झणझणीत ग्रीन राईस

Submitted by Prajakta Y on 29 May, 2021 - 12:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तीन वाट्या बासमती राईस,
अर्धी जुडी कोथिंबीर स्वच्छ केलेली आणि धुतलेली,
लसणाच्या साधारण पंधरा पाकळ्या,
मुठभर मिरच्या- या तिखटच हव्या,
एक वाटी मटार

क्रमवार पाककृती: 

Screenshot_20210529-204108.jpg

फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी कमी जिन्नसात होणारी , भन्नाट पाककृती आहे. ३१ डिसेंबरला नवऱ्याच्या मित्राकडे काहीजण जमलो होतो. तिथे एका मैत्रिणीने केली होती. भात डायरेक्ट कुकरला टाकून आपण निवांत बसता येते. पटकन होणारी सोपी पाककृती! मिरची लवर्स साठी खास!

१. अर्धी जुडी कोथिंबीर- लसणाच्या पंधरा-वीस पाकळ्या आणि मुठभर मिरच्या हे सर्व मिक्सरला कमीत कमी पाण्यात वाटून घ्यावे . मिक्सर चे झाकण उघडताना सावकाश मिरच्यांचा झणका जाणवेल!
२.कुकरमध्ये दोन डाव तेल घालावे. ते गरम झाले की हे हिरवे वाटण त्यात घालायचे आहे. हे वाटण हाताळताना प्रत्येक वेळेला जपून.

Screenshot_20210529-214206.jpg

३.चार ते पाच मिनिटे मिडीयम-हाय आचेवर मिश्रण परतले की त्यात एक वाटी मटार घालावेत आणि धुतलेला बासमती तांदूळ घालावा. पाणी न घालता हे सर्व परत चार-पाच मिनिटं परतून घ्यावं व अंदाजाने पाणी घालून दोन चमचे मीठ घालून व्यवस्थित हलवून झाकण लावून टाका.
Screenshot_20210529-204116.jpg
४. एक किंवा दोन शिट्यातच घरभर असा काही वास दरवळतो की बस! ५. कुकर उघडला की मटार वर जमलेले दिसतिल. ते नीट एकत्र करून घ्यावे आणि सर्व्ह करावा.
मिरची आणि लसूण यांचे स्ट्रॉंग फ्लेवर्स असल्यामुळे मी सोबत दही बुंदी केली होती. हे कॉम्बिनेशन खूप छान जाते.

Screenshot_20210529-222538.jpg

वाढणी/प्रमाण: 
४ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

लहान मुले खाणार असतील तर मिरच्या कमी घाला. पण खरं तर मिरच्या भरपूर असतील तर मस्त चव येते.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रेसिपी..

आमच्याकडे असाच ग्रीन राईस करतात फक्त ओलं खोबरं +आलं+लसूण आणि कोथिंबीर याचं वाटणं आणि मटारऐवजी गावठी हिरवा पावटा वापरतात..

मस्त रेसिपी, मी करून पाहिला पण गडबडीत भात करून मग या मसाल्यात फोडणी दिला तरीही छान झाला होता. काजू सापडले नाही म्हणून थोडे पिस्ते टाकले. झणझणीत फोडणीचा ग्रीन राईस. Happy थँक्स प्राजक्ता.
Screenshot_20210530-080205_Gallery.jpg

केल्याचे कळविल्याबद्दल धन्यवाद अस्मिता! आणि बाकी सर्वांना सुध्दा.
मी पण करून बघेन अशा पध्दतीने.

मस्त रेसिपी आहे, नक्की आवडेल. आता वाचली आणि उद्याच्या लंचसाठी ठरवुनही टाकली.
अजय चव्हाण, तुमची पावटा भाताची रेसिपीसुद्धा आवडली. पावटा मिळाल्यावर नक्की करून पाहीन.

मी असा पीज पुलाव बनवते नेहमी पण माझा कमी तिखट असतो. व खडा मसाला घालून साजूक तुपाच्या फोडणीत.

वरून पनीरचे बारीक चौकोनी क्युब सोनेरी तळून घालायचे व काजू.

आज अकराच्या सुमारास बायकोला व्हर्टिगोचा त्रास सुरू झाला. तिला गोळी घेऊन झोपावं लागलं.
माझी एक वाजता वेब कॉन्फरन्स होती. म्हटलं खिचडी करतो. तर तिच्या कपाळावर आठ्या आल्या. आणि माझाही खिचडी खाण्याचा मूड नव्हता. काय करावं विचार करत होतो तर याची आठवण झाली आणि ठरवले ग्रीन राईसच करायचा. ही पाकृ वाचून केला. यात मी ओलं खोबरं आणि आलं ही घातलं. मस्त झाला.

Screenshot_20210602-160908_Gallery.jpg

रायता करण्या एवढा वेळ नव्हता, दह्या सोबतही छान लागला.

आज केला.. एकदम भारी लागतोय. करतानाच मस्त घमघमाट सुटलेला. थँक्यू या सोप्या रेसिपीसाठी. Happy आता होईल बहुतेक नेहेमी करणं.
मी मिक्सर वाटणात आलं पण घातलं. पुदीना नव्हता आता नेक्स्ट टाईम घालेन तो पण.
वरून थोडं तुप घातलं.

हा घ्या rice.jpg

अंजली, जबरदस्त रंग आला आहे!

मूळ पाककृती मध्ये पुदिना / खोबरं नाहीये. इथे काही जणांनी वापरलेला दिसतो. मी बघते आता पुदिना घालून.

अरेरे , आता करून बघायलाच लागेल. Happy
बिर्यानी , पुलाव , खिचडी , फोडणीचा भात..... सगळे प्रकार आवडतात.
झणझणीत खाता नाही येणार , सौम्य ग्रीन राईस करेन.

Back to top