काय म्हटले की तुम्हाला काय आठवते?

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 December, 2020 - 02:44

म्हणजे बघा, हं
सनी म्हटले की कोणाला सुनिल गावस्कर आठवतो, कोणाला सनी देओल आठवतो, तर कोणाला सनी लिओनी आठवते.

राहुल म्हटले की एखाद्याला राहुल द्रविड आठवतो तर एखाद्याला राहुल गांधी..... मला मात्र शाहरूख आठवतो

अगदी राम म्हटले तरी मी नास्तिक असल्याने रामायणाच्या रामाआधी मै हू ना मधील राम झालेला शाहरूखच आठवतो

अभिषेक म्हटले की ज्युनिअर बच्चन आठवत असेल लोकांना, पण मला किनई तुमचा अभिषेकच आठवतो Happy

सचिन म्हटले की सचिन तेंडुलकरच डोळ्यासमोर येणारे करोडो असतील, पण माझ्यासारखेही शेकडो असतील ज्यांच्या डोळ्यासमोर महागुरू सचिन पिळगावकर देखील सोबतच येतात.

डॉन म्हटले की अमिताभ की शाहरूख या वादात न जाता आजही माझ्या डोळ्यासमोर दाऊद ईब्राहीमच येतो.

हे झाले व्यक्तींचे,
वडा म्हटले की काय येते तुमच्या डोळ्यासमोर... बटाटावडा की मेंदूवडा...?
मला आमचे मालवणी वडे आठवतात जे गावरान कोंबडीसोबत खाल्ले जातात Happy

ती आमीरखानची जाहीरात नाही का, थंडा बोले तो कोकाकोला... म्हणजे मिनरल वॉटर म्हटले की जसे कित्येकांच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा बिस्लेरीच यायची तसे थंडा म्हटले की लोकांना कोकाकोलाच आठवायला हवे हा त्या जाहीरातीमागचा फंडा.

बर्र ऑमलेट म्हटले की काय आठवते? अर्थात, मला तरी अंड्याचे ऑमलेट आठवते. शाळेत असताना एकाने ऑमलेट खाणार का विचारत डब्यातून बेसनाचा पोळा काढलेला तेव्हा अशी सटकलेली माझी.... तोपर्यंत या प्रकारालाही टोमेटो ऑमलेट बोलतात याची कल्पना नव्हती.
हेच पोळी बोलून पुरणापोळीच्य जागी चपाती देणार्‍यांबाबतही व्हायचे. आणि यात चूक ना त्यांची ना माझी..

असो,
मेट्रो म्हटले की आजही डोक्यात पहिले मेट्रो ट्रेन न येता मेट्रो टॉकिजच येते, कारण जुन्या मुंबईशी नाळच तशी जुळली आहे Happy
आणि हि फार्र मोठी लिस्ट आहे...

दरवेळी एखादे नाव वा शब्द कानावर पडताच आपल्याला त्या नावाची सर्वाधिक प्रसिद्ध व्यक्ती वा वस्तूच आठवावी असे गरजेचे नसते, कारण आपला मेंदू म्हणजे काही गूगल सर्च नाहीये.
बरेचदा आपले वैयक्तिक संदर्भ वा आवडही एक असते ज्यानुसार ते ते पहिले डोक्यात येते.
वस्तू, मनुष्य, पशू पक्षी, स्थळ, काळ, घटना वगैरे बरीच आणि विविध प्रकारची सूची बनेल...
ईथे तेच करूया, धागा विरंगुळा ग्रूपमध्ये आहे, तर कोणी काय म्हटले की तुम्हाला पहिले काय आठवते ते लिहूया आणि थोडा विरंगुळा मिळवूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नादोपा म्हणजे?
म्हणजे काय म्हणजे, वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान, तुझे लग्न शुभ मंगल सावधान Proud

मला काय म्हटले की आमच्या गावच्या एक काकू आठवतात. त्या बोलताना नेहमी समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारायच्या कॉssय? म्हणुन .
आवडली का रे चकली? कॉssय?
आमंत्रण द्यायला आल्या तरी शेवटी "मग येणार ना नक्की कॉssय?"

आणि दुसरं म्हणजे, काय बाई सांगू कसं गं सांगू हे गाणं.

धुंदी कळ्यांना... गाण्याचा karaoke track लॉकडाऊनच्या काळात इतक्या वेळा ऐकला गेलाय कि आजकाल डोअरबेल सुद्धा दोनवेळा ऐकायला आली कि त्या गाण्याचे तशाच पद्धतीची सुरवात आठवून ते गाणे आपसूकच मनात प्ले होऊ लागते Happy

मला कोणताही वार म्हटलं कीं कोकणातल्या आमच्या गांवाच्या आसपासच्या गावांचे आठवडा बाजाराचे ठरलेले वारच आठवतात. ( मंगळवार- वालावल, बुधवार- कुडाळ, शुक्रवार- परूळे इ.इ. ) कारण, लहानपणी सुटींत गांवीं असलों की हे बाजार मोठं आकर्षण असायचं.

कोर्ट ऐकलं की गवि आणि त्यांच्या कोर्टटिपा आठवतात.
तिरंगा, झेंडा असं काही ऐकलं की फारएंड आठवतात.

मला,
कोर्ट म्हटलं कीं बॅडमिंटन, जज्ज म्हटलं कीं लाकडी हातोडा, आरोपी म्हटलं कीं स्थितप्रज्ञ व साक्षीदार म्हटलं कीं बाऊन्सर अंगावर घेणारा अकरावा फलंदाज आठवतो.

general theory of relativity आणि special theory of relativity
हे दोन जेंव्हा जेंव्हा मी वाचतो तेंव्हा मला साधा चहा आणि स्पेशल चहा आठवतो
(असे वाटते कि आईन्स्टाईनने थोडी वेलची टाकून special theory of relativity बनवली असेल)

कुत्रा म्हटले कि अर्णब
फेकू, चोर, दंगेखोर म्हटले कि मोदी
तडीपार म्हणजे AS
पप्पु म्हणजे रागा
viagra म्हटल्यावर सिनियर मुंडे
सेटलमेंट, तोडिपाणी म्हटल्यावर राज ठाकरे.
चारापाणी म्हटल्यावर लालू
डायबिटीसचे औषध म्हटल्यावर अशोक सराफ.
विदूषक म्हटले तर लक्ष्या.
बोकड म्हटल्यावर शारुख
उंबरठा म्हटल्यावर स्मिता पाटील
वायफळ म्हटल्यावर तोरसेकर
क्रिकेट म्हटल्यावर सचिन
पेंग्विन म्हटल्यावर जुनियर ठाकरे
fumble म्हटल्यावर सिनियर ठाकरे
कोंबडी म्हटल्यावर राणे
अय म्हंटल्यावर लवांडे

डॅम इट म्हटलं की इंस्पेक्टर महेश
वाड्यावर चला म्हटलं की नीळुभाऊ
आये म्हटलं की दादा.
धरण म्हटलं तरी दादाच.

का.म्ह.की.तु.का. च्या सेरीज मध्ये हे काही जुने...

पारले-जी म्हटले कि ते बाळ
मरफी म्हटले कि ते दुसरे बाळ
निरमा म्हटले कि ती मुलगी

माबोवरची भांडणे बघून(की वाचून?) हे गाणे आठवते...

नफ़रत की लाठी तोड़ो, लालच का खंजर फेंको
ज़िद के पीछे मत दौड़ो, तुम प्रेम के पंछी हो
देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों..

https://youtu.be/nam9Rv7-qrw

असे वाटते कि आईन्स्टाईनने थोडी वेलची टाकून special theory of relativity बनवली असेल>> Lol
पार्लेजीचे बाळ सहमत... आता हे नवीन बाळ बघा , थोडं मोठं आहे. मला आता दोघेही आलटून पालटून आठवतात.
Screenshot_20210207-093707_WhatsApp.jpg

शांत माणूस धन्यवाद धागा वर काढलात...

लॉलीपॉप म्हटल्यावर जर चिकन लॉलीपॉप आठवले तर समजावे पोरगा मोठा झाला Happy

मी पुन्हा येईन ....
खळळ खट्याक
मितरों
कॅडाक
आता माझी सटकली, कितने आदमी थे,
बनाना है

मानव Lol
मग वयात आला समजावे Wink
लग्नाचे वय काय असावे हा कायदा ठरवायला हा निकष उत्तम आहे...

Pages