भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या कडे काल फुंतरू महाराजांनी मधमाशी खाल्ली, आणि ते खाण्याच्या नादात असे प्रताप केले सगळं तोंड वगैरे सुजउन घेतले आहे पण त्याला काही फरक पडला नाही मग नेली स्वारी डॉक्टर काकांकडे आणि केले सोपस्कार सगळे.... बहुधा चव आवडली असेल मधमाशीची मुर्खाला.... आम्हालाच टेन्शन हा आपला खाऊन मस्त बाबांजवळ झोपून गेला
Funtru-1.jpeg

अरर बिचारा, कसला कोकरू झालाय
दुखत असणारे
आमच्या बाळाने खूप लाड करून घेतलेले असा उद्योग झालेला मागे तेव्हा, सेम असेच सुजलेला तोंड त्याचा

ओडू बाळाची मज्जा
सध्या पोराची परीक्षा पहिल्यांदाच ऑफलाईन असल्याने त्याला शाळेत सोडायला जात आहे
सोबत ओड्या येतोच, आणि तिकडे गेल्यावर सगळ्या वर्ग मित्र मैत्रिणींनी गराडा घातला अय्या ओडीन आलाय म्हणून
झुम क्लासेस मुळे तो सॉलिड फेमस आहे
मग काय चिरंजीव सेलिब्रिटी असल्याच्या थाटात वावरले, आणि इतका शिष्टपणा केला ना कारट्याने
काही जणांनी शेकहॅन्ड करून बेस्ट लक घेतलं, मग सगळे मला पण मला पण म्हणून मागे लागले
तर ठराविक जणांवरच कृपा, बाकीच्याकडे बघत पण नव्हता
म्हणलं आतापासूनच प्रसिद्धी चे परिणाम दिसू लागलेत Happy

मग काय चिरंजीव सेलिब्रिटी असल्याच्या थाटात वावरले, आणि इतका शिष्टपणा केला ना कारट्याने>> अगदी अगदी.

आमच्या कडे एकतर बुटके असल्याने व त्यात एका डोळ्यात फूल पडले असल्या ने धड काही दिसत नाही. त्यात आमचा इतरां च्या बाबतीत डोंट
एंगेज विथ हुमन्स अशी पॉलीसी आहे. ( मुंबईतल्या नकचढ्या बाया आणि आगाउ पोरे उद्धट बाप्ये!!! हवेत कोणाला हा पूर्वग्रह)

तर परवा संध्याकाळी वॉकला गेलो. एक कार थांबली आता त्यातला उ बा येउन हटाइथून म्हणून शिव्या घालेल म्हणून खांबा खांबा मागून दुरून निघालो तर नेमकी एक गोडुली मुलगी येउन कॅन आय पेट धिस डॉग वगिअरे एकदम फुल्टू. आय आल्सो हॅव पपी. मग मी पण शुध्ह
इंग्रजीत तिची चौकशी केली कुत्र्याचे नाव सांगितले व आई समोर मुलीचे पण रास्त कौतूक केले.

ऐसा भी होता है म्हणून पुढे चालू लागलो.

काल असेच लिफ्ट मधून बाहेर पडलो तर खेळून परत जाणार्‍या गोडुल्या मुली दह पंधरा मिनिटे स्वीटीच्या मागेच. नाव काय कॅन आय पेट.
ह्याव अन त्या व एकीने बघून सांगितले शी हॅज ब्लू आईज!! ते आंधळे होत चाललेले डोळे आहेत हे काही मला सांगवेना. ही सर्व मुले आता लॉक डाउन मध्ये मोठी व उंच झालेली आहेत. माझ्या सारख्याला इतका जनसंप र्क म्हणजे फारच झाला. देवदूत भेटल्याचेच फीलिन्ग येते मुलांना बघितले की.

नेटफलिक्स वर Rescued by Ruby
नावाचा सुंदर चित्रपट पाहिला
एकदम मस्त आहे बॉर्डर कुली भुभु वरचा

आमचं बाळ पण आलं मागच्या आठवड्यात , say hi to ऑस्कर देशपांडे !
ऑस्करचं इन्स्टाग्रॅम : https://instagram.com/oscar_thecavapooboy?utm_medium=copy_link

9D1DBE5B-E3C0-4BD0-B0D2-B7ACA919BA30.jpeg09D6A728-AF33-4D40-99EF-97CF77942CF6.jpeg
ब्रीड् कॅव्हॅपु (cavapoo) , Its a designer mix breed : Cavalier King Charles X Toy Poodle .
Hypoallergenic, no shedding and most amazing coat !
We are obsessed !
MT कडून परत आल्या नंतर माउवीच्या प्रभावाने हळुहळु मन बनत गेलं आणि मग सर्च सुरु केला, इथल्या सँटा बारबराच्या ब्रीडर कडे ऑस्करची आई प्रेग्नंट असतानाच नंबर लावला, मला कॅरॅमल ब्राउन (टेक्निकली रुबी रेड ) विथ व्हाइट अस्साच कॅव्हॅपु हवा होता, ऑस्करच्या आईने दिला २ महिन्यांच्या वेटिंग टाइम नंतर !
(माउवीच्या प्रेमा मुळे मला दररोज कुत्र्यांचीच स्वप्नं पडत होती, एकदा एका स्वप्नातल्या कॅरॅमल ब्राउन पपीने वाकडी मान करत ‘मम्मा’ अशी हाक मारली.. त्यामुळे असाच डॉग हवा हे पक्कं केलं )
ऑस्कर ५ दिवसाचा असताना जाऊन बुक केला आणि बरोब्बर आठ आठवड्याचा झाल्यावर वाजत गाजत घरी आला, गेले आठ दुवस नुसती धम्माल .. शहाणं बाळ आहे , डे १ पासून क्रेट ट्रेन झाला आणि डे ३ पासून बेल वाजवून पॉटी ट्रेन्ड !
तसा वेडा पण आहे Proud खाण्याचे नखरे करतो, बेबी टिथ येत असल्यामुळे nipping issues आहेत पण MT च्या मार्गदर्शन आणि दररोज फेस टाइम मुळे होतोय मॅनेज !

अरे कसलं गोंडस आहे हे
भुभु परिवारात स्वागत
अजून एक लाडोबा Happy

आता लवकरच ऑस्कर च्या गंमती जमती वाचायला मिळणार

खूप खूप अभिनंदन

Hearty congratulations on baby. keep all your expensive shoes locked up .

अग्गं बै कसलं गोडुलं प्रकरण आहे हे ! डोळे तर कातील क्यूट एकदम.! हाय ऑस्कर देशपांडे!

माबो भुभू माऊ मंडळी गटगं चालू करायची का आता.. Wink

कुत्र्यांची सौंदर्य स्पर्धा फॅन्सी ड्रेस तर नक्की घेता येइल बघा घ्या कोणीतरी पुढाकार. फोटो पोस्ट करायचे.

सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी हे प्राण्यांचे संत आहेत. आपल्याकडे संत एकनाथ. गाढवाला पाणी देणा रे हेच ना . आश्कू फारच ग्लॅम आहे.

Pages