जंगलात प्रत्येक झाड हे प्रत्येक वेळा बघितले तर निराळेच दिसते. आतामात्र आमची हालत खराब झाली होती वीकेंड ची ही ट्रिप आता आम्हाला महागात पडत होती. आमच्या कडचे पाणी संपले होते जे काही थोडे खायला शिल्लक राहिले होते ते पण खायची इच्छा नव्हती. आणि रात्रीच्या थंडी नंतर जे ऊन आम्हाला आल्हाददायक वाटत होते तेच आता असह्य झाले होते. घामाच्या धारा लागल्या होत्या आणि त्या आमच्या शरीरातील पाणी आणखी कमी करत होत्या.
एव्हाना सकाळचे 11 वाजले होते एक दिवस आणि एक रात्र आणि एक रात्र अशी ट्रीप आता दुसरा पण दिवस खाते की काय असे वाटू लागले.....
क्रमशः
एव्हाना घामामुळे आमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले होते. घशाला कोरड पडली होती. कधी एकदा बाईक जवळ पोहोचून एक दोन बॉटल पाणी पितोय असे वाटत होते. पण जंगलात भरकटल्या मुळे आम्हाला कळतच नव्हते की आम्ही कुठे चाललोय. दुपारचे 2 वाजून गेले तरीही आम्ही आमच्या ठरलेल्या अपेक्षित ठिकाणी पोहोचलो नव्हतो आता मात्र माझ्या शरीरातील शक्ति संपली होती. आम्ही जवळ जवळ 14 तास न खाता पाण्याविना चालत होतो. मला चक्कर यायला चालू झाली तसे मी आकाशला हाक मारली. तो माझ्या पासून चार पाच पावले पुढे चालत होता. मी हाक मारली तसा तो वळला. आणि मला धक्काच बसला. त्याचा चेहरा विचित्र आणि बदललेला वाटत होता. म्हणजे त्याच्या चेहर्याचा अर्धा भाग paralysis झाल्यासारखा वाटत होता. त्याला नीट बोलता पण येत नव्हते म्हणुन तो इतकावेळ गप्प चालत होता. मला आत्ता लक्षात आले चालता चालता तो खूप पुढे निघून गेला होता आणि एका ठिकाणी तो बसला माझी वाट बघत तिथून तो गप्प गप्प आहे. मला कळलेले होते की याला काहीतरी चावले आहे. कदाचित विंचू असेल किवा कोणतातरी विषारी प्राणी.
आता मला खरच काळजी वाटू लागली. ही ट्रिप आता जीवघेणी बनत चालली होती. आम्ही दोघेही एका झाडाखाली बसलो मी त्याला चेक करु लागलो. विषाचा परिणाम हळुहळु वाढत चालला होता त्याच्याचेहर्याचाअर्धाभाग उतरला होता. त्याचे पाय चेक केल्यानंतर कळाले की त्याला एका सापाने चाललेले आहे. कारण साप चावल्यानंतर दोन सुई टोचल्या सारखे निशाण दिसतात. कदाचित त्याला कळाले पण नसेल आपल्याला साप चावलाय हे. कारण त्या जंगलात असंख्य गोष्टी टोचत ओरबाडत होत्या. आमच्या सर्वांगावर त्याचे व्रण दिसतही होते. पण आता एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता आकाशला ट्रीट करणे गरजेचे होते कारण विष जर पूर्ण शरीरात पसरले तर ते खूप वाईट ठरले असते. आमच्या कडे first aid kit होतेच. त्यातून एक bandage काढून मी त्या जखमेच्या वरच्या बाजूला बांधले. जखमेच्या आजूबाजूला काळे निळे झाले होते. ती जखम मी disinfectant ने धुऊन काढली. आणि syringe वापरून ब्लड ड्रेन करू लागलो. जास्त ब्लड लॉस होऊन पण चालणार नव्हते. आणि याचा काही परिणाम होईल असेही मला वाटत नव्हते कारण विष आत्तापर्यंत त्याच्या शरीरात पसरले होते. तो तसा शांतच होता ही कला त्याला आधीपासून अवगत होती कितीही stressful परिस्थिती असली तरी हा पट्टया शांतच.
आम्ही थोडा वेळ बसलो पण मला आता भिती वाटत होती की आता आता जर आकाशला चालता नाही आले किंवा तो हळूहळू चालू लागला तर आपल्याला हॉस्पिटल ला जायला आणखी वेळ लागणार. आणि आम्ही होतो त्या जागे जागे पासून जवळचे हॉस्पिटल 50 ते 60 किमी अंतरावर असेल. तिथे या सापाचा antidote उपलब्ध असेल की नाही याचीही शाश्वती नव्हती.
आता मात्र मी खूपच घाबरलो हात पाय कापू लागले. घामाच्या धारांनी आधीच शरीरातील होते नव्हते तेव्हढे पाणी संपले होते. मी खचलेला बघून आकाश मला धीर देऊ लागला. अरे किडका साप असेल विषारी असता तर आत्ता पर्यंत रामनाम सत्य हे असे झाले असते माझे. तो जोक वैगरे करून मूड लाईट करण्याचा प्रयत्न करत होता.
तेवढ्यात मला एक युक्ती सुचली एक मोठ झाड बघून त्याच्यावर चढून आजूबाजूचा परिसर किंवा एखादी ओळखीची जागा दिसते का बघून त्या दिशेने जाता येईल. मी आजूबाजूला कोणते असे झाड आहे का ते शोधू लागलो. शेवटी एक उंच झाड दिसले. मी झाडावर चढायचा प्रयत्न केला पण अंगात शक्ति नसल्याने जमत नव्हते. तरीपण खूप प्रयत्न केल्यानंतर मला शेवटी झाडावर जायला यश मिळाले. जेव्हा मी वर जाऊन नगर फिरवली तेव्हा मल फक्त आणि फक्त झाडे आणि छोटे छोटे डोंगर दिसत होते.
मी उतरणार तेवढ्यात मला एक paragliding करत असलेला tourist दिसला पण तो खुप लांब होता. पण आम्हाला आता बीच कुठे आहे याची दिशा तरी सापडली होती. आम्ही होतो तिथून उत्तरेकडे बीच होता म्हणजे आम्ही एवढा वेळ उलट्या दिशेने चालत होतो. आता तेवढेच अंतर पार करून आम्हाला परत जायचे होते. म्हणजे अजून अर्धा दिवस चालायला लागणार होते. आणि आकाश साठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचा होता.
माझ्या मानत विचार आला की मी एकटाच चालत जाऊन मदतीसाठी लोकांना घेऊन आलो तर? पण आकाशने तसे करायला नकार दिला कारण त्यामध्ये जास्त वेळ लागला असता आणि आकाशचे exact location मलाही सांगता आले नसते म्हणून तो विचार आम्ही मनातून काढून टाकला.
मी खाली आलो आकाशची condition हळूहळू खालावत चालली होती. मी वेळ न घालवता चालायला सुरुवात केली. आकाश माझा आधार घेऊन चालत होता. यावेळी आम्ही थोड्या अंतरावर झाडांवर खूण बनवून ठेवत होतो जेणेकरून आम्ही दिशा भटकणार नाही. 4 ते 5 तास चालल्यानंतर लाटांचा आवाज ऐकू येऊ लागला. आमच्या अंगात काहीच शक्ति शिल्लक राहिली नव्हती. सूर्य अस्ताला गेला होता ते tourists बोट रेडी करून जायच्या तयारीत होते तोवर आम्ही तिथे पोहोचलो. रशियान कपल होते ते आम्ही होती न्हवती ती ताकद आणून ओरडू लागलो तसे ते थांबले. त्यांना आमची अवस्था बघुन कळलेच. त्यांनी आम्हाला पाणी दिले तशी ती बाटली मी अधाशासारखे तोंडाला लावली आणि एका दमात संपवली त्यांच्या सोबत एक लोकल guide होता त्याला सगळी हकिकत सांगितली. त्याने आम्हाला बोट मध्ये घेतले.
तेथून आम्ही palolem बीच वर गेलो तिथे sea gaurds ने आकाश साठी ambulance रेडी ठेवली होती. आम्ही लगेच हॉस्पिटल मध्ये गेलो. डॉक्टर म्हणाले की hypothermia आणि विषामुळे त्याच्या शरीरात रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. अजून 2-3 तास लेट झाला असता तर रिस्क वाढली असती. आकाश 4 दिवस अॅडमिट होता. मग आम्ही रूमवर परतलो. आकाशच्या घरचे सगळे आले होते.
पण या गोष्टीने आम्हाला लाइफ चि किम्मत दाखवून दिली. आमची मैत्री आणखी घट्ट झाली आम्ही आत्ता पण असेच निरनिराळ्या ठिकाणी फिरायला जातो एन्जॉय करतो पण calculated रिस्क घेऊन.
समाप्त.....
जबरदस्त!
जबरदस्त!
सुखरूप बाहेर पडलात हे वाचून फार बरे वाटले!
बा प रे... भयंकर अनुभव.
बा प रे... भयंकर अनुभव.
पण सहीसलामत सुटलात ते महत्वाचे. आकाशची आणि तुमची मैत्री आणखीन घट्ट झाली हे सगळ्यात छान.
धन्यवाद नानबा आणि मनीमाऊ
धन्यवाद नानबा आणि मनीमाऊ
जीवावर बेतलं होतं, आता काळजी
जीवावर बेतलं होतं, आता काळजी घ्या ट्रिप मध्ये पुलेशु
डेन्जर अनुभव आहे!
डेन्जर अनुभव आहे!
डेंजरच अनुभव!
डेंजरच अनुभव!
यावरून एक घटना आठवली. नवऱ्याच्या ओळखीच्या एका मुलाच्या बाबतीत घडलेली. तो मुलगा एका ग्रुपबरोबर ट्रेकसाठी राजगडावर गेला होता. ते कुणीही नवखे नव्हते. पण रात्री पाणी भरायला गेला असताना त्याला पायाला काही तरी टोचल्यासारखं झालं. परत सगळ्यांच्यात आल्यावर पायावर झालेली खूण ग्रुपमधल्या एका मुलीने पाहिली आणि तिने तत्काळ ओळखलं की ही फुरसं चावल्याची खूण आहे. ताबडतोब बाकी मुलांनी त्याला उचलून त्या रात्रीच्या वेळीच गडाखाली आणलं आणि पुण्याला नेलं. तो बेशुद्ध झाला होता पण बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये काढल्यावर तो पूर्णपणे बरा झाला. हे त्या मुलीच्या प्रसंगावधानामुळे घडलं. तिने जर ते फुरसं चावलंय हे वेळीच ओळखलं नसतं तर अवघड होतं.
बापरे!
बापरे!
बापरे अभिषेक, फार हिंमतीचे
बापरे अभिषेक, फार हिंमतीचे लोक आहात तुम्ही आणि मित्र.
तो वाचला उपचार मिळून हे भाग्य. तुमच्या अश्याच इतर ट्रिप्स ची पण कथा येऊदे.
(स्वगतः आणि इथे आम्ही मुंबई वोल्वो चे बुकिंग न करता ताथवडे फाट्याला बस पकडणे आणि जागा मिळवणे याला रिस्क ची परमावधी मानतो.)
डेन्जर अनुभव आहे तुमचा.
डेन्जर अनुभव आहे तुमचा.
दोघेही सुखरूप बाहेर पडलात वाचून बरे वाटले.
वावे ,किस्सा भयानक आहे हाही..फुरसं म्हणजे काय?
फुरसं म्हणजे व्हायपर.
फुरसं म्हणजे व्हायपर. भारतातल्या ४ विषारी जाती नाग मण्यार घोणस फुरसे.
घोणस व फुरसे हिमोटॉक्सिन्स सोडतात. म्हणजे रक्तस्त्राव आणि बीपी कमी होत जाऊन मृत्यू
नाग आणि मण्यार न्युरोटॉक्सिन्स सोडतात, श्वास जाउन मृत्यू.
ओह..फुरसं म्हणजे सापाचाच
ओह..फुरसं म्हणजे सापाचाच प्रकार असावा असं वाटलं होतं पण हि माहिती नव्हती. धन्यवाद अनु.
अरे हां आता आठवले
अरे हां आता आठवले
फुरसे म्हणजे सॉ स्केलड व्हायपर. त्याची जात आठवत नव्हती.
फुरसे हा कोकणातला खूप कॉमन साप आहे.
धन्यवाद dodo, maitryee आणि
धन्यवाद dodo, maitryee आणि वावे. फुरस म्हणजे मला पण माहिती नव्हते कदाचित प्रत्येक बोली भाषेत वेगळा शब्द असेल.
मला प्रवासवर्णन करण्याची जाम आवड पण आळस आणि कमी वेळ यामुळे मी जास्त लिहीत नाही. गोव्यात आल्यापासून खूप अश्या जागा पाहिल्या ज्या खूप स्पेशल आहेत.
बाकी माझी लेखनशैली कशी वाटली ते सांगा कुठे चुकत असेल तर ते पण..
धन्यवाद!!
जीवावर बेतलं होतं, आता काळजी
जीवावर बेतलं होतं, आता काळजी घ्या ट्रिप मध्ये ..
पुलेशु >>>> +9999
मस्त लिखाण, छान वर्णन केलंय
मस्त लिखाण, छान वर्णन केलंय तुम्ही. फुरसे हे कोकणातील एकदम उपद्रवी जनावर, इतर साप चाहूल लागताच पळ काढतात परंतु हे तसेच खोबणीत किंवा दगडाखाली बसून राहतात आणि मग डंख मारतात.
फुरसं माझ्या फेव्हरिट
फुरसं माझ्या फेव्हरिट सापांपैकी एक आहे.
मस्त लिखाण, छान वर्णन केलंय
मस्त लिखाण, छान वर्णन केलंय तुम्ही. फुरसे हे कोकणातील एकदम उपद्रवी जनावर, इतर साप चाहूल लागताच पळ काढतात परंतु हे तसेच खोबणीत किंवा दगडाखाली बसून राहतात आणि मग डंख मारतात>>>
धन्यवाद unnadtappu
मला नेहमीच सापांच्या बद्दल कुतूहल वाटते, मी Pharmacy केल्यामुळे Chemicals आणि त्याच्या शरीरावर होणारा परिणाम हे अगदी जवळून शिकायला मिळाले.
पण निसर्गाची किमया बघून आश्चर्य वाटतं जे Chemical substances आपल्याला बनवायला त्याच्या Mechanism of action शिकायला नाकी नऊ येतात ते या निसर्गाने सहज बहाल केलं. सापांच्या विषाच्या खूप चांगला उपयोग पण आहे
मला आठवते आम्ही anticoagulants शिकत होतो म्हणजे आपल्याला जखम झाली तर आपली body ते रक्त थांबविण्यासाठी coagulants secret करते जेणेकरून ब्लड clot होऊन ब्लडलॉसकमीहोतो . काही सापांचे विष हे coagulants ने भरलेले असते ते आपल्या शरीरात गेले की रक्ताचे छोटे छोटे लगदे बनवून टाकते आणि vital organs ना ब्लड सप्लाय न झाल्याने माणूस मरतो.
अश्या प्रकारचे तंतोतंत coagulants निसर्ग बनवतो हे खरोखरच विस्मयकारक आहे.
म्हणून मला chemistry खूप आवडते.