
अपराधी कोण?(भाग 2)
"मयंग"
असं म्हणून बाबा जमिनीवर पडतात.त्याच्या रूम मध्ये पुन्हा काहीतरी पडल्याचा आवाज होतो.आई बाबांचा आवाज ऐकूण रूमच्या बाहेर येतात.
"अहो काय झालं तुम्हाला?"म्हणून जोरात ओरडतात."मयंग बघ ना तुझ्या बाबांना काय झालंय."
मयंग रूमच्या बाहेर येताच बाबांची अशी अवस्था बघून तो देखील घाबरुन जातो.तो पटकन धावत जातो व डॉक्टरांना कॉल करतो.व बाबांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करतो.काय प्रकार घडलाय आईला त्याची कसलीच कल्पना नसते.
"मयंग काय झालं रे असं अचानक तुझ्या बाबांना."
"आई तु शांत हो आधी काहीही होणार नाही बाबांना."
तितक्यात डॉक्टर येतात.
"काय झालंय डॉक्टर त्यांना ?" आईंनी विचारले
"त्यांना कसाला तरी धक्का बसालाय. "
"डॉक्टर आता बरे आहे का बाबा ?"
"Yes He is out of danger now."
काय घडले असावे आई याचाच विचार करत असतात.
त्या रात्री ते हॉस्पीटल मध्येच थांबतात.
मयंगला झोपच येत नाही कसातरी एक तास तो पडतो.दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठतो ...
"आई मी जरा साहिलला कॉल करून बोलवून घेतो."मयंग साहिलला कॉल करतो.
" हॉलो साहिल बाबांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय जरा लवकर ये ".... हे बोलत असतांना त्याच्या डोळ्यात पाणी येतं.
बाबांच्या या असल्या अवस्थेच कारण नक्कीच मी असणार. माझ्याचमुळे त्यांची ही अवस्था झाली असावी बाकी दुसरं कोणतं कारण असणार आहे. हा विचार त्याला गप्प बसू देत नव्हता. तो तसाच आईंना न सांगता घरी निघून जातो.
मयंग जाताच काहींच वेळात तिथे साहिल येतो.
"काकू कसे आहेत आता काका "?
"डॉक्टर बोलेय चिंतेचं काही कारण नाही आता."
"अच्छा बर मयंग कुठे आहे?"
"आता इथेच होता बघ,आता कुठे गेला असावा?"
"तुम्ही नका काळजी करू काकू असेल इथेच बघतो मी.
तुम्ही काही खालं नसेल ना, हा नाश्ता करूण घ्या."
इकडे मयंग घरी पोहचतो.
रूम मध्ये जाऊन जोरात हंबरडा फोडतो.हे काय करत होतो मी ...मी इतका स्वार्थी कसा झालो.आज बाबांचे काही बरे वाईट झाले असते तर....असे नको नको प्रश्न त्याला सतावत होते.तो तसाच सुमारे अर्धा तास रूम मध्ये रडत बसतो.
साहिल संपूर्ण हॉस्पिटलमध्ये मयंगला शोधतो,कित्येक कॉल करतो. पण मयंगचा काहीच पत्ता लागत नाही. तो कॉल रिसीव करत नाही..शेवटी तो शेवटचा म्हणून पुन्हा एकदा कॉल करतो.यावेळी मयंग कॉल रिसीव करतो.
" हॉलो"
"मयंग कुठे आहेस तु?"
"इथे जवळच आहे बस आलोच."
अरे!!! "मी खूप वेळचा शोधतोय तुला,ये लवकर."
"हो"
"मयंग तु ठिक आहेस ना ?"
"हो मी ठीक आहे."
काहीच वेळात मयंग हॉस्पिटलमध्ये येतो.
"कुठे होता तु, बराच उशिर केला?"
"ये साहिल ते सर्व सोड मला सांग डॉक्टरांना भेटलास का?"
"नाही"
"चल मग ते बाबांना डिस्चार्ज कधी देता ते बघू."
"डॉक्टर आम्ही बाबांना घरी कधी घेवून जाऊ शकतो ?" "Now he is absolutely fine,तुम्ही आता त्यांना घेवून जाऊ शकतात. परंतू त्यांना कुठलाच मानसिक
तनाव येणार नाही याची काळजी घ्या."
"ओके डॉक्टर "
मयंग व साहिल बाबांना घरी घेवून जातात.साहिल त्यांना त्याच्या रूम मध्ये घेवून जातो.मयंग पण त्याच्यासोबत असतो.
"तुम्ही सर्वजण बसा,मी जेवणाची तयारी करते." आई किचनमध्ये जातात.
मयंग तिथे असतो पण तो एकदा ही बाबांच्या नजरेला नजर देवून बघत नाही. जास्त काही बोलत नाही.
मयंग तिथून काढता पाय घेतो.त्यामागे साहिल पण निघतो कारण साहिलला जाणून घ्यायचे असते काय घडले होते.
साहिल मयंग कडे जाण्यास निघतो.
"थांब साहिल कुठे निघालास मला बोलायचं आहे तुझ्याशी."
"हो काका बोलाना."
"मला सांग मयंग तुला काही बोलला का?"
"कशाबद्दल?"
"त्याच्या कंपनीबद्दल किंवा अजून काही म्हणजे ज्या गोष्टीचा त्याला खूप त्रास होतोय असं काही?"
"का काका तुम्ही हे सर्व का विचारताय? ते देखील असल्या अवस्थेत"
"हे बघ साहिल मी तुला सर्व स्पष्ट सांगतो.
मयंग हल्ली काही दिवसापासून डिप्रेशन मध्ये राहतोय
मी बहुतेक वेळा विचारल त्याला काही झालंय का? कसलं टेन्शन आहे का तुला? तर काहीच नाही बाबा म्हणून टाळतो. परंतू काल जो प्रकार घडला तो बघून फार काळजी वाटतीये त्याची."
"काल जो प्रकार घडला म्हणजे,काय झालंय काका?"
"काल रात्री मयंग उशिरा आला जेवून आलोय म्हणून तसाच झोपायला निघून गेला.
का कुणास ठाऊक? काल मला त्याची जास्तच चिंता वाटू लागली म्हणून मी तो झोपला का बघायला गेलो. तशातच रूम मध्ये काही तरी पडण्याचा आवाज झाला
म्हणून मी दाराच्या फटीतून आत डोकावून बघीतले
तर ...बाबा तसेच थांबतात.
"तर काय काका? "
"मयंग गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न करत होता.व तो आवाज त्याच्याकडून दोर बांधण्याच्या गडबडीत खुर्ची पडण्याचा होता." आता बाबांच्या डोळ्यात अश्रू आले होते ...
"एकुलत्या एका मुलाने असे करावे या पेक्षा कोणता मोठा धक्का असू शकतो सांग बर ...तेच मला सहन झालं नाही माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता. मयंगने थांबावे म्हणून कसातरी जोरात मयंग म्हणून ओरडलो."
"काय मयंग ने असं केलं ?"हा साहील साठी देखील खूप मोठा धक्का होता..
"हो आपल्या मयंग ने असं केलं काल मी तिथे पोहोचलो नसतो तर खूप अनर्थ झाला असता."
"काका तुम्ही शांत व्हा अगोदर.आपण बोलू त्याच्याशी तुम्हाला कारण देखील कळेल.
मी आहे ना,तुम्ही नका काळजी करू.मला सांगा कांकूना यातलं काही माहित आहे का ?"
"नाही"
"काका नका काळजी करू विश्वास ठेवा माझ्यावर सर्व ठीक होईल.
काका असं होतं मग तुम्ही कधी बोले नाही मयंग चिंतेत असतो असं कधी "
"मी आज बोलणारच होतो तुझ्याशी."
"बर काका तुम्ही आराम करा.आणि याबाबत जास्त विचार करू नका. त्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होईल."
हे सर्व बोलून साहिल घराबाहेर निघून जातो.घराच्या बाजूला जाऊन साहिल एक कॉल करतो. व तब्बल अर्धा तास त्या व्यक्तीशी बोलतो...
क्रमश:
- शब्दवर्षा
छान सस्पेन्स बिल्ड अप होतोय,
छान सस्पेन्स बिल्ड अप होतोय,
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
कथाबीज चांगलं असेल असं वाटतंय
कथाबीज चांगलं असेल असं वाटतंय. कृपया सगळया शुद्धलेखनाच्या चुका सुधारा.
कथाबीज चांगलं असेल असं वाटतंय
कथाबीज चांगलं असेल असं वाटतंय. कृपया सगळया शुद्धलेखनाच्या चुका सुधारा.>> अनुमोदन..
लिहीत रहा आणि सगळे प्रतिसाद positively घ्या..
पुढील भागाच्या प्रतीक्षेत
पुढील भागाच्या प्रतीक्षेत
@जाईजुई
@जाईजुई
@गौरी
@अज्ञातवासी
मनस्वी आभार !!
कथाबीज चांगलं असेल असं वाटतंय. कृपया सगळया शुद्धलेखनाच्या चुका सुधारा.>>
नक्कीच ...धन्यवाद !!