Typically bored

Submitted by किल्ली on 20 November, 2020 - 09:25

.............................................................................................................
”त्याचा भूतकाळ झरझर डोळ्यासमोरून सरकू लागला आणि तो आठवणींच्या राज्यात गेला. "
एक कथा वाचताना हे वाक्य वाचलं तशी ती खुद्कन हसली. तिच्या नवीन वेब सिरीजसाठी कथा निवडण्याचे काम हाती घेतले होते
"आजकाल लिखाण किती cliche वाटतं ना आपल्याला! विशेषतः नवीन लिहू लागलेल्या लेखकांचं लिखाण साचेबद्ध असतं. पावसाळ्यात सर्व कवींच्या पावसाळी कविता सारख्याच वाटाव्यात तसं. काही वाक्ये तर आपोआपच डोक्यात येतात इतकी पाठ झालेली असतात वाचून वाचून.
सगळीकडे ठराविक पॅटर्न, स्त्रियांची म्हणून जी मासिकं येतात त्यांच्याबद्दल तर विचारायलाच नको.
आजकाल online लिहिणाऱ्या लेखकांचे पेव फुटले आहे.
कुणीही यावं आणि लिखाण खरडून जावं असं सुरु आहे.
माहिती आणि साहित्याच्या या भडिमारात दर्जेदार लिखाण वाचायला मिळेल ही अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे."

काहीतरी वेगळं हवं म्हणून तिने नविन हौशी लेखकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले होते.
त्या आव्हानाला प्रतिसाद देखील मिळाला होता. पण तिला मनासारखा कन्टेन्ट मिळत नव्हता. youtube वर एका प्रथितयश चॅनेलसाठी content creater म्हणून काम करत असताना एक गोष्ट तिला पक्की समजली होती की लोकांना मनोरंजनासाठी सतत नवनवीन काहीतरी हवं असतं. तिच्या मते त्याच त्या विषयांवर वर्षानुवर्षे चालणाऱ्या सीरियल्स आणि सिनेमाला कंटाळलेला प्रेक्षकवर्ग कॅश करायचा असेल तर unique कल्पना व कथा ह्यांना पर्याय नाही.
पण दरवेळेला नविन कन्टेन्ट आणायचा कुठून ? म्हणूनच ही एक योजना तिने राबवली होती. न जाणो ह्या हजारो कथांमधून हवा असलेला नेमका कन्टेन्ट मिळून जाईल. त्या लेखकाला योग्य ते क्रेडिट सुद्धा देता येईल.

असो, पुढची कथा वाचूया असे म्हणून तिने ती ओपन केली. नाव होते "सुगंध"

"सुगंधाने सुवासिक फुलांची सुंदर रचना केली आणि ती फुलं सरांच्या टेबलवर आकर्षक पद्धतीने रचवून ठेवली. तिच्या ह्या कामाची दखल कुणीही घेत नसले तरीही सुगंध पसरवण्याचं काम ती अव्याहत करीत असे"
हे वाक्य वाचून तिला आणखीनच बोअर झालं. तिने कथा वाचणेच बंद केले.
आता तर तिला काहीच सुचेनासे झाले होते. टिपिकल कथेतल्या नायिकांप्रमाणे तिने आलं घालून केलेला गरम गरम वाफाळत्या चहाचा घोट घेतला.

”मलाच काहीतरी केलं पाहिजे, उत्तर नवीन हवं असेल तर प्रश्नही नवीनच आणि हटके हवा. माझंच चुकलं.”
असं म्हणून तिने लॅपटॉप पुढ्यात ओढला.
तिच्या सोशल मीडियाच्या wall वर पोस्ट लिहायला घेतली,
"प्रत्येक जण गप्पा मारताना सांगत असतो ते अनुभव म्हणजे एक नवीन कथाबीज आहे, माणसाचे जीवन हे नाटक आणि देवाने उपलब्ध करून दिलेला रंगमंच म्हणजे ही धरती! तर मंडळी या, चला गप्पा मारूया , आज live session मध्ये भेटूया. आपापले आयुष्यात येणारे बरेवाईट अनुभव share करा आणि आम्ही बनवू त्यावर आधारीत एक भन्नाट कथा!!
चला, तुम्हा सगळ्यांच्या कंमेंट्स च्या पावसात आम्ही चिंब भिजायला तयार आहोत "
. .

"किती बोअर आहे यार. अनुभव वगैरे फारच टिपिकल होतंय. ह्या चँनेलकडून ही अपेक्षा नव्हती. मी नाही येणार विडिओ पाहायला "
"कंमेंट्स चा पाऊस, lol, R U running out of new उपमाs? "
"कोण लिहितं असं "
"मॅम तुम्ही सीरियल साठी लिहिता, मलाही २ बायका हव्या आहेत, सीरियल सारखं "
"हल्ली internet वर तोच कन्टेन्ट येत असतो, इथून सुद्धा पळावं लागेल "
"मॅम, माझा बॉस खडूस आहे, त्याचे किस्से सांगू का? माझी दिवाळीची रजा रद्द केली "
.....

typical सीरियल मधल्या व्हॅम्प प्रमाणे तिचाच वार तिच्यावरच उलटला आणि तिला चक्कर आली.
…….
कुणीतरी कांदा आणा रे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"वा! खूपच छान आणि एक नवीन प्रयत्न" प्रतिसाद वाचून तो कसनुसा हसला. "फारच टिपीकल प्रतिसाद होतोय हा" त्याने मनाशी विचार करून तो प्रतिसाद खोडून टाकला. त्याचे सगळे प्रतिसाद तेच तेच तेच छापील आणि टिपिकल असतात असा आरोप त्याच्यावर नेहमीच केला जायचा.

मग काय करावे? असे म्हणून अखेर त्याने गुगल केले. नवीन प्रतिसाद कोणता मिळेल का? एखादे नवीन वाक्य. गेला बाजार, एखादा नाविन्यपूर्ण शब्द तरी? चालेल चायनीज, जापनीज, कोरियन, रशियन काहीही चालेल. पण नवीन हवा. पण नाही. आज त्याचे बॅडलक जोरावर होते. विविध फोरमवर गुगलून मिळालेले सगळेच प्रतिसाद त्याला घिसेपिटे वाटू लागले.

मग शेवटी वैतागून "काही खास नाही. टिपिकली बोअर्ड आहे" असे लिहायचे त्याने ठरवले. प्रतिसाद नवीन होता पण खूप मोठी रिस्क होती. एखाद्या लेखाला थेटपणे बोअर असे संबोधून उगाच वाद ओढवून घेण्याची शक्यता त्याला वाटत होती. मग काय करावे? कळेना. खूप विचार केला. आणि अखेर म्हणाला, जाऊदे, जास्त विचार करायला नको. वादग्रस्त का असेना पण आज नवीन प्रतिसाद हाच. असे म्हणून त्याने तोच प्रतिसाद लिहून टाकला, " टिपिकली बोअर्ड आहे"... आणि पाहतो तो काय धाग्याचे नाव सुद्धा लेखिकेने बदलून तेच ठेवले होते "Typically bored"

अजून एका टिपिकल प्रतिसादातून आजही तो सुटला नव्हता.

Atul Lol

अतुल Lol

पण खरेय हा बाकी हे, काही काळानंतर भल्याभल्यांचे प्रतिसाद टिपिकल होतात. काड्या करणार्‍यांच्या काड्याही पकडल्या जाऊ लागतात वा अभ्यासू विचारवंतही एकसुरी होतात. कालांतराने एका इमेजमध्ये अडकले जातात. सोशलसाईटवर नावीन्य राखायचा उत्तम मार्ग म्हणजे कालांतराने नवनवीन आयडी बनवत राहणे आणि आपल्यातील विविध पैलू त्यातून उधळत राहणे.

ही घ्या अजून एक टिपिकल प्रतिक्रिया...
आवडलं लिखाण.

याच टिपिकल उपमा विषयावर बहुतेक एक धागा आहे वाटतं माबोवर

किल्ली is back!
मस्त खुसखुशीत, please लिहीत रहा!

धन्यवाद ऋ, मृणाली, वावे,प्रणवंत , सनव, च्रप्स,मनिम्याऊ,Gauree12 ,रूपाली विशे - पाटील , हर्पेन , अतुल Happy

@अतुल: प्रतिसाद आवडल्लाय, खल्लास Lol
@हर्पेन: होय हो, लै तरास होतो, काय सान्गू कधी मधी Proud

याच टिपिकल उपमा विषयावर बहुतेक एक धागा आहे वाटतं माबोवर >>>> आहे आहे, फारेण्ड यान्चा,
तो धागा म्हणजे सूर्य आणि हे गरिबाचे लिखाण म्हणजे काजवा हो, प्रेरणा तिथुन मिळाली असावी, कारण तो धागा वचल्यापासुन सगळीकडे उपमा आणि ठोकळे च दिसत राहतात Biggrin

https://www.maayboli.com/node/49629
सापडला हा धागा, कमाल आहे

मी अनु, फक्त कमेन्ट्स?? Biggrin

(तिने फक्त प्रतिसादान्ची वाहवा केली, म्हणून लेखकाला वाफाळत्या चहाची गरज पडली Lol )

तुझ्या लेखातल्या कमेंट्स म्हटलं गं
म्हणजे ही लेखाला कॉम्प्लिमेंट समजावी
एखाद्या खरी बिस्किटात तूप किंवा देखाव्यात सूर्य प्रत्यक्ष दिसत नसतो पण त्याची सोनेरी आभा सर्वत्र पसरलेली असते त्याप्रमाणे माझ्या प्रतिसादात प्रत्यक्ष कॉम्प्लिमेंट नसली तरी ती सर्वत्र पसरली आहे Happy

अनु Lol
वरचा प्रतिसाद म्हणजे जणू मेलेल्या मनाला संजीवनी च!

किंवा वठलेल्या वृक्षाला पालवी फुटली
किंवा
मनातल्या जाणिवांच्या आशा पल्लवीत झाल्या Happy

Pages