बहर येतो (July August मध्ये)
@वर्णिता
खरंच...... !!