फोटो कलेक्शन - Ornamental plants.
(२)
या अगोदरचा पहिला भाग
फोटो कलेक्शन - Ornamental plants.
(१)
थोड्या कमी सूर्यप्रकाशात वाढू शकणारी अशी ही झाडे Ornamentals किंवा Indoor plants म्हणून ओळखली जातात. त्या झाडांचे फोटो गेल्या दहा वर्षांत मुंबईत भरणाऱ्या प्रदर्शनांतून काढलेले एका ठिकाणी आणले आहेत. ( कॉपीराईटचा प्रश्न येणार नाही कारण पब्लिक डिस्प्ले आहेत.) थोडक्यात ही झाडे आणि फोटो माझे नाहीत. यातली काही झाडे फुलांच्या गटातही टाकता येतील. झाडांची विशेष ओळख म्हणजे पानांचा आकार आणि रंग. कमीतकमी निगा राखावी लागते कारण रोग पडत नाहीत फारसे. नवीन रोपे कटिंग्ज आणि मुळापासून सहज होतात. नर्सरीत जाऊन झाड मागताना या फोटोंचा उपयोग होईल. नावाने विकि सर्च करून माहिती घेता येईल. प्रदर्शनात झाडासोबत पाटी येईल असे घेण्याचा प्रयत्न केला. पण काही पाट्या फार दूर गेल्याने ते फोटो वगळावे लागले. हँगिगच्या फोटोंच्या बाबतीत पाटी मिळाली नाही. ही यादी संपूर्ण ( exhaustive ) नाही. अजून बरीच सामान्य झाडे आहेत पण त्यांचे फोटो नाहीत.
फोटोंचे रेझलुशन कमी ठेवले आहे धागा लगेच डाउनलोड व्हावा यासाठी. मोठा फोटो पाहायचा झाल्यास फोटोची इमेज लिंक प्रॉपर्टीजमध्ये दिसल्यावर त्यात शेवटी असलेल्या w1200 >w2400>w4800>>w7200 असा फरक केल्यावर पाहता येईल.
ही बरीचशी झाडे परदेशी (exotic) दक्षिण अमेरिका ( अमेझोन जंगलातील) किंवा न्युगिनी, मलेशिया ( विषुववृत्तीय जंगलातील) येथील असल्याने मराठी नावे असण्याची शक्यता कमीच आहे.
फोटो १
. Alocasias
फोटो २
. Aglaonema
फोटो ३
. Anthurium
फोटो ४
. Asparagus
फोटो ५
.Begonia
फोटो ६
. Coleus
फोटो ७
. Croton
फोटो ८
. Dieffenbachia
फोटो ९
. Dracaena Cordyline
फोटो १०
. Ficus
फोटो ११
. Maranta, Calathea
फोटो १२
. Monstera, Epiprenum, photos,philodendron
फोटो १३
. Asplenium nidus
फोटो १४
. Pillea
फोटो १५
. Sansevaria
फोटो १६
. Paperomia
सूचना आणि सुधारणांचे स्वागत.
_____________________
सगळे फोटो सुरेख. थोडक्यात
सगळे फोटो सुरेख. थोडक्यात सगळी शो ची झाडं. याला मराठी नावं नसतात का? देखभाल कमी लागते हे खरं. आहेत यातली काही झाडं. फुलपानांची रांगोळी काढताना ह्याची रंगीबेरंगी पाने वापरता येतात.
छान धागा. Crotons मस्त कलरफुल
छान धागा. Crotons मस्त कलरफुल असतात.
सगळे फोटो सुरेख !
सगळे फोटो सुरेख !
सगळे फोटो छान...
सगळे फोटो छान...
आमच्या शेतात अम्ही याच प्रकारची 4 ते 5 जातींची ornamental plants लावली आहेत..काही हिरवी आहेत..काही लाल गुलाबी पाने असलेली..export purpose ने plantation केलेले..पण covid आणि lockdown mule त्यांचे मार्केटिंग नाही झालेय..