मराठी रेडिओ

Submitted by rmd on 14 January, 2021 - 13:15

देशात असताना घरी कायम रेडिओ चालू असायचा. अगदी लहान असल्यापासून तो आयुष्याचा अविभाज्य भागच झाला होता. त्यातही मराठी गाण्यांचे कार्यक्रम अगदी लक्षात ठेवून ऐकले जायचे. पुणे एफ.एम. वर संध्याकाळी ५.३० वाजता लागणारा सांजधारा हा विशेष आवडता.
अमेरिकेत आल्यावर बर्‍याच गोष्टी मिस करायला लागले त्यात देशातला आणि त्याहीपेक्षा मराठी रेडिओ ही एक गोष्ट होती. यूट्यूब किंवा गाना वगैरे सारख्या ठिकाणी गाणी ऐकून दुधाची तहान ताकावर भागवायचा प्रयत्न केला गेला. पण त्यात ती रँडम गाणी ऐकण्याची मजा येईना. आपल्याला कधीही माहिती नसलेल्या चित्रपटांची गाणी अचानक कानावर पडण्यात जी धमाल आहे ती त्यात नव्हती.
असेच कधीतरी ट्यून इन रेडिओ वगैरे सारख्या गोष्टी सापडल्या जिथे मुंबई अस्मिता वाहिनी ऐकता येत होती. मग प्रॉपर रेडिओ ऐकणं सुरू झालं. काही काळाने प्रसारभारतीवर देशभरातल्या रेडिओ चॅनल्सचा खजिना सापडला आणि लॉटरी लागल्यासारखंच वाटलं. महाराष्ट्रातल्या इतक्या शहरांमधून आकाशवाणी ऑनलाईन ऐकता येते हा नवीनच शोध लागला. मग काय, चॅनल सर्फींग करत करत भरपूर मराठी गाणी, कार्यक्रम ऐकणं सुरू झालं.
पण नुकतेच प्रसारभारतीने हे रेडिओचे पेज काढून टाकले आणि अ‍ॅप सुरू केले. आणि मला अ‍ॅप नको होते. मग अजून शोधाशोध करत बसण्यापेक्षा आपणच एक पेज बनवून आपल्या ब्लॉगवर का टाकू नये असा विचार मनात आला. आणि त्याप्रमाणे onlineradiofm.in वरच्या लिंक्स जमा करून महाराष्ट्रातल्या विविध शहरातली आकाशवाणी एका पेजवर मिळेल अशी व्यवस्था केली. त्यामुळे अ‍ॅपशिवाय मराठी रेडिओ ऐकणं आता खूप सोपं झालं.
माझ्यासारखेच आकाशवाणीचे चाहते इथे मायबोलीवर खूप असतील असं वाटलं आणि म्हणूनच सर्व मायबोलीकरांसाठी ही लिंक इथे देते आहे.

https://marathiradiostations.blogspot.com/p/marathi-radio.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण मला आता सांगली ची लिंक चालत नाही. परवा बघितली तेंव्हा सुरू होती. आता not found येत आहे. प्रक्षेपण बंद असेल तर लिंक बंद होते की काय Happy

प्रक्षेपण बंद असेल तर not found येते. भारतातल्या सकाळी प्रक्षेपण सुरू झाले की लिंक्स परत चालू होतात. मुंबई अस्मिता वाहिनी बहुतेक २४ तास सुरू असते.

>> प्रक्षेपण बंद असेल तर not found येते

Lol खिस्स्स्स ऐकायला यायला हवी ना... थेट लिंकच बंद करणे म्हणजे काय Proud Light 1

बाय द वे, धाग्यात दिलेली https://onlineradiofm.in/ लिंक छान आहे. त्यात आकाशवाणी आणि खाजगी सर्वच केंद्रे ऐकायला येतात.
भाषावार आणि राज्यवार नीट मांडणी सुद्धा केली आहे.

महाराष्ट्रातील केंद्रे:
https://onlineradiofm.in/maharashtra

मराठी केंद्रे:
https://onlineradiofm.in/language/marathi

बाकी, ऑल इंडिया रेडीओचे पोर्टल (http://allindiaradio.gov.in/) आणि ॲप (newsonair) दोन्ही अत्यंत बकवास आहेत.
पोर्टल मध्ये एकतर ते लाइव्ह स्ट्रीमिंग कुठेतरी कोपऱ्यात लपवून ठेवले आहे (आपले कार्यक्रम ऑनलाईन कुणी ऐकू नयेत याची दक्षता घेतली आहे जणू) त्यातूनही त्या लाइव्ह स्ट्रीमिंग वर चुकून कुणी क्लिक केलेच तर त्यात हवे ते केंद्र कसे शोधायचे तो पर्याय नाही (उदाहरणार्थ सांगली, सातारा इत्यादी केंद्रे कुठे आहेत?)
आणि newsonair ॲप मध्ये तर नावापासूनच सगळी गंमत आहे. नाव news आणि कार्यक्रम तर सगळेच? असो.

प्रक्षेपण बंद असेल तर लिंक बंद होते की काय >>> हो. बर्‍याच स्टेशन्सची लिंकच बंद होते.

बाय द वे, धाग्यात दिलेली https://onlineradiofm.in/ लिंक छान आहे. त्यात आकाशवाणी आणि खाजगी सर्वच केंद्रे ऐकायला येतात. >>> हो. म्हणूनच ती दिली आहे. म्हणजे ज्यांना इतर स्टेशन्स ऐकायची आहेत त्यांना ती ही ऐकता येतील. माझं पेज फक्त मराठी स्टेशन्स एका ठिकाणी पटकन् मिळावीत म्हणून बनवलं आहे.

खिस्स्स्स ऐकायला यायला हवी ना... थेट लिंकच बंद करणे म्हणजे काय >>> Proud पुणे, परभणी ला बहुधा खिस्स ऐकू येते Proud

पुणे आकाशवाणीवरून काल प्रसारित झालेला एखादा कार्यक्रम आज ऐकण्याची काही सोय आहे का?

रोज विविधभारती ऐकतेच. फार सुंदर म्युझिक पिसेस आहेत त्यांचे. प्रत्येक कार्यक्रमाची एक सिग्नेचर ट्युन.

पुणे आकाशवाणी ( एफेम)FM आणि इतर एफेम फक्त
all hindi radios app by permasoft dot in in android इथे रेकॉर्ड करता येतात लाइव असताना.( होऊन गेलेले आणि पुणे आकाशवाणी एएमAM ऐकता येत नाहीत.)

Android phone app आहे. पण रेकॉर्डेड फाईल सेंड करता येते.

Srd, म्हणजे चुकलेला कार्यक्रम ऐकता नाही येणार ना!

डॉ. जयंत नारळीकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १९ जुलैला त्यांची (आकाशवाणीच्या संग्रहात असलेली) दोन भाषणं पुणे आकाशवाणीने प्रसारित केली होती. 'वेळेचं व्यवस्थापन' आणि 'माझे छंद' . ती ऐकायची होती. आकाशवाणीच्या यूट्यूबवर कधी आली तर बरं होईल.

नाही.
डीडी सह्याद्रीचे यूट्यूब चानेल आहे. बरेच कार्यक्रम आहेत.

पण आकाशवाणी पुणे हे ओडिओ आहे. शिवाय AM जुने?/ स्थानिक FM? / डीटिएच FM?
त्यांचे किंवा कुणाचे ओडिओ नाही मिळणार.

ते app घेऊन नवीन कार्यक्रम रेकॉर्डिंग करा हे सुचवतो.
तरी शोधून सापडले तर देईनच.

सध्या तरी आकाशवाणी पुणे चानेलवर ओडिओत https://youtu.be/ezZT-r4O29g इथे गीत रामायण दिसते आहे. Subscribe करून ठेवा.

अपडेट -

मी जिथून लिंक्स घेतल्या होत्या ते बंद झालेलं दिसतंय. त्यामुळे माझं पेज पण सध्या चालत नाहीये. ते रिपेअर करायला कदाचित वेळ लागेल. पण तरी जे मराठी रेडिओचे चाहते आहेत त्यांची गैरसोय नको म्हणून इथे दुसर्‍या एका साइटची लिंक देते आहे -

https://onlineradiofm.in/language/marathi

Pages