देवमाणूस

Submitted by _गार्गी_ on 18 November, 2020 - 00:25

सत्य घटनेवर आधारित आहे.
वेगवान कथा मांडणी आहे. सर्व नवोदित कलाकारांचे अभिनय उत्तम.
सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता झी मराठी वर!

Group content visibility: 
Use group defaults

सगळ्याच सिरीयल मध्ये सतत बाळबोध, बालिश,बकवास ,बंडल दाखवत राहतात,दाखवत राहतात..कारण बेअक्कल प्रेक्षक बघत राहतात,बघत राहतात Angry

चंपा तुम्ही नमूद केलेले प्रश्न खरेच वादातीत आहेत.
खऱ्या घटनेत डॉक्टर मृतदेहांची विल्हेवाट कोंबड्यांच्या पोल्ट्री एरियात लावतो जेणेकरून सडलेल्या मृतदेहाच्या वासाची जाणीव पोल्ट्री मधील घाण वासाने होणार नाही परंतु मालिकेत त्याबद्दल काहीही दाखवले नाही.

सरु आज्जीच्या वाड्या समोर एक घर आहे ते कायम बंद असते. त्यात कुणीही राहत नाही. गल्लीत सुद्धा कोणीही फिरत नाही. एवढं खेडेगाव आहे पण गावातील समाज जीवन केवळ फालतू नाम्या अन् बिनडोक बज्याला दाखवून संपतं... नाही म्हणायला सरु आज्जीची मैत्रीण तिच्यापेक्षा लाऊड अभिनय करून आणि पक्की शहरी भाषा लहेजा जपत दाखवली जाते.

Asp पूर्ण मूर्ख बाई दाखवली आहे.ती पोलिस मध्ये असून इतकी महामूर्ख असेल असं वाटलं नव्हत.
झडती घेताना त्या मूर्ख acp ची मुलगी dr कडे येतेच कशी.
पोलिस अतिशय बावळट आणि मूर्ख दाखवले आहेत.
ह्या असल्या मालिका बंद पडतील तेच चांगले

लग्नाच्या जेवणात जसे पाहुणे वाढले की पाणी टाकून मठ्ठा वाढवला जातो तसेच ह्या सगळ्या मालिकांचे होतं. चव सगळी बिघडून जाते. मला वाटते कोणतीही मालिका बनवायच्या आधी ह्यांच्याकडे स्क्रिप्ट तयार नसते. नुसती थीम असते. जसे की - चला एका गरीब जाड मुलीवर सिरीयल बनवूया मग सुरू होते "येऊ कशी तशी मी ना" . TRP रेटिंग आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून पुढे ठरते कोणत्या पात्राला जास्त फुटेज द्यायचे , कहाणीला कसे वळण द्यायचे वगैरे. मागे वाचले होते की बऱ्याच वेळेला स्क्रिप्ट सेट वर येऊन लिहिली जाते. कोणता अभिनेता available आहे त्या वरून.
मला प्रक्षकांचीच दया येते. कसलं कमी दर्जाचे कंटेंट आपल्या वाट्याला येतं. मी मालिकांची तुलना वेब सिरीजशी करतो. बाहेरच्या देशातल्या जाऊ द्या पण देशी वेब सिरीज जसे की पाताललोक , असुर, स्पेशल अप्स वगैरे ह्यांच्या कंटेंट वर किती काम केलेले असते. प्रत्येक पात्रा मागे आणि प्रसंगा मागे किती अभ्यास असतो. मालिकांची आणि वेबसिरीजची तुलना अयोग्य आहे हे मान्य पण कंटेंट वर तरी काम होऊ शकते. बऱ्याच मराठी कादंबऱ्या वाचल्या की ह्या वर किती सुंदर मालिका होऊ शकेल असे वाटते. जसे की तुंबाडचे खोत किंवा मुखवटा.
पूर्वी स्टार बेस्टसेलर्स नावाची मालिका यायची स्टार टीवी वर. छोट्या छोट्या कहाण्या 2-3 एपिसोड्स मध्ये गुंफलेल्या असायच्या. के के मेनन, इरफान खान वगैरे मंडळींनी त्या वेळी त्या मध्ये काम केले होते. युट्युब वर असतील बहुदा. Highly Recommended. अशा मालिका मराठी मध्ये का नाही बनू शकत?
ह्या मालिकांचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्या मध्ये मी अजिबात बसत नाही म्हणून माझा प्रतिसाद असंबंधीत वाटू शकतो. पण जे वाटते ते लिहिले (जास्त मालिका पहात नाही. येता जाता जेवढे दिसते त्यावरून लिहिले आहे)

बाकी नोव्हेंबर 2020 पासून झी मराठीच्या सर्व मालिकांचा TRP जबरदस्त घसरला हे वाचून प्रचंड खूश झालो होतो. पण तोच स्टार प्रवाहाच्या मालिकांचा वाढला आहे हे कळल्यानंतर काळजी वाटू लागली आहे Lol

झम्पू, नोव्हेंबर २०२० नंतर बरेच पाणी पुलाखालून वाहुन गेले आहे Bw

झी वाल्यांनी प्राईम स्लॉट्ला वर्षानुवर्षे जळूसारख्या चिकटून बसलेल्या तद्दन फालतू मालिका एकतर डीग्रेड केल्या किंवा बंद केल्या आणि त्याबदल्यात "उत्सव नात्यांचा नव्या कथांचा" या थीमवर आधारीत नवीन सिरियल्स सुरू केल्या.. मला वाटते घसरलेला टी.आर.पी. वर काढणे झी साठी फार मोठी गोष्ट नाही परंतु टी.आर.पी. राखून नंबर गेम मधे टिकून रहाणे यात त्यांचा हात धरणारे कदाचित कोणीच नाहीत. Wink

मालिकांपेक्षा वेब सिरिज कधीही उजव्याच.. त्यात काहीच वाद नाही. परंतु, टिव्ही चॅनेल्स आणि त्यावरील मालिका यांचा एक वेगळाच क्लास आणि मजा आहे असं जाणवतं. सगळे एकाच वेळी एकाच ठिकाणी टिव्हीला चिकटतात हे प्रकरण वर्षानुवर्षं टिकुन आहे Bw

मालिकांपेक्षा वेब सिरिज कधीही उजव्याच.. त्यात काहीच वाद नाही. परंतु, टिव्ही चॅनेल्स आणि त्यावरील मालिका यांचा एक वेगळाच क्लास आणि मजा आहे असं जाणवतं. सगळे एकाच वेळी एकाच ठिकाणी टिव्हीला चिकटतात हे प्रकरण वर्षानुवर्षं टिकुन आहे Bw >>>>>>>>>>>>
सहमत..... या मालिका ग्रामीण भागात जास्त बघितल्या जातात पण खरंच यांचा एक वेगळाच क्लास आणि मजा आहे .

Asp पूर्ण मूर्ख बाई दाखवली आहे.ती पोलिस मध्ये असून इतकी महामूर्ख असेल असं वाटलं नव्हत. >>> अगदी! कालचा महा एपिसोड फक्त डिंपलला तो डॉक्टर नसुन कंपाउंडर आहे हे कळण्यासाठी होता असे वाटले. त्या ईन्स्पेक्टरला मारणे म्हणजे काहीतरीच होते. त्याच्या ऐवजी त्या बाईला मारायला हवे होते इतकी बावळट आहे ती. तो इन्स्पेक्टर अॅक्टींग तरी चांगली करायचा .

कालचा एपिसोड नाही पाहिला... पण एकंदरीत उगिच्च साडेदहाचा टाईमस्लॉट अडवून ठेवला आहे असं वाटत रहातं. या विषयावर खूप चांगली सिरियल बनली असती परंतू विस्कळीत पटकथेमुळे पुरतं मातेरं झालं आहे. केवळ अंगप्रदर्शन करण्याच्या हेतुने मालिकेत एंट्री झालेली एसिपीण काहिही प्रभाव पाडू शकली नाही. डॉक्टर, सरू आजी अन डिंपल काय ते युएसपी आहेत.

राखेचा३ रात्री ११ च्या स्लॉटला ठेऊन साडेदहाच्या देवमाणसाला बघायला अजुन पब्लिक गोळा होईल असं झी वाल्यांना वाटते की काय..???

इन्स्पेक्टर बाईंचे उच्चार काही तरी वेगळेच आहेत. एकंदरीत प्रोमो मध्ये काहीतरी भन्नाट घडणार असे दाखवायचे आणि एपिसोड मध्ये तसे काहीच घडत नसल्यामुळे प्रेक्षकांना वेड्यात काढल्या सारखे वाटते. हा गुण बहुदा स्टार प्रवाह कडून उचलेला दिसतोय झी वाल्यांनी.
DJ भाऊंच्या वरच्या प्रतिसादाशी सहमत

हा गुण बहुदा स्टार प्रवाह कडून उचलेला दिसतोय झी वाल्यांनी.>> अगदी अगदी.. ही झी वाल्यांची खुबी कधीच नव्हती. प्रवाह वाले काही एंप्लोयी झी मधे जॉबला आलेत की काय?? Proud

मला वाटलं हे चक्र असंच सुरु राहणार हे सूचित करून मालिका संपली. वंदी आत्याला चुकून फेकलेला तांब्या लागतो हाच USP होता काल. मी कलर्स मराठी बघायचं सोडून हे बघत बसले कारण मला वाटलं हा शेवटचा भाग आहे. फसवले गेल्याची भावना आहे. यापुढे नाही बघणार. त्या मूर्ख दिव्या आणि मायराला काय बघायचं. मायरा आईला नको ते सांगते पण डॉक्टरची चालबाजी कधीच सांगत नाही, माठ आहे तिच्या आईसारखी. दोघी मायलेकी आयता बाप मिळवायला आतुर झाल्यात. डॉक्टर बद्दल खरं कळलं तरी दिव्या म्हणेल तुम्ही माझ्याशी लग्न करणार असाल तर मी तुम्हाला अजून खून करण्यासाठी मदत करेन Proud इंजेकशन खुपसल्यानंतर मी बघितलंच नाही.

चंपा, अगदी मनातलं बोललात.
मला वाटलेले तो इन्स्पेक्टर मायराचा खरा बाप असेल. पण कशाचे काय! आता त्या मुर्ख बाई साठी कोण बघेल सिरियल. तो इन्स्पेक्टर सगळा इन्टरेस्ट घेऊन गेला. किती निर्दयीपणे मारले त्याला.
अगदीच फसवले गेले प्रेक्षकांना. आतापासून नाही बघणार ही मालिका. Angry

झीम महिला पोलिसान्ना चुकीच्या पद्दतीने दाखवतात. ह्या सिरियलमधली आणि ' काय घडल त्या रात्री' सिरियलमधली लेडी पोलिस ( मानसी साळवी) कुठेही इन्व्हिगेस्टशन साठी जाताना स्वतःच्या मुलीन्ना घेऊन जातात.

वंदी आत्याला चुकून फेकलेला तांब्या लागतो हाच USP होता काल.>>>>>>>तो तांब्या काटकोनात कसा काय वळतो हे डायरेक्टरलाच माहिती
आज्जी तांब्या सरळ फेकते आणि वाड्याचं एन्ट्रन्स डाव्या हाताला असते तिने मारलेला तांब्या, वंदिला दरवाज्यात पाय ठेऊन आत येते न येते तोच लागतो आणि ती मग त्यालोकांच्या समोर येते। तो तांब्या टर्न कसा झाला ???/

तो तांब्या टर्न कसा झाला ???/ >>> अण्णा नायकाचे भुत आले असेल तिथे साडेदहाचा टाईम स्लॉट अडवून ही लोकं नेमक करतायत तरी काय हे बघायला. Wink

अक्षरशः काहीही आतर्क्य शेवट दाखवून मालिका संपवली.

खर्‍या आयुष्यातील देवमाणुस अजुन जिवंत आहे आणि त्यावर न्यायालयात केस सुरु आहे म्हणुन सिरियल मधील देवमाणुस काहीही करून जिवंत झालेला दाखवून सिरियल संपली (न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण होऊन खर्‍या देवमाणसाला शिक्षा झाल्यावर कदाचित पुन्हा भाग २ येऊ शकतो.)

जे "देवमाणुस"चे रेग्युलर व्युवर्स होते त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी प्रार्थना कराविशी वाटते Proud

जरा उलगडून सांगा की नक्की काय झालं ते. परत जिवंत झाला म्हणजे तो मेला कधी होता. तो सांगाडा कोणाचा असतो जो टोण्याला सापडतो.

अरे बापरे.. तुम्ही फारच मागे राहिलात की हो चंपा. तो टोण्याला सापडलेला सांगाडा त्या म्हातार्ड्याच्या मुलीचा असतो. नाव विसरलं. त्यावेळी ती लेडी ए.सी.पी. होती.

कालच्या भागात शेतात चंदाने डॉक्टरला पोटात चाकू खुपसून जखमी केलेलं दाखवलं. ती डॉक्टर्च्या डोक्यात मोठा दगड ३-४ वेळा आदळते. म्ग डॉक्टर गार होतो.. त्याच वेळी डिंपल मागून दांडकं घेऊन येत चंदाचं टाळकं फोडत तिलाही यमसदनी पाठवते अन पैशांची बॅग घेत पोबारा करते. नंतर चिता पेटलेली दाखवली आहे. त्यात चंदा आहे की डॉ़क्टर काही कळलं नाही.. परंतु शेवटी एका हॉस्पिटल मधील आयसीयु मधे एक पेशंट (जो की डॉ. देवमाणुस असतो) तडफडताना दाखवला अन त्या आयसीयु वाल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोशित केलेलं दाखव्लं. तिथुन सगळा स्टाफ बाजुला होतो तेव्हा आपला डॉक्टर खाड्कन डोळे उघडताना दाखवला आहे. इथे सेरियल संपते.

तो सांगाडा विजय(पतपेढी वाला) च्या बायको चा असतो ना? .. तिचे दागिने ओळखतो ना तो.
मी पुर्ण नाही बघितली सिरियल पण शेवटी थोडे एपिसोड पाहिलेय.

ह्या मालिकेत पोलिस हे अतिशय महामूर्ख दाखवले आहेत.. .
DCP दिव्या म्हणजे मूर्ख पणाच कळस .
स्त्रिया आणि पोलिस ह्यांची इज्जत पूर्ण काढली आहे ..शेवटी ची गुजराती बाई doctor ल स्वत्व चे आत्म समर्थन करते ह्याचा सरळ अर्थ स्त्रिया महा मूर्ख असतात हाच संदेश द्यायचा आहे असे वाटते

Biggrin

सरुआजीच्या इरसाल शिव्या देवमाणुसच्या निर्माते, डायरेक्टर, पटकथालेखक, संवादलेखक, वेषभुषाकार, नेपथ्य सर्वांनाच द्याव्यात अशी परिस्थिती आहे.... Biggrin Biggrin Biggrin

Pages