Submitted by सुप्रिया जाधव. on 3 December, 2020 - 22:39
ओळीबद्दल कालिदास चवडेकर ह्यांचे आभार मानून...
(ओळीत जरासा बदल केला आहे )
विकारांची खुळी फोफावती बाभळ कुठे लपवू
( मनाशी चाललेला सावळागोंधळ कुठे लपवू )
नकोश्या वास्तवाचा हात धरल्याने सुखी झाले
हवासा वाटणारा आठवांचा छळ कुठे लपवू ?
निपटण्याची पराकाष्ठा करुन हमखास ओघळते
व्यथेने घातले डोळ्यांतले काजळ कुठे लपवू
फिरवली पाठ पण श्वासांमधे गंधाळते आहे
जिणे उदध्वस्त करणारे जुने वादळ कुठे लपवू
मनामध्ये कुशंकेचा नकोसा गर्भ तर रुजला !
उगवत्या जावळाने वाढली मळमळ... कुठे लपवू
स्वतःचे ऱ्हायचे असते, तुझेही व्हायचे असते
उडालेली मनाची हीच तारांबळ... कुठे लपवू ?
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह अप्रतीम....
वाह अप्रतीम....
फिरवली पाठ पण श्वासांमधे गंधाळते आहे
जिणे उदध्वस्त करणारे जुने वादळ कुठे लपवू.... तुप्फान...
छान
छान