
लेखमालेतील मागचा धागा :
कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
https://www.maayboli.com/node/78455
..................................
दिनांक 16/ 3/ 2020 पासून आपण कोविड१९ धाग्यांवर महाचर्चा करीत आहोत. जगभरात अजूनही या महासाथीचा जोर कायम आहे. या साथीचा जनक म्हणजे करोना-सार्स २ हा विषाणू. गेल्या काही महिन्यात त्याने उत्परिवर्तन करून नवे अवतार जन्माला घातले. या अवतारांपैकी काही मानवी शरीरात नव्याने धुमाकूळ घालत आहेत. ते अधिक रोगप्रसारकही आहेत. गतवर्षी या आजाराचे प्रमाण वृद्ध आणि सहव्याधीग्रस्तांत जास्त होते. सहसा कुटुंबातील एखाददुसरी व्यक्तीच आजारी पडत होती. यंदा मात्र ही समीकरणे पूर्ण बदलली असून आता तरुण आणि एरवी निरोगी असणारी मंडळीही बऱ्यापैकी बाधित आहेत. एखाद्या कुटुंबात हा विषाणू घुसला की त्यातील सर्वांनाच गाठू पाहतोय.
भारतात या आजाराची दुसरी लाट चांगलीच उसळली आहे. रुग्णसंख्येच्या मानाने विविध रुग्णालय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यात रुग्णालयात छोटे-मोठे अपघात होऊन गंभीर घटना आणि त्यातून मृत्यू देखील उद्भवले आहेत. मेडिकल ऑक्सिजनचा अभूतपूर्व तुटवडा ही एक ठळक घटना. त्यातून उद्भवलेला सामाजिक उद्रेक आणि तापलेल्या राजकारणाने एप्रिलचे वातावरण अधिकच गरम झाले. जागतिक पातळीवरही ही लाट तेजीत आहे. महासाथीत आतापर्यंतच्या एकूण बाधित व मृत्यूंपैकी १/३ संख्या गेल्या ३ महिन्यांतील आहे.
दरम्यान या विषाणूविरोधातील बऱ्याच देश-विदेशी लसी आता उपलब्ध आहेत. लसीकरणानेही वेग घेतला आहे. जगाच्या विविध भागात ते कमीअधिक गतीने चालू आहे. अर्थात त्यामुळे मिळणारे संरक्षण कितपत आणि किती काळ मिळेल हे अद्याप सुस्पष्ट नाही. मात्र पूर्ण लसवंत व्यक्तींना भविष्यात हा आजार झालाच तरी तो गंभीर नसेल. उपचारांच्या आघाडीवर अजूनही विशिष्ट रामबाण औषधाची वानवा आहे. पूर्वीच्याच काही प्रस्थापित औषधांचा गरजेनुसार वापर चालू आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींतही संशोधन चालू आहे. अशा उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करीत मानवजात या विषाणूशी झुंजत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे ही आशादायक बाब.
लेखमालेच्या मागच्या धाग्याची पृष्ठसंख्या लवकर आणि बरीच फुगली. तसेच तिथली स्वसंपादनाची मुदतही लवकरच संपेल. या कारणास्तव हा नवा धागा काढतोय. उत्साही व जागरुक वाचकांच्या सहकार्याने उत्तम चर्चा होत आहे. मागील धोरणानुसार या धाग्याच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मूळ लेखाच्या शेवटी दिनक्रमे समाविष्ट करीत राहीन. नवनवीन वाचकांना त्याचा उपयोग व्हावा ही इच्छा.
ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.
....................................................
चर्चेतील महत्वाचे :
२८/४/२१
Tocilizumab एक प्रकारची अँटीबॉडी असून मध्यम आणि तीव्र covid-19 रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सच्या बरोबरीने दिली जाते.
ती तीव्र दाह नियंत्रणात आणायला मदत करते. त्यामुळे फुफ्फुसांचा बचाव होतो.
सध्या हे औषध आयात करावे लागते आणि ते पेटंट कायद्याखाली आहे. म्हणून महाग आहे.
......................................
१/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार
सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.
अनेक प्रकारच्या फंगस पासून हा आजार होऊ शकतो. साधारणपणे हा आजार झालेल्या लोकांमध्ये मधुमेह बराच अनियंत्रित असतो आणि रक्ताची तपासणी केल्यावर न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशी बऱ्याच कमी झालेल्या असतात.
या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.
...................................................................
१/५/२१
सामान्य जनतेने एकावर एक असे 2 मास्क किंवा N 95 वापरायची गरज नाही ( विषाणूचा नवा प्रकार आलेला असला तरीही). मास्कच्या प्रकारापेक्षाही तो व्यवस्थित लावणे आणि नाका-तोंडावर टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
तो घट्ट विणीच्या कापडाचा असावा ही सूचना आहे.
...............................................................
४/५/२१
Procalcitonin (PCT) हे एक प्रथिन आहे. त्याची रक्तपातळी मोजणे हे विविध जंतुसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी उपयुक्त असते. विविध जंतूसंसर्गांमध्ये ही पातळी बरीच वाढते आणि जसा आजार वाढतो तशी ती अधिकाधिक वाढते.
तीव्र कोविड रुग्णांमध्ये ती मध्यम आजारापेक्षा चौपट असते. जर आजार पुढे गंभीर झाला तर ती पातळी आठपटपर्यंत सुद्धा वाढते.
............................
६/५/२१
या महासाथीत वर्षभरात बाधीत पिढीचे संक्रमण असे झाले :
वृद्ध व सहव्याधिग्रस्त >> मध्यमवयीन >> तरुण>> ?? मुले.
साथरोगशास्त्रात याला ‘डेमोग्राफिक शिफ्ट’ असे म्हणतात. हे तसे अपेक्षित असते.
हे असे का होते यासंदर्भात दोन मुद्दे :
१. विषाणूचे नवे अवतार (उदाहरणार्थ b117) : यामुळे जो आजार होतो त्यात रुग्णांच्या शरीरात विषाणू घनता पूर्वीपेक्षा जास्त आहे >> रोगप्रसार वाढतो>> अधिक वयोगट बाधित होतात.
२. लसीकरण ज्येष्ठांपासून लहानांकडे या क्रमाने होत जाते. त्यामुळे जेष्ठ लसवंत पिढीत नवे रुग्ण तुलनेने कमी निर्माण होतात. आता असंरक्षित वयोगटांमध्ये नवे रुग्ण दिसू लागतात.
...................................................
८/५/२१
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आज दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते. मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.
..........................
१०/५/२१
१. एकूण रुग्णांच्या जेमतेम दोन टक्के गटात सिटीस्कॅन करायची गरज असते; सौम्य कोविडमध्ये त्याची अजिबात गरज नाही.
२. सिटीस्कॅनचा अनावश्यक वापर केल्यावर अजून एक त्रास वाढतो. स्कॅनची प्रक्रिया बंद वातानुकुलीत खोलीत होते. तिथे जितके जास्त रुग्ण आणले जातील तितका रुग्णाकडून संबंधित तंत्रज्ञांना होणारा रोगप्रसारही वाढतो.
..................................................
११/५/२१
कोविडकाळात दातांच्या समस्यांसाठी :
डेंटलदोस्त’ हा २५ दंतचिकित्सकांचा चमू आहे. ही निदानसेवा विनामूल्य २४ x ७ उपलब्ध आहे
दूरभाष क्रमांक 77975 55777
.....................................................
१४/५/२१
पहिल्या प्रकारच्या लसीनंतर दुसऱ्या डोसला दुसऱ्या प्रकारची लस देणे हा विषय सध्या प्रयोगाधीन आहे.
भारतात तरी याला अजून आयसीएमआरची मान्यता नाही.
....................................................
१६/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.
..................................................
१८/५/२१
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
जरी केंद्रीय कृती दलाची या उपचाराला शिफारस नसली तरी स्थानिक डॉ त्यांच्या अनुभवानुसार तो वापरू शकतात. याला ‘ऑफ-लेबल’ वापर म्हणतात.
....................................
१९/५/२१
मुळात बुरशीजन्य आजार दुर्मिळ आहे. एरवी तो खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसू शकतो :
१. रक्ताचे कर्करोग
२. अवयव प्रत्यारोपण नंतर स्टिरॉइड्स आणि अन्य तत्सम औषधे दिलेले
३. तीव्र भाजलेले.
एरवी अशा रुग्णांचे एकूण समाजातील प्रमाण तसे कमी असते. त्यामुळे अशातील ज्यांना हा बुरशीजन्य आजार होतो त्यांचे प्रमाण अजूनच खूप कमी दिसते.
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.
................................
२०/५/२१
१. या बुरशीजन्य आजाराचे शरीराच्या भागानुसार काही प्रकार असतात त्यापैकी एक म्हणजे त्वचेवर जखम होऊन त्यातून contamination मुळे हा जंतुसंसर्ग होतो.
२. आत्यंतिक कुपोषण हे सुद्धा एक कारण आहे.
३. काही अभ्यासांमध्ये कुठलेही कारण अथवा पूर्वीच्या सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळलेला आहे
.............................................................
२१/५/२१
२ डी- ग्लुकोज या नव्या विकसित झालेल्या औषधाचे व्यापारी वितरण भारतात जूनच्या मध्यावर होईल असे संबंधित उद्योगाने जाहीर केले आहे.
......................
२३/५/२१
सौम्य ते मध्यम कोविडच्या (अधिक धोका असलेल्या रुग्णांच्या) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
..................
संजय
संजय
tocilizumab एक प्रकारची अँटीबॉडी असून मध्यम आणि तीव्र covid-19 रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सच्या बरोबरीने दिली जाते.
ती तीव्र दाह नियंत्रणात आणायला मदत करते. त्यामुळे फुफ्फुसांचा बचाव होतो.
ही पहा परदेशातील बनावट
ही पहा परदेशातील बनावट औषधविक्री :
एका अमेरिकी कुटुंबाने कोविडवर रामबाण उपाय म्हणून "Miracle Mineral Solution," असले एक बनावट औषध गेले वर्षभर कित्येकांना विकले व लाखोंचा धंदा केला.
वास्तविक हे पचनसंस्थेला त्रासदायकच प्रकरण होते. अखेरीस या कुटुंबाला अटक झालेली असून आता त्यांच्यावर खटला चालेल.
कठीण आहे - विकणारे आणि विकत घेणारे पण !
(U.S. District Court, Southern District of Florida: "Case 21-20242-CR-ALTONAGA/TORRES.")
देशोदेशी थोतांडाचे बळी.
देशोदेशी थोतांडाचे बळी.
पण तिथे सजग नागरिक देखील आहेत
पण तिथे सजग नागरिक देखील आहेत ना ज्यांनी चांगले कायदे व्हावेत म्हणून चांगले प्रतिनिधी निवडले, सरकारे निवडली. एखाद वेळेला लोकांची निवड चुकलीच तरी आधीच्यांमुळे चांगली "सिस्टीम" असल्याने या भामट्यांना अटक होऊन आता खटला चालेल हे काही कमी नाही. याउलट आपल्याकडे जबाबदार सरकारातील जबाबदार खात्यातील जबाबदार मंत्रीच अशा भामट्यांसोबत जाहिरात करीत आहेत
"करोनाच्या निदानासाठी चाचण्या
"करोनाच्या निदानासाठी चाचण्या करताना लक्षणे असलेले रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त प्रवास, प्रमाणपत्र किंवा ‘एक्झिट टेस्ट’ अशा कारणांसाठी होणाऱ्या चाचण्यांची वाढती संख्या लक्षात घेता, चाचण्यांबाबतच्या धोरणात बदल केला पाहिजे, असे राज्याचे करोनाविषयक तांत्रिक सल्लागार आणि निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी म्हटले आहे."
https://www.loksatta.com/pune-news/need-for-a-change-in-corona-testing-p...
>>> tocilizumab हे ईंजेक्शन >
>>> tocilizumab हे ईंजेक्शन >>>
भरपूर काळाबाजार चालू आहे याचा
https://www.thehindu.com/news/cities/mumbai/woman-held-for-selling-tocil...
आमच्या एका नातेवाईकांना तर सव्वा लाख रुपये मोजावे लागले
बाप रे
बाप रे
मी खात्रीशीर ऐकलेली
मी खात्रीशीर ऐकलेली टोसीलीझुमॅब ची ब्लॅक किंमत 2 लाख आहे
रॅमिडिसीवीर चा ब्लॅक बराच आटोक्यात आलाय.आता ऐकलेल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये वाजवी किमतीत मिळाले.
आताच कळलेल्या बातमीनुसार
आमच्या इमारतीतील पेशंटला ३.५ लाख मोजावे लागले.पण ४-५ दिवसांपूर्वी घरी आलाय.वाईट एकाच गोष्टीचे वाटते,लोक अजूनही हा आजार लपवतात.त्यांच्याकडे अजून २ जणांना माईल्ड लक्षणे होती,तरी त्याच काळात नवीन कामवाली ठेवली.हे लोकही खालीवर फिरायचे.
आताच आमच्या मजल्यावर पेशंट सापडला.बी.एम.सी.ने त्यांच्या दरवाजावर नोटीस चिकटवली.उरलेल्या आम्हा ३ बिर्हाडांची माहिती घेऊन गेले.३-४ दिवस झाले म्हणे.पण त्यांच्याकडील कोणीही घराबाहेर पडत नाही.
बापरे, मग गरिबांनी काय करायचे
बापरे, मग गरिबांनी काय करायचे
आपण आशा ठेवू की हे सर्व
आपण आशा ठेवू की हे सर्व उत्पादन वाढल्यावर कमी होईल.
ही दोन्ही औषधे पण संजीवनी नाहीत.फक्त मदत आहेत.
आता एक्सपेरीमेंटल स्वस्त ड्रग वर टेस्ट चालू आहेत.
शक्य तितक्या(दगडाखाली हात न अडकलेल्या) नागरिकांनी हा काळाबाजार रिपोर्ट करून पकडून द्यावा.
काही दिवसांपूर्वी पेपरात आले
काही दिवसांपूर्वी पेपरात आले की स्तनदा मातेने लस घेतली तर अँटिबॉडीज तिच्याकडून बाळाला पण मिळेल अन काल बातम्यांमध्ये सांगत होते की गरोदर स्त्रिया अन स्तनदा मातांच्या चाचण्या झाल्या नाहीत तर त्यांना लस देणार नाहीत.
Tocilizumab
Tocilizumab
सध्या हे औषध आयात करावे लागते आणि ते पेटंट कायद्याखाली आहे.
त्यामुळे जेनेरिक तयार करण्यासाठी बऱ्याच कायदेशीर गुंतागुंती आहेत.
https://www.nationalheraldindia.com/india/india-stares-at-shortage-of-co...
माझ्या जवळच्या नातेवाईकाला 3
माझ्या जवळच्या नातेवाईकाला 3 दिवसात DIP diet ने covid test positive ते negative result मिळालाय त्यांची लक्षणे सौम्य प्रकाराची होती..
कुणाला try करायचे असल्यास नक्की करून बघा.
(कदाचित कुणाला उपयोग होईल म्हणून सांगितले अन्य काही हेतू नाही)
लस घेतल्यास मृत्यूची शक्यता 0
लस घेतल्यास मृत्यूची शक्यता 0.00005 टक्के.
https://www.esakal.com/global/corona-covid19-virus-america-us-joe-biden-...
वर व्हीबी यांनी जो मुद्दा
वर व्हीबी यांनी जो मुद्दा मांडला आहे त्याबद्दल :
गरोदर आणि स्तन्यदा मातांचे लसीकरण यावर भारतात अजून निर्णय झालेला नाही. पण आरोग्य मंत्रालयाने तज्ञांच्या शिफारसी मागवलेल्या आहेत. त्या संबंधी प्राथमिक बातमी इथे:
https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/centre-expert-group...
त्यानुसार तज्ञांचे मत असे दिसते :
१. गरोदर स्त्रियांना हे लसीकरण नको
२. ज्या स्तन्यदा मातांची बाळे ४२ दिवसांपेक्षा अधिक वयाची आहेत त्या मातांनी लस घ्यावी.
लसिकरन वेगाने पुर्ण करावे ,(
लसिकरन वेगाने पुर्ण करावे ,( जी उप्ब्ध असेल)..... ह्यावर आता बहुतेक सर्वजण एकमत झाले असे दिसते....हे+++
कॅनडात गरोदर स्त्रियांना
कॅनडात गरोदर स्त्रियांना आजारी आणि वृद्धानंतर रांगेत जागा मिळाली आहे.
थँक्स डॉक्टर, मी इकडे सरकारी
थँक्स डॉक्टर, मी इकडे सरकारी इस्पितळात विचारणा केली तर त्यांनी सांगितले की स्तनदा माता आणि गरोदर स्त्रियांना लस देऊ नये अशी त्यांना सूचना आहे. नियम बदलला तर कळवतो बोलले आहेत.
जुलैमध्ये तिसरी लाट येण्याचा
जुलैमध्ये तिसरी लाट येण्याचा इशारा
https://www.lokmat.com/mumbai/vaccination-18-44-year-olds-state-only-aft...
कुमार सर.परवा मी माझ्या
कुमार सर.परवा मी माझ्या भावाबद्दल लिहिले होते इथे.. तो आता बरा आहे .आज discharge मिळेल...
केया,
केया,
तुमच्या भावाच्या प्रकृतीतील सुधारणा वाचून आनंद झाला. खरं तर तुम्ही अगदी माझ्या मनातलेच लिहिले आहेत. मी असा एक प्रतिसाद देणार होतो :
इथल्या चर्चेत सहभागी बऱ्याच जणांचे आप्तस्वकीय सध्या कोविडबाधित आहेत. त्यासंबंधी इथे काही प्रश्नोत्तरेही होतात. जेव्हा अशा मंडळींची तब्येत सुधारून ते तंदुरुस्त होतील, तेव्हा इथे जरूर लिहा. अशा बातम्या आपल्या सर्वांचेच मनोधैर्य वाढवतात.
धन्यवाद !
डॉ कुमार ,
डॉ कुमार ,
मी ही माझ्या नातेवाईकांसंदर्भात इथे विचारले होते. त्यांच्या तब्येतीत बऱ्यापैकी सुधारणा आहे. तापामुळे त्या घाबरल्या होत्या. मात्र आता ताप व इतर लक्षणे पूर्णपणे कमी झालीत. थोडा थकवा आहे. डॉक्टरांच्या सूचनांचे व्यवस्थित पालन करून घरी विलगिकरणामध्ये आहेत. आता त्यांचा आवाज ऐकताना खूप समाधान वाटते.
इथे आपण आणि इतर माबोकारांनी दिलेले सर्व सकारात्मक प्रतिसाद व माहिती त्यांच्या पर्यंत पोचवत होते.
ह्या सकारात्मक ऊर्जेसाठी मनःपूर्वक धन्यवाद!
स्वासु, छान.
स्वासु, छान.
.........
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार
सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.
या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.
बरेच डॉक्टर घरी उपचार
बरेच डॉक्टर घरी उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांना कापूर हूंगायला सांगतात त्याने श्वसन मार्गातील जीवाणू आणि विषाणू मरतात . ह्याला शास्त्रीय आधार आहे का? माझ्या ६५ वर्षे वयाच्या बहिणीला एका MD ( ॲलोपथीक ) सांगितले आहे. ती घरीच उपचार घेत आहे. लस घेतल्या नंतर २० दिवसांनी तीला कोरोना संसर्ग झाला .
आग्या,
आग्या,
माझ्या आतापर्यंतच्या अभ्यासात तरी कापुराच्या कोविड-उपयुक्ततेबद्दल काही आलेले नाही. या दुव्यावर (https://www.thebetterindia.com/253419/home-remedies-do-not-cure-covid-19...) फुफ्फुसरोगतज्ञ डॉ. मृणाल सरकार यांनी अनेक मिथकांचा पर्दाफाश केलेला आहे.
त्यांच्या मते तरी नाकातून कापूर हुंगून या रुग्णाला काहीच फायदा होत नाही; एखाद्यावेळेस इजा होऊ शकते.
कापुराच्या तेलात काही औषधी गुणधर्म असतात. पण नुसता कापूर हुंगून उपयोग होईल असे वाटत नाही. त्याचे औषधी उपयोग आणि दुष्परिणाम हा वादग्रस्त विषय आहे.
धन्यवाद डॉक्टर.
धन्यवाद डॉक्टर.
लोक खोकल्यासाठी खडीसाखर ,
लोक खोकल्यासाठी खडीसाखर , व्हीक्स गोळी , ज्येष्ठमध , लिंबाची फोड चघळतात
त्याने लाळ तयार होते व त्याबरोबर घशातील त्रासदायक कण , जन्तु पुढे ढकलले जातात
जसे हे तोंडा बाबत आहे , तसेच श्वास नलिकेबाबतही आहे , त्यासाठी वाफ घ्यावी लागते , त्यात कापूर , निलगिरी थेंब , बाजारात वाफेत घालायला व हुंगायची केपस्युल मिळते ती घालून वाफ घेतली की श्वास नलिकेत संरक्षक द्रव तयार होऊन त्यातून श्वाससंस्था क्लीन होते
ह्यामागचे तत्व इतकेच आहे , बाकी त्यात फार मोठे औषधी तत्व नाही , पण मुख्य घटक गरम वाफ हाच आहे
खूप उपयुक्त धागा आणि चर्चा.
उपयुक्त चर्चा.
मी हेच विचारायला खरं इथे आले होते कि रोज वाफ घेणं कितपत फायदेशीर आहे??
मी आणि मुलं आम्ही अजिबात घरबाहेर पडत नाही आहोत पण नवर्याचे ऑफिस सुरूच आहे आणि काही आणायचे असेल तरी त्यांना च जावं लागतंय. होसुरमधे खूप पेशंट्स वाढताहेत. अपार्टमेंट मधेही आहेत. मास्क, सैनिटायझशन वगैरे करतच आहे. त्याच्या जोडीला रोज वाफ पण घ्यायला हवी का?
मृणाली,
मृणाली,
१ वर्षापूर्वीचे उत्तर पुन्हा लिहितो !
.....................
वाफ घेणे व रोगप्रतिबंध
वाफ आणि श्वसनसंस्था याबद्दल काही मूलभूत माहिती:
कुठल्याही श्वसनविकारात जेव्हा नाक चोंदणे, घशात खूप द्राव साठणे असे होते, तेव्हा वाफेने ते स्वच्छ व मोकळे होण्यास मदत होते. सूक्ष्म श्वासनलिकांपर्यंत वाफ पोचत नाही. तेव्हा ‘वरच्या’ श्वसनमार्गाची स्वच्छता हा वाफेचा खरा उपयोग आहे.
तो कुठल्याही विशिष्ट सूक्ष्मजंतूच्या विरोधातील उपाय असत नाही.
त्याचे महत्व श्वसनविकारातला पूरक उपचार इतकेच आहे.
................
तरुण व निरोगी असल्यास आणि अलर्जीचा त्रास नसल्यास रोज वाफ घेण्यात मतलब नाही.
Pages