तू मुलींना आवडत नाहीस (स्वगत)

Submitted by Parichit on 4 April, 2021 - 04:00

तू मुलींना आवडत नाहीस. कितीही कडू असली तरी हीच fact आहे. ती तुला स्वीकारण्यावाचून गत्यंतर नाही. तुझे वागणे चांगले आहे. तुझे बोलणे चांगले आहे. तुझे विचार चांगले आहेत. तुझा व्यक्तिमत्व चांगले आहे. तुझे सगळे चांगलेच आहे. परंतु.............

तू मुलींना आवडत नाहीस

हे कटू सत्य आहे. आणि हे तुला स्वीकारावेच लागेल. हि काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याच्याशी तुझ्या चांगल्या गुणांचा असण्याचा वागण्याचा काही एक संबंध नाही. सूर्य पूर्वेला उगवतो हि वस्तुस्थिती आहे व त्याबाबत आपण काहीही करू शकत नाही. तदनुसारच तू मुलींना आवडत नाहीस हि सुद्धा एक वस्तुस्थितीच आहे. त्याबाबत कोणीच काही करू शकत नाही. मुलीना कोण आवडते ते आजवर भल्याभल्यांना कळले नाही. मग तू कशाला डोकेफोड करून घेतोस? तुझ्या दृष्टीने जी मुले/पुरुष तुला बावळट, आळशी, ढेरपोटे, टकले, टाकाऊ, अजागळ, कोणतेच सदगुण नसलेले वगैरे वगैरे असे वाटतात. असेच पुरुष/मुले सुंदर स्त्रियांना/मुलीना आवडतात. त्या अशांच्यावरच भाळतात. हे ऐकायला असूया वाटत असली तरी हेच कटूसत्य आहे. सुंदर सुंदर स्त्रिया माठ पुरुषावर भाळू शकतात. तुला - सो नाईस ऑफ यू. ओके Thanks - म्हणून तुला कटवणारी लावण्यवती एखाद्या माठ टकल्या ढेरपोट्याला - यू आर माय एंजल. बी देअर फॉर मी - असे म्हणाली तर अजिबात जळू नकोस. कारण तू किती नाकारले तरी तेच सत्य आहे. मुलींची बुद्धी तशीच चालते. एखादा पुरुष तद्दन भामटा आहे याबद्दल तुझ्या मनात कोणतीही शंका नसेल. कुणालाही त्याच्या थोबडाकडे बघितल्यावरच ते कळेल इतके ते स्पष्ट असेल. ते कळण्यासाठी जास्त अक्कल चालवायचीदेखील गरज नाही. असे असूनही तू ज्या सो कॉल्ड गोड मुलीला गेली कित्येक महिने मनधरणी करून इम्प्रेस करू पाहत आहेस, त्या मुलीला नेमका तोच पुरुष काही दिवसातच आवडू लागतो. तुला टाळणारी ती, त्याला पाहताच मात्र खुश होते. त्याचे नाव घेताच आनंदून जाते. हे जळजळीत वास्तव आहे. पण ह्यावर मनातल्या मनात जळण्यापेक्षा आणि स्वत:ला मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा हे सत्य जितके लवकर तू पचवशील तितके ते तुझ्यासाठीच ते चांगले राहील. मुलींच्या पायी वेळ आणि उर्जा वाया घालवू नकोस. एखादीला तू आवडायचा असलास तर तसाही काही न करता आवडून जाशील. पण त्याचवेळी ती तुला आवडेलच ह्याची ग्यारंटी नाही, हे चालायचेच. त्यात कुणी फार तात्त्विक उहापोह करण्यात अर्थ नाही. अखेर काय? तर हे असेच आहे तर मग मुलीना इम्प्रेस करायची धडपड आणि पराकाष्ठा काहून करायची? ती तू करू नकोस.

गेली हजारो का दशहजारो वर्षे झाली, समाजात ठरवून लग्ने केली जातात. ह्यामध्ये पहिल्या भेटीतच एकमेकाला पसंद करायचे असते. अवतीभवती सगळे बसलेले असताना जीवनसाठी निवडायचा असतो. आता निसर्गाचा क्रम पाहिला तर स्त्री-पुरुषाने एकमेकाला पसंद करणे हि त्या दोघांची अत्यंत खाजगी गोष्ट असते. वास्तविक अशी चारचौघात ती करायची नसते. स्त्री हि पुरुषाचे सुंदर मन पाहून त्याची निवड करते, आणि पुरुष हा स्त्रीचे शारिरीक सौंदर्य पाहून तिची निवड करतो. हा निसर्गक्रम आहे. आता ह्या दहा पंधरा मिनिटाच्या - स्थळ बघण्याच्या - कार्यक्रमात मुलाला स्त्रीचे शरीर दिसेल व तो त्यावरून तिची पसंदी करू शकेल हे मान्य आहे. पण इतक्या कमी वेळात एकही शब्द न बोलता मुलीला त्या मुलाचे मन कसे कळू येईल? ते सुंदर आहे का काटेरी आहे ह्याचा तिला कसा अंदाज येईल? पण त्याचा विचार करतो कोण इथे? पुरुषप्रधान व्यवस्थेत पुरुषाने तिला बघून पसंद केले कि मामला मिटला. दोघांचे लग्न लावले जाते. आणि तिथून पुढे आयुष्यभर ती वैवाहिक बलात्काराला ती सामोरी जाते. पुरुषप्रधान व्यवस्था आहे. स्त्री आणि जमीन ह्या दोन म्हणजे इथे पुरुषांनी पराक्रम करून लढून वा भांडून प्राप्त करायच्या व नंतर त्यावर मालकीहक्क घेऊन यथेच्छ भोगायच्या गोष्टी असतात. वाचायला वाईट वाटेल. पण कटू असले तरी हेच सत्य आहे. सर्वाच्या मुळाशी हाच विचार आहे हे नाकारता येत नाही. कदाचित ह्याच परंपरेचे पिढ्यानपिढ्या संस्कार झाल्यामुळे अनेक स्त्रियांना जबरदस्ती करणारे पुरुष आवडतात हे वास्तव आहे. हे जरा वादग्रस्त विधान असले तरी खरे आहे. बलात्कार आणि प्रेम ह्यात अंधुक रेषा आहे. ती ज्याला कळली त्याला स्त्री प्राप्त होते. जबरदस्ती करता येत नसेल तर स्त्रीचा नाद करू नये. योग्य तेंव्हा योग्य ती जबरदस्ती केल्यास स्त्रीला तो पुरुष आवडू लागतो. ह्यात थोडे सुद्धा अयोग्य काही झाले तर मात्र तो बळात्कारच ठरतो. हा फोर्म्युला आहे.

बर. ते जाउदे. विषयांतर नको. तर मी काय सांगत होतो कि ठरवून केलेल्या लग्नाच्या नावाखाली मुलीवर पुरुषाची जबरदस्ती लादण्याची परंपरा गेली कित्येक हजारो वर्षे सुरु आहे. इतक्या हजार वर्षांचे संस्कार असल्याने आता आता गेल्या काही दशकांत मोकळ्या होऊ घातलेल्या समाज व्यवस्थेत मुलीला आपला जोडीदार आपल्या बुद्धीने निवडता येण्याची अपेक्षा करावी तरी कशी? मुर्खासारखे निर्णय घेऊन एखाद्या भामट्याचा एंजल म्हणून प्रेमिक म्हणून स्वीकार करायचा आणि तुला फडतूस म्हणून रिजेक्ट करण्याचा प्रताप मुलीकडून होणारच. कारण हजारो वर्षाच्या मानसिक गुलामगिरीमुळे त्यांची बुद्धी अद्यापी तितकी प्रगल्भ झालेली नसते. यात त्या मुलींचा दोष तो काय? ज्यांनी अशी समाज व्यवस्था निर्माण केली त्यांना बोलावे लागेल.

पण जाऊंदे. काय करायचा आपल्याला इतिहास आणि भूगोल घेऊन? तुझ्यापुरते एक आणि एकच सत्य कायम मनाशी बाळगत जा आणि ह्या बाबतीत मुलीकडून कसलीच तर्कसंगत विचारांची किंवा निर्णयाची अपेक्षा ठेऊ नकोस. म्हणजे मानसिक त्रास होणार नाही तुला. आणि ते सत्य म्हणजे.......

तू मुलींना आवडत नाहीस! विषय संपला.

[तळटीप: मागच्या काही दिवसांत घडलेल्या काही विचित्र घटनांमूळे मनात साठून राहिलेल्या विचारांचा निचरा होण्यासाठी व्यक्त होण्याची गरज भासल्याने हे स्वगत लिहिले आहे. केवळ आणि केवळ तोच एक हेतू आहे. लिहून झाल्यावर आता बरेच हलके वाटत आहे. बाकी, मायबोलीकर त्यांना जो हवा तो प्रतिसाद द्यायला मोकळे आहेत]

-------

हा वरचा लेख लिहिण्यामागे जी चित्तरकथा आहे ती खरेतर मला लिहायची नव्हती. पण लेखावर काही प्रतिसाद पाहता हि कथा लिहिणे गरजेचे आहे असे वाटल्याने ती इथे थोडक्यात देत आहे. वरील स्वगत लिहायला मला कशामुळे भाग पडले हे वाचकांना लक्षात येईल हि अपेक्षा.

कॉलेजमध्ये असताना आमचा मित्रमैत्रिणींचा एक ग्रुप होता. खूपच खेळीमेळीचे वातावरण होते. त्यात एका मुलीची व माझी चांगली मैत्री झाली. ती खूपच सुंदर होती असे मी म्हणणार नाही. पण खूप साधे सौंदर्य होता तिच्यात. काळेभोर बोलके डोळे. तो साधेपणा तो मला खूपच आवडायचा. नाजूक चणीची होती. गाणे छान गायची. खूप गोड वाटायची गाणे गात असताना. आम्ही सगळे एकत्र असताना तिला आम्ही गाणे गायचा आग्रह करायचो व ती गायची सुद्धा. किती छान दिवस होते. हळूहळू तिच्याविषयी माझ्या मनात सोफ्ट कोर्नर बनत गेला. रात्री दिवसा तिचा विचार मनात येत असे. पण हे मी तिला बोलून दाखवू शकत नव्हतो. फारच इनोसंट होती. त्यामुळे तिच्याविषयी मी असा विचार करणे हे तिला आवडले नसते. ग्रुपवर त्याचा परिणाम झाला असता. ग्रुप सोडून गेली असती व माझे खूप अवघड झाले असते. म्हणून मी गप्पच राहिलो. पण त्याचवेळी कुठेतरी काहीतरी भलतेच शिजत होते. कॉलेजात एक ज्युनिअर होता. टपोरी होता मावा गुटखा खायचा. शिवाय बरीच व्यसने होती. फक्त बोलण्यात चतुर होता आणि गाणे बरे गायचा. एवढीच काय ती जमेची बाजू. पण बाकी त्याच्या वर्तणुकीमुळे ग्रुप मध्येच काय वर्गात सुद्धा कुणाचेच त्याच्याविषयी चांगले मत नव्हते.

एक दिवस वाईट उगवला. ह्या मुलीला मी त्या मुलाशी बोलताना पाहिले. मला आश्चर्य वाटले. काय गुणाचा आहे हे माहित असूनही हि त्याच्याशी काय बोलत असावी? एकतर ती खूप इनोसंट होती किवा मूर्ख होती. मी विचार केला, कि असेल बाबा काही तात्पुरते कारण म्हणून बोलली असेल. असे म्हणून मी मनाचे समाधान करून घेतले व दुर्लक्ष केले. पण त्यानंतर सुद्धा ती त्याच्याशी बोलताना आढळली. विशेष गोष्ट अशी कि फार कोणी आजूबाजूला नसताना एकदा त्याच्याशी बोलत उभी होती. मला मनात फार जळजळ झाली. इतकी वर्षे आमचा ग्रुप आहे पण मला असे कधीच एकटे बोलायची संधी तिने दिली नाही. आणि हा मात्र कोण काल कॉलेजात आला आणि इथवर मजल मारली त्याने. मला प्रचंड अस्वस्थ वाटू लागले. ग्रुपमध्ये बाकीच्या मित्रांशी यावर ती नसताना विषय काढला. नाजूक गोष्ट होती. कारण सगळे मला म्हणले असते तिच्यात ह्याला इतका इंटरेस्ट का. त्यामुळे तसे न जाणवता मी विषय काढला. म्हणालो ती मला इनोसंट वाटते आणि तो मुलगा कसा आहे सगळ्यांना माहित आहे. तर आपण तिला सावध करूया. तर बाकीचे म्हणाले तिचे व्यक्तीगत आयुष्य आहे आपण तसे करणे बरोबर होणार नाही. ती ग्रुप सोडून जाईल. असे सर्वांनी बोलल्यावर माझा नाईलाज झाला. जे होईल ते बघत बसायचे ठरवले. आणि माझ्या डोळ्यासमोर ते कैकदा भेटत असत हे मी मूकपणाने पाहत राहिलो. एकदा ग्रुपमध्ये सर्वांच्यात ती असताना मी न राहवून विषय काढलाच. खेळीमेळीत तिला विचारले, काय बोलत असतो तो तुझ्याशी. तर अगदी सहज म्हणून गेली "अरे तुला माहिती का गाणे किती छान गातो. गाण्याच्या टिप्स देत असतो मला. बाकीचे काही असले तरी त्याच्याकडून गाणे घेण्यासारखे आहे. जे चांगले आहे ते घ्यायला काय हरकत आहे" मी मनातल्या मनात प्रचंड चरफडलो. त्यांनतर बरेच काही बाही झाले. त्या दोघांच्यात संवाद सुरु राहिला पण गाडी मैत्रीच्या पुढच्या थराला गेली असेल असे निदान मला जाणवले तरी नाही. किंवा तसे काह्ही घडले नसावे अशी मनाची खोटी समजूत काढत मी कॉलेजची वर्षे काढली.

आता कॉलेज सोडून बरीच वर्षे झालीत. मध्यंतरीच्या वर्षांत सगळ्यांचा संपर्क तुटला होता. पण नंतर आम्ही फेसबुक आणि व्हाट्सपवर पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आलो. ती नव्हती खूप वर्षे. कुठे गायब होती कुणास ठावूक. कुठूनतरी अप्रत्यक्षपणे बातमी येऊन तिचे लग्न झालेय हे सर्वाना माहिती झाले. कुणाशी झालेय हे माहित नव्हते. पण ज्याच्याशी झालेय तो "तो" नव्हता इतकी माहिती मात्र मी काढली. आणि मागच्या वर्षी कुठूनसे ती पुन्हा आमच्या संपर्कात आली. व्हाट्सपवर ग्रुप मध्ये सामील झाली. इतक्या वर्षांनी तिला पाहून सर्वधिक आनंद मला झाला होता. इतकी वर्षे कुठे गायब होतीस विचारले. तर लग्नानंतर नवरा बाळंतपण मुले संसार ह्यातून वेळच मिळाला नाही म्हणाली. तिचा नवरा बिजनेस मध्ये होता. गाण्यातले त्याला ढ कळत नव्हते हे सुद्धा तिने सांगितले. मग मला पुन्हा हुरूप चढला. गाण्याचा सराव करून मी तिला एकदा एक गाणे म्हणून पाठवले. त्यावर तिचा "छान आहे. चांगले गातोस" एवढाच रिप्लाय आला. नंतर गाणी पाठवली पण तिचा प्रतिसाद आला नाही.

आणि मला कुठून दुर्बुद्धी झाली आणि तिची फेसबुकवर फ्रेंड लिस्ट बघितली तर तो टोणगा तिच्या लिस्टमध्ये दिसला. मला मनात शंकेची पाल चुकचुकली. जर काही वाईट घडायचे असेल तर घडतेच ह्या न्यायाने गोष्टी घडल्या. त्याच्या प्रोफाईल मध्ये जाऊन बघितले असता त्याच्या प्रत्येक पोष्टवर हिची कौतुकाची कॉमेंट. मी इतके काय काय ग्रुपवर आणि फेसबुकवर लिहायचो त्याला मात्र कधी फार तिने कॉमेंट दिल्या नाहीत. मला फार वाईट वाटले. आणि मनात नको नको त्या शंका सुद्धा आल्या. मग जरा संयमाने खेळायचे ठरवले. आणि तिच्याशी बोलणे व चाटिंग वाढवून काही महिन्यांपूर्वी तिला भेटायला म्हणून तिच्या घरी गेलो. हे सुद्धा सहजपणे घडले नाही. त्यासाठी बरीच मनधरणी व बरेच काही करावे लागले. घरी गेलो तेंव्हा एकटीच होती. तिचा नवरा युरोपात गेला होता. इतक्या वर्षात आम्ही दोघे पहिल्यांदाच असे एकट्याने भेटत होतो. इतक्या वर्षांनी तिच्याशी बोलताना मला खूपच छान वाटत होते. पण एक विचित्र वाटत होते. ती फारच फॉर्मल होऊन बोलत होती. बोलण्यातून जास्त जवळीक होणार नाही याची काळजी घेत होती. मी थोडी थट्टामस्करी करायचा प्रयत्न केला पण तिने फार प्रतिसाद दिला नाही. मी थोडा हिरमुसलो. फार बोलण्यासारखे काही नाही केवळ मी फार आग्रह केला म्हणून तिने भेटायला बोलवले असे तिने अप्रत्यक्षपणे मला जाणवून दिले. मला वाईट वाटले. तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून म्हणालो दोघांसाठी थोडा-थोडा चहा करशील का आपण चहा घेता गप्पा मारू. नाईलाजाने ती तयार झाली आणि स्वयंपाकघरात गेली.

जाताना आपला मोबाईल तिथेच सोफ्यावर ठेवून गेली. माझी छाती धडधडू लागली. माझ्या काय मनात आले कुणास ठावूक. पटकन तो मोबाईल उचलला. सुदैवाने त्याला लॉक नव्हते. तिच्या व्हाट्सपवर गेलो. माझ्या हातात फार फार कमी वेळ होता. तेवढ्यात ती बाहेर आली असती तर माझे काही खरे नव्हते. त्या वेळेत झरझार स्क्रोल केले. आणि जे अपेक्षित होते तेच दिसले. त्या टोणग्याचे चाट होते. ते मी ओपन केले. आणि पुढल्या काही सेकंदात त्यांचे शेवटचे काही मेसेजेस मी भरभर नजरेखाली घातले. त्यात त्या टोणग्याने गाणी म्हणून पाठवलेली दिसत होती. त्यावर हिने पण त्याला गाणी गाऊन पाठवली होती. दोघांचे गुलुगुलू चाट होते. हार्टचे सिम्बॉल काय आणि नाचणारी बाहुली काय आणि रेनबो काय आणि काय काय. तेवढ्या काही सेकंदात माझे श्वासोच्छवास वाढले. एकमेकांच्या गाण्याचे कौतुक करायच्या नादात त्यांनी हद्द गाठली होती. "मैने प्यार तुम्ही को किया है, मैने दिल भी तुम्ही को दिया है" हे गाणे त्याने गाऊन पाठवले आणि हिने त्याला प्रतिसाद म्हणून "कसले मस्त गायलेस रे! मैने भी तुम्हे दिया है" असे म्हणून दात काढलेली स्मायली हिने पाठवली होती. त्यावर त्याने रिप्लाय पाठवला होता "ऐसे मेसेज मत कर. मेरी बिवी ने देखा तो मुझे बहुत मार पडेगी" असे काहीबाही. आणि एजून एक तिचा त्याला पाठवलेला मेसेज दिसला "यू आर माय एंजल" मी पटकन डोळे झाकले आणि मोबाईल बंद करून जागेवर आहे तसा ठेऊन दिला व डोळे मिटून बसलो. त्याशिवाय बरेच चाट होते पण ते वाचायची माझ्या हिम्मत नव्हती. हे सगळे मी केवळ काही सेकंदात उरकले. फार मोठी रिस्क मी घेतली होती. नशिबाने त्यानंतर सुद्धा एक दोन मिनिटांनी ती चहा घेऊन बाहेर आली. पण एव्हाना मला जे हवे होते ते मी काढले होते. इतक्या वर्षांचा संशय खरा ठरला होता. प्रमाणापेक्षा सुद्धा कितीतरी पटीने सिद्ध झाला होता. कॉलेजात असताना मावा गुटका सिगारेट तंबाकू ह्यात असणारा टोणगा आता काय करतोय आणि कसा सेटल झाला याच्याशी मला काही देणेघेणे नव्हते. पण माझ्यासाठी तो अजूनही फालतूच होता. ज्याच्यावर हि भाळली होती.

हे सगळे पाहिल्यावर मग मलाच तिथे जास्तवेळ थांबण्यात इंटरेस्ट उरला नाही. मला त्या दोघांचे संबंध असण्यात काही प्रॉब्लेम नव्हता. माझ्या मनात एकच राहून राहून एकच येत होते. माझ्यासाठीसुद्धा कौतुकाचे चार शब्द काढायला तिच्या जीवावर का येत असावे? माझ्या पोस्टवर नाही, किंवा माझ्या गाण्यावर नाही, मला रिप्लाय नाही. कुठेच तिच्या आयुष्यात मला फारसे स्थान नव्हते असे दिसले. मी मात्र माझी खूप छान मैत्रीण समजून चाललो होतो. माझी मनातल्या मनात प्रचंड चरफड सुरु झाली होती. चहा पिता पिता गप्पा मारताना मी विचारलेच "काय गं. माझे गाणे किंवा मेसेजेस आवडत नाहीत का तुला? कधी तू फार रिप्लाय देत नाहीस म्हणून विचारले. डिलीट करून टाक ते सगळे माझे मेसेजेस" मी हसत हसत मनातली जळजळ ओकली. तिला काय कळायचे ते कळले असावे. त्यावर तिने एकच उत्तर दिले. म्हणाली "जरा शहाणा हो ना आता तरी. अपेक्षा न ठेवता मैत्री करायला शिक. आयुष्यात आनंदी होशील". ते शब्द कान जाळत माझ्या मनात घुसले. ते शब्द आणि तो मेसेज नंतर कायम माझा पिच्छा पुरवत राहिले.

त्याला: "यू आर माय एंजल"
मला: "अपेक्षा न ठेवता मैत्री करायला शिक. आयुष्यात आनंदी होशील"

नंतर मला तिच्याशी ग्रुपवरसुद्धा बोलण्यात इंटरेस्ट उरला नाही. हे सगळे झाल्यावर तिचा विषय मनातून काढायला फार त्रास झाला. अजून होतोय. त्याचाच एक भाग म्हणून वरचा लेख.

माझी हि चित्तरकथा वाचल्याबद्दल धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

kiti immature personality aahe lekhaka chi...how can you expect a normal & sensible girl to like you even as a friend?poporn dhaga aahe ka ha?

परिचित भौ, तुमच्या सध्याच्या मन:स्थितीला ही गझल चपखल बसते आहे.
https://www.youtube.com/watch?v=9ksD-A5Nvqc
"नका दोष देऊ तिला यार कोणी
मला मीच प्रेमात बरबाद केले"

तुम्ही देखील आता त्या मैत्रीणीला दोष देत बसू नका Proud
आणि त्या मावा, गुटखा वाल्याला पण

धागाकर्ते गायब. नवीन मोहिमेवर गेले असावेत. >>>> काही काही उत्साही प्रतिसादकांना धागाकर्ते ओळखीचे वाटले हे आवर्जून सांगावंसं वाटतं. खरा खेळाडू हा ओळख दाखवत नाही. तुम्हाला माहीत जरी झालं तरी तसं न दाखवता लेखकाप्रमाणेच वेड पांघरून त्याचाच गेम खेळणं याची मजा औरच असते. हल्ली खेळातलं कौशल्य बैठ्या कामांमुळे कमी झाल्याची जी ओरड होतेय त्याची प्रचिती इथे येतेय,

रानभुलीच्या प्रतिसादावरून असं दिसतंय की एका शिझोफ्रेनिक धागाबहाद्दराचा हा डु आयडी असू शकतो.
Submitted by अजिंक्यराव पाटील on 6 April, 2021 - 18:59

>>>>>

हि पोस्ट आता वाचली.
माझ्यावर तर निशाणा नाही ना?
कारण धागाबहाद्दर हे विशेषण मोजक्याच आयडींबाबत वापरले जाते. त्यातही ते कटप्पा एक होते ते सुद्धा काही लोकांना माझाच आयडी वाटायचे. दरवेळी कोणी नवीन आयडी धागा काढू लागला की सगळ्यात पहिले मला टेंशन येते की आता हा काय लिहिणार त्याचे निम्मे बिल माझ्यावर फाटणार Happy

कुठल्या जगात वावरता तुम्ही !!!

बाई हि पॉवर आणि पैसा च बघते . आता तुम्ही ह्याला काहीपण नाव द्या जसे कि सामाजिक स्थान, उच्चं स्तरावर जाण्याची क्षमता इ.इ. आदिम काळात काय आणि आत्ताची लग्नव्यवस्था काय हेच अंतिम सत्य आहे. तुम्ही भले खट बेवडे असा, पण चांगला जॉब असला आणि आर्थिक स्थैर्य असले तर बायको कधी सोडणार नाही तुम्हाला. मग कितीपण नाद करा तुम्ही. पण हेच तुम्ही भले संत तुकाराम आहात पण कधी काळात धंद्या नुकसान झालं आणि घरात साधे पडदे बदलायला पैसे कमी पडले, तर बायको कडून कुत्र्याहून हीन वागणूक मिळाली तर आश्चर्य नको वाटायला. समजा अजूनच पैसे कमी पडला तर बायको जाईल माहेरी पोरांना घेऊन. भले म्हणेल कि बरेच महिने झाले आता माहेरी जाऊन येते. आणि ३-४ महिने तिकडेच थांबेल. तुम्ही कितीपण बोंबला मग काही नाही होत. मग तुम्ही इकडे जेवलाय का मेलाय काही देणे घेणे नाही.

पुरुष हा बाई चे रूप च बघतो. ह्याही गोष्टीला काहीपण नाव द्या तुम्ही पण हेच अंतिम सत्य आहे. जो पर्यंत बाई चांगली दिसते आणि सहकार्य करते (कुठे ते समजून घ्या) तो पर्यंत नाते चांगले टिकून असते. बाकी स्वयंपाक पाणी वगैरे कोण विचारतो मग. पण जर पुरुषाची इच्छा अपूर्ण राहत गेली तर तो जास्त दिवस कळ काढत नाही. मग चालू होतात बाहेरचे उद्योग.

(ह्या सगळ्यांमध्ये अपवाद आहेत. संस्कृती, शिक्षण, सवयी, व्यसने आणि बरेच फॅक्टर आहेत)

फार भोळे भाबडे बनू नका. फक्त पॉवर आणि पैसे ह्याच्यावर फोकस करा. यशस्वी झालात तर काहीपण मिळेल तुम्हाला. (पण जुन्या गोष्टी च्या मागे पळू नका. कसं आहे. तुमचा भूतकाळ नडेल तुम्हाला तिथे) नवीन काहीतरी बघा. लै मजा येईल. थ्रिल खतरनाक असतंय ते. सगळ्यात चांगली बाब म्हणजे पुरुषाला वय नसतंय. म्हातारे झालात तरी काही कमी नाही पडणार तुम्हाला. फक्त पॉवर आणि पैसा !!

जाऊ द्या मीच सांगतो सीक्रेट.
बाईला फक्त धनच पाहीजे वगैरे सगळे वेगळ्या नंदनवनात वावरतात. आर्थिक स्थैर्य हे सुरक्षिततेच्या भावनेतून येतं. सुखाला प्राधान्य देण्याची परंपरा तशीही देशात नाही. पण बाईला आपल्याला काय हवं याचा चॉईस मिळाला तर तिच्या मनासारखे ऐकणारा पुरूष तिला हवा असतो. तिला हवे ते करू देणारा. आमच्या इथे एका बनियाने मूल होत नाही म्हणून एक गरीब पण सुंदर बाई लग्न करून आणली. तिला वेगळा फ्लॅट घेऊन दिला. दागिने घेऊन दिले. पण तो पुरूषसुख देऊ शकत नाही हे समजल्यावर तिने त्या वैभवाला लाथ मारून एका साध्या रिक्षावाल्याबरोबर पळून जाऊन दुसरा संसार थाटला. पैशाने सगळं मिळत असतं तर काय. संसार अ‍ॅडजस्टमेण्टचं नाव आहे, पण त्यात मुख्य सुख नसेल तर वैभव काही कामाचं नाही. हे दोघांनाही लागू आहे. स्त्री आणि पुरूष काय दोन वेगवेगळे प्राणी नाहीत. पुस्तकं वाचून बाईचा स्वभाव ओळखण्याची कला येत नाही.

@परिचितभाऊ
वरचं पटलं कि नाही ?
पटलं असेल तर अजून ऐका. प्रत्येक बाईचा चॉईस सारखा नसतो. पुरूषाचाही नसतो. जसा पुरूषाचा स्वभाव तसाच बाईचा पण. तुम्ही ज्या पोरीवर मरत होता तिला तारूण्यपीटीका फोडायला आवडायचं. ढेरी असलेले, टक्कल असलेले, गुटखा खाणारे, गांजा ओढणारे यांना भरभरून तारूण्यपीटिका येतात. म्हणजे मुरूम हो. मला तर पाठीवर खूप येतात. ते फोडायला मिळावेत म्हणून ती माझ्याकडे आकर्षित झाली.

तुम्ही पण आता ढेरी वाढवून घ्या. टक्कल पडण्यासाठी प्रयत्न करा. गांजा ओढा, गुटखा खा. आणि मग उघड्या अंगाने फिरा आणि बगाच चमत्कार. तुमचे धागे काढायचं नाही बंद झालं तर पुढच्या वेळी नाव बदलून घेईन स्वतःचं. जोपर्यंत मी सांगितलेले उपाय अंमलात आणत नाही तोपर्यंत रडत कुढणारे धागे काढू नका. आधी उपाय करा.

@@रानभुली
स्वत:ची मुलगी, पत्नी, बहीण यांना सल्ले द्यायचे सोडून वेळात वेळ काढून मुलींना वाचवायची मोहीम हाती घेत आहात हे काय कमी आहे ? ( आयडी मागची व्यक्ती कोण हे आलंय लक्षात )

==> माझा प्रतिसाद उच्कावणारा आणि हे तुम्ही काय लिहिलंय? दुसऱ्या भाषेत 'आधी स्वत:च्या आई बहिणीला सल्ला द्या' असे तुम्ही मला सांगितले आहे. हे उचकावणारे नाही का? जाऊ दे. तुमच्याशी बोलण्यात मला इंटरेस्ट नाही. बाकी तुम्हाला आयडीच्या मागे कोण आहे ते मानायचे ते खुशाल माना आणि सुखी व्हा. मला काही फरक पडणार नाही.

@@च्रप्स
इंसान को तीन चीज के पीछे कभी भी नहीं भागना चाहिए बस ट्रेन और लडकी...

==> होय खरेच आहे. बस आणि ट्रेन थांबलेली असतानाच त्यात चढणे योग्य, नाहीतर धावत्या बसमागे पळून नुसतीच दमछाक काय कामाची.

@@विलभ
भविष्यात सामाजिक उतरंडीवर चढण्याची क्षमता आहे का नाही इतकंच महत्वाचं आहे

==> अहो विलभ सर तुम्ही चांगली माहिती दिली आहे त्यासाठी धन्यवाद. पण ती सिलेक्शन थेरी इथे ते लागू पडेल का? तिने नवरा म्हणून वेगळाच कोणी सिलेक्ट केलाय. आणि बॉयफ्रेंड म्हणून मावा खाणारा छपरी छपडा सिलेक्ट केलाय. का? तर तो केवळ गाणं चांगलं गातो म्हणे. कसा लावणार तुम्ही इथे लाखो वर्षांचा नियम? बर तो गाणं खरंच चांगलं गात असता तरी समजू शकलो असतो. पण ह्याचा आवाज टोयलेटवर बसून कुंथल्या सारखा. तरी हिला आवडतो. अक्कलशून्य पोरींना काय आवडेल ह्याचा नियम नाही. महम्मद रफी पासून अर्जित सिंग पर्यंत सगळ्या गायकांचे आवाज ह्यांना सुमार वाटणार. आणि रेकत रेकत गाणे म्हणणारा कोणतरी गन्जाड्या छपरी छपडा मात्र "ओसम" वगैरे वाटणार. काय बोलावे?

@@लेडीकिलर गुटखाब...
मी गुटखाबाज, आहे गांजेडा, ढेरपोट्या पण आहे. पण लेडीकिलर आहे

==> काका, तुम्हाला धाग्याचा विषय कळलेला नाही असे मला वाटत आहे. तुम्ही कसेही असा मला घेणेदेणे नाही. मुलीने तुमच्यावर फिदा व्हावे ह्यात सुद्धा मला प्रॉब्लेम नाही. तुमचा तसा गैरसमज झलेला दिसतोय. पण धागा नीट वाचा. मावा खाणाऱ्या छपरी छपड्याला भाव द्यायचा तर मला निदान साधा मित्र म्हणून किमान रिप्लाय तरी तिने द्यायला पाहिजे अशी अपेक्षा मी करणे चुकीचे आहे का? वाईट वाटणार नाही का मला मग? तिला भेटायला सुद्धा मला खूप मिनतवाऱ्या कराव्या लागल्या. तीन महिने घेतले तिने. दिवसेंदिवस साधा रिप्लाय सुद्धा देत नव्हती. त्याच्या मात्र एका मेसेजवर त्याला लगेच घरात घेत असेल. बर, घेऊ दे, तो विषय नाही. पण आम्ही इतके वाईट आहे का? कि आमच्या मेसेजला साधा रिप्लाय सुद्धा नाही? खूप मानसिक त्रास होतो ओ ह्या सगळ्याचा.

@@रीया

तुम्ही कोणालाच आवडत नाही ओ!

==> न आवडायला काय चुकीचे आहे धाग्यात सांगाल का? दुसर्याचा मोबाईल चोरून वाचणे चुकीचे हे एकवेळ मान्य आहे. पण ती माझी त्यावेळची मानसिक गरज होती म्हणून मी ते केले. ह्यात तिचे कसलेही नुकसान मी केलेले नाही.

=====================

ज्यांना वाटते मी धागा टीपी साठी काढलाय त्यांना ते वाटो. बाकीच्या प्रतिसादांमुळे त्यांचा तसा गैरसमज झाला असेल. हे मायबोलीवर नेहमीचेच आहे. पण मी पुन्हा सांगतो मी धागा फक्त मन मोकळे करण्यासाठी काढलाय.

मावा खाणाऱ्या छपरी छपड्याला भाव द्यायचा तर मला निदान साधा मित्र म्हणून किमान रिप्लाय तरी तिने द्यायला पाहिजे अशी अपेक्षा मी करणे चुकीचे आहे का? >>> तिच्या दृष्टीने विचार केला तर तुम्ही मावा खाणा-या छपरी छपड्यापेक्षाही भिकारसोट, भंगार आणि टुकार असावेत. तिचे असे समजणे चुकीचे कसे ? तुमच्या अपेक्षांचा आदरच आहे तसाच तिच्या भावनांचाही आदर आहे.
मला धाग्याचा विषय कळाला नाही का >>> अच्छा. पुढे चालू ठेवायचाय धागा. मी त्यासाठीच आलो आहे बरं बाळा. जरी केस पिकले असतील आणि माझे काळे असतील तरीही आता तू बाळच. Proud

ज्यांना वाटते मी धागा टीपी साठी काढलाय त्यांना ते वाटो. बाकीच्या प्रतिसादांमुळे त्यांचा तसा गैरसमज झाला असेल. हे मायबोलीवर नेहमीचेच आहे. पण मी पुन्हा सांगतो मी धागा फक्त मन मोकळे करण्यासाठी काढलाय. >>>>>> तुम्ही धाग्याच्या खाली जी तळटीप दिलेली आहे ती बदलून अशी टाका.

माझ्या कोणत्याही धाग्यात व्यक्त केलेल्या मतांशी मी स्वतःच सहमत असेलच असे नाही. माझ्या मालकांनी सांगितले तर होईनही.

अहो काकासाहेब, मी कोणीतरी वेगळा आहे कि जो तुमच्या माहितीचा इथला दुसरा ड्यू-आयडी आहे असा तुमचा गैर-समज झालेला दिसतोय. परंतु
तुम्ही समजता तो मी नाही. मी इथे कोणालाच ओळखत नाही. हां, फक्त एकच व्यक्ती इथे मला ओळखत असण्याची शक्यता आहे. ती व्यक्ती हे सगळे धागे वाचत सुद्धा असेल कदाचित. पण तो विषय नाही. पण ती व्यक्ती तुम्ही नाही आहात हे नक्की.
बर आता तात्पुरती रजा घेतो व नंतर येईन एकदोन दिवसांत पुन्हा.

अहो काकासाहेब, मी कोणीतरी वेगळा आहे कि जो तुमच्या माहितीचा इथला दुसरा ड्यू-आयडी आहे असा तुमचा गैर-समज झालेला दिसतोय. परंतु
तुम्ही समजता तो मी नाही. मी इथे कोणालाच ओळखत नाही. हां, फक्त एकच व्यक्ती इथे मला ओळखत असण्याची शक्यता आहे. ती व्यक्ती हे सगळे धागे वाचत सुद्धा असेल कदाचित. पण तो विषय नाही. पण ती व्यक्ती तुम्ही नाही आहात हे नक्की. >>> यावरचं सोल्युशन मी मागच्याच धाग्यात दिलेलं आहे. तुमचे आयकार्ड, आधार कार्ड स्कॅन करून इथे टाका. कुणाचेच कसलेही गैरसमज राहणार नाहीत . खरे तर मी तुमचे फोटो टाकले होते त्या धाग्यावर. त्यानंतर तुम्ही पळच काढला.

कुठेतरी तुम्ही जाता त्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर उधारी थकवली म्हणून तुमचे फोटो लावलेले अशी एक पोस्ट व्हायरल झाली आहे. मला ती पोस्ट इथे देणे प्रशस्त वाटत नाही. तरी अजूनही एक कनवाळू मनुष्य म्हणून माझे इतकेच सांगणे असेल की ड्रायव्हिंग लायसेन्स, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अपलोड करावे.

ते तुम्ही कोण सांगणार मला. तुम्ही मायबोलीवर प्रशासक आहात का. असलात तर आधी तुमचे ड्रायव्हिंग लायसेन्स, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अपलोड करा की मग. मला कसे कळणार कि खरा पोलीस आहे का तोतया पोलिस? आपण कुणा वाटले त्याला आपली माहिती देत नसतो. आधी मायबोलीवर सगळ्यांनी आपापली ओळखपत्रे अपलोड करावीत मगच मी करेन. तेंव्हा काकासाहेब, तुमच्या लाडक्या बच्चन साहेबांच्या शब्दात सांगू का. जाओ जा के पहले उन सारे सभासद के आयडी कार्ड ले के आओ जीन्होने बिना ओळखपत्र दिखाये कोतबो में धागे निकाले है.

ते तुम्ही कोण सांगणार मला. तुम्ही मायबोलीवर प्रशासक आहात का. असलात तर आधी तुमचे ड्रायव्हिंग लायसेन्स, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अपलोड करा की मग. मला कसे कळणार कि खरा पोलीस आहे का तोतया पोलिस? >>> मी माझी समस्या मांडायला किंवा मन मोकळं करायला धागा काढलेलाच नाही. मागच्याही धाग्यावर तुम्ही असाच आगाऊपणा केला होता. पण मी माझ्या घराचा फोटो देऊनही तुम्ही पळवाट काढलीत.

आता तुम्हीच ओळखूनही म्हणताय की मी तो नाहीच म्हणून तुमच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने मी माणुसकीचे कर्तव्य म्हणून समस्येवरचा उतारा सांगितला की बाबा तू तुझे सरकारी ओळखपत्र अपलोड कर म्हणजे तो मी नव्हेच वाला एपिसोडच बंद होईल. पण त्याला तुम्ही कां कू करताय काकू. ऐसे कैसे चलेगा ?

तुम्ही धागा काढता. तुम्हाला उत्तरं आली की पिसाळता. चावत सुटता. भुंकता मग रेबीजचे इंजेक्शन घ्या म्हटले की म्हणता तुम्ही कोण सांगणार ? रेबीज झालेल्या माणसाला उपचार नाही मिळाले तर तो अधिक पिसाळतो म्हणून लोक सांगतात, ते काय पोलीस असतात का ?

मी तर तुम्हाला केव्हांच ओळखले आहे. कुठल्या तरी बदनाम वस्तीत उधारी वाढल्याने तुमचे पोस्टर्स लागलेत तिथे. याला येऊ देऊ नका म्हणून. तर तुम्ही ते नाहीत अशी तुमची बतावणी असेल तर (मुकाट्याने) ओळखपत्र अपलोड करा.

आणि तुमच्यासारखा तोंड लपवून धागा काढण्याची मला गरजच नाही. माझ्या प्रेरणादायी चारीत्र्यापासून तुम्हाला काही शिकता आलेच तर म्हणून माझा एकच नमुना फोटो अपलोड करत आहे. ( माझ्या मागच्या धाग्यावरचे फोटो आणि या धाग्यावरचे फोटो हे एकमेकांशी जुळतीलच असे नाही. मी फक्त व्यक्त व्हायला अपलोड करत असतो).
19vijay2.jpg

"पटलं असेल तर अजून ऐका. प्रत्येक बाईचा चॉईस सारखा नसतो. पुरूषाचाही नसतो. जसा पुरूषाचा स्वभाव तसाच बाईचा पण. तुम्ही ज्या पोरीवर मरत होता तिला तारूण्यपीटीका फोडायला आवडायचं. ढेरी असलेले, टक्कल असलेले, गुटखा खाणारे, गांजा ओढणारे यांना भरभरून तारूण्यपीटिका येतात. म्हणजे मुरूम हो. मला तर पाठीवर खूप येतात. ते फोडायला मिळावेत म्हणून ती माझ्याकडे आकर्षित झाली." ----> Ewwwwwwwww Ewwwwwwwww हे अगदीच गलिच्छ आणि
वाचताना किळस वाटेल असे लिहीलेले आहे. कृपया Admin / वेमा यांनी हा प्रतिसाद आणि माझा देखील प्रतिक्रियेचा हा प्रतिसाद उडवावा
मला खरच नाही माहिती की हे लेडी कीलर कोण आहेत... पण प्रतिसाद देताना भाषेवर नियंत्रण हे हवेच की नाई??? अपा किंवा ऋन्मी पैकीच कुणीतरी आहे या आयडी मागचा चेहरा असे राहून राहून वाटत आहे! Proud

मला आवडलं असतं लेडीकिलर व्हायला. तंबाखू मी सिगारेटच्या माध्यमातून सेवन केलाय बऱ्याचदा, पण अभिमानाने वर्षभरापासून ते व्यसन सुटलं. गांजा 2 वेळा ओढला, एकदा काहीच झालं नाही, दुसऱ्या वेळी मात्र हवेत!

बलात्कार आणि प्रेम ह्यात अंधुक रेषा आहे. ती ज्याला कळली त्याला स्त्री प्राप्त होते. जबरदस्ती करता येत नसेल तर स्त्रीचा नाद करू नये. योग्य तेंव्हा योग्य ती जबरदस्ती केल्यास स्त्रीला तो पुरुष आवडू लागतो. ह्यात थोडे सुद्धा अयोग्य काही झाले तर मात्र तो बळात्कारच ठरतो. हा फोर्म्युला आहे.
>>> Dude, wdf???
ह्याच्याबद्दल कोणी काही आक्षेप न घेता शंभरेक प्रतिसाद पाहून नवल वाटते आहे. उलट खालीतर एकाने अनुमोदन दिले आहे. त्या किचनच्या धाग्यावर चर्चा करणार्ऱ्या एखाद्याने इथे येऊन बौद्धिक घेतले असते तर बरे दिसले असते. प्रशासक सगळे धागे वाचत नाहीत बहुतेक.(वेमा यांना तसे कळवले आहे) मान्य आहे लेखक चांगले विनोदी लेखन करतात पण स्त्रियांबद्दल असे स्वगत असेल तर अवघड आहे. वासुगिरी करायचीच आहे तर त्याचे पण काही ग्राउंडरूल्स आणि एटीकेट्स असतात पण जाऊद्या त्यापेक्षा तुम्ही खालची सेक्शुअल ऑफेन्स संबंधी आयपीसीमध्ये काय तरतुदी आणि शिक्षा आहेत त्याची कलमे नीट वाचा. विशेषतः Section 354A IPC
आज स्वगत असेल पण उद्या भावनेच्या भरात काही उद्योग केल्यास थेट पॅरोलवर बाहेर आल्यावरच नवीन धागा मिळेल आम्हाला वाचायला.
https://vikaspedia.in/social-welfare/social-awareness/legal-awareness/le...
मजरुह सुल्तानपुरीची एक ओळ आठवली ,
बडे मिया दिवाने ऐसे ना बनो , हसीना क्या चाहे हमसे सुनो

Submitted by अजिंक्यराव पाटील on 5 April, 2021 - 07:09>> जिद्दू तुम्ही म्हणताय तो आक्षेप घेतला होता. इथं खरंतर अजून बरंच लिहिलं होतं, पण ठेवलं असतं तर आयडी उडाला असता.

परिचित यांच्या भयंकर लिखाणाकडे दुर्लक्ष करून प्रगल्भ यांनी माझ्या लिखाणावर आक्षेप नोंदवल्याबद्दल आभार. ते बीभत्स आहे हे खरे आहे. पण परिचित यांच्यासारख्या आयडीशी गुलूगुलू बोलायची अपेक्षा त्यांचा ओरिजिनलच ठेवू शकतो.

"परिचित यांच्या भयंकर लिखाणाकडे दुर्लक्ष करून प्रगल्भ यांनी माझ्या लिखाणावर आक्षेप नोंदवल्याबद्दल आभार. ते बीभत्स आहे हे खरे आहे. पण परिचित यांच्यासारख्या आयडीशी गुलूगुलू बोलायची अपेक्षा त्यांचा ओरिजिनलच ठेवू शकतो." ---> माझे पूर्णपणे परिचित या आयडी(ड्यू-ID) ला अनुमोदन नाहीच आहे!! फक्त एकच म्हणणे आहे की माणूस कितीही हिडीस असला तरी सगळ्यांनी मिळून त्याला हिडिसफिडिस करणे चांगले आहे का?? मायबोलीच्या ड्यू आयडिंची माणूसकीच राख झालीय बहुतेक... लचके तोडायला नुसते आसुसलेले आहेत. यातले काही लोक असे आहेत की मी जेव्हा नवीन होतो मायबोली वर तेव्हा ते मला आवडायला लागले... मी पण त्यांचा चाहता वगैरे झालो (फारसे काही मायबोली वर लेखकाला साजेसे लेखन केलेले नसतानाही) पण आता झक मारली असे वाटत आहे!!! @Admin/@वेबमास्तर फेबू किंवा तत्सम साइट्स वर जसे Follow/Unfollow , Friend/Unfriend options असतात तसेच माबो वर चाहत्या च्या बाबतीत देखील आणावे ही कळकळीची विनंती!!

राहीला प्रश्न गुलुगुलू बोलण्याचा.... ते काय मी कुणाशीही बोलू शकतो!! अगदी कितीही वाद होवोत!
अपा काय हो तुम्ही परिचीत यांची एवढी फिरकी घेताय, चिडवाताय मग तुमच्याच ड्यू आयडी "भैया पाटील"(आता हे नक्कीच जगजाहीर आहे की भैया पाटील हा तुमचाच ड्यू आयडी आहे Proud ) नी परिचीत यांचे 'चाहते' का आहात?? आणि आश्चर्य म्हणजे भैया पाटील यांचे लिखाण म्हणावेसे असे काही लिखाण नसून सुद्धा चाहत्यांच्या यादीत केवळ आणि केवळ 'परिचीत' च आहेत

आणि मुळात परिचीत हाच ड्यू अयडी आहे!! इथल्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वाईट्ट पद्धतीचे लेखन करून त्यांचे ८ चाहते झालेच कसे मग??
आता यात पण किशोर मुंढे (कारण यांच्या सोबत मी गणेशोत्सवात काम केलेले आहे. देवमाणूस आहे!!) आणि Srd (एका माहितीतल्या व्यक्तिने सांगितले होते की Srd is so old user of Maayboli.) हे दोघे सोडले तर बाकीचे ड्यू आयडीच आहेत हे माझे ठाम मत आहे!!! प्रणवंत is also one of the due ID नि:शंकपणे!!!!! जिददु you're also the fake ID!!

ज्या ज्या लोकांना परिचीत यांना त्यांच्या लिखाणावरुन मनसोक्त शिव्या घालायच्या असतील ते नक्कीच घालू शकतात!! पण अंगात जरा हिम्मत ठेवून स्वत:च्या मूळ आयडी ने घाला!!
आणि परिचीत तुम्ही देखील यापुढे जरा कमी शिव्या पडाव्यात आणि आपली शोभा होऊ नये असे वाटत असेल आणि थोडा जरी स्वाभिमान उरला असेल तर स्वत:च्या मूळ ID नेच लिहा!!
मी फक्त तुम्हाला सावरायला इकडे येत होतो ... पण हे ड्यू आयडी बहाद्दर मला पुन्हा लांबच्या सुट्टीला पाठवण्याच्या तयारीने आलेले आहेत!!
अगदी वेडयात निघाल्याचा Feel आलाय मला Happy
म्हणून,
- माझ्याकडून या विषयाला इथेच पूर्णविराम.

ज्या ज्या लोकांना परिचीत यांना त्यांच्या लिखाणावरुन मनसोक्त शिव्या घालायच्या असतील ते नक्कीच घालू शकतात!! पण अंगात जरा हिम्मत ठेवून स्वत:च्या मूळ आयडी ने घाला!!>>
असा काही नियम आहे का?
परिचित यांना त्यांच्यावर होणाऱ्या टीकेचे काही वाटत नाही, वाटले तर ते उत्तर देतील की, नाहीतर असे आचरट धागे काढणे बंद करतील. मग तुम्ही का त्रागा करुन घेता.

मी फक्त तुम्हाला सावरायला इकडे येत होतो ... >>> सावरायला ? त्यांनी मला उत्तरं देताना जी भाषा वापरलीय त्याचं समर्थन करताय का ?

जबरदस्ती करता येत नसेल तर स्त्रीचा नाद करू नये. योग्य तेंव्हा योग्य ती जबरदस्ती केल्यास स्त्रीला तो पुरुष आवडू लागतो - ह्यावर कोणी आक्षेप घेतला तर तुम्हाला ते आक्षेपार्ह्य का वाटतंय ? मी फेक आयडी असलो तरी अश्या गोष्टी पॉईंटआऊट करायला खऱ्या आयडीनेच यावे असा मायबोलीवर नियम आहे का ? जर चुकीचा आक्षेप असेल तर ज्यांच्यावर घेतलाय ते परिचित उत्तर देतील. तुम्ही का विनाकारण अकांतांडव करताय आणि खऱ्या/खोट्याचे ओळखपत्र वाटत सुरु केले ? अशीही प्रशासक आणि इतरांची स्म्शानशांतता पाहून बहुदा आमचेच चुकले असावे असे दिसतंय. परिचित सॉरी हं! छान आहे लेख, असेच लिहीत रहा.

Pages