Submitted by रतिका on 31 January, 2021 - 13:28
नमस्कार
थोडी मदत हवी आहे.
मार्च मध्ये मी व माझे कुटुंब vizag ( विशाखापट्टणम ) ला शिफ्ट होत आहोत
माझी ३वर्षाची मुलगी आहे. तिची शाळा हि चालू करायची आहे.
दुर्देवाने तिथे कोणीही ओळखीचे नाही.
ऑनलाईन rent चे सर्व साईट्स शोधून झाले पण काही मदत होत नाही.
कोणाची काही मदत होऊ शकेल का ??
( १bhk किंवा २bhk ) काहीही उपलब्ध असेल ते चालेल पण कुटुंबासाठी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असावी.
एजन्ट चे कॉन्टॅक्ट असतील तरीही चालेल.
शाळेची काही माहित असेल तर सांगावी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
इतरांच्या नजरेस पडावा म्हणून
इतरांच्या नजरेस पडावा म्हणून धागा वर काढत आहे.
विशाखापट्टणमच्या कुठल्या
विशाखापट्टणमच्या कुठल्या विशिष्ट भागात शोधत आहात का? माझ्या ओळखीत विचारून पाहते.
धन्यवाद मनस्विता आणि हर्पेन
धन्यवाद मनस्विता आणि हर्पेन
खरतर खूप प्रतिक्षेत होते कोणाच्या तरी उत्तराची .
विशिष्ट्य असा भाग अजून काही माहित नाही
मला ऑनलाईन शोधून कळले कि मधुरवाडा राहण्यासाठी योग्य पर्याय आहे. पण पुढे काही लिंक लागेना
रतिका हा खालचा धागा बघा.
.
विशाखापट्टणम आंध्रात आहे हो.
विशाखापट्टणम आंध्रात आहे हो.
नवऱ्याचा एक मित्र born and
नवऱ्याचा एक मित्र born and brought up in विशाखापट्टणम आहे. पण सध्या तो बंगलोरला आणि त्याचे आईवडील हैदराबादला असतात. त्याला विचारता येईल. विचारायला सांगते.
आज माबो लॉगिन केल्याचे
आज माबो लॉगिन केल्याचे सार्थक झाले.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अरे सॉरी हो. मी घाईत लिहीले.
अरे सॉरी हो. मी घाईत लिहीले. खरच एक्स्ट्रीमली सॉरी. वावे आणी मानव, धन्यवाद मदत करायला पुढे आल्याबद्दल.
समुद्र आणी किनारा म्हणले की मी मनाने कोकण व कर्नाटक, केरळात आधी फिरते. आंध्रा विसरतेच नेहेमी.
मानव
मानव![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी चौकशी केली असता कळले की
मी चौकशी केली असता कळले की मधुरवाडा जरा महागडे ठिकाण आहे. इतर जागा पण राहण्यास चांगल्या आहेत व स्वस्त आहेत. आणि तिथे ट्रॅफिक त्रास फार नाही.
अजून काही माहिती म्हणजे लोकल इस्टेट एजंटची माहिती कळल्यावर इथे लिहिते.
मला स्वतःला विझागची फार
मला स्वतःला विझागची फार माहीती नाही. मी फक्त एकदा गेलो होतो आणि एकच रात्र राहिलो. शहर खूप मोठे आहे. आध्र प्रदेशातील सर्वात मोठे शहर आहे आणि आंध्रची आर्थिक राजधानी म्हटले जाते. जागोजागी तसे बोर्ड आहेत.
तुम्हाला कोणत्या भागात काम आहे त्यावर घर अवलंबून आहे. मी हैदराबादला राहतो त्यामुळे अशी बरीच मंडळी माहिती आहे ज्यांना विशाखापट्टणमविषयी माहिती आहे. तुम्हाला साधारण कोणत्या भागात घर हवे ते सांगा तसे विचारतो.
मित्राशी बोललो, तो वैझागचा
मित्राशी बोललो, तो वैझागचा आहे. कामाचे ठिकाण कुठे आहे, ते कळवले तर तो सांगू शकेल असे म्हणाला. Next to NSTL (Naval Science & Technology Laboratory) is good area where his mom lives. Sitammadhara, MVP colony etc. also good. तो स्वत: सध्या बाहेर रहातो, पण त्याच्या मित्राला विचारून त्याचा फोन तुम्हाला देईल, म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष त्याच्याशी बोलता येईल. मित्राच्या मते शक्यतो ऑफिसच्या जवळ जागा बघा, मधुरावाडा त्या दृष्टीने सोईस्कर पडणार नाही, असे म्हणाला.
अशी अनोळखी लोकंकडून मिळालेली
अशी अनोळखी लोकंकडून मिळालेली माहिती कितपत विश्वसार्ह मानायची ?
अशी पर्सनल माहिती /फोन नं सोशल मिडीया वर दिल्यावर मग गुगल / व्हॉटसअॅप फारच नाक खुपसते म्हणून तक्रार पण करायची?
Visakha Rental Agency:
Visakha Rental Agency:
07947369624 (Naidu)
1000 - Registration fee to see the properties
if anything finalize - Commission = 50% of the first month rent
Other than that, they can try checking in OLX too (if they haven't checked it yet)
Here are some properties I checked:
https://www.olx.in/item/2-bed-room-flat-with-puja-room-for-rent-iid-1620...
https://www.olx.in/item/3bhk-flat-for-rent-near-kommadi-junction-iid-162...
Other properties in that area: https://www.olx.in/madhurawada_g5461173/for-rent-houses-apartments_c1723
हा प्रतिसाद मला माझ्या
हा प्रतिसाद मला माझ्या ओळखीच्या व्यक्ती कडून मिळाला आहे.
मनस्विता आणि उपाशी बोका तुमचे
मनस्विता आणि उपाशी बोका तुमचे खूप खूप आभार.
मित्रहो D. Chodavram हे कामाचे ठिकाण आहे. कंपनीत चॊकशी केलीस असता असे कळले कि
ती जागा residential नाही.
मधुरवाडा, Sitammadhara, MVP colony हे राहण्यास उत्तम आहे ( आंध्रा ) बाहेरील लोकांसाठी.
म्हणून इथे घर बघत आहोत. या ठिकाण बद्दल काही माहित असल्यास सांगावे .
मनस्विता आपले खूप खूप आभार
आणि आम खरंच आज माबो लॉगिन केल्याचे सार्थक झाले.
<< पर्सनल माहिती /फोन नं सोशल
<< पर्सनल माहिती /फोन नं सोशल मिडीया वर दिल्यावर मग गुगल / व्हॉटसअॅप फारच नाक खुपसते म्हणून तक्रार पण करायची? >>
फोन नंबर देण्यासाठी ईमेल उपलब्ध आहे, त्याचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी व्यक्तिगत माहिती देऊ नये.
धन्यवाद
धन्यवाद
मी विचारतो की आंध्रा बाहेरील लोकांसाठी राहायच्या जागा कोणत्या आहेत. जागा शोधायची कशी
मी खर तर सायकल टूर वर गेलो होतो. शेवटल्या टप्प्यात अराकुवरुन विशाखापट्टणमला गेलो होतो. आम्ही MVP colony च्या जवळ एका बेड आणि ब्रेकफास्ट टाइप ठिकाणी राहलो होतो.
@रतिका
@रतिका
माझ्या एका मित्राने दिलेली माहिती अशी. वर नमूद केलेले भाग उत्तम आहे पण काहीसे अपस्केल आहे तेंव्हा महाग असू शकतात. त्यातल्या त्यात MVP colony महाग असण्याची शक्यता आहे. मधुरवाडा तुलनेत नवीन भाग आहे तेंव्हा तिथे तुलनेत कमी किंमतीत घर मिळेल. हा सारा भाग विजयनगर, भिमली बीच रोडला आहे तर चोडावरम दुसऱ्या बाजूला आहे. एका बाजूचा प्रवास साधारण दीड ते दोन तास लागतील. त्याच्या मते Anakpalle या भागात बघितले तर उत्तम असेल.
घर शोधण्यासाठी OLX rental, स्थानिक वृत्तपत्र या शिवाय पर्याय नाही. थोडक्यात तिथे जावे लागेल. अधिक माहिती मिळाली तर कळवितो.