भाग १९ - https://www.maayboli.com/node/77543
"जुलैला बाई, प्रश्न विचारलाय मी."
"दादासाहेब माझी मैत्रीण होती हे मी आधीही सांगितलं."
"खोटं होतं ते. वाड्यावर सोबत म्हणून फक्त कुणी मैत्रिणीला घेऊन येत नसतो."
"दादासाहेब. काही गोष्टी मी नाही सांगू शकत. मला माफ करा."
"सांगावं लागेल जुलैलाबाई..."
जुलैला क्षणभर गप्पच बसली.
"जुलैलाबाई?"
"निगार," तिथल्याच एका मुलीला तिने हाक मारली.
"माझ्या खोलीत जा, तिथून खालच्या खणातून कट्यार घेऊन ये."
"निगार शहारली."
"जातेस की नाही?" जुलैला ओरडली.
"जुलैलाबाई, आमचा जीव घ्यायचा विचार दिसतोय."
"नाही दादासाहेब. तुमचा जीव घेण्याइतकी ताकद माझ्या कट्यारीत नाही."
"मग?"
"जीव देण्यासाठी..."
"जुलैलाबाई!" दादासाहेब ओरडले.
"आम्ही आता पराभूत आहोत दादासाहेब. गुलामच म्हणा ना. पण काही कामे गुलामी स्वीकारूनही जमत नाहीत."
निगारने कट्यार आणली.
"जीव देण्याची गरज नाही, जुलैलाबाई." दादासाहेब शांतपणे म्हणाले.
"पण, एक लक्षात ठेवा, त्या डोळ्यांना मी आता आयुष्यात विसरू शकणार नाही. जेव्हा कधीही मला फक्त ते डोळे दिसतील ना, त्याक्षणी मी तिला ओळखेन."
"आग आहे दादासाहेब ती, आणि तुम्ही बर्फ. तुमचं पाणी पाणी करून टाकेल ती."
"...आणि पाणीच आग विझवतं जुलैलाबाई."
"मैं राह देखूंगी दादासाहेब, ये आग और बर्फ का खेल देखनेकी."
"मात्र मार्ग सांगणार नाही, असच ना." दादासाहेब हसले.
जुलैलाने फक्त स्मितहास्य करून उत्तर दिलं.
दादासाहेब उठले.
"चला येतो मी... त्यांनी दोन्ही हात जोडले."
जुलैलानेही त्यांना नमस्कार केला.
दादासाहेब व खानसाहेब हवेलीतून बाहेर पडले.
◆◆◆◆◆
संध्याकाळी मोक्ष आणि झोया हवेलीवर परतले.
"कसा होता आजचा दिवस मोक्षसाहेब?"
"मस्त. बरीच माहिती मिळाली."
"झोया, काय म्हणतोय तुझा स्टुडन्ट?"
"नॉट सो शार्प. निड पॉलिशिंग."
"धन्य आहेस!" मोक्षने हात जोडले.
"चला, तुम्ही फ्रेश व्हा. मोक्षसाहेब, तुम्ही आराम करा. झोयाबेटा. तुसुद्धा."
"जी खानसाहेब..." मोक्ष त्याच्या खोलीकडे निघाला.
"झोयाही त्याच्या मागोमाग निघाली."
"झोयाबेटा थांब."
झोया मागे वळली.
"खरोखर सांग, कशी आहे त्याची प्रगती?" खानसाहेब हळू आवाजात म्हणाले.
"तो दुसरा दादासाहेब आहे अब्बू..."
"काय?"
"हो. ना त्याच्या हाताला झटका लागला, ना त्याची पकड ढिली झाली. कसलेल्या नेमबाजाचीसुद्धा पकड अशी नसते."
"काय सांगतेस?"
"हो. एके १२ सुद्धा हा एका हाताने घट्ट धरू शकेल."
"झोया, माशाला पोहायला शिकवावं लागत नाही."
"अब्बू, याला थोडं अजून शिकवलं ना, हा मलाही मागे टाकेल."
खानसाहेब हसले.
"तुझी जागा कुणी नाही घेऊ शकत झोया, तू एकमेव आहेस."
"थँक्स." झोयासुद्धा हसली. "पण अब्बू त्या हवेलीत गेल्यावर हा वेगळंच बोलायला लागला."
"काय?" खानाने उत्सुकतेने विचारले.
"की मी या हवेलीत पूर्वी आलोय, या हवेलीतील प्रत्येक गोष्ट मला ओळखीची वाटतेय असं."
"झोया, उद्यापासून त्याला हवेलीत घेऊन जाऊ नकोस. ओके?" खानसाहेब कळवळून म्हणाले.
"का अब्बू?"
"ऐकत जा झोया. ऐकत जा."
"ठीक आहे." झोया म्हणाली.
"जा तू आराम कर आता. दमली असशील."
झोयाने आश्चर्याने त्यांच्याकडे बघितले, व न बोलता तिथून निघून गेली.
◆◆◆◆◆
रात्री जेवणाच्या वेळी खानसाहेब मोक्षच्या।खोलीत गेले.
मोक्षला बिर्याणी खाताना बघून त्यांना धक्काच बसला.
हाताच्या सगळ्या बोटांचा वापर करून कसलेल्या खवय्याप्रमाणे तो बिर्याणी खात होता.
"मोक्षसाहेब, आत येऊ का?"
"या ना." त्याने ताटावरून नजरही हटवली नाही.
"मोक्षसाहेब, चमचा दिला नाही का पोराने?"
"चमचा दिला, काटा चमचा दिला,नॅपकिन दिला. आणि मी बाजूला ठेवला." मोक्ष हसला.
"सरावताय तुम्ही मोक्षसाहेब."
"कुणी सोकवायच्या आधी, आपण सरावलं पाहिजे, नाही का?" मोक्ष हसला.
खानसाहेब काहीही बोलले नाही. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला, व बोलण्यास सुरुवात केली.
"मोक्षसाहेब. तुमच्यावर हल्ला झाला होता."
"हो, त्याचं काय?"
"मारेकऱ्यांची ओळख पटली."
मोक्षचा हातातला घास क्षणभर थबकला. मात्र त्याने निवांतपणे जेवणास सुरुवात केली.
"कोण होते ते खानसाहेब?"
"रामचरण शुक्ला आणि राजू शर्मा."
"बरं, काही हिस्ट्री?"
"हो. दोघेही कानपूरचे आहेत. "
"अजून काही ओळख.?"
"दोघेही युवाशाखेचे कार्यकर्ते आहेत."
मोक्ष थबकला.
त्याने ताट बाजूला केलं.
"संग्रामचीच युवाशाखा ना?'
"हो."
तुम्हाला कसं समजलं?
"खिशात ओळखपत्रे मिळाली, आणि आधार कार्डही. सगळ्या गोष्टी अस्सल आहेत..."
मोक्ष मोठयाने हसला.
"म्हणजे संग्रामचा याच्यात बिलकुल हात नाही. आपण उगाच त्याच्यावर संशय घेत होतो."
"काय बोलताय मोक्षसाहेब? धडधडीत पुरावे आहेत..."
"म्हणूनच तर म्हणतोय. कुठलाही मारेकरी पुरावे मागे ठेवत नाही, यांनी तर सरळ ताटात वाढले. दुसरी गोष्ट, युवाशाखेत फक्त मराठी माणूस अलाऊड आहे, हे भाडोत्री मारेकरी आहेत."
"मोक्षसाहेब म्हणजे?"
"म्हणजे कुणीतरी मोठा शत्रू दबा धरून बसलाय, सावध राहायला हवं खानसाहेब... अजून बिर्याणी पाठवून द्या."
खानसाहेब मोक्षकडे बघतच राहिले.
क्रमशः
लहान भाग...
लहान भाग...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
लहान भाग
लहान भाग
) प्रगती करतोय.
)
मोक्ष हळूहळू ( की पटापट
पुढील भागाच्या प्रतिक्षेत....
( I hope पुढील भाग मोठा असेल
नेहमीप्रमाणे छान ...भाग थोडे
नेहमीप्रमाणे छान ...भाग थोडे मोठे टाका
नेहमीप्रमाणे छान! मोक्षपण
नेहमीप्रमाणे छान! मोक्षला पण बिर्याणी आवडते तर
पुभाप्र !
नेहमीप्रमाणे उत्तम भाग!!
नेहमीप्रमाणे उत्तम भाग!!
छोटा भाग, पण क्वालिटी कंटेंट.
छोटा भाग, पण क्वालिटी कंटेंट.
शेवटचा सेक्शन २ दा वाचला... मस्त
लवकर आणि मोठा भाग येऊ दे
लवकर आणि मोठा भाग येऊ दे
छानच!!
छानच!!

पु.भा.प्र.
प्रसाद दिल्यासारखा काय भाग लिहितोयस
मस्त जमलाय हा भाग. सुरवात
मस्त जमलाय हा भाग. सुरवात अपेक्षेप्रमाणे झाली पण शेवट मात्र एकदम सही ... लगे रहो
भारीच !!
भारीच !!
शनिवार संपत आलाय. .. पुढील
शनिवार संपत आलाय. .. पुढील भाग लवकर येऊ देत.
पुढचा भाग टाकला आहे.
पुढचा भाग टाकला आहे.
धन्यवाद. .
धन्यवाद. .