पालक चकली (फोटो-विडिओ सोबत)

Submitted by डीडी on 25 October, 2020 - 05:25
palak-chakli
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
  • पालक - ८-१० पानं
  • तांदूळ पीठ - २ कप
  • बेसन - पाव कप
  • उडीद डाळ पीठ - पाव कप
  • मूग डाळ पीठ - पाव कप
  • मैदा - १ कप
  • दालचिनी - १-२ काड्या
  • काळी मिरी - १/२ टीस्पून
  • जिरं - १ टीस्पून
  • धणे - १/२ टेबलस्पून
  • हिंग - पाव टीस्पून
  • ओवा - १ टीस्पून
  • तीळ - १ टेबलस्पून
  • दही - २ टेबलस्पून
  • तूप - ३ टेबलस्पून
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल 
क्रमवार पाककृती: 

काही दिवसापूर्वी माझ्या सौच्या पणजीआजीने दिलेल्या कृतीने हि चकली करून पहिली. मुलाला खूप आवडली. या वेळी पुन्हा करताना व्हिडीओ केला.
इकडे भाजणी सहसा मिळत नाही म्हणून यावेळी पीठं आणि मसाला भाजून पीठ तयार केलं. छान झाली.

पालकाची पानं स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या.
एका पॅनमध्ये तांदूळ पीठ २ मिनिटं मंद आचेवर परतून एखाद्या ताटात/परातीत काढा.
पॅनमध्ये बेसन, उडीद डाळ पीठ, मूग डाळ पीठ एकत्रित ४ ते ५ मिनिटं मंद आचेवर परता आणि तांदूळ पिठात एकत्र करून थंड होऊ द्या.
पीठं पूर्ण थंड झाली की त्यात मैदा घालून छान एकत्र करून घ्या. 
पॅनमध्ये दालचिनी, मिरी, जिरं आणि धणे २ ते ३ मिनिटं मंद आचेवर भाजून घ्या आणि पूर्ण थंड झाला की ग्राइंडर मध्ये घालून बारीक वाटून घ्या. 
वाटलेला १ टेबलस्पून मसाला, हिंग, तिखट, पिठीसाखर, ओवा, तीळ आणि मीठ पिठात घालून, एकत्र करा.  (मी इथे मसाला मिक्सरला वाटला जावा म्हणून थोडा जास्त केलाय. उरलेला मसाला इतर भाजी/आमटीत वापरता येऊ शकतो) एखाद्या पळीमध्ये तुपाचा मोहन करून पिठात घाला आणि मिश्रण एकत्र करा. 
पालक बारीक चिरून पीठात घाला. 
पीठात दही घालून पीठ कालवा.
थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून थोडा वेळ ठेवून द्या.
चकली पात्रात पीठ घालण्या आधी पीठाला तेलाचा हात लावून पीठ मळा. 
चकली पात्रात पीठ घालून चकल्या पाडा आणि गरम तेलात गोल्डन ब्राऊन टाळून काढा.  

माहितीचा स्रोत: 
पणजीआजी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान पाकृ. मला वाटलेलं हिरवी शेड येईल चकलीला. दिवाळी आलीच आहे जवळ. वरचं फोटो प्रेझेन्टेशन ही देखणं आहे.

खूप खूप आभार, तेजो, सीमंतिनी, अस्मिता आणि मानव!
मानव, default template तसंच आहे, customised करायचं झालं तर खूप efforts आहेत.. पण आपली सूचना लक्षात आली, बघू कसं जमतंय. धन्यवाद!

चकली मस्त . पिठे भाजून घ्यायची युक्ती नवीनच कळली. चकली मस्त दिसतेय.
व्हिडियो भन्नाट.
दगडी खलबत्त्यात लवंगा कुटल्या का? लिखित कृती आणि सबटायटल्स दोन्हीत लिहायचं राहिलंय.

धन्यवाद अंकु, नविना, जाई, भरत, किल्ली.. खूप छान वाटलं इतक्या छान प्रति वाचून..! Happy

दगडी खलबत्त्यात लवंगा कुटल्या का? लिखित कृती आणि सबटायटल्स दोन्हीत लिहायचं राहिलंय. >> भरत, नाही.. हिंग आहे आणि caption आहेत त्याला.. बहुतेक caption थोडं आधी हवं होतं.. इतक्या बारकाईने व्हिडीओ पाहिलात हे बघून खूप आनंद झाला.. खूप खूप आभार..