
1 जुडी अगदी लहान कोवळी लाल पालेभाजी. / लाल माठ
अर्धा वाटी चणाडाळ
1 कांदा
6-7 पाकळ्या लसूण
अर्धा चमचा मसाला...
अर्धी वाटी ओल्या नारळाचा रस,
2 आमसुले
जीरे मोहरी हिंग हळद तेल
मीठ चवीपुरते
1. चणाडाळ 1 तासभर भिजत घालावी..
2.कांदा बारीक चिरून घेणे..लसूण सोलून ठेचून घेणे.
3.पालेभाजी बारीक चिरून घ्यावी.. कूकर चया डब्यात डाळ घालून वर भाजी घालावी...n 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यावे..
4.. कढईत. फोडणीसाठी तेल घालून त्यात जैरे मोहरी हिंग हळद घालून कांदा टाकावा...वर लसूण घालावी..
चांगले.परतून झालं की त्यात कूकर मध्ये दब्यातली , शिजलेली भाजी ओतावी..
5..मीठ घालून, 2.मिनट मिक्स करून घ्यावी...नारळाचा रस घालायचं...मसाला तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं...2 -3 मिनिट उकळून झालं की आमसुले टाकायची ..गॅस बंद करावा..
6....गरमा गरम भात आणि ही भाजी खावी...एकदम.मस्त चव लागते..
..1..भाजी अगदी लहान ,कोवळी, म्हणजे साधारण आपल्या हाताची बोटं असतात, तेवढी लहान हवी.. म्हणजे सुंदर चव येते...
भाजी मस्त दिसते आहे.
भाजी मस्त दिसते आहे.
लाल माठला(नाही मिळाला तर) दुसरा कोणता पर्याय असू शकेल?
छान
छान
अळूचे फतफते करा
अळूचे फतफते करा
मस्त! करून बघायला हवी.
मस्त! करून बघायला हवी.
अळूचे फतफते हो आणि चवळीची
अळूचे फतफते हो आणि चवळीची भाजी.
मस्त रेसीपी.
मस्त रेसीपी.
लाल माठला(नाही मिळाला तर)
लाल माठला(नाही मिळाला तर) दुसरा कोणता पर्याय असू शकेल?>>>
कोकणात लाल माठ पेरला की 8 दिवसात त्याचे रूप वर दोन पाने आणि खाली दोऱ्याइतका पातळ दीड -दोन इंच दांडा असे होते. आठ दिवसात इतकी उंच भाजी रुजून येते. बिया पेरताना त्या दाट पेरतात आणो मग 8 दिवसात मधलीअधली भाजी उपटून विरळणी करतात. ही जी 8 दिवसाची रोपे असतत् त्याला रव असे म्हणतात. ही जी वर दिलीय ती ह्या रवाची भाजी. आजवर मी फक्त लाल भाजीचाच रव बघितलाय. बाकी कुठल्याही भाजीचे असे कौतुक केलेलं पाहिले नाही. भाजी छान लागते.
. आजवर मी फक्त लाल भाजीचाच रव
. आजवर मी फक्त लाल भाजीचाच रव बघितलाय.>>>> +१.
आमच्याकडे कांदा खोबर्याच्या वाटणाची करतात.चांगली लागते.पण मला स्वतःला हि.मि.+ कांदा घातलेली आवडते.
छान कॄती. नक्की करून बघणार
छान कॄती. नक्की करून बघणार
आज मी बनवली. खूप छान झाली.
आज मी बनवली. खूप छान झाली. फक्त आमसूल टाकले नाहित. एरवी फक्त सुक्की भाजी करत असते पण अशी लाल माठाची पातळ भाजी पहिल्यांदा केली.
आवडते ही भाजी.
आवडते ही भाजी.
अतिशय छान झाली भाजी. इथे माठ
अतिशय छान झाली भाजी. इथे माठ मिळत नाही म्हणून लाल चार्ड वापरला. फारच स्वादिष्ट भाजी झाली. आता चार्ड बहुतेक याच पद्धतीने करेन