
अपराधी कोण ?
रात्रीचे बारा वाजले होते मयंग अंथरूणावर बराच वेळ पडून होता.एकटा शांत...
झोप लागत नव्हती.डोक्यातील विचारचक्र थांबत नव्हते.
आता रात्रीचे दोन वाजले होते. तेव्हा कुठे मयंगचा डोळा लागला....
सकाळी सात वाजता मयंगला जाग येते.झोपेतून उठताच तो अंथरूण बाजूला करून शोधाशोध करू लागतो.ती शोधाशोध मोबाईलसाठी चालेली असते....
"मयंग उठलास का?"
किचनमधून मयंगची आई आवाज देते.
"हो आई आताच उठलो बघ,येतो तयारी करूण"
मोबाईल मयंगला भेटताच मयंग एक कॉल करतो
आपण डायल केलेला नंबर यावेळी बंद आहे असे त्यावर सांगण्यात येते...
थोड्याच वेळात मयंग तयार होवून हॉल मध्ये येतो...
"आई बाबा कुठे दिसेना,कुठे गेले आहेत काही कल्पना
आहे का तुला ?"
"नाही " आईंनी मयंगला चहा देत सांगितले ...
चहा नाश्ता करूण मयंग घराबाहेर पडतो ...
"मयंगची आई आहात का घरात ?"
"हो"
मयंग चे बाबा अंगणातूनच विचारता.
"मयंग कुठे गेला? "
"आता होता इथेच गेला असेल गावात"
"बरं मी जरा शेताकडे जाऊन येतो "
मयंग मित्राकडे जातो तेथे बसतोच तोच मोबईल वर ई- मेलचे नोटिफिकेशन येते.ते बघताच मयंगच्या चेहऱ्यावर आनंद उमटतो.
"काय रे कोणाचा मेसेज आहे "मयंगचा मित्र साहिल विचारतो ...
मी परवा इंटरव्हयू दिला होता, एका मल्टिनॅशनल कंपनीत त्यांचा मेल आलाय मी सिलेक्ट झालेाय....
अरे वा!!!! "That's great news ,अब पार्टी तो बनती है"
"हो नक्कीच"
"चल येतो मी भेटू नंतर " मयंग लगेच घराकडे येतो. आईना ती गोड बातमी कळवतो आई बाबांना मिठाई आणायला सांगता .....
बाबा मिठाई घेवून येतात. घरात येताच ते मिठाई मयंगला भरवतात ...
"कधी पासून जाँईनिग आहे बेटा"
"बाबा त्यांनी तस उद्याच बोलावलं आहे"
"हो चांगलच आहे मग तु आनंदी आहेस ना. मग झाल की"
दुसऱ्या दिवशी मयंग कंपनीत जातो काल आनंदी असणारा मयंग आज थोडा कुठल्या तरी विचारचक्रात हरवला वाटत होता.
मध्ये दोन दिवस जाता मयंग या दोन्ही दिवशी कंपनीत जातो.परंतू का कुणास ठाऊक तो हल्ली गप्प गप्प राहत होता ...
"काय रे मयंग कंपनीतील वातावरण तर ठीक आहे ना?
हल्ली तू खूप शांत असतो"
"हो आई सर्व ठीक आहे,नवीन आहे ना अजून म्हणून थोडं कामाचं टेन्शन बाकी काही नाही."
इतकं बोलून मयंग घराबाहेर पडतो.व रात्री खूप उशिरा येतो ...
"आज खूप उशिर केला? "आई विचारते
हो जरा उशिरच झाला,आणि हो आई मी जेवलो आहे म्हणून आता झोपतो ,तु पण झोप ....आई निघून जाता
"काय हो आला का मयंग?"
"आताच आला बघा जेवायचं नाही बोला जेवून आलाय असं म्हणतं होता बघा, दमतो हो तो खूप त्याकडे बघून जाणवतं ते .."
"अजुन नवीन आहे तो होईल सवय तुम्ही नका चिंता करू"
मयंगचे बाबा थोडावेळ पडतात.नंतर उठून मयंग झोपला का बघायला येतात ...
मयंगच्या रूम जवळ येताच त्यांना कसला तरी आवाज येतो ,मयंग झोपला असेल काही पडले तर नसावे ना आवाज दिला तर उगाच त्याची झोप खराब होईल
असा विचार करूण ते दरवाजाच्या फटीतून आत डोकवतात ....
आत डोकवताच मयंगच्या बाबांना धक्का बसतो. बाबांना घाम फुटतो तोंडून शब्दच निघत नाही .....
क्रमशः
- शब्दवर्षा
मस्त सस्पेन्स बिल्ड होतोय...
मस्त सस्पेन्स बिल्ड होतोय... पुढील भाग लवकर टाका...
कथा पास्ट टेन्स मध्ये लिहिली तर वाचायला अजून मजा येईल...
सस्पेन्स चांगला आहे .
सस्पेन्स चांगला आहे .
सकाळी सात वाजता मयंगला जाग येते.झोपेतून उठताच तो अंथरूण बाजूला करून शोधाशोध करू लागतो.ती शोधाशोध मोबाईलसाठी चालेली असते... >>>> असं नाटकाचं वाचन केल्यासारखी वाक्यरचना रसभंग करते . पुढचं वाचायचा कंटाळा येतो .
वाक्यरचनेचा काळ सुधारल्यास मजा येईल वाचायाला.
पुढील भागाच्या आवर्जून
पुढील भागाच्या आवर्जून प्रतीक्षेत
कथानक इंटरेस्टिंग वाटतंय.
कथानक इंटरेस्टिंग वाटतंय. पुलेशु.
पहिल्याच भागात सस्पेन्स बिल्ड
पहिल्याच भागात सस्पेन्स बिल्ड करायला जमलं आहे. पण स्वस्तिने लिहिल्याप्रमाणे कथा वाचण्यापेक्षा नाटक वाचल्यासारखं वाटत आहे, त्यामुळे भूतकाळात लिहिलं तर वाचायला आवडेल. अजुन एक बदल सुचवु का? प्रत्येक वाक्यात मयंग मयंग लिहिण्यापेक्षा personal pronouns ( मराठी शब्द ??) वापरा. तो गेला, त्याने विचारलं असं लिहिलं तरी ते मयंग बद्दल आहे हे समजेल.
मयंगचा अर्थ काय? सहज उत्सुकता. ( मयंक म्हणजे पुर्ण चंद्र / पौर्णिमेचा चन्द्र. पण मयंग माझ्यासाठी नवा शब्द आहे.
तुमच्या मतांचा मी मनस्वी
तुमच्या मतांचा मी मनस्वी स्वीकार करते. प्रत्येकाच वेगवेगळं मत नक्कीच असू शकत. मी मला साजेशी आवडेल अशी रचना पद्धती केली आहे. तुम्हाला आणखी कसे आवडेल लिखाण याचा नक्कीच प्रयत्न करीन.
मी पुढील भाग लिहीतांना काळजी घेईल...
तुमच्या अभिप्रायसाठी मनस्वी धन्यवाद...
तुमच्या मतांचा मी मनस्वी
@च्रप्स
@स्वस्ति
@अज्ञातवासी
@mrunali.samad
@मीरा..
मनस्वी आभार .....
चांगलं लिहिलंय! पुढील भागाची
चांगलं लिहिलंय! पुढील भागाची प्रतिक्षा..
थोडं शुद्धलेखनाकडे पण लक्ष द्याल का?
चांगला प्रयत्न आहे. पुढे काय
चांगला प्रयत्न आहे. पुढे काय होतंय ह्याची वाट बघतोय.
बाकी थोड्याफार सूचना -
पहिला परिच्छेद भूतकाळात सुरू झाला आहे आणि पुढचं सगळं वर्तमानकाळात आहे. मयंग झोपला होता - भूतकाळ, मयंग उठतो - वर्तमानकाळ. दोन्ही प्रकारे लिहिलं जाऊ शकतं, पण एकत्र नाही. एक पद्धत निवडा व सुसंगती ठेवा.
काही ठिकाणी वाक्य अर्धवट मुद्दामून सोडल्यास ... अशी टिम्बे दिल्यास समजू शकतो. पण दर वाक्याच्या अथवा परिच्छेदाच्या शेवटी अकारण .... नको.
पण सूचनांनी दबून जाऊ नका. मूळ कथा रोचक आहे, ती वाचायला मजा येत आहे. थोडीफार सुधारणा झाल्यास आणखी छान वाचली जाईल ही कथा.