कोविड डायरीज! - सारांश, लर्निंग आणि डिलर्निंग!

Submitted by अज्ञातवासी on 6 May, 2021 - 15:12

डिस्क्लेमर - विस्कटलेले रॉ विचार वाचायचे नसतील, तर खालचा धागा वाचू नये.

१. जे म्हणतात जीवन क्षणभंगुर आहे इ. इ. त्यांना एकच सांगावस वाटतं, जेव्हा तुम्ही पॉजिटिव्ह असाल, आणि बेडची गरज असेल, तर तुमचं क्षणभंगुर जीवन संपवा, आणि ज्याचं जीवन खूप अमूल्य आहे, अशा व्यक्तीला जीवन द्या.
२. जगातलं सगळ्यात जास्त ज्ञान आपल्याला आहे, आणि त्या ज्ञानाचे अमृतकण प्रत्येकाकडे सांडूयातच असं ज्यांना वाटतं, त्यांनी अपमान सहन करण्याची तयारी ठेवावी.
३. या अशा वातावरणात, आपल्या आप्तेष्टांची चौकशी वगैरे करा असे भारावलेले मेसेज बघून आपण भारावून जाऊन समोरच्याला फोन करून अर्धा तास डोकं खाणं सिम्पली नॉट डन. प्रत्येकाला घरदार आणि आयुष्यात काही स्पेशल लोक आहेत. शाह रुख खान डियर जिंदगी मध्ये म्हणून गेलाय, 'कभी कभी हम खुदको जिंदगीमे जितना स्पेशल समझते है, उतने हम होते नही.'
४. मी प्रोफेशनल लाईफमध्ये शांत रहायला शिकलोय. होतात चुका, माणसं आहेत. करतील बरोबर. थोडंफार चुकल्याने काही नाही होत. थोडंफार लेट झालं काही नाही होतं. शांत रहा. प्रत्येकाची मनस्थिती बिघडलीय, अजून बिघडवू नका.
५. प्रत्येक मरण दुःखदायक नसतं. गमावल्याची भावना असते, आणि कधीकधी सुटकेचा निश्वास असतो.
६. अतिप्रयत्न करू नका, की डिप्रेशन येईल. प्रयत्न करा, पण मर्यादा ठरवा. अपयश स्वीकारा, मार्ग शोधा. जिवंत आहोत, हेच मोठं यश आहे.
७. निगेटिव्ह विचार येतात मनात. स्वीकार, विचार कर, जगणं चालू ठेव. कोरोनाची भीती जर तुला काळजी घ्यायला भाग पाडत असेल, तर भीती चांगली आहे. फुल पोजिटीवीटीने निष्काळजी होऊन पोजिटीव्ह होण्यापेक्षा लाख पटीने चांगलं.
८. शेजारी सख्खे शेजारी जरी असले, तरीही कुणीही स्वतःहून आमच्या घरात कोरोना पेशन्ट आहे हे सांगत नाही, म्हणून थोडं काळजीपूर्वक वागा.
९. गावभर फिरून एखादा ओळखीचा भेटला, तर मास्क काढलाच पाहिजे त्याच्याशी बोलायला, असेही महाभाग आहेत. जपा.
१०. डोन्ट प्लॅन फॉर लॉंग. छोटे गोल ठेवा.
११. तिसऱ्या लाटेत किती लाशे बीछतील, याचे आकडेवारी न्यूज वाल्यांनी टीआरपी साठी मांडायला सुरुवात केलीये. लक्ष देऊ नका.
१२. ठाम रहा, नाही म्हणायला शिका, कुणी इरिटेट करत असेल, तर स्पष्ट सांगायला शिका.
१३. आपल्या अतिशय जवळच्या लोकांची यादी बनवा, जे आपल्यालाही जवळचे मानतात. त्यांच्याशी टच मध्ये राहा. Choose wisely.
१४. नुसती तोंडओळख असेल, आणि त्यांच्यातल कुणी गेलं असेल, तर फक्त भावपूर्ण श्रद्धांजली आणि एक पुष्पगुच्छ एवढं लिहिलं तरी पुरे. लगेच फोन लावून काय झालं, कस झालं, मग यालाही झाला होता, त्यालाही झाला होता, याची गरज नाही.
१५. कोरोना म्हणजे 5G रेडिएशन नाही.
१६. १८+ आणि ४५- असलात आणि लस घेतली तर लगेच 'मी लस घेतली भो' करत फुशारक्या मारत हिंडू नका.

काही अतिशयच विस्कटलेले विचार...

१. Bonnie Wright ही Emma watson पेक्षा सुंदर दिसते.
२. Whatsapp वर ttyl तरी टाकायला हवं बोलताना, कितीही अर्जन्सी असली तरी.
३. दिलबाग सिंगची भूमिका ज्याने वठवलीय, जबरदस्त.
४. गाडीत jumper असायला हवा.
५. The invincible is best animat superhero serie
६. Darkseid हा थानोसपेक्ष्या भयंकर आहे.
७. काही नवीन फॅमिली फोटो काढून फोनमध्ये सेव करायला हवेत.
८. आजकाल मी विनाकारण केव्हाही 'bring me thanos' पुटपुटतोय. सवय मोडायला हवी.
९. अज्ञातवासीचा पुढचा भाग लिहायला घ्यावा. द शो मस्ट गो ऑन!

समाप्त!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेजारी सख्खे शेजारी जरी असले, तरीही कुणीही स्वतःहून आमच्या घरात कोरोना पेशन्ट आहे हे सांगत नाही... १००% खरं... याचमुळे जवळ च्या लोकांना ञास झाला आहे.

सगळेच मुद्दे पटले आहेत. ..
करोनाने लोकांची खरी maturity समोर आणली. एरवी खूप casual वाटणार्‍या एका काकांनी स्वतः होऊन पूर्ण सोसायटीत कळवले की आमच्या घरी 5 जण बाधित आहेत. ..
आणि याच्या उलट अनुभव पण आला.

रच्याकने << Whatsapp वर ttyl तरी टाकायला हवं बोलताना, कितीही अर्जन्सी असली तरी.>>> हे कळले नाही. .

@धनवंती - कधीकधी कुणाशी whatasapp अथवा टेलिग्राम वर बोलताना, मला काही अर्जंट काम आलं, तर बोलणं तसच अर्धवट सोडून ते काम करण्याची सवय होती.
आता ttyl टाकलं, तर समोरचा किमान वाट बघत नाही.
Ttyl - Talk to you later

करोनाने लोकांची खरी maturity समोर आणली. >>> +1000.
सोसायटीत कळलं तर लोक वाळीत टाकतील या भितीने टेस्ट करून न घेणारी family बघितली.

मी प्रोफेशनल लाईफमध्ये शांत रहायला शिकलोय. होतात चुका, माणसं आहेत. करतील बरोबर. थोडंफार चुकल्याने काही नाही होत. थोडंफार लेट झालं काही नाही होतं. शांत रहा. प्रत्येकाची मनस्थिती बिघडलीय, अजून बिघडवू नका. >>>>>> + 100 .
सुदैवाने आमच्या management लाही हे उमजू लागलयं.
Manager's manager लोकांशी संवाद साधतायेत. Recover झालेल्यांची प्रत्यक्ष चौकशी करतायेत.
People are working like crazy even being Under tremendous mental stress. एखादं दोन दिवस कोणी अचानक सुट्टी टाकली की कोणी हरकत घेत नाही आहे.

शांत रहा. प्रत्येकाची मनस्थिती बिघडलीय, अजून बिघडवू नका.>>+१

अज्ञातवासीचा पुढचा भाग लिहायला घ्यावा.>>> सुरु करा लिहायला मग...

छान लिहीलेय...
परवा कोरोना वैगेरे काही नाही... हे सगळं खोटे आहे म्हणून सांगणारा जवळचा एकजण कोरोनाने गेला..