मत्सर , असूया , जेलसी - भाग 2 .

Submitted by राधानिशा on 23 November, 2020 - 08:17

अर्थात थोड्या प्रमाणात मत्सर चांगला असंही म्हटलं जातं . कारण तो आपल्याला प्रगतीसाठी मोटिव्हेट करतो .... मी जे आधीच्या भागात म्हटलं आहे , ते अशा गोष्टींबद्दल - ज्या प्रयत्नाने मिळण्यासारख्या नसतात ... अशी परिस्थिती जी आहे तशी स्वीकारण्याखेरीज आपल्याकडे दुसरा काहीही ऑप्शन नसतो . अशा गोष्टींबद्दल मनात पडलेलं मत्सराचं बीज हे फार विषारी ... दिसताक्षणी गोळ्या घालाव्या या लायकीचं.... फक्त प्रॉब्लेम हा की ते शोधायला गेल्याशिवाय दिसत नाही आणि आपल्याकडे त्याला मारता येईल अशा गोळ्याही नसतात .... ह्या गोळ्या म्हणजे आत्मचिंतन .. कशाकशासाठी कौन्सिलर शोधणार ... स्वतःच स्वतःचा काऊन्सिलर होऊन गाठ डायसेक्ट करायची ... बाहेर जे काही येईल ते आकर्षक नक्कीच नसणार ... दुर्गंधी - खराब रक्त ... ( May be I'm exaggerating ) पण अपसेट होऊन मागे फिरू नये .... वाहू द्यावं .. आत राहण्यापेक्षा वाहून गेलेलं उत्तम .

सौम्य शब्दात सांगायचं तर साफ करायला गेलं तर खूप कचरा निघेल म्हणून आपण घराची वार्षिक सफाई कॅन्सल करत नाही .. किंवा साफ करायला सुरुवात केली आणि भलभलता कचरा निघू लागला म्हणून धसकून जाऊन थांबवतही नाही ... कारण कचरा साफ करणं अगदी सोपं आहे हे आपल्याला माहीत आहे ...

कठीण काही असेल तर ते आपल्याला सफाई करण्याची गरज आहे हे मुळात मान्य करणं आणि त्यासाठी कंबर कसून कामाला हात घालणं ... ऍक्चुअल सफाईचं काम खूप सोपं होतं त्यानंतर .

हर एकाच्या बाबतीत ही मोठी गाठच असेल असं नाही , साधा लहानसा चामखीळही असू शकतो .. आपल्याच अशुद्ध रक्तातून जन्मलेला पण तसा निरुपद्रवी ... डेड ... ज्याचा काही त्रास होत नसतो फारसा .... मग दुर्लक्ष केलं जातं त्याच्याकडे ... कारण काढून टाकायला आपल्याला जमत नसतं ... मग राहीना का अशी भूमिका घेतली जाते .. जुनी कुठलीतरी छोटीशी / पुसटशी / अतिशय सबटल असणारी असूया ... जी लक्ष देऊन पाहायला गेलं नाही तर तिथे आहे , हे लक्षातही येणार नाही ... जेवढं समाधानी आयुष्य तेवढं या चामखीळांचं प्रमाण कमी , त्रास न - गण्य ...... पण जर आयुष्य मनासारखं चाललं नसेल तर ? छोटे छोटे म्हणून अनेक चामखीळ उगवतात आणि मनाची एनर्जी ड्रेन करून टाकतात , तेही आपल्या नकळत ...

आता जर सारखे अंगावर चामखीळ येत असतील तर वर वर मलम लावून उपयोग नाही .. आहारात मूलभूत बदल , पोटातून जालीम औषध घेतलं तरच रक्ताची शुद्धी होईल ... तसंच मनाची शक्य तेवढी शुद्धी केल्याशिवाय हे प्रॉब्लेम मुळातून संपणारे नाहीत .

बाहेरची परिस्थिती बदलणं नेहमी आपल्या हातात असत नाही . पण आतली - मनातली परिस्थिती बदलणं तुलनेने खूप सोपं आहे ( अनलेस इट्स अ मेडिकल कंडिशन लाईक डिप्रेशन ) अर्थात ते जर एवढ्या सहज जमलं असतं तर एवढे ढीगभर काऊन्सिलर्स , सायकॉलॉजिस्ट - सायकोथेरपिस्ट निर्माणच झाले नसते ..... थोड्याश्या आत्मचिंतनाने खूप गोष्टी सोप्या होऊ शकतात ....

दुसरी गोष्ट - कदाचित मी अवास्तव कल्पना / अपेक्षा करत असेन .. but .. कॅन वी ऍक्सेप्ट जेलस पीपल ?

एखादी परिचयातली किंवा नात्यातली व्यक्ती रागीट आहे / शीघ्रकोपी आहे हे आपण सहज सांगतो ... शॉर्ट टेम्पर्ड असलेल्या लोकांना आपण समजून घेतो .. कारण हा त्यांच्या स्वभावातला असा दोष आहे की they can't help it , हे आपल्याला माहीत असतं . त्यामुळे त्या दोषापलीकडे जाऊन त्याचे इतर चांगले गुण आपण बघू शकतो ... त्याने स्वभावात सुधारणा करावी हे सहज बोलून दाखवू शकतो - तू राग कमी कर बाबा ... असं प्रत्येक गोष्टीत आक्रमक भूमिका घेऊन नाही चालत वगैरे वगैरे ....

मला मान्य आहे की असूयेबाबत असं सांगता नाही येऊ शकत , की तू माझा / आणखी कोणाचा मत्सर करणं बंद कर .... People will get offended . कारण मुळातच आपल्याला एखाद्याचा मत्सर वाटतो हे कोणीही जीव गेला तरी दुसऱ्याकडे मान्य करणार नाही .

ठीक आहे आपण त्याला काही सांगू शकत नाही ... पण निदान त्याच्यामुळे स्वतःला होणारा मनस्ताप , त्याचा येणारा राग तरी अवॉईड करू शकतो ... बीकॉज ही / शी कान्ट हेल्प इट इदर... आपण ठरवलं तर त्या व्यक्तीकडे सहानुभूतीने पाहू शकतो

आपण त्याला व्हिलन म्हणून मनात रंगवतो की सामान्य विक्टीम म्हणून याने आपलं त्याच्याशी वागणं अफेक्ट होत असतं ...... अर्थात त्याच्या वागण्याने काहीवेळा आपणच विक्टीम होत असतो .....

पण जर आपण चिडलो - कातावलो नाही तर आपण त्याच्याशी अधिक चांगल्या प्रकारे डील करू शकू असं मला वाटतं .... कारण जेवढे प्रॉब्लेम तो माणूस बाहेर क्रियेट करत असतो त्यापेक्षा त्याचा राग राग करून आपण त्यांचा शतपटीने आतल्या आत त्रास करून घेतो ... जर आपलं डोकं थंड असेल तर अशी माणसं देत असलेला त्रासही फार भयंकर वगैरे काही नाही असं वाटू शकतं .. आपलं डोकं थंड असेल तर आपण आपलं काम अधिक एफिशिएंटली करू शकतो आणि निगेटिव्हली व्यक्त न झाल्यामुळे आपले इतर सहकाऱ्यांशी संबंधही तणावाचे होणार नाहीत ....

अर्थात हे सगळं मला सांगायला काय होतंय म्हणा , घरात बसून ... मला यातल्या कशाशीही प्रत्यक्ष डील करावं लागलेलं नाही ... त्यामुळे हे लोका सांगे ब्रह्मज्ञान प्रकारात मोडणारं आहे ...

पण जेवढ्या सहजपणे आणि मनात किल्मिष न ठेवता आपण रागीट माणसांना स्वीकारतो तेवढंच सहज कोणी जेलस होणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असली तर तिलाही प्रेमाने / सह - अनुभूतीने स्वीकारावं असं मला वाटतं ... it's a poison they don't even know that's affecting them . It's not who they are , There's lot more to them than this . They could have been better people if only they knew how to get rid of it .

त्यांना माहीतही नाही की हे विष आहे जे त्यांना असं वागायला भाग पाडतं आहे ... ही भावना - हे वर्तन म्हणजे तो अख्खा माणूस नाही , हा फक्त त्याचा एक लहानसा भाग आहे ... जर ह्या लोकांना फक्त माहीत असतं की ही भावना कशी काढून टाकायची तर तेही आतापेक्षा माणूस म्हणून चांगले असले असते ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे.
माझ्या मनातही मागे या काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या सहा शत्रूंबद्दल लिहायचे होते.
पण आपण दोन्ही भाग छान लिहिलेत..
आधीच्या आपल्या काही लिखाणात नकारात्मक विचार जाणवले होते.. यात सकारात्मक जाणवले.

काम क्रोध मद मत्सर यावर विजय मिळवणे बरेपैकी जमतेय.
पण लोभ आणि मोह याला मात देता येत नाहीये.
बाई दवे,
लोभ आणि मोह यामध्ये काय फरक आहे कोणी उलगडून सांगेल का?

कीप इट अप राधानिशा. ह्या सर्व लेखांची एक मालिका बनवता येइल. खूप लोकांना उप योगी पडेल. मानसिक आजारांसोबत कसे जगावे असा एक गृप काढून घ्या अ‍ॅडमिन कडून आणि सर्व लेख तिथे शिफ्ट करायला घ्या. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

चांगलं विचारमंथन राधानिशा.
पण जेवढ्या सहजपणे आणि मनात किल्मिष न ठेवता आपण रागीट माणसांना स्वीकारतो तेवढंच सहज कोणी जेलस होणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असली तर तिलाही प्रेमाने / सह - अनुभूतीने स्वीकारावं असं मला वाटतं>> हे तर सगळ्या षड्रिपूंकरिता लागू करता येईल. म्हणजे त्या तेवढ्या अवगुणामुळे ती व्यक्ती आपल्याशी चुकीचे वर्तन करीत आहे, हे भान ठेवून आपली प्रतिक्रिया संयमाने देणे. Happy
पण इतका मानसिक तोल त्या क्षणी सांभाळणं अवघड असतं, हेही खरेच.

चांगले विचारमंथन.
मत्सर भितीने व असुरक्षिततेने वाटतो असं मला वाटतं. जसं आहे तसं स्वतःला/ परिस्थितीला स्विकारले तर कुणालाच असुरक्षित वाटणार नाही पर्यायाने मत्सर कापरासारखा उडून जाईल. कुठेतरी आपण स्वतःला कमी लेखत असतो म्हणूनच हे त्रासदायक होते. स्वतःला मान द्यावा, मी एक गुणदोषाचे package आहे मानून पुढे जावे. (पिया तोरा लेखात मी लिहिले होते ना तसे. )
" I am worth it !! "असं वाटायला हवं.
कुठेतरी underlying self worth/self esteem issue आहे मत्सर !! शिवाय ते नातं तुमच्या आयुष्यात कशा पद्धतीने आलंय यावरही अवलंबून असेल कदाचित.... अटी वगैरे असणे /हक्काचे न वाटणे/ स्वतःला कमी लेखणे/ मोकळेपणाने न बोलता येणे/अन्यायाची भावना /दुय्यम वागणूक.. या सगळ्याचे package आहे ही मत्सराग्नि ऊर्जा. फक्त एक स्वभाव दोष नाही. अग्नि आहे तो जाळणारचं ! मानवी भावना फार गुंतागुंतीच्या असतात. आपण जगात सगळं असूनही मत्सरी असणारे व विशेष काही नसूनही निर्मत्सरी लोक बघतोच नं ! Happy

थँक यू सगळ्यांनाच .

थँक यू अमा . मानसिक स्वास्थ्य हे नाव ठीक आहे पण मत्सराला डायरेक्ट मानसिक आजाराच्या पंक्तीत बसवणं नको वाटतं . ती रागाइतकीच नैसर्गिक भावना आहे ... अति झाले की राग नि मत्सर आणि बाकीचे रिपू / विकारही कदाचित आजार म्हणता येतील कदाचित ...... पण लिमिटेड पातळीत ते बऱ्याच लोकांमध्ये कमीअधिक प्रमाणात असतात , त्यामुळे आजार हे बिरुद योग्य नाही असं वाटतं .

राधानिशा तुमचे सर्वच लेख आवडतात कारण अति अलंकारीक नसतात. दिखाउ नसतात. त्यात अभिनिवेश नसतो. तर उलट प्रांजळ व विविध अंगांनी विचार करुन लिहीलेले असतात. एक एक भावना, गुण घेउन त्यावर विस्तृत लेख टाकत जा. उदा - 'कृतज्ञता, 'सहवेदना', 'जाणुनबुजून नमते/पडते घेणे', 'त्याग', 'रेझिलिअन्स (जीजीविषा)' हा तर सर्वांगीण सुंदर असा पैलू आहे. ........... जसे मानसिक स्वास्थ्य ढासळवणार्‍या भावना असतात तशाच काही भावनांचे स्थान 'इमोशनल कोशंट' (इ क्यु) वाढविणार्‍याही भावना असतात. त्यांवरतीही लेख येउ द्यात.

ह् त्यामुळे आजार हे बिरुद योग्य नाही असं वाटतं .>> अ‍ॅडमिन चा सल्ला घ्या. मत्सरा मुळे जीवन उध्वस्त झालेली निर पराध लोके आहेत.