खरं सांगा, किती जणांना हे ठाऊक होते?
तारीख नाही, पण असा एखादा दिवस असतो हे तरी किती जणांना ठाऊक होते?
मलाही ठाऊक नव्हते.
रोज व्हॉटसपवर गूड मॉर्निंग, गूड नाईट, हॅपी दिवाळी, हॅपी नवरात्र ते हॅपी नागपंचमी, हॅपी सर्वपित्री अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, द्वादशी असे शेकडो मेसेज येतात. पण सकाळपासून कुठेच जागतिक पुरुष दिनासंबंधित मेसेज पाहिला नाही.
हो, एक पाहिला. या दिवसाची एक प्रकारे खिल्ली उडवत बनवलेला अश्लील मेसेज. त्यामुळेच मग गूगल करून शोधले आणि आजच्या दिवसाचे महत्व समजले.
तर आज १९ नोव्हेंबर हा जागतिक पुरुष दिन आहे आणि मी आजपासून तो दरवर्षी साजरा करायचे ठरवले आहे.
पण कसा करायचा हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. म्हणजे महिला दिन साजरा करताना पुरुष मंडळी एक दिवस किचनमध्ये शिरून एक वेळच्या स्वयंपाकाचा भार उचलतात आणि दुसरया वेळचे जेवण ऑर्डर करतात वा बाहेर हॉटेलात जातात हे पाहिले आहे. पण पुरुष दिना निमित्त काय करावे हे सुचत नाहीये.
८ मार्च जागतिक महिला दिन - आमच्या ऑफिसमध्येही पुरेश्या उत्साहात साजरा केला जातो. महिला नवीन कपडे घालून येतात. ऑफिसच्या एंट्रीलाच त्यांचे गुलाबाचे फूल वा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाते. अंगावर परफ्यूमचा शिडकावा केला जातो. त्यांचा एक छानसा फोटो काढला जातो. त्यासाठी खास एक कोपरा सजवला जातो. जेव्हा त्या डेस्कवर येतात तेव्हा तिथे एक Happy Women's Day चे ग्रीटींग आणि एक सरप्राईज गिफ्ट त्यांची वाट बघत असते. मग लंचनंतर बायका बायका मिळून खाली गार्डनमध्ये जाऊन सेल्फी सेल्फी खेळतात. कामाचा मूड तर नसतोच. कारण तीन वाजताच त्यांची कामाची सुट्टी होते आणि सगळ्या जणी हॉलमध्ये जमून कंपनीने आयोजित केलेल्या खेळ आणि उपक्रमात सहभागी होतात. ५ वाजता कॅंटीनमध्ये महिला दिनाचा केक कापला जातो. तेव्हा मात्र टाळ्या वाजवायला पुरुषांनाही खास आमंत्रित केले जाते. आणि मग त्या केक सोबरत समोसा वेफर चहा कोल्ड्रींक गिळायच्या कार्यक्रमातही पुरुषांना सहभागी करून घेतले जाते. हा माझा त्या दिवशीचा सर्वात आवडीचा भाग
पण जो दिवस स्वत:च्या हक्काचा आहे त्या दिवशी मात्र शुकशुकाटच असतो. मी स्वत: महिला दिनानिमित्त ऑफिसातल्या ओळखीच्या पाळखीच्या सर्व महिलांना प्रत्यक्ष आणि व्हॉटसपवर मेसेज करून महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. पण कधी कुठल्या महिलेकडून मात्र आजवर पुरुष दिनाच्या शुभेच्छा आल्या नाहीत. अर्थात यात दोष देणे नाहीये. कारण मुळातच पुरुषांनाही कुठे ठाऊक असतो हा दिवस?
आणि त्याहून मोठा प्रश्न असा की ठाऊक असला तरी त्यांना हा दिवस साजरा करायला आवडेल का? कि यातही त्यांचा सो कॉल्ड अहंकार दुखावला जाईल.
ज्या पुरुषांना मुळातच हा अहंकार आहे त्यांनी खुशाल या दिवसाची गरज नाही म्हणावे. पण ज्या पुरुषांवर हा अहंकार नाहक लादला गेलाय त्यांनी तरी जरूर पुढाकार घेत हा दिवस साजरा करावा. आणि तो कसा करता येईल याचा विचार करावा असे मला वाटते.
आजचा माझा अर्धाअधिक दिवस असाच संपला. उरलेला देखील कदाचित असाच जाईल. पण आशा करतो की पुढच्यावेळी हा पुरुष दिन कसा साजरा करावा याचे ठोस प्लानिंग माझ्याकडे असेल.
निदान पुरुषांचाही एक दिवस असतो. त्यांनाही कर्तव्यासोबत काही हक्क आहेत. त्यांनाही भावना आहेत. त्या देखील जपायला हव्यात. त्यांच्यावरही आज काही बाबतीत अन्याय होतोय. त्यांच्यातही काही उणीवा आहेत आणि त्या त्यांनी अहंकार बाजूला सारून मान्य करायला हव्यात. त्या सुधारून आणि त्यावर मात करून पुढे जायला हवे. हि एकूणच जागरूकता तरी या निमित्ताने यावी.
मायबोलीवरील सर्व पुरुषांना आणि त्यांच्या सुखदुखात सोबत असलेल्या महिलांना जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मलाही आधी माहित नव्हता.
मलाही आधी माहित नव्हता. म्हणजे शिवजयंती प्रमाणे वर्षातले २-३ दिवस पैकी एक पुरुष दिन असा घोळ होता डोक्यात. पण ४-५ वर्षापूर्वी ऑफिस मध्ये साजरा झाल्याने कळला. आज आऊटलुक रिमाईंडर आल्याने आठवण राहिली.
आता माहित झालाय तर मला ज्यांनी मदत केली, जे आयुष्य सुखरुप आणि ऑफिस कामासाठी सुरळीत ठेवायला मदत करतात त्यांना शुभेच्छा देते.
मागच्या वर्षी आम्ही टिम मधील पुरुषांना डेअरी मिल्क दिल्या.
तसे तर महिला दिन काय, पुरुष दिन काय, एकच दिवस का साजरा करायचा असा प्रश्न आहेच. पण आता दिवस कळला आहे तर त्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करते.
मला खरचं माहित नव्हतं.
मला खरचं माहित नव्हतं. whats app ला एक दोन मेसेज बघितले तेव्हा कळलं. तुम्ही छान भावना व्यक्त केल्या आहेत लेखात.
माझ्यातर्फे सर्व पुरुष मंडळींना जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अवांतर - पुढच्या वेळी एकदम दणक्यात साजरा करा पुरुष दिन तुमच्या ऑफिसमध्ये आणि घरीसुद्धा!!
मी माझ्या गफ्रेला हा लेख
मी माझ्या गफ्रेला हा लेख दाखवला, तर ती फणकारली, प्रत्येक सॅलरीचा दिवस हा पुरूषांचाच दिवस असतो म्हणून.
कसा साजरा करावा कळत नाहीये.
कसा साजरा करावा कळत नाहीये. पण असा दिवस आहे हे सकारात्मक आहे. इथे - https://en.wikipedia.org/wiki/International_Men's_Day काही थीम्स आहेत.
सामान्यपणे पुरूष दिनाच्या
सामान्यपणे पुरूष दिनाच्या दिवशी पुरूष आरोग्याबद्दल जनजागृती करतात जसे प्रोस्टेट कॅन्सर इ. ज्यांना अशा पद्धतीच्या आरोग्य तपासण्या ह्या महिन्यात करायच्या आहेत त्यांना खूप शुभेच्छा. आपल्या तब्बेतीची काळजी घेणे म्हणजे घरादाराची काळजी घेणे ह्याकडचे पहिले पाऊल आहे. स्वस्थ रहा, समृद्ध रहा (ह्या शुभेच्छा आहेत, आग्रह नाही).
we4
केवळ माझ्या नावडत्या भाज्याच आणून जर तुम्हाला 'पुरूष दिन ' साजरा केल्याचं समधान मिळणार असेल, तर तसं करा !![20190201_190648.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u13291/20190201_190648.jpg)
19 नोव्हेंबर हा दिवस मला माजी
19 नोव्हेंबर हा दिवस मला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा वाढदिवस/स्मृतिदिन असतो असे माहित होते पण आंतर्राष्ट्रीय पुरुष दिवस कधी झाला. मायबोलीवर येऊन समजले. थोड्या उशिरा शुभेच्छा.
पुरुषस्वास्थ्यासाठीच्या
पुरुषस्वास्थ्यासाठीच्या मोव्हेंबरबद्दल इथे मायबोलीवरच वाचल्यामुळे माहिती होतं. पण १९ नोव्हेंबर हा विशिष्ट दिवस मात्र माहिती नव्हता.
मोव्हेंबर-
https://www.maayboli.com/node/30145
इंटनॅशनल मेन्स डे हा
इंटनॅशनल मेन्स डे हा सकारात्मक, सशक्त पौरुषत्व गौरववण्यासाठी. ही सकारात्मकता एक पुरुष म्हणून स्वतःमधे कशी वृद्धिंगत होईल आणि एक फादर फिगर म्हणून, मेंटर म्हणून पुढील पिढीतील मुलांमधे कशी रुजवता येतील याचा विचार करण्यासाठी. त्याच जोडीला पुरुषस्वास्थ्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी. पुरुष म्हणजे शरीराने कणखर, मनाने खंबीर हवा या अवास्तव चौकटीतून बाहेर पडून एक माणूस म्हणून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याबद्दल मोकळेपणाने बोलण्यासाठी. विशेषतः मानसिक स्वास्थाच्या बाबतीत 'मदत करा ' म्हणत हक्काने हाक मारावी असे विश्वासाचे जाळे घट्ट विणण्यासाठी. पुरुषासारखा पुरुष असून... ही पारंपारीक चौकट नाकारुन पुरुषांच्या /मुलांच्या वाट्याला येणारा मानसिक्/शारीरिक्/लैगिक छळ याबाबत संवाद , सपोर्ट नेटवर्क हे गरजेचे आहे हे खुल्या मनाने स्विकारणे, त्याबद्दल जागृती निर्माण करणे हे देखील फार महत्वाचे. या निमित्ताने आपापल्या छोट्याशा वर्तुळापुरते काम सुरु केले तरी वर्षभरात खूप काही मिळवता येइल.
स्वाती२ - छान पोस्ट.
स्वाती२ - छान पोस्ट.
मोव्हेंबर बदल फार पूर्वी
मोव्हेंबर बदल फार पूर्वी ऐकलेले. माझ्या फर्स्ट जॉबला असताना तिथे तो साजरा करायचा विचार एच आर लोकं करत होती. मी अर्थातच त्याला तयार होतो. पण पुरेसा सिरीअस रिस्पॉन्स न मिळाल्याने बारगळले.
पुरुषांना देखील भावना असतात
पुरुषांना देखील भावना असतात हे मान्य...पण पुरुष दिनाचे (की दीनाचे
) विशेष अप्रूप नाही.
एक जनरल observation
पुरुषांमध्ये दोन प्रकार ठळकपणे दिसून येऊ लागलेत हल्ली
एक जे अजिबातच समाजात राहायच्या पातळीचे नसतात ( त्यांच्याबद्दल असे स्वतः पुरुष असूनही वाटते).
दुसरे बिचारे संसाराचा गाडा ओढत आतून खचलेले किंवाहळवेपणा, ई. ओपनली दाखवून प्रगल्भ माणूस असल्याची जाणीव करून देणारे.
(उदा. चांद्रयान फेल झालं तेंव्हा डॉ के सिवन ह्यांचे अश्रू)
मी कोठेतरी ऐकले होते, we/ this society needs more men crying out in public openly....
============
असा कोणताही दिवस, फक्त शुभेच्छा देण्यापुरता मर्यादित न ठेवता आणखी काहीतरी करता येईल का ह्याचा जरूर विचार करतो.
we/ this society needs more
we/ this society needs more men crying out in public openly.
>>>
पुरुषांनी आपली संवेदनशील बाजू जगासमोर येईल असे काहीतरी करून हा दिवस साजरा करायला हवा. काय करता येईल यासाठी विचार करायला हवे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी स्वत: माझा हळवा कोपरा दाखवायला लाजत नसल्याने पुरुषासारखा पुरुष असा काय वागतो याची सारवासारव म्हणून घरचे नेहमी म्हणायचे की कर्क राशीचा आहे म्हणून तसा आहे तो
हो ना शरद उपाध्येही कर्क
हो ना शरद उपाध्येही कर्क राशीला फार मुळूमुळू दाखवतात. ते म्हणतात, पुरुषांकरता ही रास जडच जाते. रेल्वेत यांनाच मुली उठुन जागा देतात.
.
काहीही :(. एक तर मुलींनी अशी जागा धडधाकट बाईला दिली काय अन पुरुषाला दिली का, की फर्क पैंदा? उगाच फालतू कल्पना डोक्यात घालायच्या.
कर्क रास मस्त आहे. अतिशय काव्यमय, रोमँटिक, भावुक लोक असतात. आणि वाट्टेल त्यांच्या थार्यालाही जात नाहीत. खेकडा कसा अपली सुरक्षा/ आपले कवच सांभाळून असतो, तसे हे स्वतःला सांभाळून असतात.
भरपूर श्रोते मिळाले की काही
भरपूर श्रोते मिळाले की काही वक्ते पुड्या सोडायला मागे पुढे पहात नाहीत.
चंपक आणि ठकठक मधले जोक
चंपक आणि ठकठक मधले जोक घ्यायचे, एक दोन राशी घुसवायच्या त्या विनोदात आणि सादर करायचे असा तो उपाध्ये प्रकार आहे..
*असा तो उपाध्ये प्रकार आहे..*
*असा तो उपाध्ये प्रकार आहे..* +1
प्रकार बरोबर आहे. फक्त चंपक
प्रकार बरोबर आहे. फक्त चंपक आणि ठकठकमध्ये असे जोक नसायचे.
मी सहावी की सातवीत असताना ते स्टॅण्ड अप कॉमेडी नाटक पाहिले होते. तेव्हा मजा आल्याचे आठवतेय. अति झाले की बोअर होते. पण एकदा नक्की बघावे.
औरंगाबाद : पत्नी पीडित पुरुष
औरंगाबाद : पत्नी पीडित पुरुष आश्रम येथे जागतिक पुरुष दिन साजरा
https://www.loksatta.com/aurangabad/world-men-day-celebrated-at-wife-vic...
मायबोलीवरील सर्व पुरुष आयडींना 'जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!'
आज जागतिक पुरुष दिन होता आणि
आज जागतिक पुरुष दिन होता आणि यावर्षीही हे कळले पण नाही
पुरुषदिनाला काही महत्व आहे की नाही.. पुरुषांना काही ईज्जत आहे की नाही..