मने, उठ ! मार्च चा पहिला पंधरवडा उलटून गेला. नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे तुमच्याइथला जगप्रसिद्ध फ्लावर शो संपल्यालाही आठ दिवस झाले असते. यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यात फ्लावर शो नाही. आसपास सगळीकडे फेब्रुवारीच्या अखेरीस झालेल्या हिम वर्षावाचे ढीग दिवसेंदिवस तसेच पडून होते. पण म्हणून हेलेबोअर्स आणि क्रोकसेस फुलायचे थांबले नाहीत. बर्फ वितळला तसे या फुलांच्या बरोबरीने अर्ली स्प्रिंग वीड्स जोमाने हजेरी लावू लागलेत. डॅफोडिलचे कंद माना वर काढतायत. ब्लू बर्ड्स आणि रॉबिन्स दिसायला लागलेत.
सेंट पॅट्रिक डे च्या मुहुर्तावर वाटाणे, बटाटे, कॉलिफ्लॉवर , स्प्रिंग सॅलडस लावायचे असतात. भाज्यांचे वाफे साफसूफ करणे , कुंपणाची डागडूजी करणे अशी कामे लवकर हातावेगळी करायची आहेत. बी- बियाणांचा पेटारा उघडून इन्डोअर सीड स्टार्टिंग ची तयारी करायला हवी.
तुमचे काय यंदाचे काय प्लान्स? नवीन काय ट्राय करणार ? बागकामाशी संबंधित कुठले इंस्टाग्राम अकाउंट / पॉडकास्ट आवडते आहेत ?
लिहा पटापट
मला भरभर वाढणारी व कमाणीवर
मला भरभर वाढणारी व कमाणीवर सुंदर दिसणारी , टेक्समध्ये टिकणारी, आळशीपणा केला तर पाणी घालण्याच्या आधी न मरणारी फुलांची वेल सुचवा. पेरिनियल व सुगंधी असेल अजून मस्त !
बहुदूधी आखूडशिंगी झालयं माहितीये Happy
उपयुक्त धागा.
हनीसकल - भरभर वाढणारी व
हनीसकल - भरभर वाढणारी व कमाणीवर सुंदर दिसणारी , टेक्समध्ये टिकणारी, आळशीपणा केला तर पाणी घालण्याच्या आधी न मरणारी फुलांची वेल, पेरिनियल , सुगंधी ( काही व्हरायटी)
क्लिमॅटिस - भरभर वाढणारी व कमाणीवर सुंदर दिसणारी , टेक्समध्ये टिकणारी ( फूल सन व्हरायटी), आळशीपणा केला तर पाणी घालण्याच्या आधी न मरणारी फुलांची वेल, पेरिनियल , सुगंधी ( काही व्हरायटी)
बोगनव्हिले, मांडेव्हिया - भरभर वाढणारी व कमाणीवर सुंदर दिसणारी , टेक्समध्ये टिकणारी, आळशीपणा केला तर पाणी घालण्याच्या आधी न मरणारी फुलांची वेल,
अस्मिता, मधुमालती लावा.
अस्मिता, मधुमालती लावा.
हनीसकल लावणार असाल तर तुमच्या
हनीसकल लावणार असाल तर तुमच्या भागात नेटिव्ह असेल अशीच शोधून लावा. जपानी हनीसकल भयंकर इन्व्हेसिव्ह असतात
जपानी हनीसकल भयंकर
जपानी हनीसकल भयंकर इन्व्हेसिव्ह असतात >> इथे खुप प्रॉब्लेम झाले आहेत म्हणे. मागच्या वर्षी पेपर मध्ये पण वाचले होते.
जपानी हनीसकल भयंकर
जपानी हनीसकल भयंकर इन्व्हेसिव्ह असतात >> हो हे लिहायला हवे होते. मास्टर गारडनर क्लब ने ती विकली जाऊ नये इथे अशा प्रकारची प्रोपोसल काऊंटी कडे दिले होते. कोराल किंवा व्हाईट हनिसकल बघा.
धन्यवाद असामी , सविस्तर
धन्यवाद असामी , सविस्तर प्रतिसादासाठी. बोगनव्हिले माझ्या मनातही होती.
धन्यवाद सिंडरेला व मेधा.
मधुमालतीला होम डिपोच्या भाषेत काय म्हणतात ??
यंदा किंवा खरं मागच्या वर्षी
यंदा किंवा खरं मागच्या वर्षी वेळ मिळाला म्हणून ट्युलिप्स लावले. हरणांच्या जाचातून वाचलेल्या रांगा पाहून समाधान वाटतंय. बाकी नेहमीप्रमाणे वाफा बूक केला आहे. पुन्हा इथे फेरी मारेनच
अॅडमईव्ह किंवा मेगनहॅरी...
अॅडमईव्ह किंवा मेगनहॅरी... रंगून क्रिपर
कमानीवर हे लावून , त्याच्या
कमानीवर हे लावून , त्याच्या खाली...' मेरे पिया गये रंगून , दिलं हे फर्टिलायझर पण टाकून' खेळता येईल..
थँक्स अमित.
मेरे पिया गये रंगून , दिलं हे
मेरे पिया गये रंगून , दिलं हे फर्टिलायझर पण टाकून >>>
>>मेरे पिया गये रंगून , दिलं
>>मेरे पिया गये रंगून , दिलं हे फर्टिलायझर पण टाकून >>>
स्प्रिंग ब्रेकच्या निमित्ताने
स्प्रिंग ब्रेकच्या निमित्ताने सुट्टी घेतली होती आठवडाभर. तेंव्हा भाज्यांच्या वाफा साफसूफ करणे. वीडस उपटणे करुन वाटाणे, अरुगुला, केल आणि लेट्यूसच्या बिया लावल्यात. घरापुढे दोन प्रकारचे मॅग्नोलिया आणि वीपिंग चेरी लावलेत.१४-१५ वर्षांपूर्वी तेंव्हाच्या घरात एक वीपिंग चेरी लावलं होतं - जेमतेम दीड दोन इंच जाडीचा बुंधा होता. मागच्या आठवड्यात त्या भागात जाणं झालं तर त्याचा बुंधा मस्त गरगरीत १०-१२ इंच झालाय. फार मस्त वाटलं ते पाहून.
अंबाडी, मायाळूच्या बिया घरातच रुजवल्यात सध्या. महिन्याभरात मग अंगणात लावता येतील.
वाटाणे बाहेरच लावलेस का?
वाटाणे बाहेरच लावलेस का? बाहेर लावलेल्या वाटाण्यासारख्या बियांवर चिपमक्स फार ताव मारतात त्यामुळे मी घरातच लावलेत थोडे.
- मी पण यंदा प्रथमच वाटाणे
- मी पण यंदा प्रथमच वाटाणे लावलेत. अक्षरशः महिन्याभरात फुलं यायला लागली. आता शेंगाही धरल्या आहेत.
पहिल्यांदाच लावल्यामुळे या रोपाचं एक विशेष समजलं. हे सरळसोट वाढतं. फांदी वगैरे धरत नाही.
- मार्च्मधे नारसिसस् आणि डॅफोडिल्सला फुलं येऊन गेली.
- मागच्या वर्षी बी पासून वाढवलेल्या वांग्यांची झाडं थंडीत कशीबशी तग धरुन होती. ती आता छान वाढू लागलीयत. मागच्या सीजनला उशीरा लावल्यामुळे १०-१२ च वांगी आली.
- शेवग्याला आता शेंगा येऊ लागल्या आहेत.
वीकेन्ड ला नर्सरी ची ट्रिप
वीकेन्ड ला नर्सरी ची ट्रिप झाली. काही ठिकाणी बुशेस रीप्लेस करायची होती तिथे लावायला हाय्ड्रन्जिआ आणि रोडेडेन्ड्रॉन आणले.
लोकल हनीसकल मिळाली तीही एका कोपर्यात कुंपणावर चढवण्यासाठी लावायचा प्लान आहे. ती वेल लहान आहे अत्त्ता. एका कुंडीत छोट्या पिंजर्याच्या आधाराने लावलेली आहे. तर ती जमिनीत कशी लावायची? त्या पिंजर्यासकट ? आणि खारी/ सशांपासून वाचवावी लागेल का?
फरसबी, काकडी, वाटाणे, हरभरे
फरसबी, काकडी, वाटाणे, हरभरे आणि अॅन्युअल फुलझाडांच्या बिया घरात लावल्या आहेत. रात्री अजुनही शून्याच्या खाली तापमान जातंच आहे त्यामुळे बाहेर जमिनीत लावायला शेवटच्या फ्रॉस्टची वाट बघतोय.
स्क्वॉश, चेरी टमेटो आणि सिमला मिरचीच्या बिया पण लावेन.
तुम्ही बिया रुजल्या की
तुम्ही बिया रुजल्या की सिलेक्टीव्हली त्यातल्या चांगल्या वाटणार्याच लावता की सगळ्या लावता ? मला त्या अजिबात टाकवत नाही नि बर्यापैकी सगळ्या लावल्या नुसताच कचरा होत जातो
पहिल्यांदाच लावल्यामुळे या रोपाचं एक विशेष समजलं. हे सरळसोट वाढतं. फांदी वगैरे धरत नाही. >> ही वेल नसते का ? कधी लावलेली नाहिये किंवा बघितलेलेही नाही चक्क .
भाकरी आलीच पाहिजे आणि थिनिंग
भाकरी आलीच पाहिजे आणि थिनिंग केलंच पाहिजे
मटाराचा वेल फार पसरत नाही,
मटार वेल किंवा बुश फार पसरत नाही, आधाराने सरळसोट वाढतो. मटार खूप सहज रुजतो पण आमच्याकडे पक्षी, खारी मटाराची लहान रोपं आली नासधूस करतात फार, त्यामुळे जास्तीची लावायची.
ही वेल नसते का ? कधी लावलेली
ही वेल नसते का ? कधी लावलेली नाहिये किंवा बघितलेलेही नाही चक्क .>> असामी, ही वेलच आहे. sprout झाल्यावर जे एक स्टेम येतं , त्यालाच पानं, फुलं, शेंग येतेय. No branches.
असामी, वरच्या फोटोवरुन कल्पना
असामी, वरच्या फोटोवरुन कल्पना येईल बघ. जे तुरे दिसताहेत ते tendrils आहेत. ते नुसताच आधार पकडतात.
मी पुणेकर, छान आलेत मटार. ते
मी पुणेकर, छान आलेत मटार. ते cluster मधे लावायचे हे माहित नव्हतं मला.
पुढच्या वेळेला चुका सुधारुन लावीन. आमच्याकडे आता गरम व्हायला सुर्वात झालीय.
मी पुणेकर, छान आलेत मटार. ते
डबल पोस्ट
@ शुगोल, हो म्हणजे सपोर्ट
@ शुगोल, हो म्हणजे त्यांना सपोर्ट मिळतो.
तुमची पण मटाराची छोटी रोपं छान आली आहेत.
हिवाळी/ अर्ली स्प्रिंग
हिवाळी/ अर्ली स्प्रिंग हॅलिबोरस
मला एकदा अबोली लावून पहायची
मला एकदा अबोली लावून पहायची आहे. मी मागे एका बॉटनिकल गार्डन मध्ये पाहिली होती, पण मला रोपं कुठेच नाही मिळालीत. कोणाला काही माहिती आहे का कुठे मिळू शकेल अबोलीचं बी किंवा रोप?
crossandra seeds गूगल केलंत
crossandra seeds गूगल केलंत तर बरेच पर्याय आहेत. होम डिपोमध्ये अबोली मिळते अशी एक थेअरी आहे. त्या न्यायानं लोजमध्ये पण मिळू शकेल.
आमच्या इथे लोजमधे मागच्या
आमच्या इथे लोजमधे मागच्या वर्षी अबोली मिळाली होती. यावर्षी परवापर्यंत तरी आली नव्हती. माझं मागच्या वेळचं झाड अजून आहे, पण या सिझनला अजून फुलं धरली नाहीत.
अटलांटाला होमडिपोत अबोली
अटलांटाला होमडिपोत अबोली मिळायची. आम्ही दोन वेळा आणली होती.
Pages