केकसाठी:
१. दिडकप मैदा / केक फ्लोअर
२. दिड टीस्पून बेकिंग पावडर
३. पाव टीस्पून मीठ
४. पाच अंडी.
५. एक कप साखर - पाऊण कप आणि पाव कप अश्या दोन भागांत
६. एक टीस्पून व्हॅनिला इसेन्स
७. १/३ कप दूध
दुधाचं मिश्रण
१. १४ Oz कन्डेन्स्ड मिल्क (स्वीट)
२. १२ Oz इव्हॅपोरेटेड मिल्क
३. १ कप होल (फुल फॅट) मिल्क (आपलं नेहमीचं दुध)
फ्रॉस्टींग साठी
१. २ कप हेवी व्हिपींग क्रिम
२. २ टेबलस्पून साखर
३. आवडीनुसार फळं. स्ट्रॉबेरी, रासबेरी, किवी, संत्र्याच्या बारक्या फोडी, पिचचे तुकडे वगैरे.
परवा 'मदर्स डे'च्या दिवशी मला अचानक ऑन-कॉल ड्युटी आली. तसही सध्या फार कुठे जाता येत नाही पण जर बाहेर ऊन असेल तर चालायला किंवा हायकिंगला जाता येतं पण आता दिवसभर घरात बसायला लागणार होतं. घरातली मदर ग्रोसरीला जाणारच होती. तिला म्हंटलं तुला जर केक खायचा असेल तर मी यादी देतो त्याप्रमाणे सामान आण. एकंदरीत ऑन-कॉल आघाडीवर शांतता असल्याने दुपारी हा केक करायला घेतला.
*
अटलांटाला एक 'मँबो कॅफे' नावाचं क्युबन रेस्टॉरंट होतं. तिथे हा 'त्रेस लेचेस' म्हणजे शब्दशः अर्थ 'तीन प्रकारची दुधं' असलेला केक खूप भारी मिळायचा. मायबोलीकर प्रॅडी हिच्या घरीच पहिल्यांदा खाल्ला होता. नंतर बरेचदा आणला जायचा. पुढे पॅसिफिक नॉर्थवेस्टात आल्यावर हा केक खाणं जरा कमी झालं कारण इथे लॅटीन अमेरिकन / मॅक्सिकन रेस्टॉरंट अटलांटापेक्षा कमी आहेत. पण तरीही आठवण यायचीच. परवा फ्लॅन केक केला तेव्हाच पुढचं बेकिंग त्रेस लेचेस केक करायचा हे ठरवलं होतं. तीन प्रकारची दुधं असल्याने हा केक ओला असतो पण तरी लिबलिबित नसतो. केकमध्ये दुधं पुरेसं शोषलं जातं.
१. मोठ्या भांड्यात मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ चाळून घेतलं.
२. वेगळ्या दोन भांड्यांमध्ये अंड्यांमधलं पिवळं आणि पांढरं वेगवेगळं करून घेतलं.
३. अंड्यातल्या पिवळ्यामध्ये पाऊण कप साखर घालून हँडमिक्सरने हाय स्पिडवर फेटून घेतलं. ( मिश्रणाचा रंग फिकट पिवळा झाला पाहिजे). नंतर त्यात दुध आणि व्हॅनिला इसेन्स घालून ढवळून घेतलं.
४. अंड्यातल्या पांढरं हँडमिक्सरने हायस्पिडवर 'सॉफ्ट पीक्स' येईपर्यंत फेटून घेतलं. हे करत असताना उरलेल्या पाव साखरेतली थोडी थोडी साखर त्यात घालत रहायचं. हे करण्याआधी हँडमिक्सरचं पातं स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं. वरचं पिवळ मिश्रण ह्यात जाता कामा नये नाहीतर सॉफ्ट पीक्स नीट येत नाहीत. मी मागे एकदा हाताने फेटून हे करायचं प्रयत्न केला होता पण अजिबात पीक्स आली नाहीत आणि दुसर्या दिवशी जिम केल्यावर दुखतो तसा हात दुखला !
५. आता पीठाच्या मिश्रणात पिवळं मिश्रण ओतलं आणि हलक्या हाताने ढवळून घेतलं. आता फेटायचं नाही फक्त पीठ व्यवस्थित गुठळ्या न रहाता मिसळलं गेलं पाहिजे.
६. आता ह्या मिश्रणात पांढर मिश्रण ओतून अतिशय हलक्या हाताने एकत्र करून घेतलं. सॉफ्ट पीक्स मोडायचे नाहीत कारण केक ह्या पीक्समुळेच फुगतो. हे सगळं मिश्रण नेहमीच्या केकपेक्षा हलकं आणि फेसाळ होतं (कारण ह्यात फक्त दीड कपच पीठ आहे आणि पाच खूप फेटलेली अंडी आहेत).
७. ९ X १३ च्या बेकींग ट्रेल थोडा बटर किंवा तेलाचा हात लावून मिश्रण त्यात ओतून ३५० डी.फॅ. वर तीस ते पस्तिस मिनिटे बेक करून घेतलं. (टूथपीक कोरडी बाहेर येईपर्यंत). हे जर काचेच्या किंवा चिनी मातीच्या डीशमध्ये केलं तर केक चांगला फुलतो म्हणे शिवाय केक संपेपर्यंत त्यातच ठेऊन देता येतो. आम्ही त्यानिमित्ताने नवीन काचेची बेकींग डीश आणली.
८. केक झाल्यावर अवनबाहेर काढून (बेकींग डीशमध्ये तसाच ठेऊन) पूर्ण गार करून घेतला. कितीही मोहं झाला तरी कापून खाऊ नये (आणि मुख्य म्हणजे घरातल्या बाकी मेंब्रांना तसं करू देऊ नये!).
९. दुधाचं मिश्रण करण्यासाठी तीन दुधं मिक्सरमध्ये मिनिटभर घुसळून घेतली.
१०. गार झालेल्या केकला काट्याने टोचून भोकं पाडली आणि दुधाचं मिश्रण सगळीकडे सारखं ओतलं. भोकांमुळे दुध आतपर्यंत झिरपतं. बघताना दुध खूप जास्त आहे असं वाटेल पण ते सगळं केकमध्ये व्यवस्थित शोषलं जातं. त्यामुळे वाटलं तरी वगळू नये. साधारण अर्धातास मुरण्यासाठी ठेऊन द्यावं.
११. आता व्हिपींग क्रीम एका भांड्यात घेऊन हॅंड मिक्सरने घट्ट(पसरता येण्याइतकं) होईपर्यंत फेटून घेतलं.
१२. व्हिपींग क्रिमचा सारखा थर पूर्ण केकला लावून घेतला आणि गार करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेऊन दिलं.
१३. खाण्यासाठी स्ट्रॉबेरीज आणि किवीचे पातळ काप करून केकवर लावले आणि मग उभे स्लाईस करून खाल्ले. केक कापताना लिबलिबीत होत नाही पण तरीही केक छान ओलसर आणि गोड लागतो.
*
*
१. फळं अगदी ऐनवेळी लावावी. आधीपासून लाऊन कदाचित आंबट होऊ शकतात. हापूस आंबे असतील तर त्याचे कापही ह्यावर लाऊन भारी लागतील! (अर्थात हापूस आंबा केक वगैरे लावणं म्हणजे जरा.......... !)
२. ह्या केकमध्ये अजिबात बटर घातलेलं नाहीये पण बाकी भरपूर फॅट्स आहेत!
३. केल्या केल्या कदाचित थोडास अंड्याचा वास येई शकतो पण नंतर तो जातो. केक गार करताना जर त्याला वारा लागला तर अंड्याचा वास येतो असं नेटवर वाचलं. त्यामुळे गार करताना जाळी ठेऊन गार करावा. फेटलेल्या अंड्यांमुळे केक खूपच हलका होतो.
जबरी केक
जबरी केक
खुप मस्त दिसतोय केक..
खुप मस्त दिसतोय केक..
मस्त दिसतोय केक.
मस्त दिसतोय केक.
मला एरवी केक्स खूप आवडत नाही.
मला एरवी केक्स खूप आवडत नाही. खाताना नेहमीच कॅलरीजचा विचार मनात येतो. पण हा केक मात्र प्रचंड आवडतो. सेफवे मध्ये मिळतो तो मी नेहमी आणते. एक एक घास अक्षरशः जिभेवर मेल्ट होतो. मी केक शक्यतो कधीच घरी करत नाही, कारण बेकिंगची आवड नाही व घरचेही माझ्यासारखे फारसे केक खात नाहीत. पण एकदा ह्या रेसिपीने करून पाहायचा विचार करत आहे. बघूया जमते का
खूप दिवस हा केक बनवायचे मनात
खूप दिवस हा केक बनवायचे मनात होते. शेवटी ख्रिसमसचा मुहूर्त मिळाला. रेसिपी हीच तंतोतंत....
वरील सजावट लेकीने केलीय.
मस्त दिसतोय.
मस्त दिसतोय.
मस्त माऊ
मस्त माऊ
मस्त दिसतोय त्रेस लेचेस केक!
मस्त दिसतोय त्रेस लेचेस केक! तोंडाला पाणी सुटलंय. बंगलोरच्या मॅग्नोलिया बेकरी (न्यूयॉर्क) चा त्रेस लेचेस केक आमचा फेवरेट
क्या बात है! जबरी दिसतोय.
क्या बात है! जबरी दिसतोय.
सुरेख दिसतोय माऊमैया !!
सुरेख दिसतोय माऊमैया !!
धन्यवाद सर्वांना....
धन्यवाद सर्वांना....
वर्णनावरून भारी वाटतोय केक.
वर्णनावरून भारी वाटतोय केक.
स्विगीवर जवळपास दिसतोय. मागवायचा मोह होतोय
होऊन जाऊदे 31 डिसेंम्बर ला
होऊन जाऊदे 31 डिसेंम्बर ला खर्च!
खूपच लाळगाळू दिसतोय केक. आता
खूपच लाळगाळू दिसतोय केक. आता खाल्ल्याशिवाय चैन पडणार नाही. सेम टू सेम कुठे मिळेल?
सेम टू सेम कुठे मिळेल? <<
सेम टू सेम कुठे मिळेल? << अमेरिकेत कॉस्को (Costco) मधे मिळतो..
सेम टू सेम कुठे मिळेल? <<
सेम टू सेम कुठे मिळेल? << अमेरिकेत कॉस्को (Costco) मधे मिळतो..>>>> ठाण्यावरून अमेरिकेला केक खायला जाणे परवडणार नाही मला
ठाण्यातल्या केक शॉप मध्ये शोधला पण नाहीये जवळपास कुठेच
होय हा त्रे लेचे केक म्हणजेच
होय हा त्रे लेचे केक म्हणजेच मिल्क केक ना? डि-व्हा-इ-न!!! लागतो
माउमैय्या सुंदर आहे तुम्ही बेक केलेला, केक.
ठाण्यावरून अमेरिकेला केक
ठाण्यावरून अमेरिकेला केक खायला जाणे परवडणार नाही मला <<< त्यात काय? दोन डोस घ्या, एक तिकीट काढा, आर्टी पिसीआर करा, आणि बसा विमानात.. खाण्यापुढे कशाची काळजी..
Quattro Restorante Lower
Quattro Restorante Lower Parel येथे मिळेल मामींनी आधीच सांगितल आहे.
निल्सन, मेक्सिकन फूड मिळणार्
निल्सन, मेक्सिकन फूड मिळणार्या ठिकाणी शोधा.
भांडुप - New York Burrito Company इथे दिसतो आहे.
New York Burrito Company इथे
New York Burrito Company इथे दिसतो आहे. >>>Yess इथे आहे, मलापण दिसला zomato वर. धन्यवाद आता ठाण्यात डिलिव्हरी देतात का बघते.
त्यात काय? दोन डोस घ्या, एक
त्यात काय? दोन डोस घ्या, एक तिकीट काढा, आर्टी पिसीआर करा, आणि बसा विमानात.. खाण्यापुढे कशाची काळजी..>>>> आम्ही आणि आमच्या गेल्या कित्येक पिढ्या अमेरिका काय साधे महाराष्ट्राच्या बाहेर पण गेल्या नाहीत. जर मी केक खायला अमेरिकेला गेली तर माझं नाव सुवर्णाक्षरात कोरवे लागेल
रेस्पीचे नाव बदलून लैच
रेस्पीचे नाव बदलून लैच त्रासाचा केक ठेवा. हे झेंगाट जमणारे नाही आणि सारखे बघून कालवाकालव होतीया
रेस्पीचे नाव बदलून लैच
रेस्पीचे नाव बदलून लैच त्रासाचा केक ठेवा. >> अगदी अगदी . मी तर लै त्रासाचा केकच वाचतेय कधीपासून .
ईतकं दूध असेल तर मी कदाचित खाणार नाहे , पण भारीच टेम्टीन्ग दिसतोय
माझं नाव सुवर्णाक्षरात कोरवे
माझं नाव सुवर्णाक्षरात कोरवे लागेल >>>> अरे दुग्धशर्करा योग.. किंवा त्रेस लेचेस् योग..
आज हा केक करून बघितला. सगळे
आज हा केक करून बघितला. सगळे प्रमाण जसेच्या तसे वापरून सुद्धा केक किंचित जास्त गोड आणि थोडा लिबलिबित झाला. घातलेले सगळे दूध शोषले गेले नाही, थोडे तळाशी राहिलेले आहे. Condensed मिल्क थोडे कमी घालायला पाहिजे असे वाटले.
वरून केक आणि खाली रसमलाई
वरून केक आणि खाली रसमलाई झालेला केक म्हणजेच तर खरा त्रेस लेचेस केक! अहाहा!... तुम्हाला नको असेल तर मला पाठवा.
वरून केक आणि खाली रसमलाई
वरून केक आणि खाली रसमलाई झालेला केक म्हणजेच तर खरा त्रेस लेचेस केक!
>> बरोबर, असाच झालाय. वर ओलसर केक आणि खाली शाही तुकडा (बासुंदीत भिजलेला). यु के मध्ये असाल तर नक्कीच घेऊन जा चांगला मोठा केक झालाय.
Pages