आसं म्हणतात हे कलियुग आहे
हया कलियुगात पाप केलं की
ते ह्याच जन्मात फेडव लागत
मग माझ हे कोणतं युग...?
पाप करण तर दूरच,
पण माझा पूर्ण जीवही तयार झालेला नसतो
तरी माझ्या त्या अर्ध्या जीवाला मारलं जातं
मग माझं हे कोणत युग....?
हां आसं मी अनुभवलेल तर नाही
पण ऐकलंय नक्कीच.....
डॉक्टर हे देव असतात
आई - बाबा हे जन्मदाते असतात
पण माझ्या आयुष्यात काही उलटच घडलंय
मग माझं हे कोणतं युग....?
हां आई- बाबांची ती कुजबुज
रात्री थोडी थोडी ऐकली होती मी
उद्या Abortion करायला जायचं म्हणून
वाटली थोडी चिंता,
वाटली थोडी काळजी
माझे आई- बाबा मलाच मारायला निघाले
पण समजवल मनाला
हॉस्पिटल मध्ये तर देव आहेत नं
आणि ती म्हण आठवली
देव तारी त्याला कोण मारी
ह्यावरून थोडसं हासले, अन आनंदात झोपले.
पण उद्याचा दिवस
माझ्यासाठी काळोखाची रात्र निघाला
एवढासा जीव तो थरथर कापत होता
विष पिलेल्या माणसाला
तदप्ताना सर्वांनी पाहिलंय
पण मला विष पाजून मारलंय
तरी मला तडपताना कोणीच नाही पाहिलंय
मगं माझ हे कोणतं युग....?
ना मला आई- बाबांनी वाचवले
नाही देवाने वाचवले
ह्या अन्यायासाठी कोणतं न्यायालय आहे...?
असेलही म्हणा पण माझ्याकडे proof नाही
ना माझं पोस्ट मोर्तम झालं
नाही अंत्यविधी झाला
त्यात सापडत नाही माझी deadbody
असेल ती कुठल्या तरी डस्टबीन मध्ये
अणि deadbody मिळाली
तर माझं नावही नाही
अणि नाव नाही म्हणजे माणूसच नाही
मग माझं हे कोणत युग.....?
हां प्रत्येक दुखा:तही ऐक
आनंदाचा किरण असतो ना
तो मलाही मिळाला....काय...?
त्या दुस्टबीन मध्ये
मला खूप छान अश्या मैत्रिणी मिळाल्या
ज्यांची स्वप्न होती IAS,डॉक्टर, इंजिनिअर, व्हायचं
अन् त्यात ऐकीच स्वप्न तर काही वेगळंच होत
तिला तर तिच्या आई बाबांची
लाडकी सोणुली व्हायचं होत,
ह्या सर्व आनंदात मे कुठं आहे मला कळलंच नाही
अणि मीही माझं ध्येय शोधण्याच्या स्वप्नात रंगुन गेले.....२
छान...
छान...