प्रोजेक्ट मधून रोल ऑफ होताना कसा attitude हवा ?

Submitted by ऱोहि on 15 October, 2020 - 03:20

कधी कधी असं होत कि manger खडूस असतो , कधी टीम mates भावखाऊ असतात . मी ज्या प्रोजेक्ट मध्ये assign झाले तेंव्हा तो ongoing प्रोजेक्ट होता. नव्या टीम मध्ये छोट्या छोट्या टीम झाल्या होत्या . सगळेच मला नवीन असल्याने कुणी KT प्रॉपर दिली नाही तरी मी तेंव्हा चालवूंन घेतले. बरेच जण prod चा ऍक्सेस असल्याने काही prod ला fail झालं तरी डिटेल्स द्यायचे नाहीत . मुळात माझा स्वभाव खूप बडबड करण्याचा नाहीये ,त्यामुळे खूप त्रास झाला .
लोक त्यांना assign केलेली कामे सुद्धा इतक्या भाव खाऊन करतात याचा राग यायचा. आता प्रोजेक्ट संपत आलाय सो मला release करत आहेत .
पण कुठेतरी back ऑफ the mind हि फीलिंग येतेय कि अजून चांगलं काम नक्की करू शकलो असतो आणि जे केलय त्याला highlight का नाही केलं

असो पण आता मॅनेजर आणि टीम lead चा प्रचंड राग येत आहे , असं वाटत आहे सांगावं सरळ कि हे सगळे कसे वागले आणि चॅट history टाकून द्यावी
पण कित्ती लिमिटेशन्स येतात आणि शेवटी छान छान बोलावं लागत

तुमचे काय अनुभव आहेत ?

Group content visibility: 
Use group defaults

असल्या गोष्टी मनावर घेऊ नयेत. जोपर्यंत आपण प्रोजेक्टवर असु तोपर्यंत आपण चांगले काम करुन ते वेळोवेळी हायलाईट करत रहावे. कोणी कसे वागावे हे आपल्या हातात आजिबात नसते त्यामुळे कुणी आपणाला कसलीच मदत केली नाही तरी आपली कामाची गरज ओळखुन मदत लागली तर त्या व्यक्तीला जरुर मेल टाकुन मदत मागावी. "बरं बाबा.. तु मोठ्या बापाचा..!" असा अ‍ॅटीट्युड ठेवून आपली कामे करुन्/करवून घ्यावीत.

टीम मेटस हे काहे आपले घरचे मेंबर्स अथवा पाहुणे राउळे नसतात त्यामुळे जेवढ्यास तेवढं ठेऊन आपला कार्यभाग साधावा. सर्वांशी चांगले संबंध ठेऊन प्रोजेक्ट मधुन रीलीज घ्यावे.. कारण आपणाला हेही माहीत नसतं की कोणता टीम मेंबर आपणाला आहे त्याच कंपनीत अथवा दुसरीकडे कधी भेटेल. शक्यतो सर्वांशी हसुन-खेळुन रहावे त्यामुळे आपली किंमत कमी होत नाही अन समोरचाही (कितिही अहंकारी असला तरी..!) आपणाला अडचणीत आणण्याचं टाळतो.

नवीन प्रोजेक्ट साठी शुभेच्छा..!!

डु नॉट बर्न ब्रिजेस. अजिबात मेल टाकू नका. उपयोग शून्य होइल पण मनस्ताप खूप होइल. दुसरं प्रॉजेक्ट मिळणे जड जाइल. डी जेंशी सहमत.

सगळेच मला नवीन असल्याने कुणी KT प्रॉपर दिली नाही तरी मी तेंव्हा चालवूंन घेतले >> हे कधीही कोणालाही नीट मिळत नाही. त्याकरता स्वतः प्रयत्न करावे लागतात. प्रश्न विचारणे तर आलेच पण जुने डॉक्युमेंटेशन शोधून वाचणे, शक्य असल्यास एण्ड यूझर्सशी बोलून ,त्यांचे काम ऑब्झर्व करून माहिती मिळवणे, टीममधले जाणकार लोक कोण ते ओळखून त्यांच्याकडून अनडॉक्युमेंटेड माहिती मिळवणे हे सर्व अपरिहार्य आहे .

केटी इज अ मिथ! डॉक्युमेंटेशन न करणे, कुणालाच काही धड माहित नसणे इज अ नॉर्म.
प्रश्न विचारणे, बोलत रहाणे, शोधत रहाणे, चुका करायला न घाबरणे आणि त्यातुन शिकत रहाणे हाच उपाय आहे. चांगल्या आयटी कंपनीत झटकन उत्तर देणे महत्त्वाचे असते. चुका असतील तर त्या सुधारता येतात. रादर चुका असणं अपेक्षित असते. उत्तरोत्तर सोप्या चुका न करणे येऊ लागते.
आपण दुसर्‍याला आऊट ऑफ द वे जाऊन मदत केली तर दुसरा आपल्याला करेल हे ही जाणून असा. मदत करायला कधीही हात आखडता घेऊ नका. आणि पटलं नाही तर फार काळ काढू ही नका. काडीमोड घेत रहा. मार्केट चांगलं असेल तर काडीमोड घेत रहावा (वै. म.)
मेधा +१
मी देसी कन्संल्टिंग कंपन्यात काम केलेलं नाही. प्रॉडक्ट कंपनीत काम केलेलं आहे. सो कंसल्टिंग असेल तर प्रतिसाद बाद समजावा.

>> काही prod ला fail झालं तरी डिटेल्स द्यायचे नाहीत <<
हा मॅनेजमेंट इशु आहे. तुमची कंपनी मोठी, वेल एस्टॅब्लिश्ड असेल तर प्रोसेस इज ब्रोकन; लहान असेल तर ग्रीनबॅक इशु आहे. इशु जेन्युइन असेल तर कंपनीत शाइन होण्याची हिच वेळ आहे. स्टार मेथड वापरुन एक क्रिस्प डेक मॅनेजमेंटला पाठवा. त्यावर अ‍ॅक्शन घेतली जाईल का नाहि हि पुढची बाब, पण तुमच्यात लिडरशीप क्वालिटि आहे याची ओळख मॅनेजमेंट्ला होईल. गुड लक...

स्टार मेथड वापरुन एक क्रिस्प डेक मॅनेजमेंटला पाठवा. त्यावर अ‍ॅक्शन घेतली जाईल का नाहि हि पुढची बाब, पण तुमच्यात लिडरशीप क्वालिटि आहे याची ओळख मॅनेजमेंट्ला होईल.
>>

बॉलिवूड स्क्रिप्टच की एकदम!

माझ्याबाबत सांगायचे झाल्यास मी ॲटीट्यूडच असा ठेवतो की मला कोणाच्या ॲप्रेसिएशनची गरज नाही. जी क्वालिटी माझ्यात नाही तिचे कोणी का कौतुक करावे आणि जी क्वालिटी माझ्यात आहे ती कोणी कौतुक न केल्याने नाहीशी होणार नाही. तरीही ती जगाला कळावे असे वाटत असेल तर लोकांनी कौतुक करण्याची वाट न पाहता सेल्फ मार्केटींग करावे.

बाकी जो व्यवसाय आपल्या पोटापाण्याचा असतो तिथे स्वत:ही ॲटीट्यूड दाखवू नये की दुसरयाचा ठेचायला जाऊ नये. पण याचा अर्थ लाचारसारखे राहावे असे नाही. कारण आपल्याला जॉबची जितकी गरज असते तितकीच कंपनीला आपली. कोणाच्या अध्यातमध्यात नसणारयाचा जॉब नेहमीच सुरक्षित असतो आणि आयुष्यही सुखकर Happy

तरी लाईफमध्ये थ्रिल हवे असल्यास स्वत:ची कंपनी काढावी, स्वत:चा बिजनेस सुरू करावा, पॉकेट मे रॉकेटसिंग बनावे. एखाद्या कंपनीत काम करून तेथील ऑफिस पॉलिटीक्सनध्ये थ्रिल वा ॲम्बिशन शोधण्यात काही मजा नाही. असे मला वाटते.

>>बॉलिवूड स्क्रिप्टच की एकदम!<<
बोले तो फँटसी? ये तुम्हारा तजुर्बा है, या सभी देसी आय्टि कंपनीमे बनियागिरी बरकरार है? कंटिन्युअस प्रोसेस इंप्रुवमेंट, फिडबॅक लूप मॅकनिझम वगैरा ये सब सिर्फ हव्वा... Happy

कन्सल्टन्सी मध्ये काम करू नये ( टीसीएस, इंफी, विप्रो वगैरे) पॉलिटिक्स बेकार असते आणि बिलिंग साठी काहीही करायला मागे पुढे बघत नाहीत,मग त्यात एखाद्याचे करियर किल का होईना...
प्रोडकत कंपनी पकडा...

कोणाच्या अध्यातमध्यात नसणारयाचा जॉब नेहमीच सुरक्षित असतो आणि आयुष्यही सुखकर >> सौ टके की बात..!

No one likes to listen to your problems.... Either go with the solutions of the problems you faced (as suggested by Raj) else सुमडीमे कलटी मार लो!!

DJ,सामो >> अगदी बरोबर , नक्की प्रयत्न करिन .
मेधा >> मला KT त्याने दिली ज्याला परफॉर्मन्स च्या issue मुळे release केलं होतं . माझं एक चुकलं , मी मेल वर communicate नाही केलं
अमितव >> consulting रे बाबा
राज >> मला असं वाटायचं कि मी issue create करेल असं होईल
ऋन्मेऽऽष >> सुरवात तर अशीच केली होती , पण कुणी च ऐकून घेतलं नाही , सगळ्यन्नाच त्यांची हवा करायची होती , इतकी कि एकदा मी अँप्रेसिएशन मेल मागितला तर मला २ दिवस सतत मेल राहिले Sad
मला याच कंपनीत २ वर्ष झाले DA (डिस्टिंक्ट अचिव्हर) मिळत होत .
पण हाच attitude thevnar आहे पुढे इव्हन इन life as वेल
स्वरुप >> नक्की नक्की
च्रप्स >> profile पाठवू का ? Happy

पण हाच attitude thevnar आहे पुढे इव्हन इन life as वेल
>>>>

शुभेच्छा,
आयुष्य सुद्धा क्रिकेटसारखे असते.
एखादा गोलंदाज छान लाईन लेंथ पकडून टिच्चून गोलंदाजी करत असतो. पण मध्येच समोरून एखादा तिरसट फलंदाज येतो आणि वेडेवाकडे फटके मारून त्याची लाईन लेंथ बिघडवतो. गोलंदाज मग अतिविचार करत वेगवेगळे प्रयोग करायला लागतो. आणि मग त्या गोलंदाजाची लयच जाते आणि सारेच त्याला झोडपू लागतात. आपण ती चूक करू नये. जर आपले वागणे योग्य असेल तर ते योग्यच आहे. नेहमीच मनासारखे रिझल्ट नाही मिळत. त्या दिवशी आपली लाईन लेंथ आपले विचार भरकटू नयेत याची काळजी घ्यावी. लाँग टर्मचा विचार करता यश नक्की पदरात पडतेच. कारण लाईफ ट्वेंटी-२० नाही तर टेस्ट क्रिकेट आहे.