मायबोली नामक संकेतस्थळावर त्रिभंग चित्रपटाच्या धाग्यावर शिव्यांवर चालू असलेल्या चर्चेत एका प्रतिसादात मी म्हटले,
आधी मी ठराविक सर्कलमध्ये शिव्या द्यायचो, पण आता कुठेच देत नाही.
अपवाद - च्यायला, साला, आणि आईच्या गावात हे शब्द उद्गारवाचक म्हणून तोंडात येतात पण ते घरीच
---------------
यावर एक प्रतिसाद आला तो असा,
आई काही ऑब्जेक्षन घेत नाही? हॉरिबल.
---------------
सगळ्यात पहिले गंमत याची वाटली की ऑब्जेक्शन घ्यायचे काम आजही समाजाने आईवरच सोपवले आहे. मुलांना संस्कार लावायची जबाबदारी आजही तिच्याच खांद्यावर टाकली आहे. माझी आई सुद्धा वडिलांसारखीच जॉबला जायची, तिचा पगार खरे तर त्यांच्यापेक्षाही किंचित जास्तच होता, आणि तरीही माझ्या जडणघडणीला वडिलांच्या आधी तिलाच जबाबदार ठरवले जाणार आहे
दुसरा विचार मनात हा आला की आता याला एक छानसा चुरचुरीत रिप्लाय द्यावा की, मला देखील घरी दारू पिणार्यांबद्दल हेच वाटते, घरचे कसे चालवून घेतात? हॉरीबल
पण मग म्हटले असा प्रतिसाद देणे हे विषय टाळून पुढे गेल्यासारखे होईल, जाओ पहले ऊस आदमी की साईन ले के आओ म्हणत आपल्याबद्दल केलेले स्टेटमेंट मान्य केल्यासारखे होईल. स्वत:बाबत ते केलेही असते, पण ऊल्लेख आईचा आहे आणि तिच्याबाबत मी बराच भावनिक असल्याने म्हटले आपणच प्रामाणिकपणे या उत्तराचा शोध घ्यावा आणि तो ईथे मांडावा.
खरेच घरात कधीतरी माझ्या तोंडून साला, च्याईला, आईच्या गावात असे शब्द बाहेर पडतात त्यावर आई ऑब्जेकशन का घेत नाही?
तर याचे उत्तर जाणून घेताना मी नकळत माझ्या भूतकाळात शिरलो.
माझे बालपण दक्षिण मुंबईतील चाळीत गेले हे एव्हाना अखंड मायबोलीला ठाऊक असेल. त्या चाळी म्हणजे एक वेगळीच संस्कृती होती. एकमेकांच्या घरात, ताटात, आयुष्यात डोकावणे. तसेच दुसर्यांनी आपल्या घरात, ताटात, आयुष्यात विनाहरकत डोकावावे म्हणून जेवतानाही घराचे आणि सदासर्वदा मनाचे दरवाजे खुले ठेवणे. हा तिथला बेसिक रुल होता. तसेच तिथली एक बेसिक भाषा होती. ज्यात शिव्या बेमालूमपणे मिसळल्या जायच्या. देण्याची सक्ती नसायची, पण ऐकण्याशिवाय पर्याय नसायचा. कारण कानही दरवाज्यांसोबतच खुले ठेऊन जगायचे असायचे. पौंगंडावस्थेतील मुलांमध्ये तर ज्याला शिव्या द्यायला यायच्या नाहीत तो साधा सरळ सभ्य नाही तर बायल्या, नल्ला, बाळू, छगन अश्या नावांनी आणि विशेषणांनी गौरवला जायचा.
अर्थात, आजूबाजुचे शेजारी शिव्या देतात, अगदी घरातही देतात म्हणून प्रत्येकाने द्यायलाच हव्यात असे गरजेचे नव्हते. चाळीचे ओवरऑल जरी एक कल्चर असले तरी त्यातील प्रत्येक घराचे आपले एक भिन्न कल्चर होते. आणि ते प्रत्येकाला जपायचा अधिकार होता. त्यामुळे आपल्या मुलांना शिव्यांची सवय लागू नये म्हणून आमच्या घरचे नेहमी जागरूक असायचे.
तर या घरच्या संस्कारांबद्दल सांगायचे झाल्यास, लहानपणी माझ्या तोंडात "च्याईला" हा शिवीसद्रुश्य शब्द बसला होता. घरी सुद्धा सहजच तोंडात यायचा आणि आल्या आल्या एक थोबाडीत पडायची. एक दिवस मी पुढची पायरी गाठली आणि तोंडातून "साल्या" हा शब्द बाहेर काढला. तो देखील थेट माझ्या काकांसाठी वापरला. बस त्यादिवशी थोबाडीत न पडता माझे थोबाडच फोडले गेले. दुधाचे सारे दात एकाच दिवशी पडले. एक तो दिवस आणि एक आजचा दिवस. पुन्हा कधी घरच्यांसमोर तोंडातून अपशब्द बाहेर नाही आला. घरातच नव्हे तर बाहेरही कधी थोरामोठ्यांसमोर वा मुलींसमोर तो नाही आला. जसे शिव्या सहज तोंडातून बाहेर पडायच्या तसेच हे नियंत्रण देखील ईतकी वर्षे सहजच जमले. त्यामुळेच आज ऑफिसला व्हाईट कॉलर सोफेस्टीकेटेड ईमेज मिरवताना हा गुण कामी येतोय.
(वरील पॅराग्राफ माझ्या वाईट सवयी ३ - शिवीगाळ या लेखातून जस्साच्या तस्सा उचलला आहे)
https://www.maayboli.com/node/56984 - जरूर वाचा हा लेख. मायबोलीवरील माझ्या उत्कृष्ट शंभर लेखांपैकी एक आहे
असो,
पण गेले काही वर्षे, म्हणजे मूलं बाळे झाल्यावर, रुढार्थाने स्वतःचा संसार सुरू झाल्यावर, या वयात आता साला च्यायला हे शब्द अध्येमध्ये सहज तोंडात येतात तेव्हा आई नाही घेत ऑब्जेक्शन. बहुधा आता माझे मी बघून घेण्याईतपत मोठा झालो आहे असे तिला वाटत असावे. किंवा ज्या ठिकाणी माझे बालपण गेले आहे ते पाहता आज मी या वयात जर दोनचार फुटकळ अपशब्द ऊच्चारत असेल तर ते तिला तुलनेत सौम्य वाटत असेल. जे एकाअर्थी खरेही आहे,
कारण,
वरील सर्व पार्श्वभूमी पाहता, आजच्या तारखेला जिथे दर दुसरया घरात मद्यपान करणारा मुलगा सापडतो तिथे आपल्या पोराला दारू-सिगारेटच नाही तर सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही, जो अश्लाघ्य शिव्या देत नाही, तंटाबखेडा मारामार्या करत नाही, ज्याच्या असभ्य वर्तनाच्या कधी तक्रारी येत नाही, कधी कुठल्या मुलीशी-महिलेशी गैरवर्तन नाही, आपण भले आणि आपले कुटुंब भले म्हणत जो वाईट संगतीत टवाळक्या करत हिंडत नाही, जो कधी कोणाबद्दल मनात द्वेष बाळगत नाही, कोणाचा राग करत नाही, कोणाला टोमणे मारत नाही, कोणावर कसलीही टिका करत नाही. कोणाच्या अध्यातमध्यात पडत नाही. जो घरी बाहेर सर्वत्र सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागतो, कसलाही अहंकाराचा दर्प आपल्या मनाला शिवू देत नाही, जो भौतिक सुखामागे धावत नाही, आहे त्यात समाधान मानून आपल्याच विश्वात रमतो ....... अश्या आपल्या मुलाला बघून तिला नक्कीच समाधान वाटत असेल.
जेव्हा नवीन घरात राहायला आल्यावर घरकामाला येणार्या बायका तिला म्हणतात की या सोसायटीत पैसेवाले खूप आहेत, पण तुमच्यासारखे सुशिक्षित सुसंस्कृत लोकं मोजकेच आहेत, तेव्हा तिला नक्कीच आपण आपल्या मुलाला एक चांगले आयुष्य दिले असे वाटत असेल.
त्यामुळे मला तरी असे वाटत नाही की आज जाऊन त्याच आईला असा प्रतिप्रश्न करावा, की माझ्या तोंडात जर आज एखादा अपशब्द येत असेल तर आई तू ऑब्जेक्शन का घेत नाहीस....
मातृप्रेमी,
- ऋन्मेष !
आवडलं!
आवडलं!
माझे बालपण दक्षिण मुंबईतील
माझे बालपण दक्षिण मुंबईतील चाळीत गेले हे एव्हाना अखंड मायबोलीला ठाऊक असेल. >>> लेखातले हे (एकच) वाक्य कळले. सेलेब्रिटीजचं असंच असतं. पण स्वतःला मायबोलीपुरतेच मर्यादीत करून लेखकाने अंडरएस्टीमेट केले आहे असे वाटते. कन्फुजन खालील गोष्टींबद्दल आहे.
१. त्रिभंग धागा वाचलेला असणे ही पूर्व अट आहे का ?
२. माझ्या वाईट सवयी चा संदर्भ वाचून गदगदून आलं. कोणत्याही चांगल्या लेखासाठी जसे संदर्भ दिले जातात तसेच या लेखात संदर्भही दिले गेले आहेत. योगायोगाने ते दस्तुरखुद्द लेखकाचेच आहेत. आश्चर्यच !
३. सगळ्यात पहिले गंमत याची वाटली की ऑब्जेक्शन घ्यायचे काम आजही समाजाने आईवरच सोपवले आहे. मुलांना संस्कार लावायची जबाबदारी आजही तिच्याच खांद्यावर टाकली आहे. माझी आई सुद्धा वडिलांसारखीच जॉबला जायची, तिचा पगार खरे तर त्यांच्यापेक्षाही किंचित जास्तच होता, आणि तरीही माझ्या जडणघडणीला वडिलांच्या आधी तिलाच जबाबदार ठरवले जाणार आहे
हे विचार स्वतःचेच आहेत का ?
कारण त्या घटस्फोट, पोटगी-खंडणीच्या धाग्यावर घरकामाला बाई आहे तरीही त्यांच्यात वाद होतात असे म्हटले आहे. हा विरोधाभास नाही का ? हा त्या दोघातला भांडणाचा मुद्दा असेल पण धागाकर्ता म्हणून तो चूक आहे असे कुठे लिहीले नाही.
खरोखर आजकालच्या जगात ऋन्मेऽऽष
खरोखर आजकालच्या जगात ऋन्मेऽऽष सारखे सर्वगुणसंपन्न लोक फारच दुर्मिळ आहेत. ते आदर्श आहेत उगाच नाही मायबोलीवर सगळ्यांत जास्त चाहते त्यांचे आहेत
खरोखर आजकालच्या जगात ऋन्मेऽऽष
खरोखर आजकालच्या जगात ऋन्मेऽऽष सारखे सर्वगुणसंपन्न लोक फारच दुर्मिळ आहेत.>>>> +११११११
रुन्मेष हा खूपच सच्चा मनाचा माणूस आहे. आजवर मी कधीच त्याला कोणावरही चिडलेला पाहिलेला नाही. मायबोली उघडली आणि रुन्मेषचा नुसता प्रतिसाद जरी दिसला तरी मन प्रसन्न होतं.
ऋ, मायबोलीचा सोपनील शाखा
ऋ, मायबोलीचा सोपनील शाखा होतास आता महागुरु होतोयस
मिंत्रा लोगो चा धागा काढ की.
अजुन एक- नवरा गेल्यावरही आजकाल बायका कुंकु-टिकली मंगळसुत्र वैगेरे घालत रहातात. पुर्वी असं नव्हतं यावर चर्चा होण्यासारखा धागा काढ. बघ कसं जमतंय ते
लेख छान
लेख छान
सस्मित, धन्यवाद, झरूर
वावे, साधा माणूस, मृणाली, धन्यवाद
सस्मित, धन्यवाद, झरूर
सवड मिळताच लगेच
घरात जर वडिलांच्या तोंडात
घरात जर वडिलांच्या तोंडात शिव्या असतील तर मुलांच्याही तोंडात शिव्या बसतात अशी दोन उदाहरणं सोसायटीत पाहिली आहेत. सहासात वर्षांचा मुलगा, ज्याला त्या शिव्यांचा अर्थ कळण्याची सुतराम शक्यता नाही, अशा शिव्या देताना पाहिलं आहे. त्यामुळे ही आईपेक्षा वडिलांचीच जबाबदारी अधिक आहे. (जनरली बायका असल्या शिव्या देत नाहीत म्हणून)
लेखातील सर्वात जास्त आवडलेलं
लेखातील सर्वात जास्त आवडलेलं वाक्य "मायबोलीवरील माझ्या उत्कृष्ट शंभर लेखांपैकी एक "
मलाही आवडला लेख
मलाही आवडला लेख
खरोखर आजकालच्या जगात ऋन्मेऽऽष
खरोखर आजकालच्या जगात ऋन्मेऽऽष सारखे सर्वगुणसंपन्न लोक फारच दुर्मिळ आहेत. ते आदर्श आहेत उगाच नाही मायबोलीवर सगळ्यांत जास्त चाहते त्यांचे आहेत >>>>>>>
+११११११११ पूर्ण सहमत .
धाग्यावर प्रतिक्रिया देणारे बऱ्याच वेळा ऋणमेश ला खिजवत असतात , टोमणे मारत असतात !!
तरी पण हे साहेब मात्र संयम ढळू न देता उत्तरे देत असतात .....
ऋन्मेष यांचे धागे मला तरी
ऋन्मेष यांचे धागे मला तरी आवडतात. लोकांना व्यक्त होता येते, इन्टरॅक्टिव्ह असतात आणि लेखकही ताळतंत्र सोडून बोलत नाही. अनेकजण डिवचतात पण लेखक महाशय पुरुन उरतत. हा धागाही आवडला.
सामो +१
सामो +१
खूप छान Runmesh!
खूप छान Runmesh!
रुन्मेष,
रुन्मेष,
तुझे कर्मसिद्धांताबद्दलचे विचार वाचायला आवडतील. वेगळा धागा काढल्यास तेही छान.
म्हणजे समजा आपण कोणाला- काही लोकांना- जाणूनबुजून त्रास देतोय-त्यांना उचकवण्यातच आपल्याला आनंद मिळतोय- तर याचा भविष्यात आपल्याला काही त्रास होऊ शकतो का? ते इथेच फेडावं लागू शकतं का?
या केसमध्ये ज्यांना त्रास देतोय ते लोक कोणी जवळचे नाहीत- आईबाबा वगैरे जे काहीही सहन करतील- तर अनोळखी आहेत. लोकांचे तळतळाट लागतात वगैरेवर विश्वास आहे का तुझा? की कर्मसिद्धांत वगैरे सब झूठ वाटतं?
हे फक्त हिंदू धर्मातच आहे असं नाही तर ख्रिस्ती धर्मातही 'you shall reap what you sow" असं म्हटलं आहे.
मग मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यातूनच आनंद मिळवणे या विकृतीला काही consequences असतील का?
सनव केवढं सोपं आहे हे
सनव केवढं सोपं आहे हे कर्मसिद्धांतानुसार.
कर्मांची जमा खाती पुढल्या जन्मात कॅरी ऑन होतात.
मायबोलीकरांची गेल्या जन्माची कर्मे आहेत, आता सेटल होताहेत.
छान लेख
छान लेख
तरी पण हे साहेब मात्र संयम
तरी पण हे साहेब मात्र संयम ढळू न देता उत्तरे देत असतात>>>
संयम ढळला की वापरायचे आयडी वेगळे आहेत हो
ते बरोबर येतात जिथं यायचं तिथे
शिवाय हलगी, तुणतुणे किती भारी नई म्हणणारे पण आहेत काही वेगळे
हा सगळा एकपात्री प्रयोग असतो
रुन्मेष,
रुन्मेष,
तुझे कर्मसिद्धांताबद्दलचे विचार वाचायला आवडतील. वेगळा धागा काढल्यास तेही छान.
>>>>
चालेल, नंतर सावकाश वेगळा धागा काढतो
संयम ढळला की तो रेंजरभाई का
संयम ढळला की तो रेंजरभाई का कोण आहे तो येतो मग तलवार घेऊन.
आवडलं !!
आवडलं !!
गलगले निघाले!
गलगले निघाले!
बाकी सगळं ठीक आहे पण 'च्यायला
बाकी सगळं ठीक आहे पण 'च्यायला' ही शिवी आईशी निगडीत असल्याने 'आई काही बोलत नाही का' असं आलं असावं असं मला वाटतं. यात वळण कोणी लावायचं, संस्कार कोणी करायचे हा मुद्दा नसावा असा माझा अंदाज आहे.
'बापाच्याला' असली शिवी असती तर बहुदा बाबा काही म्हणत नाहीत का असं विचारलं असतं.
सनव, सोमिवर काय वाचावं काय
सनव, सोमिवर काय वाचावं काय वाचु नये,काय स्किप करावं काय आणी किती सिरीयसली घ्यावं हे स्वतः च्या हातात आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीचं लेखन उघडुन वाचुन मग त्याचा सो कॉल्ड त्रास करून घेऊन त्याला शिव्याशाप तळतळट देणं ही कसली कर्म?
ऋन्मेष यांचे धागे मला ही
ऋन्मेष यांचे धागे मला ही आवडतात. पडतात एखाद्यला असे प्रश्न, आमच्यासारखे बघू नन्तर , आपल्या किंवा आपल्या जवळच्याच्या संबंधित अजून नाही न झालं असं मग कशाला विचार करा म्हणून सोडून देतो. पण चर्चा उलटसुलट घडतात. 30,40 टक्के तरी प्रतिसाद चांगले आणि मुद्द्याला अनुसरून असतात. प्रतिसाद देणाऱ्यांच्या दहापट जण वाचनमात्र असतात. त्याना काही न काही उपयोगी पडू शकते.
तुझे कर्मसिद्धांताबद्दलचे विचार वाचायला आवडतील. वेगळा धागा काढल्यास तेही छान.>> मला ही आवडेल. पण वेगळ्या अनुषंगाने. म्हणजे समोरचा उचकवतोय, आपली खेचतोय, कधी कधी लागेल असे बोलतोय पण वाचनमात्र असल्यापासून बघतेय कधीही रुन्मेष यांची भाषा असभ्य झाली नाही की त्रागा, चिडचिड नाही. कसं जमवता हे सगळं याची उत्सुकता आहे.
प्र. आई काही ऑब्जेक्षन घेत
प्र. आई काही ऑब्जेक्षन घेत नाही?
उ. आई कुठे काय करते?
मला वाटतं शीर्षकातला प्रश्न
मला वाटतं शीर्षकातला प्रश्न वासतविक असा असायला हवा -
'च्यायला' हा शबद इतका सर्रास वापरला जात होता व रूढ झाला होता कीं आईलाही तो खटकत नसे ? ' कारण, सर्रास वापराने शिवीतला शब्दशः अर्थ साफ पुसून गेलेला असतो. ( तसं नसतं तर आज बरेच मित्र एकमेकांना ज्या शिव्या अगदीं सहजपणे वापरतात त्यावरून मुडदेच पडले असते ). मीं ' बाषरे !' म्हटलं तर ' वडील ऑबजेकशन नाहीं घेत ?' किंवा आईने मला ' मेल्या, आथी हात धुवून ये' म्हटलं तर मीं आक्षेप नाही घेत, असः विचारण्यासारखं आहे हें.
च्यायला' ही शिवी आईशी निगडीत
च्यायला' ही शिवी आईशी निगडीत असल्याने 'आई काही बोलत नाही का' असं आलं असावं असं मला वाटतं. यात वळण कोणी लावायचं, संस्कार कोणी करायचे हा मुद्दा नसावा असा माझा अंदाज आहे.
>>>>>>>
शिव्या या बहुतांश आईबहिणींच्याच असतात. आणि मुलीही या एमसीबीसी शिव्या तश्याच देतात. त्यांना बदलून त्यात बापभाऊ टाकायची तसदी घेत नाहीत.
तू म्हणतेस तसे असू शकतेच. पण तरीही आईची शिवी आहे म्हणून आई ऑब्जेक्शन घेणार, बाबांची आहे तर बाबा हे लॉजिक मूळतच काही पटत नाही. कारण या लॉजिकने ज्याला बहिण नाही तो कोणी ऑब्जेक्शन घेणारे नसल्याने बहिणीच्या शिव्या घरी बिनधास्त देऊ शकतो असे होईल.
आईबाबा ऑब्जेक्शन घेताना मुलगा शिवी देतोय हे पहिले बघणार की कोणावरून देतोय हे बघणार...
छान लेख आहे. आवडला.
छान लेख आहे. आवडला.
प्रत्येकजण शिवी देतोच...
प्रत्येकजण शिवी देतोच... कोणत्या सर्कल समोर देतो हा प्रश्न आहे... एकांतात तरी देतोच... मनात देतो नाहीतर...
Pages