Submitted by Dr. Satilal Patil on 10 May, 2021 - 22:43
नमस्कार,
मी महिन्याभरापूर्वीच मायबोलीवर आलोय. मायबोलीवर जास्तीत जास्त वाचकांपर्यंत लेखन पोहोचवण्यासाठी काय करायला हवे याचे कृपया मार्गदर्शन करावे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिपाची जाहिरात चालू आहे आहे
मिपाची जाहिरात चालू आहे आहे का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी वाचतो पण प्रतिसाद देत नाही
मी वाचतो पण प्रतिसाद देत नाही. कारण मग ते डबल होतील.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
( समजले त्याला समजले)
आता हा एक संवाद पहा. मर्म समजून घ्या
"अगं , कित्ती दिवसांनी दिसलीस? कुठे होतीस ?"
( माझ्या चार चार पाकृ वर प्रतिसाद नाही तुझा )
" काही नाही गं, बिझी होते "
( कळतात हो बोलणी. खूपच प्रेम आलंय)
" आज वेळ मिळाला वाटतं "
( आज काय रिकामा वेळ का मग ?)
" अगं आज एक मस्त प्रवासवर्णन पोस्ट केलंय"
" अय्या हो का ? काय बाई तुझं. मज्जा आहे. कुठे कुठे फिरून येतेस. चल कामं आहेत घरातली, ऑफीसची. भेटु गं लवकर "
( तू बस भटकत आणि आम्ही काय प्रतिसाद देत बसायचं का ? ते काही नाही. जोपर्यंत पाकृवर प्रतिसाद येत नाही, तोपर्यंत मी पण अज्जिबात ढुंकून सुद्धा बघणार नाही. आम्ही काय रिकामटेकडे आहोत का ?"
" अगं हो का ? काळजी घे गं "
( बरी आत्ताच कामं आली. जोपर्यंत हिच्या पाकृवर दोन शब्द लिहीत नाही तोपर्यंत ही काही परत यायची नाही आता)
(No subject)
(No subject)
"कसदार लेखन"
"कसदार लेखन"
ते तर रमेश मंत्रींनी पण कधी
ते तर रमेश मंत्रींनी पण कधी केलं नाही ओ.
छान धागा
छान धागा
कसदार लेखन"
कसदार लेखन"![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>
पुरस्कार मिळवायला काय करावे विचारले नाहीये
<< पारंबीचा आत्मा, रावल्या
<< पारंबीचा आत्मा, रावल्या मशीनवाला, mi_anu, मानव पृथ्वीकर, धनवन्ती, जिज्ञासा, नानबा, ऋन्मेऽऽष, mi_anu, बोकलत, वर्णिता, अभि_नव, स्वाती२, पाचपाटील, मामी, अस्मिता, रानभुली, सीमंतिनी, जेम्स बॉन्ड, वीरु, शापित आयुष्य आपल्या सूचना आणि अभिप्राय छान आहेत. आपण सुचवल्यानुसार पुढचे लेख मायबोलीवर टाकतो. >>
------ जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचायचे असेल तर आधी ऋन्मेऽऽष यांच्या धाग्यांचा अभ्यास करा.... हमखास यशस्वी व्हाल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मायबोलीवर जास्तीत जास्त
मायबोलीवर जास्तीत जास्त वाचकांपर्यंत लेखन पोहोचवण्यासाठी काय करायला हवे ??
मायबोलच नाही तर इंटरनेटवर कुठेही लिहणाऱ्याने लिहित जावे. वाचक हळूहळू येतात. काही प्रतिक्रिया देतात काही देत नाही. लिहणे सोडू नये.
नवीन Submitted by बेफ़िकीर on
नवीन Submitted by बेफ़िकीर on 13 May, 2021 - 22:07
<<
पाहून ड्वाले निवले.
मायनी आन भो! तुमची अन आमच्या तंतुलित महेश यांची फार आठवण येत होती परवा.
आल इस वेल?
ते तर रमेश मंत्रींनी पण कधी
ते तर रमेश मंत्रींनी पण कधी केलं नाही ओ.
Submitted by पारंबीचा आत्मा on 13 May, 2021 - 21:32
<<
मायबोलीवर जास्तीत जास्त वाचक मिळवायची पण त्यांना काही पडलेली नव्हती असे वाटते![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तसं पाहिलं तर कसदार लेखन मस्तराम देखिल करत असत म्हणे. तेव्हा एका परिप्रेक्ष्यातून तर वाचकवर्गावर पण बरंच डीपेंड अस्तं असं वाट्टं.
रमेश मंत्री हे पहिल्या
रमेश मंत्री हे पहिल्या धारेच्या विनोदी लेखकांमधले नाव आहे. त्यांचे लेखन कसदार नसूनही त्यांचे लिखाण दिवाळी अंक, मासिके यातून छापून येत असे. पुस्तकेही खपत होती. असे बरेच आहेत.
त्यांचे लेखन कसदार नसूनही
त्यांचे लेखन कसदार नसूनही
<<
कसदार नसूनही, म्हणजे नक्की कसे?
आत्माराम्भौ, पब्लिकला आवडते, ते कसदार. कसदार विनोद हा कधीकधी चावट, थिल्लरही असू शकतो. टवाळांना आवडला म्हणजे झाले![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कसदार म्हणजे जडजंबल तत्वप्रचुर आकलनास कठीण असा अर्थ नाही.
किमान लॉजिकल, सामान्य मनांस भावेल, काही विचार मांडेल, काही करमणूक देईल, काही माहिती, ज्ञान, त्यात रस उत्पन्न होइल याप्रकारे मांडेल, असे लेखन नेहेमीच पॉपुलर होते असे माझे तरी मत आहे.
माझ्या आजपर्यंतच्या वाचन प्रवासावरून, मला जे लेखन आवडते ते माझ्या जीवनानुभवाशी जवळीक साधणारे असते. किंवा त्यात भर घालणारे असते. अन वाचनाचे ज्योनर बालवाङ्मयापासून सायन्स फिक्शन, तत्वज्ञान, इतिहास, संशोधन असे सगळेच आहे. भेळ बांधून आणलेल्या पेपरच्या कागदावर छापलेले लेखनही वर्ज्य नाही. कधीकधी तेही चित्ताकर्षक अन कसदार वाटते.
तुम्हाला कोणते कसदार अपेक्षित
तुम्हाला कोणते कसदार अपेक्षित होते ? मी त्यावर माझा प्रतिसाद दिला होता.
तुम्हाला कसदार - पॉप्युलर म्हणायचे होते का ?
न्यूट्रीशनल व्हॅल्यू वाले.
न्यूट्रीशनल व्हॅल्यू वाले.
कस चा अर्थ मोल्स्वर्थ शब्दकोशात :
कसदार kasadāra (p. 145)
कसदार kasadāra a Having कस q. v. Sig. I. Substantial, pithy, sappy, possessing substance, strength, goodness.
असा आहे.
आय मीन्ट एक्झॅक्टली दॅट.
रच्याकने,
रच्याकने,
तुम्हाला दिलेला पहिला प्रतिसाद तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून ऋन्म्याला मारलेली गोळी होती.
बादवे, जिज्ञासूंसाठी:
बादवे, जिज्ञासूंसाठी:
http://dsal.uchicago.edu/dictionaries/
या लिंकेवर डिक्श्नरीज फॉर साऊथ एशियन लॅन्ग्युएजेस उपलब्ध आहेत. युनिवर्सिटी ऑफ शिकागो चा उपक्रम. बुकमार्क करून ठेवावी अशी साईट आहे.
लिंक साठी धन्यवाद सर !
लिंक साठी धन्यवाद सर !
तुम्हाला दिलेला पहिला
तुम्हाला दिलेला पहिला प्रतिसाद तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून ऋन्म्याला मारलेली गोळी होती.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>>>>>
कुठला प्रतिसाद कुठली गोळी.. मला कशी नाही कळली.. आरपार गेली काय
अगदी शिकागो चिकागोला जायची
अगदी शिकागो चिकागोला जायची गरज नाही.
आपल्या अस्सल मराठी माणसांनी consolidate केलेला कोश
https://bruhadkosh.org/
संकल्पना: आदूबाळ | तंत्रज्ञान निर्मिती: प्रसाद शिरगावकर | विदा संकलक: ऋषिकेश खोपटीकर.
ऋन्मेऽऽष
ऋन्मेऽऽष
कुठला प्रतिसाद कुठली गोळी.. मला कशी नाही कळली.. आरपार गेली काय>>>>>
मान गये !
प्रभूदेसाई, अस्सल मराठी
प्रभूदेसाई, अस्सल मराठी माणसांनी शिकागोला जाऊनच तो माल आणलाय
The searchable data of the above dictionaries has been sourced from Digital Dictionaries of South Asia (DDSA). We are thankful to DDSA, and their benefactors, namely U.S. Department of Education and other government agencies and foundations.
भरत
भरत
हे मला माहित नाही काय ?
पण त्यांनी दोन तीन कोश एकत्र केले आहेत. हे ही नसे थोडके
त्याचे श्रेय द्या ना.
एकत्र केले की एकाच
एकत्र केले की एकाच शोधसुविधेने मिळतील अशी सोय केली? अर्थात ही सोय चांगलीच आहे.
भरत
भरत
अजून एक
मी हा कोश प्रसिध्द झाल्यापासून जवळ जवळ रोज वापरतो आहे. हल्ली हल्ली मधूनच 'शब्द कौमुदी' चा उल्लेख यायला लागला आहे. हा कोश श्री पटवर्धन ह्यांचा आहे. हा कोश म्हणजे मराठीचा 'अमरकोश' असावा. कॉपी मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे.
कुणाला अधिक माहिती असेल तर कृपया share करा.
तो कोश कसा वापरायचा आहे ?
तो कोश कसा वापरायचा आहे ? इंग्रजी शब्दावरून मराठी शब्द हवा असेल तर सोय आहे का ?
मराठी मराठी असा आहे.वापरून
मराठी मराठी असा आहे.वापरून पहा.
मराठी मराठी असा आहे.वापरून
......
पण त्यांनी दोन तीन कोश एकत्र
पण त्यांनी दोन तीन कोश एकत्र केले आहेत. हे ही नसे थोडके
<<
देसाईअप्पा, इथे कम्बाइण्ड सर्व शब्दकोश शोधायची सोय त्याच लिंकेवर उपलब्ध आहे.
गिव्ह क्रेडिट व्हेअर इट्स ड्यू. तिथे त्या युनिवर्सिटीने आपली भाषा अन तिचा इतिहास डिजिटाईज करून शोधायला सोप्या स्वरुपात फार पूर्वी फु क ट उपलब्ध करून दिलेला आहे.
पण असोच. झेंडा उंचा रहे हमारा.
बृहद्कोश हा चांगला प्रकल्प आहे असे म्हणतो.
कृ पां कुलकर्णी यांचा
कृ पां कुलकर्णी यांचा (श्रीपाद जोशी यांनी सुधारून संपादिलेला) मराठी व्युत्पत्ती कोश जर जालावर आला तर खूपच सोयीचे होईल.
कुठे काही प्रयत्न चालू आहेत काय?
<बृहद्कोश हा चांगला प्रकल्प
<बृहद्कोश हा चांगला प्रकल्प आहे असे म्हणतो.>
धन्स
आता विज्ञान हा शब्द दोनी ठीकाणी एन्टर करून पहा कसे वाटते ते .
लोक वाचत असतात .
लोक वाचत असतात .
पण वाचकांचे काही सांगू शकत नाही . ज्यांना ज्या प्रकारचं लेखन आवडतं , जसं ते म्हणतात, तसं लेखन ते वाचतीलच , त्यावर प्रतिसाद देतीलच याची काही ग्यारंटी नाही .
जे इतर सुमार प्रवास वर्णनं वाचून प्रतिक्रिया देतील . भरभरून बोलतील ते तुमच्या प्रवास वर्णनांवर व्यक्त होतीलच असं काही नाही . या गोष्टीच कोणालाही आश्चर्य वाटेल - पण असं आहे खरं . लोक बऱ्याचदा लेखकाला प्रतिक्रिया देतात , लेखन कसंही असलं तरी चालतंय .
कोणता विषय आणि कोणी लिहिलं
कोणता विषय आणि कोणी लिहिलं आहे यांंवर पुढे वाचक वाढतात.
१) पयशे मिळवणे
२) आरोग्य
३) विनोदी लेखन
या क्रमाने लेख (सध्या) मायबोलीवर वाचले जातात. भटकंती विषय मागे पडला आहे. म्हणजे तुमचाच लेख नव्हे तर हा विषयच मागे पडला आहे. पण कुठे तरी आपल्या डायरीत धूळ खात पडण्यापेक्षा फोटोंसह नेटवरती पडला तर बरं या विचाराने मी लिहितो. फार काही प्रतिसाद आले नाही तरी वाईट वाटत नाही.
मी काही लेख वाचले. लेखनात
मी काही लेख वाचले. लेखनात उपमांचा अतिरेक आहे. बाईक म्हणजे माधुरी दिक्षीत असल्या उपमा आता कालबाह्य आहेत. कसली इमेज डोळ्यासमोर येते?! वाक्या वाक्यात उपमा हे जरा शालेय निबंधासारखे होते आहे तसे होउ देउ नका. भुतान वरच्या लेखात अशी माहिती आहे ती भटकंती सदरात येत नाही. दळण प्रकारची व विद्युत प्रकल्पांची माहिती जी विकी वरूनही मिळते अशी माहिती देउन उपयोग नाही. स्लाइस ऑफ लाइफ व माणसांचे व अन्न संस्कृतीचे अनुभव नवी लोकेशन्स जी परदेशातील सभासदंनी पाहिली नाही आहेत त्याचे फोटो दिले तर लोकांना
वाचायला मजा येइल व प्रतिसाद वाढतील.
.
.
कंपू
कंपू
Pages