काल गिल्ट फ्री , मानसिक-आरोग्य दिवस रजा घेतली. म्हणजे अशी काही कॅटेगरी आमच्या ऑफिसात आहे असे नव्हे तर आपल्यालाच तशी कॅटेगरी स्वांताय सुखाय या हेतूस्तव बनवावी लागते. तर काल मी पहीले म्हणजे सकाळी तासभर चालून फिरुन आले. चालताना, आर्ट् ऑफ लिव्हींगच्या रिशी नित्यप्रज्ञा यांचे काही व्हिडीओज ऐकले. एकदम छान सुरुवात झाली दिवसाची. व्हिडीओ ऐकण्यात व्यतीत केलेला हा वेळ मला फार बहुमूल्य वाटला. घरी आल्यावरती मी ऐकलेल्या भागांच्या काही नोटस काढल्या. कॉलेजपासूनच नोट काढण्यात मास्टरी होती माझी. विषयाच्या सविस्तर आणि सारभूत नोटस काढायच्या, मराठीत टिपणे म्हणतात त्याला. ती टिपणे खाली शेअर करते आहे. हे विचार माझे नाहीत. हा ऋषीमुनिंनी दिलेला अध्यात्मिक , वैचारीक, व्यावहारीकदृष्ट्या महत्वाचा अनमोल ठेवा आहे.
----------------------------------------------------------
१. दररोज थोडा वेळ तरी समाधीचा अनुभव घ्या. Drop wishes. Invoke intuition. Make your mind available to intuition.
२. आपल्या मनात जे तरंग उमटतात ते आपले कर्म आहेच याबद्दल सहसा बरेच लोक क्लिअर असतात. परंतु आपल्यामुळे आपल्या आसपासच्या लोकांच्या मनात काय तरंग उमटतात तेही आपलेच कर्म आहे.आपली जबाबदारी आहे.
३. मन-बुद्धी-चित्त (memory)-अहंकार - हे झाले internal life
४. षड्रिपु आपल्या मनात तसेच आसपास आपल्या वागणुकीमुळे कुरुपता निर्माण करतात.
५. पंचमहाभूतामध्ये पृथ्वी सर्वात जड तत्व मग जल, नंतर अनुक्रमे वायु व अग्नी. अवकाशाच्या पोकळीत तर चेतना आहेच.
६. सत्व-रज-तम- ३ गुण तर वात-कफ-पित्त हे ३ दोष.
७. चराचरात प्रत्येक वस्तूमध्ये चेतना (conciousness) आहे.
८. शिळेपासून (अचर योनी) सजीवांपर्यंत प्रत्येकात चेतना आहे. प्रत्येकजण उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती evolve होतो आहे.
- शिळा योनी , वृक्ष योनी या अचर योनी आहे.
- कीटक, पशु, मानव आदि योनी चर योनी आहेत.
९. गाडी लागते, फलाटावरती लोक चढतात. आपल्या डब्यात काहीजण प्रवासी म्हणुन येतात. कोणी थेपल्यांचा डबा उघडतं, कोणी बाहेरुन केळी आणलेली असतात. सारेजण वाटुन घेतात, गप्पा मारत प्रवास सुरु होतो. तसेच जीवनाचे आहे. आई-वडील-भाऊ - बहीण हे जीवाला मिळत जातात. सारे २ घडीचे प्रवासी असतात. आपापले स्टेशन/ गंतव्य स्थान आले, की उतरुन जातात.
१० प्रत्येक जीवाचा स्वभाव सत-चित-आनंदमयच आहे. Collective conciousness हा महासागर असेल तर individual concisousnee या लाटा आहेत. एकाला परमात्मा म्हणतात तर दुसर्याला जीवात्मा.
११. प्रत्येक क्षणी जीव २ अनुभव घेतो - Internal life आणि external life
१२. चेतनेचे ५ factors आहेत - Food, place, people,time & Karma
- जैसा अन्न वैसा मन
- जैसा संग वैसा रंग
- जैसा स्थान वैसा ज्ञान
१३ कर्म म्हणजे काय तर जीवाने ज्या ज्या योनिंमधुन आतापर्यंतचा प्रवास केलेला आहे, त्या त्या योनीमध्ये त्याने काही संस्कार साठवलेले असतात, या पूर्वसंस्कारांमुळे तो घडत जातो. हा प्रभाव म्हणजे कर्म.
१४. जीवावर पडलेला तसेच जीवामुळे आसपासच्या जीवांवर पडलेला प्रभाव दोन्ही त्या त्या जीवाचे कर्म.
१५ ज्या स्वरुपाचे कर्म असते त्याच स्वरुपाचे फळ मिळते. तुम्ही पूर्वेला चालू लागलात तर दक्षिणेस कसे पोचाल?
१६. तुमच्या मनसा-वाचा-कर्मणामुळे जर भोवताली अप्रसन्नता निर्माण होत असेल तर त्या गोष्टीची तुम्ही जबाबदारी घ्या. ते तुमचे कर्म आहे.
१७ अन्य लोकांच्या मनात तुमच्याबद्दल अप्रसन्नता, राग, असूया असेल तर जबाबदारी घ्या. तुमचे मन शुद्ध राहील याची व अन्य लोकांचेही मन कसे शुद्ध, निर्विकार राहीलकते पहा. मैत्री करा, आत्मियता दर्शवा, स्तुती करा, caringly वागा. फळ मिळेलच असे नाही पण प्रयत्न तर तुमच्या हाती आहे.
१८. कोणी आक्रोश घेउन आला, तरी तुमच्या वृत्तीने तो निववा. dissipate करा. अवघड आहे खरे. पण रणजी ट्रॉफी काही सहज मिळत नाही. कोणत्या लेव्हलची टेस्ट मॅच खेळायची आहे ते तुम्न्ही ठरवा.
१९. मुमुक्षता म्हणजे काय तर परम तत्वापर्यंत पोचायची तहान.
२०. Food, people,time & Karma - optimize करा व जीवनाचे कल्याण साधा. जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलेल.
२१. Time, energy & मन (mind) ही ३ साधने आहेत. लक्षपूर्वक पाहीले तर तुम्हाला कळेल की ज्या रीतीने तुम्ही ही साधने वापरता , त्या रीतीने त्या प्रमाणात तुम्हाला फळ मिळते. तसेच जीवन तुम्ही निर्माण करता.
२२. प्रत्येक जीवाच्या चेतनेचे वेगवेगळे आहेत - कोणात वीररस अधिक आहे तर कोणात करुण रस. एखाद्यात शांती रसाचे आधिक्य आहे तर एखाद्यात भक्तीरस. कोणात वैराग्य तर कोणात शृंगार.
२३. तुम्ही हे रस blossonm करा. तुमच्यात भक्तीरसाची कमी असेल तर रोज गा-नाचा व तो रस जागवा, develop करा. तुमच्यात वीररस असेल तर अनाथाश्रमात जा, करुणरस जागवा. ब्रह्मरस असेल तर ज्ञान मिळवा, वाटा.
२४. blossoming - intensify-सुंदरता.
२५ बाह्य जगापेक्षा आतील जगाला जास्त महत्व आहे. That is the real game.
२६ आता नको असलेले विचार, स्मृती कसे काढून टाकायचे तर तुमच्याकडे सृष्टीने दिलेली ३ साधने आहेत - उच्छ्वास, attention & intention. तुमच्या अप्रसन्नतेचे भाव असतील प्रत्येक उच्छावासाबरोबर delete करुन टाका. Attention = Cursor, प्रत्येक उच्छ्वास = delete button. file मोठी असेल तर delete व्हायला वेळ लागेल. फार काळ तुम्ही एखादा blame करणारा किंवा नकारात्मक विचार केलेला असेल तर तो पुसण्यास वेळ लागू शकतो पण नक्की पुसला जाइल.
२७ रिक्त व्हा. Empty व्हा. सत-चित-आनंद आपोआप reset होइल.
- आता 'सत' म्हणजे काय तर. त्याचे ३ गुण आहेत. -
-- Ability to know,
--desire to know
--Accumulation of what you already know
- चित म्हणजे काय तर
-- Aliveness. हाताला संवेदना आहेत, sensation आहे, उर्जा आहे. ही energy आहे चित. कुंडलिनी शक्ती.
- आनंद म्हणजे काय
-- तर प्राणशक्ती. काहींमध्ये अधिक असते तर काहींची कमी असते. प्रेममय आनंद, करुणामय आनंद, वीररसपूर्ण आनंद
-- जेव्हा तुम्ही आनंदी असता तुम्हाला ती सर्वाधिक नैसर्गिक स्थिती वाटते की नाही?
-- की दु:खी असता तेव्हा तुम्ही म्हणता हां हाच माझ स्वभाव आहे,. हे मला नैसर्गिक वाटते?
-- आनंद जागवा, aliveness आपोआप येतो. aliveness जागवा - आनंद आपोआप चढतो. सत चढाओ, चित & आनंद will expand. आनंद चढाओ, सत & चित will expand.
-- तीन पायांचे मेज आहे हे. एक पाय लांबला की अन्य दोन पायही लांबतात.
२८ आता blossoming चेही २ प्रकार आहेत
- Negative to Neutral
--षड्रिपु त्यागणे आणि मूळ सत-चित-आनंद स्वभाव प्रस्थापित करणे म्हणजे Negative to Neutral
- Neutral to Positive
-- स्वतःमधील शांतरस, वीररस, ब्रह्मरस आणि अन्य सकारात्मकता intensify करणे म्हणजे Neutral to Positive
२९. Celebrate Life लोकं काय म्हणतील याची पर्वा करणे सोडा.
३०. Enthusiasm, Love, Joy are infectious. Rather than you getting affected by ppl, you affect them with these positive traits
३१. सोहम मंत्राइतकाच अजुन एक मंत्र लक्षात ठेवा - So What
- कोणी स्तुती केली - So What\
- निंदा केली - So What
- कोणाच्या हातून चूकी झाली - So What
- आपल्याकडुन चूकी झाली - So What
३२. आपण आयुष्य अनावश्यक serious करुन ठेवलेले आहे. Go crazy. घरी, ऑफिसमध्ये Go crazy. Let ppl know you cannot be controlled
३३. Seriousness चा मुखवटा फेका. Declaire you are crazy, पागल. आणि तुम्ही free व्हाल.
३४. सहजता = सुंदरता. सहज व्हा. हा जो शहाणपणाचा मुखवटा तुम्ही धारण केलेला आहे तो तुम्हाला माहीत आहे बेगडी आहे, वरवरचा आहे तसेच लोकांनाही माहीत आहे की हा मुखवटा आहे. अंदरका मामला कुछ और है| कधीना कधी तो फाटेल.
३५. Whole game is that of conciousness. We are pieces of conciousness expressing conciousness.
'mental Health Day' रजा घेउन काढलेल्या नोटस
Submitted by सामो on 4 May, 2021 - 10:22
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम! पुन्हा पुन्हा वाचेन
अप्रतिम! पुन्हा पुन्हा वाचेन.
धन्यवाद मामी.
धन्यवाद मामी.
उपयुक्त आहे हे.
उपयुक्त आहे हे.
थँक यु राभु.
थँक यु राभु.
खूप खोलवर विचार मांडलेत..!
खूप खोलवर विचार मांडलेत..!
खूप सुंदर..!!
कॉलेजपासूनच नोट काढण्यात मास्टरी होती माझी. विषयाच्या सविस्तर आणि सारभूत नोटस काढायच्या>>> खूप कौतुकास्पद आहे हे..
सारे २ घडीचे प्रवासी असतात.
सारे २ घडीचे प्रवासी असतात. आपापले स्टेशन/ गंतव्य स्थान आले, की उतरुन जातात. >> असं असतं तर सोपंच होतं. नेमके 'स्टिंकी' लोक आपल्याच शेजारी येऊन बसतात नि शेवटी आपण दोन स्टॉप अलिकडे उतरतो पण ते उतरत नाहीत. This is the hard part! - हा माझा आक्रोश- निवव आता.
छान लिहीले आहे!!
हाहाहा
हाहाहा
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
36) वरचे सगळे माझ्या मनातील
36) वरचे सगळे माझ्या मनातील तरंग आहे. त्याची फार चिरफाड करु नका
सुरेख लिहिलंय. टिपण्या टिपून
सुरेख लिहिलंय. टिपण्या टिपून ठेवून वारंवार वाचण्यासारख्या आहेत.
सी चा प्रतिसाद वाचताना कॉपी पेस्ट वाक्य आणि पुढचा प्रतिसाद वाचताना ' हां ये भी बराबर है , ये भी तो बराबर है' असं झालं माझं.
आपापले स्टेशन/ गंतव्य स्थान आले, की उतरुन जातात. >> आणि उतरून गेले तरी ठेपले ,केळी आपल्याजवळ ठेवून जातात. मग कधी कधी त्याचं ओझं होतं.
डोक्याला ताप नको असेल तर 'so
डोक्याला ताप नको असेल तर 'so what' चा मंत्र अगदी बेस्ट आहे
खूप सुरेख लिहिलं आहे
सामो, The Best लिहीलं आहेस...
सामो, The Best लिहीलं आहेस...
काही मुद्दे जे एका वाक्यात मांडलेत, त्यावर सखोल गाभा असलेली पुस्तकं आहेत.
थोडक्यात आणि सुटसुटीत लिहीलंय!
चांगले मुद्दे काढले आहेत.
चांगले मुद्दे काढले आहेत.
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
आणि उतरून गेले तरी ठेपले
आणि उतरून गेले तरी ठेपले ,केळी आपल्याजवळ ठेवून जातात. मग कधी कधी त्याचं ओझं होतं. >> अगदी अगदी.
बुद्धिझम वरती जे पुस्तक वाचले
बुद्धिझम वरती जे पुस्तक वाचले त्यावर आज माईंडमॅप बनवले. खालील दुव्यांवरती पहाता येतील.-
https://gitmind.com/app/doc/8264953816
https://gitmind.com/app/doc/3024953635
खुप छान! सगळे मुद्दे मननीय
खुप छान! सगळे मुद्दे मननीय आहेत!
आज आर्ट् ऑफ लिव्हींगच्या रिशी
आज आर्ट् ऑफ लिव्हींगच्या रिशी नित्यप्रज्ञा यांची हिंदी भक्तीसुधा गाणी ऐकत होते. आणि सहज गुगलले. २७ डिसेंबर २०२१ ला ते गेले (कोव्हिड मुळे) - असे वाचनात आले. function at() { [native code] }इशय वाईट वाटले. - https://www.newsunzip.com/wiki/rishi-nityapragya/
काय सुंदर गात. - https://www.youtube.com/playlist?list=PLPMB_AjaOHWGp2z5pUfdyyms4wsxLVA0g
निव्वळ स्वर्गिय गात.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=b3P-EAR10ug&list=PLPMB_AjaOHWGp2z5pUfdyy...
तुम गगन के चंद्रमा हो ....
स्वीट!!!! अप्रतिम गायले आहे.
गाणे तर अत्यंत गोड गातातच पण
गाणे तर अत्यंत गोड गातातच पण आधी जे किस्से सांगतात ते इतके मनोहर असतात ना. मध्यंतरी ते म्हणजे रिशी नित्यप्रज्ञा कोव्हिडमध्ये गेले असे ऐकण्यात आले. वाईट वाटलेले.
https://www.youtube.com/watch?v=x1MdFmCwl-8&t=3s
आर्या प्रतिसादाबद्दल आभार.
आर्या प्रतिसादाबद्दल आभार.
काल 'बाऊंड्रीज' या विषयावरील
काल 'बाऊंड्रीज' या विषयावरील लेख वाचत बसले होते. हा आवडीचा विषय तर आहेच पण मी आचरणात आणण्याचा आटोकाट प्रयत्नही करते.
प्रत्येक व्यक्तीच्या लिखित्/अलिखित अर्थात ठळक/पुसट अशा सीमा असतात आणि त्या आपण ओलांडायच्या नसतात. “Respecting someone else's boundaries is an act of love,” explains Cristen Smith, LMHC किती सार्थ व सुंदर वाक्य आहे हे. आणि हा नात्यातला पदन्यास असतो. असं कोणी कठोरपणे सांगतही नाही की बाई ग माझ्या या अमक्या अमक्या सीमा आहेत तेव्हा बिवेअर! ओलांडू नकोस. काही लोक सांगतही असतील पण बरेचसे लोक इतकं परखड बोलू शकत नाहीत (cannot stand for temselves). जेव्हा आपण इतरांच्या या सीमांची/मर्यादांची कदर करतो तेव्हा, त्यांना एक सेफ स्पेस देतो जिथे ते मनमोकळेपणाने, सुरक्षित वाटल्याने व्यक्त होउ शकतात.
हा विषय मला प्रचंड रोचक वाटतो. कदाचित मी पूर्वी माझ्या बाऊंडरीज सेट करण्याकरता स्ट्रगल केलेली असल्यने असेल. खरे तर अजूनही मी यशस्वी होत नाही. खूपदा स्वतःच्या मर्यादा आखून देताना, आपण दुसर्याला हार्शली वागवतो आहोत असे उगाचच वाटते. यातून मग महामूर्ख प्रसंग निर्माण होतात उदा - माझी एक सहकारी उगाचच मला पीडे - तू आणि तुझा नवरा दूर कसे रहाता म्हणुन. इट वॉज रिअली नन ऑफ हर बिझनेस. "तू सोशल सेक्युरिटी भरतेस का? आर यु श्युअर?" हा सुद्धा तिचाच असा प्रश्न.
मला कधी कधी माबोवरचे 'दिवे घ्या' लाईटली घ्या हेसुद्धा क्रॉसिंग बाऊंडरीज वाटलेले आहे. असो. नेहमी नाही पण होय क्वचित. मीसुद्धा कधीकधी व्हर्बली/नॉन-व्हर्बली बाऊंडरीज ओलांडलेल्या आहेत. आणि मला त्याचा पश्चात्ताप आहे.
साभार - लिंकडैन - फार मस्त
साभार - लिंकडैन - फार मस्त मुद्दे आहेत -
When you hit 40, you will see two types of people - Those who took care of themselves and those who didn't.
Lifting weights is investing in your future self. Start now, to be functional well in your 80s, while increasing your attractiveness.
Mental health is correlated to your physical health. The healthier you are, the better environment for your mind to be in.
Sleep is the best performance-enhancing drug on the planet that removes waste from your brain and body. Fix it and you fix a lot many problems in life.
Walk when you are bored when you are stressed when you are angry when you need creativity-Walk to gain clarity. Walking is the most underrated exercise on the planet. Just do it.
Make a list of things that annoy you - That small you are
Make a list of things that you love that's how big you are.
Stop taking shit personally. Create a mentality of API(Assuming Positive Intent.) Life is too short to give your energy to slights and perceived insults.
Stop seeking approval. Seeking approval is relying on external validation. Validation is an inside job.
Your perception is your reality. If you want a better life, you need to change the lense through which you see the world.
If they don't have your phone number, they don't know you. Act accordingly.
Never judge a person based on what they say, judge on what they do. Behavior is a more accurate way of assessing character.
If you cut off a friendship because you disagree on things like politics, it's a sign that you don't want friends. You want an echo chamber.
If you want better results in life, look at the people you surround yourself with. If they don't match the reality you are creating, find a better group.
Being broke and poor are not the same. Being broke is the condition you deal with when you don't have money. Being poor is a mental condition, that keeps you broke.
Most people think a great life is about money, cars, and houses. The reality is that a great life is based on things, money can't buy like health, family, and relationships.
The path to mental peace goes through forgiveness. Forgive-forgive-forgive! Resentment is a waste of mental energy that hurts you more than the other party.
Your parents did the best they could with what they were taught. Forgive and move on.
Your emotions are your responsibility. Remember no one made you feel a way. Your body did it on its own.
Take ownership of every result in your life. It may not be your fault but it's always your responsibility.
Stop being a snowflake. Stop being so sensitive and complaining. Instead, start being solution oriented.
Give a fuck about your appearance. This starts with your body and is further communicated through how you dress, and cut your hair. You don't need to be a fashionista. You just need to look like you give a fuck about how you look.
Your mind is a goal-seeking machine. You need to give it a goal, or it will give a goal to you.
You will enjoy your life more when you focus on enjoying the climb rather than reaching the summit.
The purpose of life is not to retire but to be useful. Once you're not useful anymore then it's time to retire.
The top 3 ways to transform your life are - getting your health, money, and mind right. Work on one at a time, then move on to the next.
You are younger than you think ............ एकदम आवडला