सगळ्यात आधी सांगायचे म्हणजे मी इथे जो मुद्दा/प्रश्न मांडते आहे तो १००% खरा आहे. धाग्यावरती रिप्लाय वाढावेत किंवा बाकी काहीही हेतू नाही. आता सरळ मुद्याला येते. गेली १५ वर्षे हे नेहमीच घडत आलेले आहे आणि आता त्यामुळे डिप्रेशन,चिडचिड, वाढत जातंय. आमच्या कडे म्हणजे (होणाऱ्या सासरच्या घरी ) एकही काम मार्गी लागत नाही. सासरे नाही आहेत सासू, नवरा (होणारा) आणि त्याचा मोठा भाऊ घरी असतात. सगळे उच्च शिक्षित आहेत. बिझनेस करण्याकरीता सगळे करून झाले. मेहनत, खरेपणा हेच आता भोवती आहे असे वाटते आहे. सासरचे नाव आमच्या शहरात प्रसिद्ध आहे राजकारणात आहेत सगळेजण. सासू ला पटले नाही म्हणून लहानपणिच वेगळे झाले. त्या आडनावाचा reference सुद्धा हे लोक वापरात नाही जेंव्हा कि तसे वापरले तर एकही काम नाही होणार असे राहणारच नाही . पण सज्जन असून सुद्धा एकही काम बरोबर हवे तसे होत नाही. शेवटच्या क्षणी कुठे माशी शिंकते देव जाणे. बरं देवाचे सुद्धा करतात. जी लोकं खोटी काम करीत आहे ते पुढे चालले आहे आणि आम्ही मात्र जिथे आहे तिथेच. काय करावे हे नं समजून आता शेवटचा पर्याय म्हणून लिहिते आहे.
मदत हवी आहे
Submitted by kalyanib on 21 October, 2020 - 05:37
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुमचं लग्न पंधरा वर्षांपासून
तुमचं लग्न पंधरा वर्षांपासून ठरलेलं आहे???
सासू ला पटले नाही म्हणून
सासू ला पटले नाही म्हणून लहानपणिच वेगळे झाले. ... Kahitari गफलत होतेय का?
मुलांच्या लहानपणी म्हणायचे
मुलांच्या लहानपणी म्हणायचे असेल हो
मला नक्की कळलंच नाहीये समस्या
मला नक्की कळलंच नाहीये समस्या काय आहे ते
सीरीयसली..तुम्हाला काय
सीरीयसली..तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि काय मदत हवी आहे काही कळलंच नाहीए.
मला वाटते कल्याणी मॅडम आधी
मला वाटते कल्याणी मॅडम आधी पासून त्रासलेल्या आहेत. आणि आता त्यांच्या होणारया सासरचा बिझनेस लॉस मध्ये आहे..म्हणून त्यांची चिडचिड होतेय कि हे सगळे भोग आपल्यचं वाट्याला का ?
मला हा धागा म्हणजे पछाडलेल्या
मला हा धागा म्हणजे पछाडलेल्या धाग्याचे परिणाम वाटतोय
मला कळले ते एवढे -
मला कळले ते एवढे -
सासरचे घराणे शहरात मोठे नामवंत आहे, राजकारणात आहे. पण इतरांशी न पटल्यामुळे कल्याणीचे सासू सासरे घरातील इतरांपासून वेगळे झाले. आता सासरे नाहीत.
यांचे दिर व होणारा नवरा उच्चशिक्षित आहेत पण अजून नीट बस्तान बसले नाही. धंदा सुरू करून सासरचे आडनाव वापरले तर कामे भराभर होतील पण यांना पटत नाही.
एकूण या सगळ्या स्थितीमुळे कल्याणी यांची चिडचिड होतेय. त्यांना उपाय हवाय.
आता काय उपाय सुचवणार?
उच्चशिक्षित आहेत आणि धंदा जमत नाही तर नोकरी बघा.
शहर सोडून दुसरीकडे सेटल व्हा.
लग्न अजून झाले नसेल तर फेरविचार करा.
कोणीतरी करणी केलेली दिसते.
कोणीतरी करणी केलेली दिसते.
अहो वीरू असे काही नस्तय ओ..
अहो वीरू असे काही नस्तय ओ.. चुकीच्या वेळी चुकीचे निर्णय घेतले कि लॉस हा ठरलेलाच आहे..
मला तरी राहुल गांधींचा आयडी
मला तरी राहुल गांधींचा आयडी वाटत आहे
>> सज्जन असून सुद्धा एकही काम
>> सज्जन असून सुद्धा एकही काम बरोबर हवे तसे होत नाही....जी लोकं खोटी काम करीत आहे ते पुढे चालले आहे आणि आम्ही मात्र जिथे आहे तिथेच.
Ok. मला वाटतेय हे त्यांचे problem statement आहे
अहो वीरू असे काही नस्तय ओ.. >
अहो वीरू असे काही नस्तय ओ.. >> एकाच वेळी इतकी संकटं!!
कधी सिधी उंगली कधी तेढी
कधी सिधी उंगली कधी तेढी उंगली..हाकानाका
वीरू देव परीक्षा घेतोय
वीरू देव परीक्षा घेतोय म्हणायचे .. देवाला सांगायचे मी अभ्यास करून पास होणार आणि ते हि नाही जमले तर कॉपी करून तरी पास होणार.. पण पास तर नक्कीच होणार..
होऊ घातलेल्या सासरच्या घरी
होऊ घातलेल्या सासरच्या घरी आधीच एवढे प्रॉब्लेम्स असतील तर आत्ता लगेचच लग्न करुन अजुन प्रॉब्लेम्स वाढवून नयेत... नाही म्हणजे धंदा, नोकरी, शेती, राजकारणात चांगलं बस्तान बसल्यावर लग्न केलेलं बरं...!
डी जे तुम्ही म्हणता ते खरं
डी जे तुम्ही म्हणता ते खरं आहे. पण कधी कधी हा हि प्रश्न येतो कि किती पर्यंत थांबायचे ..आणि खरंच थांबायचे आहे कि.. दुसरी वाट धरायची.
कधी हा हि प्रश्न येतो कि किती
कधी हा हि प्रश्न येतो कि किती पर्यंत थांबायचे ..आणि खरंच थांबायचे आहे कि.. दुसरी वाट धरायची. >> तेच तर म्हणतोय मी. १५ वर्ष म्हणजे १ तपाहुन जास्त काळ झाला. आणि इतकी वाट पाहुनही समस्या कमी होत नसतील तर दुसरी वाट पकडुन नव्याने सुरुवात केलेली बरी.
हो.. श्रवु अन वीरु तुम्ही
हो.. श्रवु अन वीरु तुम्ही म्हणता तेही बरोबरच आहे.
बघा, माबोकर कधीच शहाणे होऊ
बघा, माबोकर कधीच शहाणे होऊ शकत नाहीत.
हेच शिकलात काय पछाडलेल्या धाग्यावरुन, चुक तुमचीच अन मग ऊगाच धागाकर्त्यांना नावे ठेवता
हे बघ व्ही बी.. आम्ही आमची
हे बघ व्ही बी.. आम्ही आमची वैचारिक पातळी तपासून बघतोय..कधी काळी अशी वेळ आलीच तर काय करायचे..
आपण काय विचार करू शकतो.. हे
आपण काय विचार करू शकतो.. हे आपल्याला कळले कि निर्णय घायला सोपे जातात..
हम्म
हम्म
मी पण करेन कदाचित, पण इतक्या लवकर नाही
व्ही बी आता तू काहीच विचार
व्ही बी आता तू काहीच विचार करू नकोस.. फक्त विश्रांती घे.. आणि आनंदी आनंद गडे राहा..
धन्द्यात जम का बसला नाही याची
धन्द्यात जम का बसला नाही याची व्यावहारिक कारणं शोधा. ती दुरुस्त करता येण्यासारखी असतील तर चर्चा करून प्रयोग करायला हरकत नाही. जर तसे नसेल तर वेगळ्या वाटा शोधा. जर इथेच लग्न करायचे पक्के ठरले असेल, तर तुम्ही आर्थिक द्रुष्ट्या सक्षम व्हा. पुढील वाटचालीस शुभेच्छा !
15 वर्षे हा कालावधी कुठला आहे
15 वर्षे हा कालावधी कुठला आहे?
होऊ घातलेल्या सासर च्या लोकांना सोसाव्या लागणाऱ्या त्रासाचा का यांच्या वैयक्तिक त्रासाचा
असा विचार करा तुमच्या पायगुणाने सगळं चांगलं होईल
सुनेची पावलं ही लक्ष्मीची पावलं असतात
अगदीच तसे काही नाही झालं तरी सासरच्यांना मानसिक आधार देण्याचे काम तर नक्की करू शकाल
आपल्यासोबत कोणीतरी खंबीरपणे उभे आहे ही भावना पण मानसिक बळ देते आणि कदाचीत सगळं एकदम चित्र पालटेल तरी
15 वर्षे हा कालावधी कुठला आहे
15 वर्षे हा कालावधी कुठला आहे?
Submitted by आशुचँप on 21 October, 2020 - 20:14
>>>
शाळेत असल्यापासून आणाभाका घेतल्या असण्याला वाव आहे.
तसे नसेल. होणाऱ्या नवऱ्याकडून
तसे नसेल. होणाऱ्या नवऱ्याकडून कळले असेल कि त्यांच्याकडे गेले १५ वर्ष सतत अडचणी येतात.
हल्ली एक धागा मागे पडायला लागला कि नवा असा धागा येतो ज्यावर शंका घ्यायला भरपूर वाव असेल. लोक सल्ले देतात, प्रश्न विचारतात, चौकशी करतात पण धागाकर्ता ढिम्म! मग लोक चेष्टा करतात, धागा विसरून आपापसात चर्चा करतात. दुसऱ्यांचे प्रतिसाद खोडून काढतात, परत चेष्टा करतात. मग कंटाळतात आणि धागा थंड पडतो.
तेवढाच कोरोनाचा विसर पडातो..
हल्ली एक धागा मागे पडायला लागला कि नवा असा धागा येतो ज्यावर शंका घ्यायला भरपूर वाव असेल. लोक सल्ले देतात, प्रश्न विचारतात, चौकशी करतात पण धागाकर्ता ढिम्म! मग लोक चेष्टा करतात, धागा विसरून आपापसात चर्चा करतात. दुसऱ्यांचे प्रतिसाद खोडून काढतात, परत चेष्टा करतात. मग कंटाळतात आणि धागा थंड पडतो.>>
तेवढाच कोरोनाचा विसर पडतो.. ताजंतवानं वाटतं..
अशा धागाकर्त्यांना माबो तर्फे कोविड योद्धा धागाकर्ते पुरस्कार द्यायला हवा..!
कोविड योद्धा धागाकर्ते>>
कोविड योद्धा धागाकर्ते>>
Pages