Submitted by गजानन on 12 June, 2021 - 16:08
'उठा उठा हो सकळीक, वाचे स्मरावा गजमुख' या प्रसिद्ध गाण्याच्या शेवटी 'रामानंद स्मरता कंठी, तो संकटी पावतो' असे कडवे आहे, यातल्या रामानंद या गीतकारांबद्दल अधिक माहिती आहे का कोणाला? नेटवर शोधता एके ठिकाणी 'उठा उठा हो सकळीक' या शुद्ध मराठी गाण्याचे गीतकार रामानंद शर्मा असे लिहिलेले पाहिल्यावर उत्सुकता अजून चाळवली.
(संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, यांच्या आरत्यांमध्ये शेवटी रामजनार्दनी असे नाव येते. त्यांचा वरील रामानंदांशी काही संबंध आहे का?)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माहीत नाही पण धागा वर
धागा वर काढण्याकरता म्हणून हा प्रतिसाद
हर्पेन ध्यन्यवाद धागा वर
हर्पेन, ध्यन्यवाद रे धागा वर काढल्याबद्दल. (असे म्हणून मी पुन्हा एकदा धागा वर काढतो. )
गजानन , बर्याच वर्षांनी दिसत
गजानन , बर्याच वर्षांनी दिसत आहात. वेलकम बॅक.
गीतकार रामानंद शर्मा हे प्रो. रामानन्द, रामानन्द या नावांनी ही प्रसिद्ध होते. ते नुसते गीतकारच नाही पण गायक आणि अभिनेतेही होते असे वाचले आहे पण Filmography माहीती नाही.
पण ते रामानंद (शर्मा) आणि "उठा उठा हो सकळीक" गाण्याचे गीतकार रामानंद यांचा काहीच संबंध नसावा. कारण रामानंद शर्मा यांच्या गाण्याच्या यादीत दुसरे कुठलेही मराठी गाणे सापडत नाही. आणि हे गीतकार रामानंद (शर्मा) तसे बरेच अलीकडले आहेत (१९७०-१९८० मधले)
ज्ञानेश्वरांच्या आरतीत "रामजनार्दनी" उल्लेख आलेली व्यक्ती आणखीनच वेगळी असावी. आणि ज्या अर्थी त्यांनी ज्ञानेश्वरांची आरती लिहिली त्या अर्थी ते नक्कीच ज्ञानेश्वरांच्या (१२७५-????) नंतरचे. हे एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी (१५०४-१५७५) यांचे शिष्य रामजनार्दन होते (एकनाथांचे गुरुबंधू)
आणि मला माहिती असलेल्या तुकारामांच्या आरतीत "रामेश्वर" असा उल्लेख आहे " म्हणूनी रामेश्वरे, चरणी मस्तक ठेवले". (रामजनार्दनी किंवा रामानंद नाही. ) ही व्यक्ती तुकारामांच्या नंतरची (१५९८-???) नंतरची असणार.
शिर्डी साईबाबा : जीवन - दर्शन और भक्ति या ओ. पी झा यांनी लिहिलेल्या पुस्तकात तुकारामांची आरती श्री रामेश्वर भट्ट यांनी लिहिली असा उल्लेख आहे, त्याच पुस्तकात ज्ञानेश्वरांची आरती " श्रीरामजनार्दन स्वामी" यांनी लिहिली असा उल्लेख आहे. त्यामुळे या सगळ्या वेगळ्या व्यक्ती आहेत.
तुमच्या या प्रश्नाचा शोध घेतांना महात्मा गांधींनी येरवडा जेल मधे असताना तुकारामांंच्या काही अभंगांचा इंग्रजीत अनुवाद केला होता ही नवीन माहिती मला कळाली.
अजय, धन्यवाद.
अजय, धन्यवाद.
खरे आहे, तुकारामांच्या आरतीत 'म्हणूनी रामेश्वरे, चरणी मस्तक ठेवले' असे आहे. गीतकार रामानंद, श्रीरामजनार्दन स्वामी, श्री. रामेश्वर भट्ट यांच्या खुलाश्याबद्दल धन्यवाद. गांधीजींनी केलेल्या अभंगांच्या भाषांतराबद्दलही माहीत नव्हते. (आता नेमके कोणते अभंग गांधींनी निवडले असावेत, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.)
तुमची पोस्ट वाचताना 'उठा उठा हो सकळीक' चे रेकॉर्डींग (लेखन नव्हे) कधी झाले असावे असाही प्रश्न पडला. आणि त्यानिमित्त जसे पुस्तकाचे प्रकाशनवर्ष पुस्तकाच्या माहितीसोबत छापले जाते, तसे गाण्याच्या माहितीसोबत मूळ रेकॉर्डींग कधी झाले याचे डोक्युमेंटेशन कुठेतरी असावे असे वाटले. हल्ली चुटकीसरसी हवे ते गाणे शोधून ऐकण्याची सोय आहे. पण त्यासोबत मूळ गाण्याची सगळी माहिती सहज उपलब्ध असतेच असे नाही. त्यात एक गाणे एकापेक्षा जास्त अल्बम्/संचात संग्रहीत करून पुनः प्रकाशित झालेले असू शकते.
तुमच्या या प्रश्नाचा शोध
तुमच्या या प्रश्नाचा शोध घेतांना महात्मा गांधींनी येरवडा जेल मधे असताना तुकारामांंच्या काही अभंगांचा इंग्रजीत अनुवाद केला होता ही नवीन माहिती मला कळाली. म्हणजे गांधीजींना मराठी येत होतं? माझ्याकरता ही नवीनच माहिती कळाली.
मी आठवणीतली गाणी ची वेबसाईट
मी आठवणीतली गाणीच्या वेबसाईटवर शोधले. काही माहिती मिळाली नाही. अजून कोणी तोच प्रयत्न करू नये म्हणून लिहून ठेवतेय!