Submitted by सुप्रिया जाधव. on 15 October, 2020 - 03:34
आधी होती बुजरी मग थाटात मिरवली
लग्न लागले आयुष्याशी, व्यथा करवली !
गडगडले ढग त्वेषाने, फुटले कोसळले
लखलखणारी वीज मुक्याने कुठे हरवली ?
कानशिलावर बंदुक ठेवत काळ सरकला
ऐकुन माझे मी नियतीची खोड जिरवली
बाईच्या जातीला हे हे शोभत नाही
युगानूयुगे यादी होती तीच गिरवली
दुर्बळ होते तोवर मी आवडती होते
सक्षम झाल्यावर दुनियेने पाठ फिरवली
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अ प्र ति म !! सुप्रिया ताई
अ प्र ति म !! सुप्रिया ताई !!
प्रत्येक शेर आवडलाय ! शेवटचा तर मस्तच !
धन्यवाद अंजली
धन्यवाद अंजली