
हो, फेसबूक मेमरीच आली आहे तशी.
माझी पोस्ट होती पिझ्झा खात सेलिब्रेट करायची. तेव्हा त्यावर प्रतिक्रिया आलेल्या की चार-सहा महिन्यात ढोकळा खायची तयारी ठेव. हे पिझ्झा-वडापावचे नाते फार टिकणार नाही. पण टिकले. त्यांनी टिकवून दाखवले.
माझ्यामते याचे सर्वाधिक श्रेय श्री उद्धव ठाकरे यांना जाते.
या काळात सेनेच्या हिंदुत्ववादावर बरीच टिका झाली. या सरकारमध्येही सर्वात जास्त टिका उद्धव ठाकरेंनाच झेलावी लागली. जसे राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यावर होतात तसे ईमेज खराब करायचे वैयक्तिक हल्ले झाले. पण ते विशेष रिॲक्ट झालेच नाहीत. भारी संयम!
आता सरकार टिकवणे याबद्दल कसले कौतुक? ते तर केलेल्या कामांवरून झाले पाहिजे ना?
सहमत!
पण सध्याच्या कोरोनाच्या संकटात एक स्थिर सरकार देणे हे सुद्धा फार गरजेचे होते असे मला वाटते. ते जमवले याबद्दल अभिनंदन.
तळटीप - मी कुठल्याच राजकीय पक्षाचा समर्थक नसून वरची फेसबूक पोस्ट विनोदाच्या अंगाने टाकलेली. जिला सर्व पक्षीय मित्रांनी लाईक केलेले. हा धागा मात्र विनोदाच्या अंगाने नसून प्रामाणिक मत आहे. येथील सर्वपक्षीय सभासदांनी आपले प्रामाणिक मत नोंदवावे.
>>चांगले मानाचे डिल करू शकतात
>>चांगले मानाचे डिल करू शकतात ना भाजपाशी?<<
ते तात्पुरते.... राजकारणात दूरचा विचार करावा लागतो!
आणि जर मी मुख्यमंत्र्यांचे
आणि जर मी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतोय म्हणून माझ्यावर त्यांच्या राजकीय पक्षाचे समर्थक असल्याचा ठपका ठेवत असाल तर खरेच अवघड आहे. कारण आताच मायबोलीवरच्या पहिल्या पानावरच्या एका धाग्यावर नजर गेली. शिवसेनेचे काय होणार? ६००+ पोस्ट झाल्यात.. तिथे कधी पाहिलेय का मला ?
मला काही फरक पडत नाही शिव्सेनेचे काय होणार याने... माझ्या महाराष्ट्राचे काय होणार मला याच्याशी मतलब आहे.
ते तात्पुरते.... राजकारणात
ते तात्पुरते.... राजकारणात दूरचा विचार करावा लागतो!
>>>>
दूरचा विचार करता भाजप आपल्यासोबत आलेल्याची फरफटच करेल हे तुम्ही ठरवूनच टाकले आहे.
>>तिथे कधी पाहिलेय का मला ?<<
>>तिथे कधी पाहिलेय का मला ?<<
तुझे काय सांगता येतेय

घे रे!
तिथेही एखादा "तुमचा अभिषेक, भास्कर" वगैरे असू शकतो की
>>दूरचा विचार करता भाजप
>>दूरचा विचार करता भाजप आपल्यासोबत आलेल्याची फरफटच करेल हे तुम्ही ठरवूनच टाकले आहे.<<
डील करुन बरोबर आलेल्या पक्षाला मग काय कडेवर घेऊन फिरायचे?
त्या त्या वेळच्या तडजोडी असतात त्या!
समोरचा असू शकतो ना कुठल्यातरी
समोरचा असू शकतो ना कुठल्यातरी एखाद्या पक्षाचा समर्थक..
>>>>
समर्थक वा कार्यकर्ता असण्यात काही गैर नाही. ते स्वाभाविकच आहे. पण निष्ठा देशाशी हवी. तो पक्ष आपल्या देशाचे भले करणारा वाटतो म्हणूनच आपण त्याच्यासोबत असतो ना. मग तो जेव्हा चुकतो तेव्हा त्याला त्याची चूकही दाखवायला हवी. सोशलसाईटवर त्या चुकीचे समर्थन करत त्यावर पांघरूण घालत फिरू नये ईतकीच अपेक्षा मी ठेवतो.
आणि भाषा.
याबाबत मी नेहमीच आग्रही असतो.
जर तुमचे मुद्दे योग्य असतील तर तुम्हाला हे शेणा कमळा फेकू पपू केजरू अश्या शब्दांची काही एक गरज पडू नये.
आणि हि अपेक्षा सुद्धा सर्वपक्षीय आहे. वर त्यांनी शेणा लिहिले म्हणून ते उदाहरण दिले याचा अर्थ बाकीच्यांचे कसेही उल्लेख करा असे नाही
या अश्या वादांमुळे चांगली राजकीय चर्चा होत नाही जे मायबोलीवर ईतर विविध विषयांवर होते.
मागे चंद्रकात पाटिल यांनी शरद
मागे चंद्रकात पाटिल यांनी शरद पवारांवर टिका(?) केली होती त्यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व सेनेच्या नेत्यापासून ते पोराटोरां पर्यंत सर्वांनी त्यांच्याव र टिकेची झोड उठवली होती. आता तशीच टिका सातरा उदयनराजे भोसलेंनी पवारांवर केली आहे. आता बघू महा भकास आघाडीतील किती जणांची तोंडे उघडतात ती.
बाळ ऋन्मेष,
बाळ ऋन्मेष,
"अश्याने आपण भाजप समर्थक आणि सेना द्वेष्टी वाटता. आणि मग आपले विचारही एकतर्फी वाटतात." हे तुझे मूळ वाक्य आणि एखाद्याच्या समर्थक वाटण्यावर किंवा एकतर्फी असण्यावरचा आक्षेप होता.
आणि आता म्हणतोयस की "समर्थक वा कार्यकर्ता असण्यात काही गैर नाही." आणि त्याला उगाच त्याला देशाशी निष्ठा, देशाचे भले वगैरे मुलामा देतोयस!
भाषेबद्दलच्या आक्षेपाला आक्षेप नाही पण तू तो आक्षेप समर्थक असण्याच्या मुद्द्याबरोबर मिसळून गल्लत करत आहेस!
सरकारचे अभिनंदन!
सरकारचे अभिनंदन!
{{{ आणि भाषा.
{{{ आणि भाषा.
याबाबत मी नेहमीच आग्रही असतो. }}}
लूक व्हू इज् टॉकिंग? सिरीयसली? ह्युमन या शब्दाऐवजी हुमायून हा शब्द वापरुन संपूर्ण मानवजात ही एकाच धर्माशी बांधिलकी दाखवित असल्याचे लिहिणार्याकडून वरील विधान अत्यंत बेगडी वाटते.
आणि आता म्हणतोयस की "समर्थक
आणि आता म्हणतोयस की "समर्थक वा कार्यकर्ता असण्यात काही गैर नाही."
>>>>
खरा पुणेकर
माझ्या आधीच्या वाक्यातील सेना द्वेष्टे खाऊन टकलेत सोयीने
एखाद्या पक्षाचे समर्थक असण्यात काही गैर नाही कारण तुम्हाला कोणाचीतरी विचारसरणी पटणे स्वाभाविक आहे. पण तुम्ही त्यांच्या विरोधकांचा हिन उल्लेख करत असाल तर नक्कीच ते आक्षेपार्ह आहे असे मला वाटते. कारण मग तुमचे समर्थन नुसते विचारसरणीपुरते न राहता ती एक प्रकारची भक्तगिरी होते. म्हणजे त्या राजकीय पक्षाचे सारेच बरोबर वाटणे. ईतरांचे सारेच चूक वाटणे. जे अशक्य आहे. चांगली वाईट माणसे सगळीकडे असतात. राजकीय चुका, घोटाळे, भ्रष्टाचार कमी अधिक प्रमाणात सारेच पक्ष करतात. आपण समर्थन देत असलेल्या पक्षाच्या चुकांचीही वकिली आपण करू लागलो तर समजावे आपली निष्ठा देशापासून ढळून त्या राजकीय पक्षापाशी जातेय.
ह्युमन या शब्दाऐवजी हुमायून
ह्युमन या शब्दाऐवजी हुमायून हा शब्द वापरुन संपूर्ण मानवजात ही एकाच धर्माशी बांधिलकी दाखवित असल्याचे...


आई ग्ग..
सॉरी हसल्याबद्दल.. पण सिरीअसली हा ॲंगल हा अर्थ वाचून हसणे आवरले नाही
अहो मी धर्म जात वंश वर्ण असले काही मानतच नाही...म्हणजे भेद मानत नाही असे नाही तर ती संकल्पनाच मानत नाही. मी क्श्याला यात पडतोय.
आणि गंमत म्हणजे वर कोणीतरी मला सेना समर्थक म्हणत आहेत... त्याच्याशी हे विसंगत नाही का वाटत
Submitted by ऋन्मेऽऽष on 29
Submitted by ऋन्मेऽऽष on 29 November, 2020 - 18:29
वेड पांघरुन कुठे जाताय महाशय? सेना कधीचीच हुमायून झाल्याचं जसं काही तुम्हाला ठाऊकच नाही...
सेना कधीचीच हुमायून झाल्याचं
सेना कधीचीच हुमायून झाल्याचं जसं काही तुम्हाला ठाऊकच नाही...
>>>>
कधी झाली?
आणि मी कधीपासून हा शब्द वापरतोय?
जरा फॅक्ट आणाल का?
Submitted by ऋन्मेऽऽष on 29
Submitted by ऋन्मेऽऽष on 29 November, 2020 - 18:34
तुमचा हिशेब मी कशाला ठेवू? तुमचं तुम्ही सांगा...
सेनेला भाजप अफजलखान वाटायला लागला तेव्हाच सेनेची हुमायून होण्याकडे वाटचाल होऊ लागली.
आपण समर्थन देत असलेल्या
आपण समर्थन देत असलेल्या पक्षाच्या चुकांचीही वकिली आपण करू लागलो तर समजावे आपली निष्ठा देशापासून ढळून त्या राजकीय पक्षापाशी जातेय.
--
LOL !
>>माझ्या आधीच्या वाक्यातील
>>माझ्या आधीच्या वाक्यातील सेना द्वेष्टे खाऊन टकलेत सोयीने Happy<<
त्याने फारसा काही फरक पडत नाही खरे तर पण पालथ्या घड्यावर किती पाणी घालायचे याला काही मर्यादा आहेत.... त्यामुळे तुझे चालू दे!
रूनमेश ,
रूनमेश ,
तुमच्यावर सेना समर्थक , मोदी विरोधक , लव जिहादी
ही लेबले पडली आहेत
वेलकम टू अवर पार्टी
आज abp माझा वर एक धम्माल
आज abp माझा वर एक धम्माल विनोदी सर्व्हे दाखवत होते.... कहां से आते है ये लोग
तुमचा हिशेब मी कशाला ठेवू?
तुमचा हिशेब मी कशाला ठेवू? तुमचं तुम्ही सांगा...
>>>>
मी मायबोलीवर प्रकट व्हायच्या आधीपासून ऑर्कुट कम्युनिटीवर हुमायुन नेचर हा शब्द वापरतोय.
तरी साधारण किमान ९ वर्षे पकडा.
आता तुमचे ते सेना हुमायुन कधी झाली ते सांगा.
>>वेलकम टू अवर पार्टी<<
>>वेलकम टू अवर पार्टी<<
अहो इतके सोप्पे आहे का ते?
ती पात्रता त्याच्या अंगी यावी म्हणून त्याला अजुन खूप कठोर मेहनत करावी लागेल
आज abp माझा वर एक धम्माल
आज abp माझा वर एक धम्माल विनोदी सर्व्हे दाखवत होते.... कहां से आते है ये लोग Rofl
--
अगदी !
बाळासाहेब आज असते तर त्यांनी म्हटले असते
'चाटायची म्हणजे कीती, जिभेला काही विश्रांती'
त्या बीबीसी मराठी मधे असेच
त्या बीबीसी मराठी मधे असेच विनोदी लिहिलेय.
फडणवीस सरकारने सुरु केलेल्या सर्व कामांना स्थगिती देण्याशिवाय या पेंग्विनने इतर एक काम केले नाही तरिही 'ठाकरे सरकार'ची कामगिरी म्हणे समाधानकारक.
भाजपाचे ते केशव उपाध्ये
भाजपाचे ते केशव उपाध्ये सगळ्यांना पुरुन उरतात

आघाडी सरकारचे तीन प्रवक्ते + अभय देशपांडे/केतन वैद्य + प्रसन्न जोशी/आशिष जाधव विरुद्ध केशव उपाध्ये एकटे खिंड लढवत असतात
" 'लव्ह जिहाद'मुळे युवतींना
" 'लव्ह जिहाद'मुळे युवतींना मोबाईल वापरास बंदी...."
हा धागा वाचनमात्र केलाय का ?
प्रतिसाद टकवयची खिडकी दिसत नाही हो !
तुमचे हेलिकॉप्टर पडले
तुमचे हेलिकॉप्टर पडले त्या धाग्याच्या डोक्यावर
असू दे , आता करीनाच्या डोहाळजेवणावर धागा निघेल , तिकडे लिहा
आणि ' शिव सेनेचे काय होणार ?
आणि ' शिव सेनेचे काय होणार ? ' हा पण सर्वासाठी वाचन मात्र झालाय का ?
वर्ष पूर्ती निमित्त जुने गाणे
वर्ष पूर्ती निमित्त जुने गाणे नवीन स्वरूपात !
तुमच्याकडे दिल्लीत शिंह आहे
तुमच्याकडे दिल्लीत शिंह आहे म्हणे ,
कोकणात बेडूक आहेत
सगळे प्राणी घेऊन प्राणी संघालय काढणार का
आता तुम्ही सगळे भांडून दमला
आता तुम्ही सगळे भांडून दमला असाल तर थोडी विश्रांती घ्या तोपर्यंत मी तुमच्यासाठी सादर करत आहे बच्चे कंपनीत फेमस असलेलं गाणं. गाण्याचे बोल आहेत 'नानी तेरी मोरनी को मोर ले गये बाकी जो बचा था ऊसे काले चोर ले गये'
https://youtu.be/byqs6AmYdGU
Pages