फोटो कलेक्शन Ornamentals plants (१)

Submitted by Srd on 12 December, 2020 - 09:14

फोटो कलेक्शन - Ornamental plants.
(१)

याचा दुसरा भाग
फोटो कलेक्शन - Ornamental plants.(२)
(१)

थोड्या कमी सूर्यप्रकाशात वाढू शकणारी अशी ही झाडे Ornamentals किंवा Indoor plants म्हणून ओळखली जातात. त्या झाडांचे फोटो गेल्या दहा वर्षांत मुंबईत भरणाऱ्या प्रदर्शनांतून काढलेले एका ठिकाणी आणले आहेत. ( कॉपीराईटचा प्रश्न येणार नाही कारण पब्लिक डिस्प्ले आहेत.) थोडक्यात ही झाडे माझी नाहीत पण फोटो मी काढले आहेत.. यातली काही झाडे फुलांच्या गटातही टाकता येतील. झाडांची विशेष ओळख म्हणजे पानांचा आकार आणि रंग. कमीतकमी निगा राखावी लागते कारण रोग पडत नाहीत फारसे. नवीन रोपे कटिंग्ज आणि मुळापासून सहज होतात. नर्सरीत जाऊन झाड मागताना या फोटोंचा उपयोग होईल. नावाने विकि सर्च करून माहिती घेता येईल. प्रदर्शनात झाडासोबत पाटी येईल असे घेण्याचा प्रयत्न केला. पण काही पाट्या फार दूर गेल्याने ते फोटो वगळावे लागले. हँगिगच्या फोटोंच्या बाबतीत पाटी मिळाली नाही. ही यादी संपूर्ण ( exhaustive ) नाही. अजून बरीच सामान्य झाडे आहेत पण त्यांचे फोटो नाहीत.

फोटोंचे रेझलुशन कमी ठेवले आहे धागा लगेच डाउनलोड व्हावा यासाठी. मोठा फोटो पाहायचा झाल्यास फोटोची इमेज लिंक प्रॉपर्टीजमध्ये दिसल्यावर त्यात शेवटी असलेल्या w1200 >w2400>w4800>>w7200 असा फरक केल्यावर पाहता येईल.

ही बरीचशी झाडे परदेशी (exotic) दक्षिण अमेरिका ( अमेझोन जंगलातील) किंवा न्युगिनी, मलेशिया ( विषुववृत्तीय जंगलातील) येथील असल्याने मराठी नावे असण्याची शक्यता कमीच आहे.

फोटो १
. Gladiolus

फोटो २
. heliconia plant / Lobster-claws

फोटो ३
. Plumbago / निळी अबोली ?

फोटो ४
. Poinsetia

फोटो ५
. mussaenda

फोटो ६
. Amarylilis dutch

फोटो ७
. Lili other

फोटो ८
. Cana variegated विविधरंगी कर्दळ

फोटो ९
. Cana any other कर्दळ

फोटो १०
. Geranium

फोटो ११
. Galphimia

फोटो १२
. Euphorbia

फोटो १३
. Euphorbia milli

फोटो १४
.zamioculcas , staithes, spathyphyllum, globa

फोटो १५
. ??

_______________________

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे कलेक्शन !
मला पर्सनली तितकी आवड नाही पण विनासायास बघायला मिळाले तर आवडते हे फूलाझाडांचे प्रदर्शन. त्यामुळे कॉलेजला वीजेटीआयला भरलेले बघायचो. तसेच घराजवळच असल्याने राणीबागेतल्या प्रदर्शनालाही हौशी मित्रांना सोबत म्हणून एक दोनदा गेलोय. त्यातून घरच्यांसाठी गुलाब नेलेले तेवढेच. कारण घरी आईवडिलांना थोडीफार आवड होती. पण मला असे ऑर्नामेंटल प्लांट म्हणजे कमी निगा राखावी लागते अश्या प्रकाराबद्दल विशेष माहीत नव्हते. पुन्हा कधी योग आला तर चौकशी करेन आता..

कर्दळीने सुरवात करा. स्वस्त आणि मस्त.
---------------
प्रदर्शनं तीच दोन. एक मुंबई मनपाचे भायखळा राणीबागेत पुढे असते आणि दुसरे फ्रेंड्स ओफ ट्रीज या ग्रुपचे विजेटिआई/न्याशनल बान्द्रा/ सध्या रुपारेलमध्ये भरते. फेब्रुवारी महिना. ठाणे मनपाचे गावदेवी मैदानात, नवीन मुंबई मनपाचे भावे सभागृह पटांगणात.

मोठमोठी झाडे तिथे आणून मांडायची आणि परत न्यायची हे फक्त सेंट्ल/वेस्टन रेल्वे, बिएआरसी, गोदरेज अशा मोठ्या
कंपन्यांनाच शक्य होते. ट्रकमधून आणतात. त्यांचे माळी असतात.

छान आहेत प्रचि.
प्रचि क्र . ११ - Camellia नव्हे Thryallis (Galphimia glauca) आहे. माझ्याकडे आहे आणि माझे आवडते रोप ..म्हणून ओळखता आले Happy
या रोपाला हळदी रंगाचे पिवळेधम्मक, नाजूक फुलांचे देखणे तुरे येतात.

सगळे फोटो सुंदर. छान धागा.
माझ्याकडे फोटो 7 आहे त्याला स्पायडर लिली म्हणतो आणि फोटो 13 ला सरसकट कॅक्टस Lol