ह्या वर्षाची सुरवातच कोरोनाच्या विळख्याने झाली. चांगल्या चालत असलेल्या जीवन शैलीला खिळ बसली. आयुष्य ठप्प झाल्या सारखं झालं. आम्ही तर आज ना उद्या हा काळोखी बोगदा संपेल आणि प्रकाश येईल ह्या आशेवर मार्च पासून जवळ जवळ घरातच राहून दिवस काढतोय. पण कालचक्र थांबत नाही. बघता बघता दसरा संपला ,दिवाळीचे वेध लागले आणि यजमानांच दरवर्षी नोव्हेम्बरमध्ये सबमिट कराव लागणार लाईफ सर्टिफिकेट ह्या वर्षी बँकेत न जाता कसं सबमिट करायचं ही चिंता मला सतावू लागली. यजमानांच पेंशन ठाण्याच्या बँकेत आणि आमचा सध्या मुक्काम साताऱ्यात यामुळे तर हे काम जास्तच कठीण वाटू लागलं.
कोरोनाच्या काळात जेष्ठांनी बाहेर जाणं, बँकेतल्या गर्दीत मिसळण तस धोक्याचं आहे हे ओळखून ह्या वर्षी online submission ची सुविधा उपलब्ध केली गेलीय. त्या साठीची लिंक ही मिळाली होती नेटवर. पण डिटेल्स बघितले तेव्हा कळलं की त्यासाठी नुसता मोबाईल पुरेसा नव्हता, हाताचे ठसे रेकॉर्ड करणार एक छोटंसं डिव्हाईस ही लागणार होतं जे माझ्याकडे नव्हतं. त्यामुळे तो मार्ग बंद झाला. म्हणजे पुन्हा परिस्थिती जैसे थे.
तशातच पोस्टमन घरी येऊन on line life certificate issue करेल अशी बातमी वाचण्यात आली. ते app डाऊन लोड करून तिथे रिक्वेस्ट पाठवली तर जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करा असं त्यांचं उत्तर आलं. म्हणजे त्या साठी तरी बाहेर पडावं लागणारच होतं जे
मी कोरोनाच्या काळात टाळत होते. आता बँकेत समक्ष जाण्याला पर्याय नाही ह्या विचारापर्यंत मी येऊन पोचले पण तेवढ्यातच आमच्या एका सुहृदानी एका पोस्टमन चा मोबाईल नंबर दिला आणि पुन्हा बाहेर न जाता life certificate मिळवण्याची आशा पल्लवित झाली.
मी पोस्टमन चा मोबाईल नं डायल केला. जनरली समोरून अश्या कॉलला रिस्पॉन्स येत नाही असा पूर्वानुभव असल्याने तिसऱ्याच रिंग ला पलीकडून हॅलो ऐकून आश्चर्याचा पहिला धक्का बसला. अतिशय सौम्य आणि मृदू आवाजात माझा पत्ता विचारला गेला आणि मला काय काय documents तयार ठेवावी लागतील हे सांगून पुढील दोन चार दिवसांत येतो असे आश्वासन ही मिळाले.
आपल्याला गरज आहे तेव्हा पाच सहा दिवसांनी आपणच परत फोन करू या हया विचारात मी असतानाच दोन तीन दिवसांनी दुपारी दीड च्या सुमारास फाटक वाजलं तर पोस्ट मनच दारात उभा. एकाच कॉल मध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर हजर हा दुसरा धक्का होता. हे माझ्यासाठी अगदीच अनपेक्षित होत त्यामुळे जरा गोंधळूनच गेले मी. पण मास्क, सॅनिटायझर इ. आयुधांनिशी सगळी documents घेऊन आम्ही त्याना सामोरे गेलो. आयत्या वेळी टेक्नॉलॉजी नीट वर्क होईल ना , बोटांचे ठसे नीट मिळतील ना अशी शंका मनात होतीच. त्याप्रमाणे पहिल्यावेळी कुठेतरी गडबड झाली आणि काम झालं नाहीच पण त्यांनी काही ही न बोलता परत सगळं पुन्हा केलं आणि तेव्हा मात्र online life certificate मिळवण्यात यश आलं. पोस्टमनने त्याचा स्क्रीन शॉट ही माझ्या मोबाइलवर शेअर केला.
इतक्या सुरळीतपणे काम झालं म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानले. खूप चांगली सेवा दिल्या बद्दल खरंच खुश होऊन त्यानी जास्त रकमेची मागणी केलेली नसताना ही मीच आनंदाने भरघोस टिप दिली त्यांना. जेष्ठांची काळजी घेण्याची आंतरिक उर्मी, तंत्रज्ञानातील प्रगती आणि ते नीटपणे राबवण्याची इच्छाशक्ती असणारा कर्मचारी वर्ग यामुळेच घरच्या घरी काम झालं ह्या विचारात असतानाच परत फोन वाजला . आपलं काम झालं ना अशी गोड आवाजात चौकशी केली गेली. मी काम झाल्याचं सांगितलं. धन्यवाद दिले. पण बोलत असताना माझ्या लक्षात आलं की मी save केलेला हा नंबर आणि स्क्रिन शॉट पाठवलेला नंबर वेगवेगळे आहेत. त्याच झालं असं होतं की माझ्याकडे नंबर असलेल्या पोस्टमनना वेळ नसल्याने त्यानी दुसऱ्या एका पोस्टमनना आमच्या कडे पाठवले होते आणि म्हणूनच फोन करून ते माझ्या कामाची चौकशी करत होते. म्हणजे आमचं काम केलेले पोस्टमन कुणी दुसरेच होते तर ... हा माझ्यासाठी आश्चर्याचा तिसरा धक्का होता.
ज्यांच्या मुळे माझं काम इतक्या बिनबोभाट पणे झालं होतं त्यांची उतराई होण्यासाठी ह्या वर्षीची दिवाळी घेण्यासाठी सवड मिळेल तेव्हा नक्की या असा मी त्यांना फोन केला तर "अहो मॅडम , कसली बक्षिसी देताय हे तर आमचं कामच आहे " अश्या विनयशील शब्दात नकार देऊन मला आश्चर्याचा आणखी एक सुखद धक्का दिला.
आपण सरकारी यंत्रणे बाबत कधीच समाधानी नसतो. सरकारी काम आणि सहा महिने थांब अश्या म्हणी वगैरे ही आहेत. परंतु मनाची उभारी वाढवणारे , जगातल्या चांगुलपणाची प्रचिती देणारे असे सुखद अनुभव ही येतात कधी कधी आणि मग परत एकदा हे जग सुंदर दिसायला लागत ...आणि मनाला छान , उत्साही वाटतं ...
धन्यवाद ममो.
धन्यवाद ममो.
मनिमिहोर तुमचा चांगला अनुभव
मनिमोहोर तुमचा चांगला अनुभव इथे लिहिल्यामुळे मला नवीन मिळाली. धन्यवाद.
70 रुपये रेट आहे
70 रुपये रेट आहे
>>>
ममो ताई हो, आईच्या मैत्रीणीने हाच आकडा सांगितलेला. पण त्या पीडीएफमध्ये काम झाल्यावर पैसे घेतील ईतकेच लिहिलेले. ठिकाणानुसार बदल असू शकतो. पण सोयीच्या मानाने हे अल्पदरातच आहे.
सकारात्मक अनुभव चांगले
सकारात्मक अनुभव चांगले वाटले. मला पोस्टाचा कायम चांगलाच अनुभव आलाय. गेल्या वर्षी चक्क मनी ऑर्डरही केली होती.
प्रत्यक्श बँकेत जाणे हाच
प्रत्यक्श बँकेत जाणे हाच पर्याय . कधी कधी आधार अपडेट केल्यास ( तिथेही सेंटरला जावे लागतेच) मॅच होतात ठसे. >>>>>
बँकेत बोलणे झाले आहे... त्यांनी सांगितलं की सगळ ऑन लाईन केला आहे..
छान सकारात्मक अनुभव !
छान सकारात्मक अनुभव !
कोणालाही बोटाचे ठसे देताना
कोणालाही बोटाचे ठसे देताना क्रुपया योग्य काळजी घ्यावी. ह्याचे स्कॅम सुरू होऊन ज्ये. नागरीकांना लुबाडलं जाऊ नये....
धन्यवाद सर्वांना . सगळे
धन्यवाद सर्वांना . सगळे प्रतिसाद ही माहितीत भर घालणारे .
ममो ताई हो, आईच्या मैत्रीणीने हाच आकडा सांगितलेला. पण त्या काम झाल्यावर पैसे घेतील ईतकेच लिहिलेले. ठिकाणानुसार बदल असू शकतो. पण सोयीच्या मानाने हे अल्पदरातच आहे. >> रेट युनिफॉर्म 70 RS च आहे.जो खूप च कमी आहे. कोणी खुश होऊन टिप दिली तर होतील थोडे अधिक पैसे. प्लस कदाचित पोस्ट खात देत असेल पर केस इनसेंटिव्ह .
बँकेत बोलणे झाले आहे... त्यांनी सांगितलं की सगळ ऑन लाईन केला आहे.. > मग कदाचित मेन ऑफिस ला जावं लागेल तुम्हाला.
ह्या वर्षी मी ठाण्याच्या
ह्या वर्षी मी ठाण्याच्या पोस्ट ऑफिस ला मेल पाठवली. मला ही सर्व्हिस हवी आहे अशी.
मेक ला लगेच उत्तर आलं ज्यात पोस्टमन चा मोबाईल नं दिलेला होता. मी फोन करण्याचा आधीच त्यांचा फोन आला, अमुक दिवशी अमुक वेळेला येतोय असा.
तर दिवशी बरोबर ते अगदी वेळेवर आले . तीन चार वेळा ट्राय करावा लागला ते ही त्यांनी न कुरकुरता केलं आणि अखेर झालं लाईफ certificate अपलोड.
इतकी चांगली सर्व्हिस मिळाली म्हणून मी तर भारवूनच गेले. कारण ह्या वर्षी ही घरबसल्या गर्दीत न मिसळता काम झालं. ह्या साठी फक्त सत्तर रुपये चार्ज हा तसा सोयीच्या मानाने खूपच रिझनेबल आहे. काही लोकं देत असतील टिप पण ते ऐच्छिक आहे. प्रति केस सरकार ही काही कमिशन देत असेल तर माहीत नाही. असो. मोटीवेशन काही ही असलं पण सेवा सुपर आहे.
तीन चार वेळा ट्राय करावा
तीन चार वेळा ट्राय करावा लागला ते ही त्यांनी न कुरकुरता केलं आणि अखेर झालं लाईफ certificate अपलोड.>>>> मझ्या आईचे थंब इम्प्रेशन नाही झाले,मग तिला सहीसाठी न्यावे लागले.म्हटले पुढच्या वर्षी नाही मिळाली पेन्शन तरी चालेल्,तुला इतके लांब जायला नको.
पोस्टाचा कारभार प्रचंड
पोस्टाचा कारभार प्रचंड सुधारला आहे.
सध्या ग्रामिण पोस्ट्मनचा बेमुदत संप आहे त्यामुळे आमच्या गावचे पोस्ट्मन घरी बसलेत. गावी कुरियर येत नाही त्यामुळे कोणा मित्रमैत्रिणींना काही पाठवायचे असेल तर पोस्टाने पाठवा असेच आम्ही सांगतो. तर लेकीची दोन पार्सले पोस्टाने येणारहोती, त्याची चौकशी करायला ती पोस्टात गेली तेव्हा संपाचे कळले. त्यातल्या त्यात चांगले एवढेच होते की पोस्टात नव्याने लाग्ळेली पोस्ट वुमन संपात नव्हती, तिला काम करण्याची सवलत होती. लेकीला तिच्या पार्सलांची काळजी वाटली म्हणुन तिने इन्डिया पोस्टच्या ट्विटरवर ट्विट केले की माझी अशी अशी पार्सले येताहेत ती आता संपामुळे मला कशी मिळणार,?
ट्विटचे उत्तर आले नाही पण काल पार्सले आलीत हे ट्रॅकरवर कळल्याबर ती पर्सले आणायला पोस्टात गेल्यावर तिथली मुलगी म्हणाली, तुम्ही तक्रार का केली, मी तुमची पार्सल आणणार होतेच सावंतवाडीला जाऊन. ( तिकडचे पोऑ ग्रामिण नाही त्यामुळे तिथे संप नाही). मुलीने मग तिला व्यवस्थीत सांगितले तिने केलेल्या ट्विटबद्दल.
पण इन्डिया पोस्ट वर केलेल्या ट्विटवरचे कमेंट एका छोट्याश्या गावात पोचुन त्यावर कार्यवाही केली जाते हे बघुन आश्चर्य वाटले. ट्विट कामाला येते हे माहित होते कारण पार्सले गहाळ झाल्यावर त्या संबंधात ट्विट करुन लेकिने ती मिळवली होती पण गहाळ पार्सले शहरात हरवली होती, गावातही ट्विट पोचेल वाटले नव्हते.
सेवानिवृत्त व्यक्ती अपंग अथवा
सेवानिवृत्त व्यक्ती अपंग अथवा आजारपणामुळे जाऊ शकत नसल्यास बँकेला तसा पुरावा दिल्यास ते एक फॉर्म देतात तो भरायचा. या फॉर्म मध्ये मी नोकरी करत नाही दुसरे लग्न केले नाही वगैरे वगैरे माहिती असते. बँकेतल्या सबंधित अधिकाऱ्याला व्हिडिओ कॉल करायला सांगायचा. मग ते व्हिडिओ कॉल करतात तो व्हिडिओ कॉल चालू असताना सेवानिवृत्त व्यक्तीने त्या फॉर्मवर सही करायची.
हे प्रोसिजर स्टेट बॅंक करते.
अथवा ते कोणालातरी घरी पाठवतात. त्यांच्यासमोर फॉर्मवर सही करायची व द्यायचा.
कुठेतरी एक पेन्शनरचे पेन्शन लाईफ सर्टिफिकेट साठी बँकेने थांबवले तो कोर्टात गेला व कोर्टाने बँकेने लाइफ सर्टिफिकेट मिळवायला हवे ही त्यांची जबाबदारी आहे अशी ऑर्डर केली . त्यामुळे अशा बाबतीत बँका हल्ली व्यवस्थित सहकार्य करतात.
साधना, छान वाटल वाचून.
साधना, छान वाटल वाचून.
ट्विटचे उत्तर आले नाही पण काल पार्सले आलीत हे ट्रॅकरवर कळल्याबर ती पर्सले आणायला पोस्टात गेल्यावर तिथली मुलगी म्हणाली, तुम्ही तक्रार का केली, मी तुमची पार्सल आणणार होतेच सावंतवाडीला जाऊन. ( तिकडचे पोऑ ग्रामिण नाही त्यामुळे तिथे संप नाही). >> किती बदल झालाय.
बँकेतल्या सबंधित अधिकाऱ्याला व्हिडिओ कॉल करायला सांगायचा. मग ते व्हिडिओ कॉल करतात तो व्हिडिओ कॉल चालू असताना सेवानिवृत्त व्यक्तीने त्या फॉर्मवर सही करायची.
हे प्रोसिजर स्टेट बॅंक करते. >> होय बरोबर , ही सुविधा ही घेतली आहे मी.
विडिओ कॉलिंग करून kyc करणे
विडिओ कॉलिंग करून kyc करणे येत्या काही वर्षांत पसरेल बहुतेक. Kotak811 हे बँक अकाउंट (zero balance bank account) मी घरून उघडले आणि घरूनच kyc केले.
सरकारी digilocker site वर PAN, AADHAAR, RATION CARD UPLOAD केलंय. तिथूनच लाइफ सर्टिफिकेट पाठवायची सोय करायला हवी. (फोनमधील finger print scanner वापरून).
सध्या ऑनलाईन हायातीचा दाखला
सध्या ऑनलाईन हायातीचा दाखला भरता येतो का? मुंबईत बँक खात आहे आणि वडील गावी आहेत तर ऑनलाईन दाखल करता येतो का? गावच्या बँके शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना काही माहिती नाही असं उत्तर दिलंय.
मेघा ऑनलाईन भरता येतो दाखला.
मेघा ऑनलाईन भरता येतो दाखला.पण एकच कॅविएट आहे की फोन नंबर आधारशी लिंक पाहिजे.
जीवनप्रमाण ॲपही आहे. ते डाऊनलोड करून फिंगर स्कॅन (त्यासाठी वेगळी प्रोसेस इथेच वर लिहिली होती) किंवा मोबाईलने फेस स्कॅन ( ॲक्चुअली रेटीना स्कॅन) करावं लागतं.
आई व साबांचं यावर्षी जीवनप्रमाण ॲपवरून सबमिट केलं.
धन्यवाद माझेमान
धन्यवाद माझेमान
करायला ती पोस्टात गेली तेव्हा
करायला ती पोस्टात गेली तेव्हा संपाचे कळले...... तरीच माझे एक कुरिअर 20-२५ दिवस झाले तरी आले नाही.
तसेच माझ्या ऑफिसमध्ये मी,मेमध्ये एक फॉर्म भरून पाठवला तो 2 महिन्यांनी address is not found म्हणून आला.पत्त्याची खातरजमा केली.तोच पत्ता आहे.पोस्टातील मुलगी म्हणाली तुम्ही RAD करून पाठवा.तेही केले.acknowledgment ali nahi.
मेघा, देवकी काल लिहायचं
मेघा, देवकी काल लिहायचं राहिलं. जीवनप्रमाण ॲपसोबत आधारफेसआरडी ॲपपण लागेल फेसस्कॅनसाठी.
माझ्या मावशीचं (वय ९४) लाइफ
माझ्या मावशीच्या (वय ९४) लाइफ सर्टिफिकेटची प्रक्रिया महिला पोस्ट कर्मचारी मावशीच्या घरी येऊन करत असताना मला तिथे हजर असण्याचा योग आला.
कधी येणार ते आधी सांगितलं , त्या दिवशी सकाळी पुन्हा फोन आला. माहिती भरताना आलेल्या शंका ( म्हणजे नक्की काय भरायचं , अकाउंट नंबर मध्ये डॅश आहे की स्लॅश की काहीच नाही) वरिष्ठांना किंवा तिच्या सहकर्मचार्यांना फोन करून तिने सोडवल्या. त्यात सगळी माहिती दोनदा भरावी लागली. काही चुकलं तर पेन्शन जमा होणार नाही. तसं होऊ नये याची तिने काळजी घेतली.
मावशीचा फोटो ती डोळ्यांची उघडझाप करताना असा हवा होता. अर्धोन्मीलित ?
अर्थातच प्रभावित करणारा अनुभव.
मावशीचा फोटो ती डोळ्यांची
मावशीचा फोटो ती डोळ्यांची उघडझाप करताना असा हवा होता. अर्धोन्मीलित ? >>> व्हिडीओ असेल. जीवन प्रमाण वर पण तसे करायला सांगतात.
मी विचारलं व्हिडियो घेताय का,
मी विचारलं व्हिडियो घेताय का, तर ती फोटो म्हणाली.
फेस identification करत असतील
फेस identification करत असतील तर उघड झाप करावी लागते डोळ्यांची.
भरत , 94 व्या वर्षी एवढं सगळ मावशी करू शकल्या हे खूपच भारी वाटतंय.
मी केलं माझं on line certificate तेव्हा माझ्या पुढे एक वयस्कर बाई होत्या , त्यांना डोळ्यांची उघड झाप जमत नव्हती म्हणून त्याचं काम झालं नाही.
मावशीला फक्त फोटोसाठी बसायचं
मावशीला फक्त फोटोसाठी बसायचं होतं. बाकी सगळं तिच्या लेकीने केलं. अपॉइंटमेंट घेणं, कागदपत्र दाखवणं, ओटीपी सांगणं. अर्थात मावशी अजूनही सोबत घेऊन बाहेर जाते.
हे फारच अवांतर होईल. मावशीने दहा बारा वर्षांपूर्वी ब्रह्मविद्येचा प्रगत अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. हा दोन वर्षांचा असतो. ती अजूनही ब्रह्मविद्येचे श्वसन - व्यायाम जमेल तसे करते.
ढकलपत्रावरून
ढकलपत्रावरून (ही माहिती वापरून बघितली आहे.)
*नमस्कार To all Retirees.*
Since November has approached and it is now time for all to give their *Life certificate* to the Bank.
The Govt has made the process very easy with Digital Life certificate submission.
All Retirees are herewith advised to download two apps developed by Govt / UIDAI, Jeevan Pramaan and AadhaarFaceRD through Google's Play Store (for Android phones). The screen shot are as given below.
Once both the apps are downloaded user needs to open Jeevan Pramaan software. Once the same is opened you will get a screen to enter your Aadhar number, mobile number and email id. You will receive an OTP which needs to be feed and submit.
The system will then prompt you to allow the app to use AadharFaceRD, please select Allow.
Once done you will receive some instructions to capture your face, remove your dark glasses if any and to blink your eyes when prompted.
Click the I agree box and proceed.
Your camera will get activated and you need to hold steady to capture your face on camera and need to blink your eyes once when prompted.
In a few seconds you will receive a message that your life certificate has been generated and will be submitted to the concerned Bank / pension issuing agency.
You can then opt for downloading the society generated DLC (Digital Life certificate) for future reference in case of need.
Kindly note that your Aadhar number should be registered with the pension bank account and the mobile number should be the same as given in your Aadhar card.
Any problem faced by any retiree may contact Chetan Shah on mobile number 7977813143 from 4th Nov 2024 onwards between 10:00 am to 1:00 pm and 5:00 pm to 8:00 pm.
94 व्या वर्षी एवढं सगळ मावशी
94 व्या वर्षी एवढं सगळ मावशी करू शकल्या हे खूपच भारी वाटतंय. >>> +१
जीवनप्रमाण ॲपसोबत आधारफेसआरडी
जीवनप्रमाण ॲपसोबत आधारफेसआरडी ॲपपण लागेल..... M आधार ॲप होते.त्यामुळे जीवन प्रमाणच्या साईट वर स्कॅन करायला येते.
पण माझे 4 वेळा करून (वेगवेगळ्या दिवशी) करून झाले नाही.सो physical submission झिंदाबाद.पण बऱ्याच जणांचे dlc झाले.
आईच्यावेळी SBI चे मॅनेजर, व्हेरिफिकेशनसाठी घरी आले.स्टाफ नाही म्हणून ते आले.मागच्या वर्षी peon ala होता.
सध्या ऑनलाईन हायातीचा दाखला
सध्या ऑनलाईन हायातीचा दाखला भरता येतो का? मुंबईत बँक खात आहे आणि वडील गावी आहेत तर ऑनलाईन दाखल करता येतो का? गावच्या बँके शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना काही माहिती नाही असं उत्तर दिलंय.>>>>>>
@meghask
पेन्शन जर जिल्हा परिषद ची ( शिक्षक ई.) असेल तर जिथे पेन्शन अकाउंट आहे त्या बँक ब्रांचमध्ये सही करण्यासाठी लिस्ट येते , ऑनलाईन सबमिशन ग्राह्य मानले जात नाही.
मावशीने दहा बारा वर्षांपूर्वी
मावशीने दहा बारा वर्षांपूर्वी ब्रह्मविद्येचा प्रगत अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. हा दोन वर्षांचा असतो. ती अजूनही ब्रह्मविद्येचे श्वसन - व्यायाम जमेल तसे करते. >>भरत, कमाल आहे.
ह्या वर्षी आमच्या ऑफिसने ऑनलाईन सबमिशन वर फारच भर दिला होता आणि ऑफिसने असे certificate जनरेट करण्यासाठी रविवारी उपनगरात (ठाणे बेलापूर दहिसर वगैरे ) असे कॅम्प आयोजित केले होते. त्यामुळे ह्या वर्षी प्रथमच आम्ही आमचे डिजिटल सर्टिफिकेट जनरेट केले
Pages