छोट्या पडद्यावर उद्यापासून एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘स्वाभिमान’. अस्तित्वाचा शोध घेऊ पहाणाऱ्या हरहुन्नरी पल्लवीची गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळेल. एका छोट्या गावात वाढलेल्या पल्लवीचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न आहे. स्वप्नांचा पाठलाग करत ती तिचं ध्येयं कशा पद्धतीने गाठते याची रंजक गोष्ट स्वाभिमान मालिकेतून उलगडेल. पूजा बिरारी ही गुणी अभिनेत्री पल्लवी ही व्यक्तिरेखा साकारत असून स्वाभिमान या मालिकेतून ती टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करत आहे. यासोबतच सर्वांचा लाडका अभिनेता अक्षर कोठारी, आसावरी जोशी, अशोक शिंदे, सुरेखा कुडची, प्रसाद पंडित अशी दमदार कलाकारांची फौज मालिकेत पाहायला मिळेल.
स्वाभिमान मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘स्वाभिमान हा एका मुलीच्या, बाईच्या आयुष्यातला दागिना आहे जो तिने अभिमानाने मिरवायला हवा. स्वाभिमान हे तिचं अस्तित्व आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते कधीही हरवता कामा नये हे या मालिकेतून रसिकांना पाहायला मिळेल. माणसाने स्वाभिमानी असावं ती त्याची ओळख असते.’
स्टार प्रवाह प्रस्तुत ‘स्वाभिमान’ या मालिकेची निर्मिती फ्रेम्स प्रोडक्शनने केली असून कल्पेश कुंभार दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. येत्या 22 फेब्रुवारीपासून सायंकाळी 6.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर ‘स्वाभिमान’ ही मालिका प्रसारित होणार आहे.
ही मालिका एकदम ४-५ महिने
ही मालिका एकदम ४-५ महिने पुढे नेली आज. संपत तर नाहीये ना? वेगळी नि छान आहे ही मालिका.
लग्नसीझन आहे सध्या. त्या
लग्नसीझन आहे सध्या. त्या निमित्याने भाचीबाई दर्शन झाले आम्हा दोघांना.
मला वाटले मालिकेबद्दल बोलताय
मला वाटले मालिकेबद्दल बोलताय भाचीचे अहो भेटले की नाही :डोळ्यात बदाम:
इथे भाचीबाईंचे अहो वेगळे आहेत
मालिकेबद्दलच लिहिलं, शांतनु पल्लवी लग्न झालं देवळात पण मोठ्या आईला परत सर्व साग्रसंगीत करायचं आहे म्हणून परत हळदीपासून सर्व सुरु. इथे सिरीयलमधे भाचीबाईचे अहो वेगळे आहेत ना, तिचे खरे अहो कुठेत त्यात (पल्लवीची आई, भाची आहेना माझी) . तसाही तिचा रोल संपत आला असेल, मुलगी लग्न होऊन सासरी गेली की माहेरचे जास्त दाखवत नाहीत. आताही खूप दिवसांनी होतं तिला काम. ती स्वामी समर्थमधे असते पण मी ती बघत नाही.
एनिवे मध्ये चार पाच दिवस नव्हती बघितली, गौरव पल्लवीचे लग्न थांबवतो शांतू आणि डायरी दाखवतो तो प्रोमो बघितला म्हणून बघितली, त्या नंदिताला उगाच मारले, तिला मारणार समजलं म्हणून सोडून दिलेली बघायची.
ह्या सिरियलमध्ये हिरॉइनची
ह्या सिरियलमध्ये हिरॉइनची बहीण मरते आणि त्यानंतरचे प्रसंग पाहून किती नीच पातळीचा ड्रामा दाखवत आहेत बघून फिजिकली किळस आली.
बरं झालं मी टाळलं ते बघायचं.
बरं झालं मी टाळलं ते बघायचं. नंदीताला मारणार हे समजल्यावर सोडून दिलेली ही सिरीयल, त्यानंतर जेव्हा तो शांतनु डायरी घेऊन येतो तो प्रोमो बघितला, त्या एपिसोडपासून सुरुवात केली परत बघायला.
अंजू, मला वाटलं तुम्हाला ते
अंजू, मला वाटलं तुम्हाला ते दोघे खरेच एखाद्या लग्नात भेटले की काय. मालिका कधीच बघितली नाही.
खरंतर नंदीता गेल्यावर,
खरंतर नंदीता गेल्यावर, पल्लवी साग्रसंगीत कौतुक करुन घ्यायला तयार झाली, याचं थोडं आश्चर्य वाटतंय कारण काहीच दिवस झाले असतील ना, थोडं सावट असतंच ना. नॉर्मल व्हायला हवं सर्वांनी लवकर हे जरी खरं असलं तरी जाणारी एकदम तरुण होती आणि तिचा करुण अंत झालाय.
त्यामुळे देवळात झालेलं लग्न मान्य करायला हवं होतं सर्वांनी.
Pages