तीन वाट्या बासमती राईस,
अर्धी जुडी कोथिंबीर स्वच्छ केलेली आणि धुतलेली,
लसणाच्या साधारण पंधरा पाकळ्या,
मुठभर मिरच्या- या तिखटच हव्या,
एक वाटी मटार
फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी कमी जिन्नसात होणारी , भन्नाट पाककृती आहे. ३१ डिसेंबरला नवऱ्याच्या मित्राकडे काहीजण जमलो होतो. तिथे एका मैत्रिणीने केली होती. भात डायरेक्ट कुकरला टाकून आपण निवांत बसता येते. पटकन होणारी सोपी पाककृती! मिरची लवर्स साठी खास!
१. अर्धी जुडी कोथिंबीर- लसणाच्या पंधरा-वीस पाकळ्या आणि मुठभर मिरच्या हे सर्व मिक्सरला कमीत कमी पाण्यात वाटून घ्यावे . मिक्सर चे झाकण उघडताना सावकाश मिरच्यांचा झणका जाणवेल!
२.कुकरमध्ये दोन डाव तेल घालावे. ते गरम झाले की हे हिरवे वाटण त्यात घालायचे आहे. हे वाटण हाताळताना प्रत्येक वेळेला जपून.
३.चार ते पाच मिनिटे मिडीयम-हाय आचेवर मिश्रण परतले की त्यात एक वाटी मटार घालावेत आणि धुतलेला बासमती तांदूळ घालावा. पाणी न घालता हे सर्व परत चार-पाच मिनिटं परतून घ्यावं व अंदाजाने पाणी घालून दोन चमचे मीठ घालून व्यवस्थित हलवून झाकण लावून टाका.
४. एक किंवा दोन शिट्यातच घरभर असा काही वास दरवळतो की बस! ५. कुकर उघडला की मटार वर जमलेले दिसतिल. ते नीट एकत्र करून घ्यावे आणि सर्व्ह करावा.
मिरची आणि लसूण यांचे स्ट्रॉंग फ्लेवर्स असल्यामुळे मी सोबत दही बुंदी केली होती. हे कॉम्बिनेशन खूप छान जाते.
लहान मुले खाणार असतील तर मिरच्या कमी घाला. पण खरं तर मिरच्या भरपूर असतील तर मस्त चव येते.
भारी!
भारी!
मस्तच!
मस्तच!
छान रेसिपी.
छान रेसिपी.
छान रेसिपी..
छान रेसिपी..
आमच्याकडे असाच ग्रीन राईस करतात फक्त ओलं खोबरं +आलं+लसूण आणि कोथिंबीर याचं वाटणं आणि मटारऐवजी गावठी हिरवा पावटा वापरतात..
छान
छान
मस्त.
मस्त.
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
छान रेसिपी.
छान रेसिपी.
छान. सोपी. करून पाहीन.
छान. सोपी. करून पाहीन.
मस्त रेसिपी, मी करून पाहिला
मस्त रेसिपी, मी करून पाहिला पण गडबडीत भात करून मग या मसाल्यात फोडणी दिला तरीही छान झाला होता. काजू सापडले नाही म्हणून थोडे पिस्ते टाकले. झणझणीत फोडणीचा ग्रीन राईस. थँक्स प्राजक्ता.
असं झणझणीत काहीतरी पाहिजे.
असं झणझणीत काहीतरी पाहिजे. करून पाहण्यात येईल. धन्यवाद.
केल्याचे कळविल्याबद्दल
केल्याचे कळविल्याबद्दल धन्यवाद अस्मिता! आणि बाकी सर्वांना सुध्दा.
मी पण करून बघेन अशा पध्दतीने.
Rani_1, विपू बघा.
Rani_1, विपू बघा.
मस्त रेसिपी आहे, नक्की आवडेल.
मस्त रेसिपी आहे, नक्की आवडेल. आता वाचली आणि उद्याच्या लंचसाठी ठरवुनही टाकली.
अजय चव्हाण, तुमची पावटा भाताची रेसिपीसुद्धा आवडली. पावटा मिळाल्यावर नक्की करून पाहीन.
छान रेसिपी प्राजक्ता. मी
छान रेसिपी प्राजक्ता. मी सुद्धा अशाच प्रकारे बनवते मटार घालून केलेला भात.
छान रेसिपी आहे.... वाचूनच भूक
छान रेसिपी आहे.... वाचूनच भूक खवळली
दाजीबांची मजा करायला असा झणझणीत भात करता येईल...
मी असा पीज पुलाव बनवते नेहमी
मी असा पीज पुलाव बनवते नेहमी पण माझा कमी तिखट असतो. व खडा मसाला घालून साजूक तुपाच्या फोडणीत.
वरून पनीरचे बारीक चौकोनी क्युब सोनेरी तळून घालायचे व काजू.
प्राजक्ता,विपु केली आहे.
प्राजक्ता,विपु केली आहे.
छान रेसिपी...
छान रेसिपी...
Chan recipe..
Chan recipe..
रुपाली, ऊर्मिला, धन्यवाद!
रुपाली, ऊर्मिला, धन्यवाद!
Rani_1, विपू बघा.
आज अकराच्या सुमारास बायकोला
आज अकराच्या सुमारास बायकोला व्हर्टिगोचा त्रास सुरू झाला. तिला गोळी घेऊन झोपावं लागलं.
माझी एक वाजता वेब कॉन्फरन्स होती. म्हटलं खिचडी करतो. तर तिच्या कपाळावर आठ्या आल्या. आणि माझाही खिचडी खाण्याचा मूड नव्हता. काय करावं विचार करत होतो तर याची आठवण झाली आणि ठरवले ग्रीन राईसच करायचा. ही पाकृ वाचून केला. यात मी ओलं खोबरं आणि आलं ही घातलं. मस्त झाला.
रायता करण्या एवढा वेळ नव्हता, दह्या सोबतही छान लागला.
छान पाकृ!
छान पाकृ!
छान पाकृ. हिरवा रंग ही मस्त
छान पाकृ. हिरवा रंग ही मस्त दिसतोय.
मी आलं, पुदिना आणि लिंबाचा रस
मी आलं, पुदिना आणि लिंबाचा रस पण घातला. छान झाला भात. धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
बरं झालं मानव, पाककृती लगेच उपयोगी पडली.
आज केला.. एकदम भारी लागतोय.
आज केला.. एकदम भारी लागतोय. करतानाच मस्त घमघमाट सुटलेला. थँक्यू या सोप्या रेसिपीसाठी. आता होईल बहुतेक नेहेमी करणं.
मी मिक्सर वाटणात आलं पण घातलं. पुदीना नव्हता आता नेक्स्ट टाईम घालेन तो पण.
वरून थोडं तुप घातलं.
हा घ्या
वाह मस्तच रेसिपी आणि क्रमवार
वाह मस्तच रेसिपी आणि क्रमवार एकेक फोटो.
अस्मिता, मानव आणि अंजली तुमचे फोटोही मस्तच.
अंजली, जबरदस्त रंग आला आहे!
अंजली, जबरदस्त रंग आला आहे!
मूळ पाककृती मध्ये पुदिना / खोबरं नाहीये. इथे काही जणांनी वापरलेला दिसतो. मी बघते आता पुदिना घालून.
अरेरे , आता करून बघायलाच
अरेरे , आता करून बघायलाच लागेल.
बिर्यानी , पुलाव , खिचडी , फोडणीचा भात..... सगळे प्रकार आवडतात.
झणझणीत खाता नाही येणार , सौम्य ग्रीन राईस करेन.