
भाग-1 : https://www.maayboli.com/node/78536
भाग-2 : https://www.maayboli.com/node/78541
भाग-3
https://www.maayboli.com/node/78602
भाग-4 : https://www.maayboli.com/node/78678
भाग- 5 : https://www.maayboli.com/node/78729
अपराधी कोण ? ( भाग 6 )
बाबा कसले तरी पुस्तक वाचत बसलेले होते.
"बाबा"
"मयंग आत ये."
"बाबा मला तुमच्याशी बोलायचे आहे."
"हो मला देखील तुझ्याशीच बोलायचे आहे. मी तीच वाट बघत होतो तु कधी येतोस."
"बाबा मला माफ करा, माझ्या हातून खूप मोठी चूक घडत होती.अहो चूक कसली तो अपराधच होता.
मी तुमचा अपराधी आहे त्यासाठी तुम्ही मला पाहीजे ती शिक्षा द्या."
"तुझी शिक्षा हीच आहे आज तु मला सर्व निसंकोज पणे काहीही न लपवता सांग."
"हो ते सांगण्यासाठीच मी आलो आहे."
"कॉलेज मध्ये असतांना रश्मी नावांच्या मुलीशी माझी ओळख झाली.नंतर आमच्यात चांगली मैत्री झाली ती मैत्री नंतर कधी प्रेमात बदलली मला कळलंच नाही.मी तिच्यासाठी सर्व काही करण्यास तयार होतो."
तो पुढे रश्मी कंपनीजवळ भेटल्यापासून तर शशांक तिच्या बाबांना जाऊन भेटल्यापर्यंतच सर्व काही सविस्तर सांगतो.माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला; पण ती करत असतांना थांबलो देखील नेमकी तेव्हाच तुम्ही मला बघीतलं असावं.. तो हे सर्व बाबांना सांगतो.
बाबा सर्व काही शांतेत ऐकूण घेतात.
"हे बघ रश्मीच किती बरोबर किती चुकीचं यावर मी काही बोलणार नाही. किंवा या सर्व गोष्टीला तीच जबाबदार आहे,हे देखील माझ्या दृष्टीने चुकीचे.
आयुष्यात लोक येतात जातात काही चांगले क्षण देवून जातात काही वाईट.त्या वाईट क्षणाकडून काही शिकायचं की त्यातच रेंगाळत बसायचं हे आपलं आपण ठरावायचं असतं.जी मुलगी आज तुला अर्धात सोडून गेली पुढे काय शाश्वती तिने तुला आयुष्यभराची साथ देलीच असती.जितकी नकारात्मक बाजू आपण बघतो त्यापेक्षा अधिक सकारात्मक बाजू देखील असते.
"खरं आहे बाबा तुमचं म्हणून मी या सर्व गोष्टींच खापर कुणावरही फोडत नाही. याला सर्वस्वी मी जबाबदार आहे मला मान्य आहे."
"तुच चुकीचा हे पण बरोबर नाही.तु क्षणिक भरकटला होतास हे तुला मान्य आहे;हेच खूप आहे.
एक लक्षात ठेव कुणा एका व्यतीमुळे आयुष्य कधीच थांबवायचे नसते.ज्या व्यक्तीला तुमची किंमत नाही तिच्यासाठी तर अजिबात नाही. याउलट तिथून खरी नव्याने सुरूवात करायची असते.गीतामध्ये सांगितलय कमजोर तुम्ही नसता तुमची वेळ असते.अशा वेळी फक्त तो वाईट काळ कसा निघून जातो ते बघायचं
असतं. एकदा हा वाईट काळ निघून गेला तर;जणू खळाळणार्या पाण्याला संथपणा यावा तसं काहीसं वाटतं.
तो वाईट काळ खूप काही शिकून जातो कोण आपलं हे देखील दाखवून जातो.हाच वाईट काळ आयुष्यात पुढे अनेक चुका होण्यापासून थाबवतो.
जे झालं ते झालं तुला विसरायला नक्कीच त्रास होईल पण येणारा काळ नक्कीच चांगला असेल...
एखाद्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यातून निघून जाणं म्हणजे त्या पेक्षा चांगली व्यक्ती आपल्या आयुष्यात पुढे नक्की येणार ही झाली आशा.
जीवन हे क्षणभंगुर आहे.भविष्य कुणाच्या हाती नाही.
फक्त आशेवर जीवन चालतं. उद्या काय होणार याचा पत्ता कोणालाच नसतो. उद्याचं सुर्य कोणाच्या नशिबात आहे हे सांगणं तर अधिकच कठीण आहे.म्हणून आहे त्यात जगावं येणारा काळ नक्कीच चांगला असेल म्हणून पुढे जात राहावं हेच जीवन आहे."
"बाबा तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी खूप मोलाची आहे.मी वचन देतो;असा विचार
पुढे कधीच करणार नाही.
असं म्हणून तो बाबांना मीठी मारतो.
"आईला व मानवीला याबाबत काहीही कळायला नको.खूप हळव्या आहे त्या माझा जरा जास्तच विचार करतात. त्या हे कधीच विसणार नाही..हा विषय भविष्यात छोट्या छोट्या गोष्टीत माझ्या विषयी त्याच्यासाठी चिंतेचं कारण बनू शकतो...
म्हणजे बघाना कधी यायला उशिर झाला तर; आई किती काळजी करते.तेव्हा हा सर्व प्रकार तिला समजलातर ती एका मर्यादेपलीकडे जाऊन माझी काळजी करेल.असं घडायला नको.आणि तिच्या सारखीच आपली 'मनू' आहे.
म्हणून नकोच त्यांना त्रास."
"ठीक आहे."
सर्व काही ठीक होतं रात्रीचे जेवण करून मयंग साहिल,शशांक रूममध्ये बसलेले होते त्यातच मयंगच्या फोनवर एक नोटिफिकेशन येते ते बघून त्याच्या चेहर्यावर एक स्मिथहास्य उमटते.
तो स्मिथहास्य करतो त्याचवेळेस ते शशांक बघतो.
"काय कुणाचा मेसेज आहे."
"बाबांशी बोलून झाल्यावर मी एका 'लाईफलाईन' नावाच्या संस्थेशी संपर्क साधला. ही एक अशी संस्था आहे जी गेल्या कित्येक वर्षापासून डिप्रेशन मध्ये गेलेल्या लोकांसाठी काम करते. या संस्थेत शंभर स्वयंसेवक आणि पाच मार्गदर्शक आहेत. निराश मनाला उभारी देण्याचे काम 'लाईफलाईन 'करत आहे, थोडक्यात सागायचं झालं तर 'fight for suicide' साठी काम करते. या संस्थेने आजपर्यंत हजारो व्यक्तींना आत्मघातकी विचारांपासून प्रवृत्त करण्यात यश मिळविले आहे.
मी त्या संस्थेशी त्यांचा मेंबर अर्थात
एक स्वयंसेवक होण्यासाठी उत्सुक आहे.म्हणून संपर्क साधला होता त्यांचाच मेसेज आहे ते तयार आहे.
"हो पण यात नेमकं करायचं काय ?" साहिलने विचारले
"ही संस्था आत्महत्या प्रतिबंधाचे काम करते.
या संस्थेचा एक मदत क्रमांक असतो.संस्थेतर्फे रोज बारा ते पाच या वेळेत मदत क्रमांकावर हेल्पलाईन सुरू आहे. दररोज या हेल्पलाईनवर दहा ते बारा कॉल्स येतात. आत्महत्येचे विचार मनात असणाऱ्या लोकांना खूपकाही सांगायचं असतं. पण त्यांचं ऐकून घेणारं कोणी नसतं. अशावेळी त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. लोकांचं ऐकून घेण्यासाठी एक सहनशीलता हवी असते, त्याकरिता ते स्वयंसेवकांना प्रशिक्षण देखील देतात. लोकांना बोलायचं तर खूप आहे परंतू संवादासाठी कोणीही नाही यांसाठी ही संस्था काम करते. त्या लोकांच म्हणण ऐकूण त्यांना त्यातून बाहेर पडण्यास मदत करते. प्रसंगी मानसोपचार तज्ज्ञांची मदत देखील देतात.
म्हणून मी त्याच्याशी संपर्क साधला मला देखील अशा लोकांसाठी काम करायचं आहे.यापुढे माझा प्रयत्न हाच असेल की मी त्याच्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक
बनावं.
"That's a great idea यासाठी आम्ही तयार आहोत."
साहिल मोबाईलमध्ये संस्थेविषयी बघत बोलतो.
"हो... शुभ काम में देरी कैसी"
"खरं आहे शशांक."
मयंग हसतच बोलतो.
"I am proud of you"
शशांक मयंगला मीठी मारतो.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
एका वर्षानंतर .......
रविवारचा दिवस होता सायंकाळाचे सहा वाजले होते.मयंग रूममध्ये बसलेला विचारात हरवलेला होता; व स्वत:शीच बोलत होता.
"रश्मी तुझे 'आठवणीचे पसारे 'आजही मी विसरलो नाही; परंतू पुर्वीच्या आठवणीत आणि आजच्या आठवणीत तफावत आहे. त्या आठवणी मनाला छळत होत्या,त्यात वेदना होत्या. आजच्या आठवणीत वेदनाच नाहीये .आज त्या फक्त आठवणी आहे.त्या एखाद्या गणितीय उदाहरणाला सोडवायच्या पद्धती प्रमाने आहे, एकदा लक्षात बसल्या की विसर पडत नाही.बाकी त्यांचा काहीच अर्थ नाही.
मला माहीत नाही तु कुठे आहेस? कशी आहे ?आज हे जाणून घेण्यात मला कुठलाच रस नाही.परंतू जिथे पण असावी सुखात असावी...
एखाद्या झाडाची एका ठराविक कालावधी नंतर पानगळ व्हावी त्या प्रमाने तू आयुष्यातून निघून गेली. परंतू त्याच झाडावर नवी पालवी फुटावी अशा रूपात बरच काही देवून गेलीस.आज माझ्याकडे सर्व आहे अगदी तुला पाहीजे होते त्याच्या कित्येक पट्टीने अधिक
मी 'lifeline' सारख्या संस्थेसाठी काम करून फक्त आनंदीच नाही तर समाधानी आहे.डिप्रेशन मध्ये असलेल्या अनेक लोकांशी बोलतांना नवीन अनुभव येतात.त्यांच्याशी बोलून मला कळाले की खरंच शिकण्यासारख खूप आहे.खरं समाधान आपण अशा लोकांना यातून बाहेर काढण्यात यशस्वी झालो की मग मिळते.आज माझ्या आयुष्यातील एक तास त्या लोकांच्या नावावर आहे त्यासाठी तुझे धन्यवाद!!! खरचं जातांना तू नकळत खूप काही देवून गेलीस.
मला माहीत होते आई बाबासाठी मीच सर्व काही आहे; पण आता आमच्यातील नातं अधिक घट्ट झालं आहे. मी बाबांपासून आजकाल काही लपवत नाही.साहिल शशांक साठी मी किती महत्ताचा हे त्या दिवशी त्याच्या डोळ्यात दिसत होतं.मी खूप लकी आहे माझ्याकडे इतकी चांगली फॅमिली आणि मित्र आहे.तू गेलीस रश्मी पण माझ्या जीवनाला एक नवीन दिशा देवून गेलीस...
हा सर्व विचार करूण मयंग एक मोठा श्वास घेतो. मोबाईल मध्ये आपली आवडती प्लेलिस्ट चालू करतो व इअरफोन्स घालून शांत पडून गाण्यांचा आनंद घेतो.
समाप्त !
- शब्दवर्षा
_________________ XXX________________
टिप: सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून सदर कथेतील नावं आणि घटनेत काही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
कथेत दिलेल्या 'लाईफलाईन' नावाच्या संस्था सारख्या अनेक संस्था आहे. वेगवेगळ्या भागानूसार गूगलवर त्यांची सविस्तर माहीती उपलब्ध आहे. व सोबत हेल्पलाइन क्रमांक देखील उपलब्ध आहे.
धन्यवाद !!!
मागच्याच भागात कथा का संपवली
मागच्याच भागात कथा का संपवली नाही हा प्रश्न पडला होता
पण हा भाग वाचून समजलं
खूप छान झालाय हा भाग!!
पुढिल लेखनास खूप खूप शुभेच्छा
छान झालीये कथा!
छान झालीये कथा!
पुढील कथेच्या प्रतीक्षेत!
छान कथा...
छान कथा...
पुढील लेखनास शुभेच्छा..!!
मनूप्रिया
मनूप्रिया
अज्ञातवासी
रूपाली विशे-पाटील
मनस्वी आभार !!!