Submitted by सुप्रिया जाधव. on 10 November, 2020 - 10:19
मला माझ्याहुनीही जाणतो तो की कशी आहे
कशाला सांगता आहात त्याला ही अशी आहे
कधी वटपौर्णिमा असते कधी धरते निरंकारी
नको मागूस काही आजही एकादशी आहे
तुझ्या गरजा तुझ्या इच्छाच शिरसावंद्य मानाव्या ?
तिच्या ती व्यक्त करते फक्त अन पडते फशी आहे
तिच्या लवचीकतेची थोरवी ती काय वर्णावी ?
भुकेला माय असणारी, निजेला उर्वशी आहे
नसेना का जगाला, प्रश्न तो इतका गहन नाही
तिची किंमत तिलासुद्धा कुठे रे फारशी आहे
तिचे ते हुंदके दबके तिचे ते कोरडे डोळे
पुराव्याला तुझ्यापाशी तुझी ओली उशी आहे
स्वतःच्या जन्मदात्याच्या घरी ठरते सदा उपरी
मुलांना जन्म देते त्या घरीही कसनुशी आहे
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर!
सुंदर!
छान आहे.
आई ग्ग!! शेवटचा शेर
आई ग्ग!! शेवटचा शेर
आवडली.
आवडली. छान आहे

तिची किंमत तिलासुद्धा कुठे रे फारशी आहे..
सगळेच शेर सरस ...... निशब्द !
सगळेच शेर सरस ...... निशब्द !
सगळ्यांना मनापासुन धन्यवाद
सगळ्यांना मनापासुन धन्यवाद
सुप्रिया ताई तुम्ही एकमेव
सुप्रिया ताई तुम्ही एकमेव आहात ज्यांच्या काही गझल/ कविता माझ्या निवडक दहात आहेत.
जास्त कळत नाही पण तुमच्या बऱ्याच कविता/गझल मनाला भिडतात हे नक्की.
खूप छान.
खूप छान.
गझल सौन्दर्य काही कळत नाही पण
गझल सौन्दर्य काही कळत नाही पण हीचा अर्थ कुठेतरी आतपर्यंत पोचला.
स्वतःच्या जन्मदात्याच्या घरी ठरते सदा उपरी
मुलांना जन्म देते त्या घरीही कसनुशी आहे >>> अगदी अगदी
सगळ्यांचे मनापासुन आभार
सगळ्यांचे मनापासुन आभार
VB आणि वर्णिता विशेष
लोभ कायम असाच राहो
खूप खूप आवडली.... अप्रतीम गझल
खूप खूप आवडली.... अप्रतीम गझल
खूपच परिणामकारक मांडणी.
खूपच परिणामकारक मांडणी. शब्दप्रभुत्व खरेच वाखाणण्याजोगे आहे.
वा खुपच छान
वा खुपच छान