रुपेरी चंद्र भाळावर हवासा वाटतो आहे

Submitted by सुप्रिया जाधव. on 2 April, 2021 - 16:11

मनामध्ये तुझा जागर हवासा वाटतो आहे
तुझा-माझ्यातला वावर हवासा वाटतो आहे

किती दिवसांत नव्हता ऐकला आवाज मी माझा
तुझ्या प्रेमात भिजला स्वर हवासा वाटतो आहे

अमावस संपता संपेचना तर पौर्णिमा कुठली ?
रुपेरी चंद्र भाळावर हवासा वाटतो आहे

तुझ्या नजरेतल्या प्रणयात माझी गंधते काया
फुले रोमांच अंगावर... हवासा वाटतो आहे

किती वर्षांत मी शृंगारताना लाजले नव्हते
हुकांचा मागच्या झंपर, हवासा वाटतो आहे

कधीची सोसते आहे नशीबाची दिरंगाई
सुखाचा फैसला तत्पर हवासा वाटतो आहे

सुप्रिया

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती दिवसांत नव्हता ऐकला आवाज मी माझा
तुझ्या प्रेमात भिजला स्वर हवासा वाटतो आहे

वाह ! हा शेर आवडला. लॉकडाऊन असल्यामुळे तर थेट भिडला.

-दिलीप बिरुटे