| निशिगंधा |

Submitted by अक्षता08 on 29 November, 2020 - 00:21

प्रत्येक फुलाचा एक विशिष्ट गंध असतो ( उग्र, मोहक, मंद, इ.). तसेच निशिगंधाचा गंध हा मादक या संज्ञेत बसतो. रातराणीप्रमाणे निशिगंधा/ रजनीगंधा नावाप्रमाणेच रात्री उमलते. रात्री निशिगंधाचा सुगंध असा काही घरभर (निदान खोलीभर तरी) पसरतो, किमान पाच सेकंद तुम्हाला खिळवून ठेवण्याची क्षमता त्या फुलात आहे. निशिगंधाच्या एका तुर्यातून दहा ते पंधरा दिवस फूलं फुलत राहतात.

निशिगंधाचे कंद आपण कुंडीत लावू शकतो. कंद जेवढे जास्त तेवढा कुंडीचा आकार मोठा घ्यावा. एक ते दोन फूट वर तूरे वाढून त्या तूर्याला निशीची फुलं येतात. जून महिन्यापासून फुलं यायला सुरुवात होते. निशिगंधाला फुलं येण्यासाठी प्रखर सूर्यप्रकाशाची गरज असते. मातीत ओलावा कायम राहायला हवा. एका तूर्यातून सर्व फुलं येऊन गेली की तो तुरा कापून टाकावा. दर 10 ते 15 दिवसांनी खत द्यावे. ह्या फुलाला खताची गरज इतर फुलझाडांपेक्षा अधिक असते.

अश्या या पांढर्‍या, नाजूक फुलांचा गंध एकदा आपण अनुभवला की आपण ह्या फुलांच्या फूलण्याची वाट नक्कीच बघत बसतो.CollageMaker_20201121_230022210.jpgCollageMaker_20201121_230953590.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त. सध्या कुंडीत कंद लावलेत. पानं भरपूर आलीत पण तुर्याची वाट बघणं चालू आहे. मला वाटलं हे फूल बारमाही असतं. ते हारतुरे विकतात त्यांच्याकडे बारमाही फुलं दिसतात ही. काहीजण गुलछडी पण म्हणताना ऐकलय या फुलांना.
कृष्णधवल फोटो सुरेख दिसतोय.

मस्तच. क्षणभर तो सुवास नाकावर रेंगाळून गेलाच. आमच्याकडे कुंडीत लावलाय.पण फुलं बघायला खूप वाट बघावी लागते.
माझ्या लग्नाचे हार आठवले. Happy

फुलं येउन गेल्यावर तुरे काढून टाकायचं माहिती नव्हतं. माझ्याकडे दोन कंद छान उतरले होते यंदा. ३-४ फुट तरी उंच झाले आणि भरपूर फुलं आली होती. इथल्या छोट्याश्या उन्हाळ्यात निशिगंधाचं रोप उगवून फुलं येतील असं वाटलच नव्हतं त्यामुळे कळ्या लागल्या तेव्हाच फारच आनंद झाला Happy

@किशोर मुंढे , @अस्मिता.
धन्यवाद !! Happy

@मी चिन्मयी
(माझ्या लग्नाचे हार आठवले.)
Happy Happy

@वर्णिता
धन्यवाद Happy
निशीगंधा मध्येही बरेच प्रकार आहेत (माझ्याकडे जे आहे ते seasonal flowering plant आहे)

@सिंडरेला
तुम्ही lucky आहात. Happy
(इथल्या छोट्याश्या उन्हाळ्यात निशिगंधाचं रोप उगवून फुलं येतील असं वाटलच नव्हतं त्यामुळे कळ्या लागल्या तेव्हाच फारच आनंद झाला)