Submitted by केअशु on 7 March, 2021 - 07:44
प्रतिभा म्हणजे मराठीत ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात त्याला भारतात सध्या किती महत्व आहे? पुढे किती असेल?
प्रतिभा नक्की कशाला म्हणावं? मीम्स बनवणं,व्हिडिओ एक नि त्यावर गाणे भलतेच चढवून खसखस पिकवणे यांना प्रतिभा म्हणता येईल का?
क्रिएटिव्हिटी आणि फालतूपणा यांना अोळखण्याच्या खूणा कोणत्या? त्या कालपरत्वे,वयोपरत्वे बदलतात का?
अॅनिमेशन बनवणे किंवा फोटोग्राफी ही प्रतिभा आहे का? की ते तंत्र आहे?
प्रतिभा या क्षेत्रात केवळ भारतात करिअरच्या दृष्टीने किती स्कोप आहे? क्रिएटिव्हिटी या अंतर्गत करिअरचे पर्याय कोणते सुचवाल? प्रतिभा हा प्रकार उपजत असेल तर कोर्सेसची जोडणी हवीच का? एखाद्याने कोर्स पास केला पण प्रतिभा कमी असेल तर चालेल का?
सध्या केवळ प्रश्नच आहेत.त्यामुळेच निवेदन छोटे आहे.क्रिएटिव्हिटी या विषयावर चर्चा व्हावी. _/\_
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भरपूर आणि मजबूत स्कोप आहे पण
भरपूर आणि मजबूत स्कोप आहे पण एस्टाब्लिश होई परेन्त फार मेहनत पण आहे. कारण आपली प्रतिभा सही लोकांपरेन्त पोहोचली पाहिजे वरना बहुत पापड बेलने पडते है.
प्रामुख्याने क्रिएटिव्ह राइ टिंग ह्यात लेख, डिजिटल मार्के टिं ग, चित्रपटांचे सीरीअल चे वेब सीरीज चे लेखन. कविता गाणी लिहिणे हे आले.
चित्रकला अक्षर लेखन. ह्याला ग्राफिक डिझाइनिन्ग. डिजिटल मार्केटिंग मध्ये स्कोप आहे. जाहिरात क्षेत्रातही आहे. पण उमेदवारी सगळी कडे करावी लागते.
वाद्यवादन. संगीत गायन. म्युझिक अॅरेंज्जिन्ग.
अॅक्टिंग
चांगला स्वयंपाक करणे
हजर जबाबी पणा - स्टँड अप कॉमेडी.
ब्रीफ अनुसार लिहिणे, रिसर्च करणे व नंतर लेख लिहिणे पॉड्कास्ट बनवणे, ही ही एक प्रकार ची क्राफ्ट आहे.
जाहिरात कॉपी रायटिं ग
संवाद फेक. जितके व्हि डिओ, वगैरे आहेत त्याला संवादकाची गरज आहेच.
व्हॉइस आर्टिस्ट. हर पकारचे आवाज काढणे,
एक किंवा दोन ती न भाषांमध्ये उत्तम वाच नअ/ अभिवाचन करणे. ह्याचे ही ट्रेनिन्ग मिळते. पूर्वी प्रताप शर्मा घेत असत.
उलट आता प्रतिभेच्या जोरावरच पुढे जाणॅ जास्त सोपे आहे. कारण आयटी, संलन्ग क्षेत्रात बर्याच जॉब प्रोफाइल ह्या आटोमेशन कडे झुकत आहेत. व झपाट्याने माणसांची गरज कमी कमी होत आहे. मी सुद्धा रिटायर होण्या आधी प्रत्येक फंक्षनालिटी आटोमेट होण्या च्या कामात व्यग्र आहे सध्या. म्हण जे माझ्यानंतर हे काम मशीनच करणार. नाहीतर आठ दहा माणसे घ्यावी लागतील. किंवा असलेल्यांना पगार वाढवून द्यावे लागतील.
चित्रप टांचे कलर करेक्षन
चित्रप टांचे कलर करेक्षन करणे. ह्यासाठी रंग व तंत्रज्ञान दोन्हीची उत्तम जाण हवी.
सिनेमाचे ट्रेलर व फक्त त्याचेच संगीत बनवणे हे चित्रपटा पेक्षा वेग ळे काम आहे.
मॅरेज व इवेंट प्लानिन्ग हे प्रत्येकाला युनिक हवे असल्याने डोक्यात कल्पना व भरपूर ज्ञा न असलेली व्यक्ती इथे यशस्वी होईल. जसे मला जर डॉ. हू किंवा लॉर्ड ऑफ द रिंग थीमची पार्टी हवी असेल तर ते नक्की काय आहे ते माहीत असणे त्यावर रिसर्च करून कल्पना क्लाइंट ला प्रेझेंट करणे व ते सर्व प्रॉप्स च्या साह्याने एक्सिक्युट पण करणे.
सुतार काम, रंगकाम, प्लंबर इलेक्ट्रिशिअन इंट्रिरीअर डिझाइन हे देखील फार क्रिएटिव्ह काम वाले आहेत व आजकाल प्रत्येक प्रतिभेवर आधा रित कामाला तांत्रिक माहिती पण हवी.
जुन्या कलांचे पुनरुज्जीवन जसे
जुन्या कलांचे पुनरुज्जीवन जसे उदा . मला लिप्पण आर्ट खूप आव्डते तर घराची एक भिंत तशी बनवून देणे, काही तरूण मराठी मुले वारली आर्ट जुन्या पद्धतीने बनवतात त्यांच्यावर लेख आला होता. ते माध्यम म्हणून कॅनव्हास वर गाईच्या शेणात पाणी मिसळून लेप देतात. तर प्र त्येक सीझन मध्ये गाय काय चारा खाईल त्यावर शेणाचा रंग अवलंबू न आहे. ही मुले आजी कडे सर्व शिकलेली आहेत. व हातात उपजत कला पाहिजेच.
मिड डे मध्ये त्यांच्यावर लेख आला होता.
सध्या डिझयनर गार्डन प्लॅनिंग
सध्या डिझयनर गार्डन प्लॅनिंग पण जोरात चालू असलेला बिझनेस आहे. बिल्डिंग बांधायला भरपूर हिरवाई मारल्यावर जेव्हा रहायची वेळ येते तेव्हा लोकांना नजरेला हिरवाई ची गरज भासते. हायड्रोपोनिक पाईप गार्डन्स, पूर्ण बाल्कनी डिझाईन करुन तिथे छान दिसतील आणि टिकायला सोपी पडतील अशी झाडं लावून देणे.
सोशल मिडीया पार्टनर आणि कॉपीरायटर, युट्यूब किंवाव्ही लॉग मधून मॉनिटायझेशन चा अभ्यास करुन शिक्षण देणे असेही काही व्यवसाय सुचतात.
अमांच्या सूचना खूप चांगल्या आहेत.
मला क्रिअॅटिव्ह नाही पण महत्वाचा एक उद्योग सुचतो म्हणजे आर ओ प्युरिफायर वापरणारे किंवा किचन वॉटर चा पी एच बॅलन्स करुन हे पाणी योग्य मार्गाने बाल्कनी गार्डन ला पुरवणारी गॅजेटस तयर करुन देणे. आपल्याला या रिसायकलिंग ची खूप गरज आहे. घरात मेडस असताना त्यांना कमी पाणी वापरा असं प्रत्येक वेळी ट्रेन करता येत नाही. त्यांना २० मिनीटात काम उरकून दुसर्या घरी जायचं असतं.
व्हर्लपूल चं एक किचन वेस्ट श्रेड करुन त्यात उच्च प्रतीचं कल्चर आणि तापमान वापरुन अगदी कमी दिवसात रोजच्या कचर्याचं कंपोस्ट करुन देणारं यंत्र आहे. )पण सध्या फक्त परदेशात, आणि किंमत ५०० डॉलर्स च्या आसपास आहे.) मॅन्युअल कंपोस्टिंग ला लागणारा वेळ व उत्साह फार जणांकडे नाही. (बरेच लोक त्यापेक्षा आम्ही सगळं एकत्र टाकतो आणि सॉर्ट सोसायटी च्या खर्चातून करा म्हणतात. हा रेझिस्टन्स कमी करायला प्रक्रिया सोपी करणं गरजेचं आहे.)
सोलर कुकर्स च्या मॉडेल मध्ये गेली अनेक वर्षं काहीही बदल झालेले नाहीत. यात बदल करुन वजन कमी करणे, कुकर कोणत्यातरी लाईट सेन्सर ने कोन आपोआप बदलेल असे बनवून स्वस्तात विकणे )रोजचा वरण भात कुकर लावण्या इतका गॅस चा खर्च वाचला तरी पुरे) अश्या सस्टेनेबल क्षेत्रात शोध आणि व्यवसायाला खूप वाव आहे. )अर्थात तुमचा फोकस कला क्षेत्राकडे आहे हे मला कळतंय.)
खरंतर हा प्रतिसाद बराच अवांतर झाला आहे. पण शिंकेसारखे विचार येत गेले म्हणून मांडून टाकले
क्रिएटिव्हिटीची गरज सर्वच
क्रिएटिव्हिटीची गरज सर्वच क्षेत्रात असते. त्या जोडीला त्या त्या क्षेत्रातले मुलभूत शिक्षण, स्वयंशिस्त, कष्टाची तयारी आणि व्यवहारज्ञान हवे. जोडीला इतर पूरक क्षेत्रांतले उपयोगी असे टिपायची नजर हवी. नवे तंत्र शिकायची तयारी हवी. स्कोप बाबत म्हणाल तर क्रिएटिव असाल तर आजूबाजूची परीस्थिती बघून त्यातच नविन संधी शोधणे होते.
वेबसाईट डिझाइन करणे - हे
वेबसाईट डिझाइन करणे - हे क्रिएटिव्ह फिल्ड आहे.
Creative perfumery another
Creative perfumery another very good field.
व्हर्लपूल चं एक किचन वेस्ट
व्हर्लपूल चं एक किचन वेस्ट श्रेड करुन त्यात उच्च प्रतीचं कल्चर आणि तापमान वापरुन अगदी कमी दिवसात रोजच्या कचर्याचं कंपोस्ट करुन देणारं यंत्र आहे. )पण सध्या फक्त परदेशात, आणि किंमत ५०० डॉलर्स च्या आसपास आहे.) >>>
हल्लीच म्हणजे कोविड ने सगळे बंद पाडण्यापूर्वी एका एक्सहिबिशनमध्ये असले मशीन भारतीय बनावटीचे बघितले होते. किंमत त्यांनी सांगितली नाही पण त्यांचा ग्राहकवर्ग सोसायट्या, ऑफिसेस वगैरे होते जिथे मोठ्या प्रमाणात हिरवा कचरा तयार होतो.
साधना, जमल्यास डिटेल्स आठवत
साधना, जमल्यास डिटेल्स आठवत असतील तर पाठवा
इथे फेसबुकवर 'कंपोस्ट मेकर मशीन' म्हणून जाहिरात करतात आणि नंबरवर इन्कवायरी केली की 'कंपोस्ट बिन' विकतो सांगतात
बिन किंवा नुसते हाताने फिरवायचे गोल ड्रम रोटेटर टंबलर हे 'कंपोस्ट मशीन'नव्हेत.
@अमा फार छान माहिती दिलीत.खूप
@अमा फार छान माहिती दिलीत.खूप आभार.
चित्रपटांचे कलर करेक्षन करणे. ह्यासाठी रंग व तंत्रज्ञान दोन्हीची उत्तम जाण हवी. हे नवीन समजले. याबद्दल अजून कुठे वाचायला मिळेल?
mi_anu आणि इतरांचेही आभार.
मी एक छान उदाहरण देतो. आमच्या
मी एक छान उदाहरण देतो. आमच्या पूर्वजांनी बरीच रामोशी मंडळी गावात आणली होती कामासाठी. ही मंडळी इमानाला एवढी पक्की होती की नातेवाईकांपेक्षा यांच्यावर जास्त विश्वास होता अटीतटीच्या वेळी. तर नंतर काळ बदलला आणि बहुतेक मंडळी इतरत्र पसरली. ज्यांना जमिनी मिळाल्या ती दोन चार घरे आहेत अजून. त्यातल्या काहींना मिळेल तिथे चिकटवून दिले घरच्यांनी नोकरीसाठी आणि शेतीमध्ये पण मदत होतच असते त्यांची. त्यांच्यातलाच एक तरुण पोऱ्या आहे. त्याच्या वडलांचा अपघात झाला होता त्यात एक पाय गेल्याने घरीच असतात आणि सगळी जबाबदारी आईवरच येऊन पडली. हा थोडा चुणचुणीत होता त्यामुळे बीकॉम झाल्यावर त्याला स्पर्धापरीक्षांचा अभ्यास कर म्हटलं. त्यासाठी पुण्यात घेऊन आलो आणि एका विभागाच्या गेस्टहाऊसला वर्कर म्हणून लावून दिला. तिथे असाही काही कामाचा फार लोड नसतो आणि सुपरवायझरलाबी याला जादा पिळु नका ही सुचना करून ठेवली होती. दहा हजार पगार मिळायचा आणि राहायची-खायची सोयपण झाली तिथे. होईल तसा अभ्यास कर म्हटलं होशील कधीतरी पास एखाद्या परीक्षेत. ह्या भाऊने वर्षभर दिवस काढले कसेतरी आणि एकदिवस येऊन म्हणाला मला नाही झेपत हे सर्व, मी जातो गावाला. हे ऐकून माझी थोडी सटकली पण तो म्हणाला मी आमच्या एका पाव्हण्याकडे जायचो इथे त्यांचा ऑर्केस्ट्रा आहे. तिथे मी गाणे म्हणायला आणि ते काय असते पुढे ते वाजवायला शिकलो आहे. मला हे व्यवस्थित जमते आहे आणि पारनेरात एकाकडे बोलणी झाली आहे कामाची. मला तर त्याच्यावर विश्वासच नव्हता त्यामुळे नाही जमले ते काम तर परत माझ्याकडे येऊ नको म्हटलं आणि दोन शिव्या घालून दिला पाठवून. पण या भाऊने चांगलाच जम बसवला आहे त्या कामात आणि त्याला आता पारनेर बरोबरच आजूबाजूच्या तालुक्यांतबी सुपाऱ्या मिळत असतात लग्नाच्या. वर्षाला ५-६ लाख कमाई होते म्हणतो. करोनाने सध्या धंदा बसला आहे पण आजणाउद्या होईलच सुरु परत सर्व. आता त्याचे गाणे कधी मी ऐकले नाही पण चार पैसे कमवतोय म्हणजे वाईटतर नक्कीच नसेल. धाग्याशी सम्बन्धित वाटले म्हणून दिले.
बादवे, तुम्ही एकच धागा दोन तीन वेळा का काढला आहे का ?
जिद्दु तांत्रिक घोटाळ्यामुळे
जिद्दु तांत्रिक घोटाळ्यामुळे क्रिएटिव्ह करिअर्स हा एकापेक्षा अनेकवेळा आला होता.एक ठेवून बाकीचे उडवावेत असे संमं ला कळवले होते. पण त्यांनी बहुधा लक्ष दिले नाही. या निमित्य पुन्हा विनंती की क्रिएटिव्ह करिअर्स या शीर्षकाने असणारे माझे सर्व धागे संमं ने डिलीट करावेत.
@जिद्दु - एक कथाच झाली की.
@जिद्दु - एक कथाच झाली की. कौतुक आहे तुम्ही मदत करुन एका व्यक्तीच्या आयुष्यात चांगला बदल घडवलात. खूप छान.
मस्त सकाळी उठून कंपनीत जायचं.
मस्त सकाळी उठून कंपनीत जायचं. सकाळी ग्रुप मीटिंगमध्ये सिरीयस चेहऱ्याने आपण मरेस्तोवर काम करतोय असं दाखवायचं. मधूनच एखाद दुसरे प्रतिप्रश्न समोरच्याला करायचे. मधूनच एखाद्या व्यक्तीला दोष देऊन त्याच्यामुळे कामं रखडलेत असं भासवायचं सोबतीला केविलवाणा चेहरा करायचा. आणि मिटिंग संपताना एकदम एनरजेटिक आव आणून केबिनबाहेर पडायचं बस्स झालं मग दिवसभर मस्त टाईमपास करायचा. वेगवेगळ्या डिपार्टमेंटला भेटी देऊन तिथल्या कालीगशी मस्त गप्पा मारायच्या. दुपारी मस्त चार पाच चपात्या भात चेपायचा. त्यातल्या त्यात संधी साधून मस्त एसीत डुलक्या काढायच्या. डुलक्या काढताना घोरण्याचा आवाज येणार नाही याची काळजी घ्यायची. संध्याकाळी कोणी बघत नसेल तेव्हा हळूच घरी सटकायचं. कंपनी लाईफ म्हणजे मज्जाच मज्जा.
प्रतिभा म्हणजे मराठीत ज्याला
प्रतिभा म्हणजे मराठीत ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात त्याला भारतात सध्या किती महत्व आहे? पुढे किती असेल? >> प्रतिभा म्हणजे क्रिएटिव्हिटी नाही
क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता : आपण सर्वच थोड्याबहुत प्रमाणात सर्जनशील असतो. उदा. रोजच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी आपण क्रिएटिव्हिटी वापरून सोडवतो. एखादे तांत्रिक शिक्षण घेऊन आणि त्यातून रोजगार मिळवता येऊ शकतो आणि सर्जनशीलतेच्या बळावर यश मिळवता येऊ शकते. जसे एखाद्या क्षेत्रात शिरकाव करणे आणि स्पर्धात्मक वातावरणात सुद्धा वरच्या पदावर पोहोचणे.
वर उल्लेख केलेले बहुतेक सर्व करिअर्स सर्जनशीलता या प्रकारात येतील.
प्रतिभा म्हणजे genius : प्रतिभा हा प्रकार उपजत असतो (अर्थात हे माझं मत). हे लोक प्रतिभेच्या जोरावर संपूर्ण जगाला किंवा क्षेत्राला नवीन दिशा देऊ शकतात. उदा. यात अनेक प्रसिद्ध व्यक्ती येतील. My favorite दा विंची, या व्यक्तीने केलेल्या कामातून आधुनिक जगातल्या शिक्षणाच्या कितीतरी शाखा निर्माण झाल्या
आपण या विषयावर चर्चा व्हावी म्हणालात म्हणून थोडे माझेही विचार मांडले ..
प्रतिभा हा शब्द तुम्ही
प्रतिभा हा शब्द तुम्ही डिझाइनच्या संदर्भात वापरला आहे असं वाटतंय. तसं असेल तर "डिझाइन" अभ्यासक्रम असलेल्या खूप संस्था आहेत. करियरच्या दृष्टिने इथुन बाहेर पडलेल्या स्नातकांना भरपुर डिमांड आहे. सध्या व्यावसायिक स्पर्धेत टिकुन रहण्याचं समीकरण काहिसं असं आहे - स्टँड आउट प्रॉडक्ट <-- डिझाइन <--> इनोवेशन...