
अपराधी कोण ? ( भाग 5 )
शशांक आता मयंगला समजावू लागतो.
"मान्य आहे दिलेली जखम भरूण निघते आणि छाप सोडून जाते.सतत त्याच जखमेची आठवण करून देते,परंतू तू हे कसा विसारलास प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. जखमेची तीच सलती छाप ती जखम पुन्हा होवू नये म्हणून सावध होण्याचा इशारा तर देतेच; पण पुढे तीच चूक पुन्हा घडू नये याची आठवण देखील करून देते."
"खरं आहे तुझं शशांक पण त्या वेळी मला काहीच सुचलं नाही. घरी आलो झालेला प्रकार मला सहन होत नव्हता. त्यातच माझं लक्ष रूम मध्ये ठेवलेल्या दोराकडे गेलं वाटलं संपून टाकावं सर्व नको त्या आठवणीत जीतेपणी मरणं.काय झालं मलाच कळलं नाही मी तो दोर बांधला लगेच मला आईची आठवण झाली. मी तसाच एकदम थांबलो व तो दोर परत सोडू लागलो...बाबांनी मला तेंव्हाच बघितलं असावं; परंतू यामुळे जर बाबांचे काही बरे वाईट झाले असते तर... माझ्या जगण्याला काहीच अर्थ उरला नसता.
मी खरा अपराधी आहे आईचा,बाबांचा कारण मी असे जीवन संपवण्यास निघालो होतो ज्यावर माझा अधिकारच नाही.हे जीवन त्यांच आहे त्यांनी दिलेलं आहे.आत्महत्येसारखा विचार माझ्या मनात येणं म्हणजेच मी त्यांचा खूप मोठा अपराधी आहे आणि तुमचाही.
"तु नक्की सर्व तपास केला का खरचं रश्मीने असे केले?"
"हो साहिल , शशांक बोलतोय ते खरं आहे."
यावर साहिलने व मयंगने शशांकडे बघीतले.
"म्हणजे तुला हे माहित होते शशांक."
साहिलने विचारले
"हो मी रश्मीच्या बाबांकडे गेलो होतो,त्यांना
सांगितले
मी रश्मीचा कॉलेज फ्रेंड आहे असे. त्यातच पुढे मी काही बोलणार त्यांनी स्वतःहून सांगितले रश्मी आणि विराज बद्दल विराज रश्मीची पसंती आहे हे देखील सागितले.
" तु हे तेव्हाच मयंगला का नाही बोलास."
"साहिल मी खरं तर सांगणार होतो पण मयंग अगोदरच खूप दुःखी होता परत हे सर्व सांगून मला त्याला अजून त्रास द्यायचा नव्हता; पण चूकलं माझं कदाचीत मी तेव्हा बोललो असतो तर..आज हे सर्व झालं नसतं."
" नाही शशांक यात तुझी काहीही चूक नाही किंवा रश्मीची ही नाही मी जे केले त्यास सर्वस्वी माझे विचार आणि मी जबाबदार आहे.बाकी कुणीच दोषी नाही.
जे घडायचे होते ते घडले. असे झाले असते तर, हे घडले नसते... हे सर्व बोलण्यात आता काहीच अर्थ नाही. अशा आता बऱ्याच गोष्टी आहे ज्यामुळे आपल्याला वाटेल हे असे झाले असते ते तसे झाले असते तर... हा सर्व प्रकार घडला नसता ; परंतू या सर्व गोष्टीत चूकलो तो मी काही क्षणासाठी स्वार्थी झालो होतो.त्याची आज मला खूप मोठी अशी किंमत मोजावी लागली असती."
रूममध्ये आता शांतता पसरते..
शशांक मयंगच्या जवळ ऐवून घट्ट अशी मीठी मारतो.
"परत आयुष्यात अशी चूक करणार नाही,वचन दे मला."
"हो मी तुला व साहिलला वचन देतो परत माझ्या हातून असा अपराध घडणार नाही ..."
आता साहिलसुध्दा त्या दोघांना मीठी मारतो.
मयंग शांत होतो.व तिथून जाण्यास निघतो.
"कुठे निघालास ? " साहिल विचारतो
"मी ज्यांचा अपराधी आहे त्यांची माफी मागायला."
मयंग तिथून बाबांच्या रूमकडे निघून जातो.
शशांकच्या लाल झालेल्या डोळ्यात आता अश्रू जागा
घेतात.
"आता सर्व ठीक होईल."
" हो "
असं म्हणून शशांक अश्रूंना मोकळी वाट करून देतो.
मानवी उठून मयंगच्या रूम मध्ये येते.
"काय झालंय?"
"तुझे डोळे इतके लाल का? "
"काही नाही झोपलो होतो साहिलने मध्येच उठवले म्हणून."
"अच्छा !
"तु सांगितलं नाहीस तुझ्या प्रोजेक्ट बद्दल म्हणजे झालं का ते पुर्ण का परत जावे लागेल."
"झालं अगदी व्यवस्थित रित्या पूर्ण झालं;आज सर्वच काम."
"आजचे सर्वच काम म्हणजे ?"
"काही नाही गं तु खूप प्रश्न करते."
यावर साहिल हसतो.
ती राग आलाय अस दाखवून मी चालली बाबांकडे म्हणून जाण्यास निघते.
"नाही थांब."
का?
"ते आपल्याला साहिलच्या घरी जायचे आहे काकू कडे."
"खरंच का? पण मी एकदा जावून येते बाबांकडे. "
"नाही तु चल मयंग आहे तिथे."
आईंना सांगून ते तिघे साहिलच्या घरी मानवीला हा सर्व प्रकार कळू नये म्हणून निघून जातात.
क्रमश:
- शब्दवर्षा
छान चालू आहे चांगलं मांडलयत
छान चालू आहे
चांगलं मांडलयत
अवल मनस्वी आभार !!!
अवल
मनस्वी आभार !!!
छान चालू आहे..! पुभाप्र.!!
छान चालू आहे..!
पुभाप्र.!!
वाचतेय.पुलेशु.
वाचतेय.पुलेशु.
@रूपाली विशे - पाटील
@रूपाली विशे - पाटील
@Mrunali.samad
मनस्वी धन्यवाद !!!