Submitted by _गार्गी_ on 18 November, 2020 - 00:25
सत्य घटनेवर आधारित आहे.
वेगवान कथा मांडणी आहे. सर्व नवोदित कलाकारांचे अभिनय उत्तम.
सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता झी मराठी वर!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान लिहिलंत डीटेल मधे.. इथले
छान लिहिलंत डीटेल मधे.. इथले अपडेट्स वाचुन आता मालिका बघाविशी वाटु लागली..
अपडेटच्या प्रतीक्षेत
अपडेटच्या प्रतीक्षेत
शनिवारचा भाग नाही पाहिला
शनिवारचा भाग नाही पाहिला त्यामुळे आजच्या भागाचे आपडेट उद्या टाकेन.
मंजुळा वाड्यात जायला निघते
मंजुळा वाड्यात जायला निघते तोच बाहेर संजय उभा असतो. तो तिला गाडीवरून वाड्यात सोडायला निघतो. पण अर्ध्या वाटेत संजयची गाडी बंद पडते. तेवढ्यात तिथे नाम्या येतो मंजुळाला उशीर होत असल्याने ती नाम्याला सायकलवरून वाड्यात सोडायला सांगते.
ईकडे वाड्यात टोन्या कालच्या प्रकारामुळे डॉक्टरला धमकावत असतो. ते बघून मंजुळा टोन्याला डॉक्टरची माफी मागायला लावते.ते बघून डॉक्टर तिला म्हणतात की टोन्या लहान आहे, तुम्ही त्याचं बोलणं मनावर घेऊ नका. ते ऐकून मंजुळा डॉक्टरला म्हणते की काही गोष्टी वेळीच थांबलेल्या चांगल्या असतात. हे ऐकून डॉक्टर चपापतो .
इकडे नाम्या सायकल कडे बघून विचार करत असतो. तेवढ्यात बज्या दळणाचा डब्बा घेऊन येतो आणि सायकलच्या सीटवर ठेवतो. ते बघून नाम्या बज्यावर चिडतो आणि त्याला सगळा किस्सा सांगतो. त्याला हेही सांगतो कि मंजुला तो आवडतो.
तेवढ्यात त्याला डॉक्टरचा फोन येतो डॉक्टर त्याला दोन कोल्ड्रिंक्स पाठवायला सांगतात.
मंजुळा दवाखान्यात येते तेव्हा डॉक्टर तिला सांगतो की त्याला तिची माफी मागायची होती. ति समजतेय तसा तो खरच नाहीये असही तो म्हणतो. मंजुळा म्हणते की मंगल ने तिला त्याच्याविषयी सांगितले आहे. तो म्हणतो की जर त्यांची आधी एकमेकांशी ओळख असती तर त्यानेच तिला लग्नासाठी विचारल असत . हे सांगताना तो मुद्दाम तिच्या साडीवर कोल्ड्रिंक्स सांडतो. हे बघून मंजुळा चिडते आणि त्याला धमकी देते की तिच्या नादाला लागला तर परिणाम वाईट होतील.
हे ऐकून डिंपल तिथे येते आणि त्याला सांगते की त्याने उगाच वेळ वाया घालवू नये. आणि त्याला चॅलेंज करते की मंजुळा त्याच्या हाती नाही लागणार.
रात्री तो मंजुळा विषयी विचार करत उभा असतो तोच त्याला विठ्ठल दिसतो. तो विठ्ठलला विचारतो की मंजुळा त्याच्या हाती लागेल का तेव्हा विठ्ठल नेहमी प्रमाणे त्याच्याकडे बघून निघून जातो.
दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर डिंपलला मंजुळा विषयी माहिती काढायला सांगतो. तेव्हा डिंपल त्याला चॅलेंज ची आठवण करून देते. तेव्हा तो तिला म्हणतो की ती हारली काय किंवा जिंकली काय फायदा तिचाच होणार आहे. तेव्हा डिंपल तिला हे काम जमणार नाही असं सांगते. हे ऐकून डॉक्टर तिला चॅलेंज करतो आणि ती ते स्वीकारते.
एकदम मस्त अपडेट -
एकदम मस्त अपडेट -
ईकडे वाड्यात टोन्या कालच्या प्रकारामुळे डॉक्टरला धमकावत असतो. >>> Can you please elaborate?
तेवढ्यात डॉक्टर तिथे येतो आणि
Can you please elaborate? >> तेवढ्यात डॉक्टर तिथे येतो आणि तिच्या हातातली
खाऊची पिशवी हिसकावून घेतो. आणि तिला ऐकवतो की कसं तिने आणलेल्या डब्यामुळे विजयला food poisoning झाल आणि आज ती मुलांना खायला देऊन त्यांच्या जिवाशी खेळत आहे. तसेच तो तिला हे ही ऐकवतो की काल त्याच्यामुळेच विजयचा जीव वाचला. आणि तिला सुद्धा त्याची गरज लागणार आहे > या सगळ्यामुळे ( आणि खाऊ न मिळाल्यामुळे) टोन्या चिडलेला असतो.
Okay... Thanks...
Okay... Thanks...
कालच्या चला हवा येऊ द्या मधे
कालच्या चला हवा येऊ द्या मधे देवमाणुस चे ३ जण आलेत.. त्यांच्यावर मस्त स्कीट सुरु आहे. आजच्या भागात सुद्धा ते कॅरी ऑन होणार आहे.
हो. डिंपल छान दिसतेय. टोन्या
हो. डिंपल छान दिसतेय. टोन्या आणि सरूआजी यायला हवे होते.
नाम्या मंजुने सांगितलेल सामान
नाम्या मंजुने सांगितलेल सामान पोचवायला तिच्या घरी जातो. ( अगदी गॉगल वैगेरे घालून) पण मंजुळा त्याला घरात न घेताच हाकलून लावते.
मंजुळाला दिसतं की तिच्या नवर्याच्या गोळ्या संपत आलेल्या आहेत आणि त्या आणायला मुंबईला जावं लागणार असतं. नाम्या तिला सांगतो की तो सामान भरायला मुंबईला जातो तेव्हा तिला त्याला गोळ्या आणायला सांगते आणि याविषयी कोणालाही सांगू नकोस असे बजावते.
ईकडे सरूआजी मंजुची वाट बघत बसलेली असते. मंजु आल्यावर ती तिच्या नवर्याचा विषय काढते आणि सांगते की काहीही झालं तरी तिच्या पाठीशी सरूआजी खंबीरपणे उभी आहे.
बाजाराचा दिवस असल्याने वंदीआत्या तिथे येते आणि भाऊबीजेच गिफ्ट मागते. तेव्हा डिंपल तिला सांगते की तिच लग्न मोडल्याने त्यांनी दिवाळी साजरी केली नाही.
तेव्हा वंदीआत्या तिला म्हणते की तिला सगळ माहित आहे. आणि त्यांच्याकडे अचानक एवढा पैसा कुठून येत आहे हे ही ती शोधून काढेल.
डॉक्टर नाम्याला काही औषधं आणायला सांगतात तेव्हा नाम्या एक औषध आणायचं विसरतो. तेव्हा डॉक्टर त्याला लिस्ट मागतात . चुकून तो मंजुची लिस्ट डॉक्टरला देतो. लिस्ट बघून डॉक्टरला कळतं की मंजुच्या घरी नक्कीच कुणीतरी पेशंट आहे.
आणि जिथे पेशंट तिथे डॉक्टर.
। ाांाााांााांाााांाांाााांााांाााा
ही एवढीशी लिस्ट मधली चूक पुढे
ही एवढीशी लिस्ट मधली चूक पुढे मंजुळाच्या जीवावर बेतू शकते
Once upon a time, someone has
Once upon a time, someone has promised to give daily updates of this series....
Once upon a time, someone has
Once upon a time, someone has promised to give daily updates of this series.... >>> हो मीच ती :}
पण online exams मधे खूप busy होते. :>
पण उद्यापासून daily updates मिळतील!
धन्स..!
धन्स..!
(No subject)
मंजुळा वाड्यात येते तेव्हा
मंजुळा वाड्यात येते तेव्हा तिला डिंपल नाश्ता करण्याचा आग्रह करत असते. तेवढ्यात क्रिश तिथे येतो. ( या मुलाचा मालिकेत नक्की काय रोल आहे हेच मला समजले नाहिये. ) आणि तो विशिष्ट आवाज काढून डिंपलला हाक मारत असतो. ते मंजुळा बघते आणि त्याला चांगलाच चोपुन काढते. डिंपल दवाखान्यात येते तेव्हा डॉक्टर तिला मंजुच्या घराची चावी चोरण्याचे काम सांगतात. आणि बक्षिसाचे अमिष दाखवतात.
नाम्या मंजुला पाहण्यासाठी वाड्यात येतो. तो दवाखान्याजवळ थांबून मंजुला बघत असतो तोच डॉक्टरचं त्याच्याकडे लक्ष जातं. तेव्हा तो दवाखान्यात जाऊन डॉक्टरांची विचारपूस करू लागतो. तेव्हा डॉक्टर उधारीचा विषय काढतात आणि त्याला थांबायला सांगुन पैसे आणायला जायचं नाटक करतात. नाम्याला खिडकीत ऊभा असलेला पाहून डॉक्टर खिडकी चे दार जोरात त्याच्या हातावर आपटतात. तेव्हा नाम्याची किंचाळी ऐकून मंजुळा आणि वाड्यातले सगळेच धावत दवाखान्यात येतात.
कोणाचेही लक्ष नाही हे पाहून डॉक्टर मंजुची पर्स उचलत असतात. तेवढ्यात डिंपल तिथे येते. आणि त्यांना सांगते की मुलांनी पाहीलं तर उगाच बोभाटा होईल. तेव्हा त्यांनी दवाखान्यात जावं ती तिला दिलेलं काम व्यवस्थित करेल.
डॉक्टर दवाखान्यात येऊन नाम्याला औषध देऊन घालवून देतात. तोपर्यंत डिंपल तिथे चावी घेऊन येते.
ती चावी घेऊन डॉक्टर मंजुळा च्या घरी जातात.
Thanks!!
Thanks!!
Thanks!! >>
Thanks!! >>
डॉक्टर डिंपलने दिलेली चावी
डॉक्टर डिंपलने दिलेली चावी घेऊन मंजुच्या घरी जातो. ईकडे मंजु घरी जायला निघताच डिंपल तिला बोलण्यात गुंतवते. डॉक्टर घरात घुसून ईकडे तिकडे पाहात असतानाच मंजु तिथे येते आणि डॉक्टरला ओढतच बाहेर घेऊन येते. तेव्हा डॉक्टर गावातील माणसासमोर तमाशा करतो. आणि त्यांना म्हणतो की मंजुच्या घरी कोणीतरी पेशंट आहे आणि तोच वाचवा म्हणून ओरडत होता. तेव्हा डिंपल तिथे येते आणि ती सांगते की डॉक्टर खरे बोलत आहेत. डॉक्टर सगळ्यांना म्हणतात की सगळे मिळून मंजुच्या घरात जाउन तिने कुणाला लपविले आहे ते पाहू. ते ऐकून मंजु घाबरते आणि दार लावून घेते. तेव्हा गावकरी मंजुला दोषी ठरवतात.
मंजु रडत असते तेव्हा तिचा नवरा तिला कारण विचारतो . ती त्याला घडलेला प्रकार सांगते. तेव्हा तो तिला मुंबईला परत जाऊ असे म्हणतो. ती त्याला म्हणते की आता जर कोणी त्रास दिला तर तो तिचे दुसरे रूप बघेल.
बज्याची आई सरूआजीला मंजु विषयी सांगत असते की कसे गावातील पुरूष तिच्या मागे लागले आहेत. नाम्याबद्दलही ती सरूआजीला सांगते. तेवढ्यात नाम्या तिथे येतो. तेव्हा सरूआजी त्याला मंजुच्या मागे न लागण्याविषयी ताकीद देते.
Thanks for update
Thanks for update
किती दिवस झालेत, टीवी लावलेला नाही, त्यामुळे काही कळायला मार्ग नाही.
मंजुळाविषयी वाईट वाटतंय.
डॉक्टर काल झालेल्या
डॉक्टर काल झालेल्या प्रकारामुळे गाव सोडून जात असतात. तेव्हा सगळे गावकरी त्यांना न जाण्यासाठी विनवणी करतात. तेवढ्यात तिथे मंजु येते. सगळे गावकरी डॉक्टरांच्या गाव सोडण्याला ती जबाबदार असल्याचा आरोप तिच्यावर करतात. ते ऐकून ती डॉक्टरांना गाव न सोडण्याविषयी विनवते.
संजय मंजुच्या जमिनीसाठी ग्राहक घेऊन येतो. तेव्हा डॉक्टर त्याला सांगतात की मंजुळा ने ती जमीन डॉक्टरांना विकायचे कबूल केले आहे. आणि ते ती जमीन गरीबांसाठी हॉस्पिटल बांधायला वापरणार आहेत.
तेव्हा तो ग्राहक मंजुळाला सांगतो की डॉक्टरांना कबूल केलेली जमीन तो घेऊ शकत नाही.
Thanks...
Thanks...
मंजुळा फासात गुंतत चाललीये हळूहळू...
मंजुळा च्या नवर्यासाठी
मंजुळा च्या नवर्यासाठी मुंबईवरून डॉक्टर येतो तेव्हा मंजु त्याला आत घेते. कुणासाठीही न उघडणारा दरवाजा ह्या व्यक्तीसाठी उघडलेला बघून गावात उलटसुलट चर्चा रंगते. ती गोष्ट गावातील बायकांमार्फत डॉक्टर पर्यंत पोचते. हे ऐकून डिंपल डॉक्टरांना म्हणते, मंजुच्या आयुष्यात दुसरा कोणीतरी आहे त्यामुळेच ती त्यांना भाव देत नाही. हे ऐकून डॉक्टर रात्री मंजुच्या घरी जातो आणि मंजुला व त्या व्यक्तीला एकत्र बघतो.
रात्री डिंपल डॉक्टरांच्या खोलीत जाते व त्यांनी मंजुच्या घरी काय पाहीलं हे विचारते. तेव्हा डॉक्टर तीला त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती काढायचे काम देतो. हे ऐकून डिंपल तीला हे काम जमणार नाही असे म्हणते. तेव्हा डॉक्टर तीला ऐकवतो की तीला ह्याच कामाचे पैसे मिळतात. आणि त्याला नाही ऐकायची सवय नाहीये.
गावात मंजुच्या उलटसुलट चर्चेमुळे तीच्या ट्यूशनचे विद्यार्थीही कमी होतात.
गावातील माणसे डॉक्टरकडे येतात आणि मंजुला गावाबाहेर काढण्याची विनंती करतात.
मंजु तिच्या नवर्याला रात्री
मंजु तिच्या नवर्याला रात्री अंगणात घेऊन जाते. तिथे ते दोघे गप्पा मारत असतात तेव्हड्यात तिच्या नवर्याला अस्वस्थ वाटू लागतं. ती पाणी आणण्यासाठी आत जाते तेव्हा तिच्या दाराजवळ काही माणसे दारू पिऊन येतात आणि तिच्याबद्दल असभ्य बोलु लागतात. त्यांच बोलणं मंजुच्या नवर्याच्या कानावर पडतं.
दुसऱ्या दिवशी तीच माणसे डॉक्टर कडे जातात आणि मंजु मुळे गावाची बदनामी होतेय असे सांगून तिला गावाबाहेर काढण्याची विनंती करतात. हे ऐकून डॉक्टर खुष होतो पण चेहर्यावर तसे न दाखवता त्यांना सांगतो की तो मंजुशी याबाबत बोलेल. डिंपल त्याला ती माणसे का आली होती हे विचारते. तेव्हा तो म्हणतो की त्याच्या हाताला धरून त्याला घराबाहेर काढलेल्या मंजुळाचं गावात राहाणं किंवा न राहाणं हे त्याच्या हातात आहे. आणि तो डिंपलला मंजुच्या घरी जाऊन तिला ह्या गोष्टीची कल्पना द्यायला सांगतो.
गावकरी जाताच तो मंजुच्या घरी जातो आणि तिला घडलेल्या प्रसंगाविषयी सांगतो आणि हेही सांगतो की अशा परिस्थितीत तो तिला एकटीला नाही सोडू शकत. तो तिला त्याच्या सोबत यायला सांगतो तेव्हा ती तिची बॅग घ्यायला आत जाते. तेव्हड्यात तिथे सगळे गावकरी येतात आणि गोंधळ घालू लागतात. ते ऐकून डॉक्टर मनोमन खुष होत असतो तोच मंजुळा दार उघडते आणि सगळ्या नजरा तिकडे वळतात.
Thanks for update
Thanks for update
Thanks for update Happy >>>
Thanks for update Happy >>>
मंजुळानं तिच्या घरात कोणाला
मंजुळानं तिच्या घरात कोणाला लपवलं आहे? याचं उत्तर गावकऱ्यांना मिळालं असलं तरी यामुळं डॉक्टर अजित कुमार याची चांगलीच फजिती होते. गावकऱ्यांसमोर नाचक्की झाल्यानं अजित कुमार भयंकर चिडतो आणि कुठेतरी निघून जातो.
दुसऱ्या दिवशी गावकरी अजित कुमारला गावभर शोधत असतात. पण तो कुठंच सापडत नाही. डॉक्टर सापडत नसल्याचा दोष गावकरी मंजुळाला देतात. तिच्यासोबत झालेल्या भांडणामुळं अजित कुमार गाव सोडून गेला, असं म्हणतात. डॉक्टरचा शोध घेण्यासाठी पोलिसही वाड्यात येतात. मंजुमुळेच अजित कुमार गायब असल्याचं गावकरी पोलिसांना सांगतात. त्यामुळं पोलिस मंजुळाला चौकशीसाठी घेऊन जातात.
आताच मी हा धागा शोधत होतो.
आताच मी हा धागा शोधत होतो.
देवमाणूस रिपीट चालुये..
Thanks
@गार्गी - अपडेटच्या
@गार्गी - अपडेटच्या प्रतीक्षेत
मी आजकाल बघत नाहीये.
मंजुळा ने कानउघडणी केल्यामुळे
मंजुळा ने कानउघडणी केल्यामुळे अजित मधे फारच बदल झालाय. ( आता हा बदल किती दिवस टिकतो हे त्याच्यावरचं अवलंबून आहे )
बज्या डॉक्टर कडे येतो आणि बोलता बोलता हेही सांगुन जातो की मंजुच्या जमिनीचा व्यवहार होणार असल्यामुळे ती मुंबईला परत चाललीये. हे ऐकून डॉक्टर ( अगदी चांगल्या मनाने ) जो मंजुची जमीन विकत घेणार आहे त्याच्याकडे जाऊन त्याचे आभार मानतो. ( याची काय गरज होती हा प्रश्न आपल्यासोबत त्या माणसालाही पडतो! )
मंगल डिंपलला हळूच विचारते की डॉक्टर खरचं मंजुच्या घरी गेले होते का तेव्हा डिंपल तिला समजावते की त्या प्रकरणात मंजु आणि डॉक्टर या दोघांचाही दोष नाही.
मंजुला डॉक्टरांना बोलल्या बद्दल वाईट वाटत असत आणि डॉक्टर सुध्दा तिला टाळत ( की टाळण्याचे नाटक करत ) असतो. तेव्हा मंजुळा त्याच्याशी नव्याने ओळख करून घेत मैत्रीचा हात पुढे करते. ( maybe एक नविन सुरूवात)
डिंपलला मात्र डॉक्टर च्या चांगुलपणाचा राग येत असतो. डॉक्टर खरच सुधारले आहेत हे बघण्यासाठी ती त्यांना सांगते की रेश्मा ची बॉडी ती पोलीसांच्या हवाली करणार आहे .
Pages