टाकाउतून उपयोगी, मास्कपट्टी.
( D I Y . बिनशिवणकामाचा)
रुमालाची किंवा त्या मापाच्या ( १८ इंच) कोणत्याही कापडाची त्रिकोणी घडी करून नाकातोंडावर बांधली की सोपा मास्क तयार होतो. शिवणकाम नको काही नको.
पण एक अडचण आहे म्हणजे नाकाच्या बाजूने पोकळ जागा राहते. रुमाल घट्ट बांधला तर नाक चेपते. तरीही थोडी हवा जातेच. चष्मा असल्यास काचांवर वाफ धरते.
त्यासाठी एक प्लास्टिकचा तुकडा बनवला. तो कोणत्याही रुमालाएवढ्या कापडात बांधून मास्क तयार होतो. फोटोत तो वरती ठेवलेला दाखवला आहे पण आत घडीमध्ये ठेवून नाकावर येईल असा धरून रुमाल बांधायचा.
फोटो १
हार्पिकची बॉटल कापून बरेच तुकडे मिळतील. जूनी सुरी गरम करून प्रथम बॉटल कापली. मग छोटे तुकडे कापले. त्याच्या खडबडीत कडा साफ केल्या. दोन्ही कडेला जे दोन भाग वळवले आहेत ते मेणबत्तीच्या ज्योतीच्या बाजूस धरून वळवून पाणी ओतले की वाकडे राहतात. ग्यासवर करताना जरा उंचावर फिरवून नरम झाल्यावर बाजूला घेऊन वळवता येतील. पण पेटणार नाही याची काळजी घेणे.
फोटो २
फोटो ३
फोटो ४
____________________________________
हा धागा आणि फोटो माझे आहेत.
प्रताधिकारमुक्त ठेवत आहे.
अन्यत्र प्रकाशित नाही.
- Srd -
छानच !
छानच !
सुंदर प्रयत्न. परंतु सतत उघड
सुंदर प्रयत्न. परंतु सतत उघड बंद करायला गैरसोयीचा आहे. रुमाल सैल झाला तर प्लास्टिकचा आधार कमकुवत होऊन खाली पडू शकतो.
नाही हो. घडीत ठेवलेला तुकडा
नाही हो. घडीत ठेवलेला तुकडा अजिबात पडत नाही. डबल घडी करता येतेच. प्लास्टिक सैल होऊन फाकत नाही.
अगोदर स्टीलचे टंग क्लीनर कापून वापरायचा विचार होता. पण ते टोचेल आणि करायलाही सोपे नाही.
छान आहे युक्ती.
छान आहे युक्ती.
मला नाही कळलं, कसा वापरायचा?
मला नाही कळलं, कसा वापरायचा?