मोठ्या आयटी कंपनीत केटी/इअर डाऊन मुलांना संधी किती?

Submitted by केअशु on 12 January, 2021 - 00:29

मित्रहो!
आमच्या एका WhatsApp समुहात झालेल्या चर्चेवर हा प्रश्न आहे.
प्रश्न असा आहे की TCS किंवा तशाच मोठ्या आयटी कंपन्या जरी केटी किंवा वायडी(इअर डाऊन) झालेल्या मुलांना चाचणी परीक्षेला बसू देत असले तरी या केटी/वायडी होऊन मग पदवी/पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्यांपैकी किती जणांना प्रत्यक्षात या मोठाल्या कंपन्यांमधे नोकरी मिळते? कारण परिक्षेला बसण्याची संधी म्हणजे नोकरी मिळालीच असे काही नव्हेच. म्हणजे समजा ५ हजार उमेदवार हे केटी/वायडी होऊन पदवी पूर्ण केलेले असतील तर या पाच हजारातल्या किती जणांना प्रत्यक्षात या कंपन्यांमधे नोकरी मिळते? आणि मिळालीच तरी यांना काम कोणते मिळते?
माबोवर अशा मोठ्या आयटी कंपन्यांसाठी रिक्रुटमेंटचा अनुभव असलेल्यांनी प्रतिसादात तसा उल्लेख आवर्जून करावा.अश्वमुखातून आलेले अधिक विश्वासार्ह Happy
(याचा अर्थ बाकीच्यांनी लिहू नये असा नव्हे.जरुर लिहावे)

तळटीप: मी आयटी क्षेत्रात काम करत नाही.त्यामुळे माझ्या तर्कात , माहितीत चुका असू शकतात. चुभूदेघे. मी मला मिळाले ते संदर्भ जोडले आहेत. _/\_

प्रश्न एका लेखावरुन आणि त्यावरील एका प्रतिसादावरुन सुरु झाला.तो लेख खालीलप्रमाणे
---------------------------------------------------------
"कमी मार्क्स मिळाल्याने काही फरक पडत नाही" - ही सर्वात घातक अंधश्रद्धांपैकी एक आहे. "पैसा सर्वस्व नाही" ही त्याच पठडीतील दुसरी अंधश्रद्धा.

मार्क्स हे लक्षण आहे. अभ्यास कमी केल्याचं.

मार्क्स कमी मिळाले म्हणजे तुम्ही गणित, मराठी, इंग्रजी "व्यवस्थित" शिकला नाही आहात. विज्ञानाचे मूलभूत नियम नीट पाठ करून घेतले नाहीत. इतिहास भूगोल समजला नाहीये तुम्हाला.

घोकंपट्टी करून मिळालेलं ज्ञान काय कामाचं - हे विचारणं टाळ्या मिळवायला आणि मान डोलवायला छान आहे.

पण हीच घोकंपट्टी कितीतरी स्किल्स डेव्हलप करत असते हे कुणी सांगत नाही.

ट्रिग्नोमेट्रीचा फायदा काय हा प्रश्न ठीक आहे. पण तो चार्ट पाठ करून त्यावरील गणितं सोडवताना स्मरणशक्ती आणि लॉजिकल रिझनिंगचं नातं मजबूत होत असतं. फार मोठी जमेची बाजू आहे ही. भूगोल धड असेल तर चारचौघात गप्पा मारताना ग्लोबल रेफरन्सेस पटापट उलगडत जातात. मराठी व्याकरण नीट असणं ओव्हरऑल संभाषण कौशल्यासाठी किती महत्वाचं आहे हे सांगायला हवं का? इंग्लिश स्किल्स व्यवस्थित आहेत म्हणून करिअर बूस्ट झालेले कमी लोक बघितलेत का आपण?

एमबीए एन्ट्रान्सची तयारी करताना हे सगळं खूप खूप जाणवलं मला. १२ वी धड न केल्याचे परिणाम इंजिनिअरिंगमध्ये भोगले. पण १० वी पर्यंत स्टार परफॉर्मर असल्याचा फायदा थेट मुंबईतील टॉप १० एमबीए कॉलेजेसपैकी एकाचं प्रवेशद्वार उघडण्यात झाला. स्पोकन इंग्लिश चांगलं असल्यामुळे एमबीए गाजवू शकलो. पुढे नोकऱ्या करताना हेच कमावलेले कित्येक स्किल्स सतत कमी येत गेले.

अर्थात, हे सगळं ज्यांना जमलं नाही, ते आज अपयशी आहेत का? अर्थातच नाही. पण आज मिळालेलं यश कमावण्यासाठी त्यांना मोजावी लागलेली किंमत दुर्लक्षित करता येणारे का?!

सतत नकारांना सामोरं जावं लागणं, सहज उपलब्ध होऊ शकणारे पर्याय बंद होणं - हे सगळं "काहीच नुकसान नाही" प्रकारात टाकून द्यायचं का?

हे सगळं सोडून द्या.

परिक्षांमधील मार्क्स एक खूप मोठं पब्लिक स्टेटमेंट असतं.

तुम्ही स्वतःला, स्वतःच्या करिअरला किती सिरियसली घेता - याचं जगाला दिलेलं डिक्लेरेशन असतं. इंजिनिअरिंगमध्ये कॅपम्स रिकृटमेन्टला येणाऱ्या कम्पनी १०वी - १२वी चे मार्क्स बघण्यामागे हेच कारण असतं.

परीक्षेतील अपयश म्हणजे "सगळं संपलं" असं अजिबात नाही. पण -

"राजा, तुला माहिती होतं १०वी/१२वी चं महत्व...तरी तू इतके कमी मार्क्स मिळवलेस...हे तुझं चुकलं आहे...तू कमी पडला आहेस" - हे पण सांगायचं नाही का?

तुझ्यासाठी आईवडील, बहीणभाऊ खूप ऍडजस्ट करत होते, त्याग करत होते - त्याची किंमत तू ठेवली नाहीस - ही जाणीव करून द्यायची नाही का?

लक्षात घ्या - जर मुलांना आताच ही जाणीव करून दिली नाही तर ते आज भानावर येऊन उद्या सिरियसली पुढचा विचार करणार नाहीयेत.

"१० वी १२ वी म्हणजे सर्वस्व नव्हे" - हे कुणासाठी? जो त्या नंतर खूप मेहनत घेतो, त्याच्यासाठी! पण नंतर मेहनत घेण्यासाठी आज त्याला परिस्थितीचं भान यायला नको का? आपल्या "१२ वी म्हणजे सर्वस्व नव्हे! बिनधास्त रहा! मजा कर!" संदेशांमुळे त्याला हे गंभीर्यच येणार नाही - हे कळायला नको का आपल्याला!

आपल्या आजूबाजूला १२वीत अपयशी होऊनही पुढे यशस्वी झालेले जितके लोक आहेत - त्याहून अधिक लोक क्षमता असूनही बिलो अॅव्हरेज जीवन जगणारे आहेत.

कशामुळे? कारण हे गांभीर्य त्यांना कधीच आलं नाही.

हेच हवंय का आपल्याला?!

शेवटी, सर्वात महत्वाचा मुद्दा.

आज १२ वी होऊन गेलेल्या मुलांना धीर देण्यासाठी तुम्ही हे म्हणताय खरं. पण तुमचं हे म्हणणं ऐकणारे-वाचणारे ८वी, ९वीतले पोरं काय शिकताहेत यातून? त्यांना काय सिग्नल्स देतोय आपण?!

"काही फरक पडत नाही मार्क्स कमी मिळाल्याने" असं म्हटल्याने आपण मोठया मेहनतीने, विचार करून उभारलेली अख्खी सिस्टीम आपण एका फटक्यात रद्द करून बसतो - हे कळू नये का आपल्याला?!

कोवळ्या जीवांनी परीक्षेतील अपयशामुळे आयुष्य संपवू नये हे योग्यच. पण पुढील आयुष्य घडवण्यासाठी परीक्षा महत्वाच्या असतात - याचं भान ही आवश्यक आहे, हे नाकारून कसं चालेल?!

स्पर्धा जीवघेणी नको. मान्य.

पण स्पर्धाच नको म्हणून कसं चालेल?!

स्पर्धा असणारच! तुम्ही त्यात उतरायचंच नाही असं ठरवलं तरी स्पर्धा तुम्हाला जज करणारच.

मानवी अस्तित्वच उत्क्रांतीची स्पर्धा जिंकत जिंकत उभं राहिलं आहे.

नाकारून जाणार कुठे आपण?

: ओंकार दाभाडकर, १०वी-१२वीत आलेल्या अपयशाची जबर किंमत चुकवलेला एक परीक्षार्थी
d.omkar1@gmail.com

प्रतिसाद

अगदी अचूक विश्लेषण केलय. टाटा कन्सलटन्सीने त्याच्या माहीती तंत्रज्ञान (IT) विभागात, मेकॅनिकल इंजिनीअर्सची भरती केली. मी त्यांच्या HR विभागातल्या माझ्या मित्राला विचारले की IT चे graduate उपलब्ध असताना, मेकॅनिकल इंजिनीअर्स का निवडलेत? त्याच उत्तर, निवडलेल्या उमेदवारांनी त्यांची गुणवत्ता सतत सिद्ध केली आहे, 10 वी, 12 वी, इंजिनीअरींग, त्यांनी आपली अभ्यासातली समरसता (dedication) सिद्ध केली आहे. IT मधे सतत नविन innovation येत राहणार, त्याच्याशी हे उमेदवार नक्कीच जूळवून घेतील. आणि घोकंपट्टीबाबत बोलाल तर ठराविक असाइंनमेंटसाठी ठराविक वेळेत, त्यासाठीही मांड ठोकून बसणे, हे सिद्ध होते.
Pundlik Kolambkar
---------------------------------------------------------
यावर एका ग्रुप सदस्यांनी TCS ची खालील जाहिरात दाखवली.
IMG-20201221-WA0016.jpg

याच संदर्भाने श्रीराम गीत , आयटी तज्ञ अतुल कहातेलिखित "आयटीतंच जायचंय" या पुस्तकात खालील माहिती दिली आहे.
Screenshot_20210112-083114_1.jpg
हे पुस्तक २०१४ चं आहे.

Group content visibility: 
Use group defaults

१० वी १२ वी मधलं यश हा मुद्दा आहेच. पुढे जास्त मार्ग उपलब्ध होतात.
पण त्याही पेक्षा मोठा मुद्दा पुढे आयुष्य, नोकरी, पॉलिटिक्स, सॉफ्ट स्किल्स, खरे टेक्निकल स्किल्स कसे किति वेगाने आत्मसात केले, पहिल्या नोकरीत चांगल्या कामावर संधी मिळाली का यावर पुढच्या प्रगतीचा वेग अवलंबून असतो.
नुसतं अकॅडेमिक यश असून भागत नाही आणि अकॅडेमिक्स मध्ये पूर्ण मागे पडून नुसत्या सॉफ्ट स्किल्स वर पुढे जाता येत नाही.
आपल्या जवळचे ज्ञान, ओळखी, बारगेनिंग पॉवर आपण योग्य जागी योग्य वेळी योग्य माणसांसमोर कशी वापरतो हे जास्त महत्वाचं.
मुलांना १० वी १२ वी चं महत्व पटवावं, त्यांना 'आता थोडा नीट मन लावून अभ्यास केलास तर नंतर भरपूर कॉलेजेस आणि बरेच प्रयाय उघडे असतील' हे सांगावं हे नक्कीच, पण त्याच बरोबर १०वी १२ वी किंवा एंजिनीयरींग मध्ये केटी म्हणजे आयुष्य संपलं असा गिल्टही देऊ नये.(तुम्ही या लेखात तसं सुचवत नाही हे माहिती आहे.) एखादा मुलगा १० वी १२ वी किंवा इंजिनीयरींग मध्ये थ्रू फर्स्ट क्लास किंवा डिस्टिंक्शन न घेता एखाद्या हुशार मुलापेक्षा थोडा सावकाश प्रगती करेल. पण त्याला या अश्या फॉरवर्ड चा मारा किंवा सतत जाणीव करुन दिल्यास मात्र त्याची सर्व आशा मारली जाऊन तो जमिनीवर सरपटेल आणि अजून सावकाश प्रगती करेल.
अनेक ड्रॉप इयर, केटी, ५ बॅकलॉग आहून कॅरी ओव्हर रुल मध्ये पुढच्या वर्षात ढकललेले माझे वर्गमित्र आता त्यांच्या स्किल्स च्या आणि स्ट्रीट स्मार्टनेस च्या जोरावर बर्‍याच मोठ्या जागी आहेत, अनेक वर्षं ऑनसाईट आहेत.
आपण करतो त्या कामाबद्दल समाधान असणे, स्वतःवर विश्वास असणे आणि एकंदर आयुष्य कर्जाचा खूप बोजा न ठेवता सुखाने जगता येणे हे जास्त महत्वाचं आहे.

डायरी वाक्यः
आयुष्यात तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत काहीतरी चांगलं करायला संधी आहेत.नेव्हर टू लेट.

सर्वात तळाला जो प्रश्न आहे तो सुरूवातीला विचारा. नंतर या प्रश्नावर जी उलटसुलट / एकविचारी मतं आली आहत त्यातले निवडक नमुने खालीलप्रमाणे अशी टिप्पणी द्या.
मग सुरूवातीस दिलेले पेस्ट करा.
आत्ता निष्कर्ष काढला आहे असे वाटते.

लेख आणि विचार आवडले. लेखकाची मते पटली. बरोबरच आहेत.

पण

TCS मधे चांगला कॅन्डिडेट असेल तर एटीकेटी आणि वायडी साठी सूट मिळते. (काही अॅप्रुव्हल्स घ्यावी लागतात)

हे अनुभवी कॅन्डीडेटसाठी आहे. फ्रेशरसाठी नाही.

काही लोक चिमटा बसल्यावर किंवा ठेच लागल्यावर सुधारतात..... केटी/इअर डाऊन हा एक चिमटा आहे.... तो रिॲलिटी चेक समजून पुढचे करिअर सिरिअसली घेणारे चिक्कार जण आहेत अगदी सुरुवातीला छोट्या कंपन्यात उमेदवारी करुन नंतर MNC मध्ये बऱ्यापैकी ग्रोथ घेतलेले अगदी ओळखीतली पण बरीच उदाहरणे आहेत.
हां.... आता फ्रेशर्सना जरा अवघड जाते पण दारे वगैरे काही बंद होत नाहीत!

@रानभुली बदल केला आहे.
@किल्ली TCS असंच काही नाही.विप्रो,इन्फोसिस अशा मोठाल्या कंपन्या

कँपस मध्ये पब्लिकने ढीगाने अप्लाय केलं की चाळण लावायला असले क्रायटेरिआ बरे पडतात. प्रोग्रॅमिंग टेस्ट, इंटर्व्हू सगळ्यांचे घेण्यापेक्षा थोड्यांचे घेणे सोपे.
मग जॉब चेंजच्या वेळी स्किल असलं की झालं, असली कुंडली कोणी बघत असेल असं वाटत नाही. त्यातही स्किल नसलेल्या चार व्यक्ती आल्या की चाळण लावायला बघणारच.
तुमच्यात कौशल्य असेल तर काही वर्षे गेली की सपाटीकरण होते. आणि हे कौशल्य फक्त टेक्निकल अर्थातच नाही.